शिवाजी महाराज चारोळ्या मराठी & हिंदी 2024 (100+ सर्वोत्तम चारोळ्या) | Shivaji Maharaj Charolya in Marathi | Shivaji Maharaj Charoli in Marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

Shivaji Maharaj Charolya in Marathi & Hindi | शिवाजी महाराज चारोळ्या मराठी & हिंदी – प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना माझा नमस्कार. मित्रहो, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जवळ आली आहे. सगळी कडे महाराजांच्या जयंती ची जंगत तयारी सुरू आहे.

आपण दरवर्षी 19 फेब्रुवारीला महाराजांची जयंती अगदी जल्लोषात साजरी करतो. आज आपण या लेखात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त अतिशय सुंदर चारोळ्या आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. महाराजांच्या जयंती निमित्त भाषण देताना आपल्याला श्रोत्यांकडून टाळ्यांचा कडकडाट ऐकून घ्यायचा असेल तर चारोळ्या शिवाय पर्याय नाही.

आज आपण या लेखात शिवाजी महाराज भाषण चारोळी मराठी आणि हिंदी भाषेत बघणार आहोत. या लेखात आपण 100+ अतिशय सुंदर चारोळ्या बघणार आहोत. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता चारोळ्याना सुरुवात करुया.

शिवाजी महाराज चारोळ्या मराठी | Shivaji Maharaj Charolya in Marathi

स्वराज्य घडवले शिवबांनी
मावळे होते साथीला
गर्व कधी नाय जातीचा
कारण
अभिमान आहे या मातीचा

भवानी मातेचा लेक तो,
मराठ्यांचा राजा होता,
झुकला नाही कोणासमोर,
मुघलांचा तो बाप होता..!

शब्दही पडतील अपुरे,
अशी शिवबांची किर्ती
राजा शोभून दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती

इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि
विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती.

आयुष्यष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे
मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे 
पण 350 वर्षानंतर ही रयतेच्या 
मनात राहणं हा कर्माचा भाग आहे!

निधड्या छातीचा
दनगड कणांचा
मराठी मनांचा
भारत भूमीचा एकच राजा

चमकतात आमच्या आज ही तेज
तलवारीच्या धारा,
दिशा बदलतो पाहुन आम्हालाहा वादळी वारा
मावळे आम्ही शिवरायांचे जगने आमचे ताठ,
आडवे जाण्याआधी विचार करा या मर्दमराठ्याशी आहे गाठ

तुमचे उपकार जेवढे मानाव
तेवढे कमीच आहे राजे ,
तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच …
आज आम्ही आहोत.
!! राजे वंदन ञिवार वंदन !

विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा
केला असा एक “मर्द मराठा शिवबा” होऊन गेला.

पिता शहाजी , माता जिजाबाईचे पुत्र महान |
देश-धर्माचे होते रक्षक ,भारत मातेची शान ||
स्वातंत्र्य व धर्म-संस्कृतीचे होते सुदृढ सेनानी |
कोण ते वीर , ज्यांची होती तलवार भवानी ||

करुनी तांडव जिंकु
आम्ही दिल्लीचे तख्त
कोण आम्हास अडविणार
मावळे आम्ही जन्मता: शिवभक्त…

हिंदवी स्वराज्याच्या
जन्म भूमीवर धर्मवीर कट्टर संभाजी राजे
भेटणार नाही, हिंदू-मराठा जात आमची
धर्माँतर आम्हां पटणार नाही,
टोपली वळून पोट भरु पण
कोणाखाली झुकणार नाही,
उपाशी पोटी मेलो तरी चालेल
पण कोणाखाली वाकणार नाही,
जातीसाठी खाऊ माती याचीच
आम्हाला जाण
आहे, नसानसात
शिवभक्ति आमच्या, आम्हाला हिंदवी
स्वराज्याचा अभिमान आहे.
जय जगदंब
!! जय शिवराय !!

ताशे तडफणार
ह्रदय धडकणार
मन थोडे भडकणार
पण या देशावरच काय
अख्याजगावर
19 फेब्रुवारीला भगवा झेंडा फडकणार

जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती
अरे मरणाची कुणाला भीती
आदर्श आमचे राजे शिवछत्रपती

एक राजा जो रयतेसाठी जगला
एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला
एक नेता जो लोकहितासाठी झटला
एक असामान्य माणूस ज्याने
गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला

रायगडी मंदीरी वसे माझा राया
चरणाशी अर्पितो अजन्म ही काया
जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती
प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया

उंच आकाशी झेप ज्ञानाची असेल तर,
गरुडासारखा बळ हवं.
दरीत झेप घ्यायची असेल तर,
नभाएवढं धाडस हवं.
पाण्यात उसळी घ्याची असेल तर,
माशासारखी कला हवी.
अन साम्राज्य निर्माण करायच असेल तर,
शिवबाचच काळीज हवं.

शिवबा शिवाय किंमत नाय….
शंभू शिवाय हिंमत नाय…
भगव्या शिवाय नमत नाय….
शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय
जय जिजाऊ जय शिवराय…..

शिवाजी महाराज चारोळी मराठी | छत्रपती शिवाजी महाराज चारोळी

माझ्या राजाला दगडाच्या,
मंदिराची गरज नाही..
माझ्या राजाला रोज,
पुजाव लागत नाही..
माझ्या राजाला दुध-तुपाचा,
अभिषेक करावा लागत नाही..
माझ्या राजाला कधी,
नवस बोलावा लागत नाही..
माझ्या राजाला सोने-चांदीचा,
साज ही चढवावा लागत नाही..
एवढ असुनही जे जगातील,
अब्जवधी लोकांच्या..
हृदयावर अधिराज्य,
गाजवतात असे एकमेव युगपुरुष..
॥ राजा शिवछत्रपती ॥

ज्या मातीत जन्मलो तीचा रंग सावळा आहे.
सह्याद्री असो वा हिमालय, छाती ठोक सांगतो 
“मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

कलम नव्हते कायदा नव्हता
तरीही सुखी होती प्रजा
कारण सिंहासनावर होता
माझा छत्रपती शिवाजी राजा

माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,
धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!

पापणीला पापणी भिडते
त्याला निमित्त म्हणतात…
वाघ  दोन पावलं मागे
सरकतो त्याला अवलोकन  म्हणतात…
आणि
हिंदवी स्वराज्याची स्थापना
करणाऱ्या  वाघाला 
छत्रपती शिवराय म्हणतात …

लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार,
महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार…

भगव्या रक्ताची धमक बघ,
स्वाभीमानाची आहे !!
घाबरतोस कुणाला वेड्या तु तर शिवबांचा
“वाघ” आहे

सिहांची चाल, गरुडाची नजर
स्त्रियांचा आदर , शत्रूंचे मर्दन
असेच असावे मावळ्यांचे वर्तन
हीच छत्रपती शिवाजी राजांची शिकवण.

मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा राजा
आजही गौरव गीते गाती
ओवाळुनि पंचारती
तो फक्त राजा शिवछत्रपती.

उंच आकाशी झेप ज्ञानाची असेल तर,
गरुडासारखा बळ हवं.
दरीत झेप घ्यायची असेल तर,
नभाएवढं धाडस हवं.
पाण्यात उसळी घ्याची असेल तर,
माशासारखी कला हवी.
अन साम्राज्य निर्माण करायच असेल तर,
शिवबाचच काळीज हवं.

इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
तलवारीच्या पात्यावर
माणुसकीच्या नात्यावर
प्रेम करणारा राजा
शिवछत्रपती

कर्तव्याची धार
स्त्रियांचा आदर
तलवारीचा वार
शत्रूंचा सहार
भवानी तलवार
शिवबा हाती

नको गाजू तलवार परक्याच्या दरबारी
तू राजा आहेस घे आकाश भरारी
दिन दलित दुबळ्यांचा हो कैवारी
फडकव पताका हिंदवी स्वराज्याची
घे प्रण हे शिवबा शिरावरी

शक्ती बुद्धी युक्ती
जनसेवेची भक्ती
राजा कसा असावा
जसा शिवछत्रपती

हिमालयाच्या उंचीलाही
थोडा वाटेल हेवा
छत्रपतीच्या स्वराज्याची
मी का नसेल ठेवा

शरीर माणसाचे, काळीज वाघाचे
हिच तर त्यांची अदा आहे
म्हणूनच तर अवघा महाराष्ट्र
माझ्या “शिवरायांवर” फिदा आहे.

लाख मेले तरी चालतील,
पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे
जय जिजाऊ जय शिवराय

घासल्याशिवाय धार नाही
तलवारीच्या पातीला
शिवरायांसारखे दैवत लाभले
महाराष्ट्राच्या मातीला

अरे फुलविला आमच्या रक्ताने
आम्ही स्वराज्याचा मळा
म्हणून म्हणतो मर्द मावळ्यांचा
नादच आहे लय खुळा

अरे हजार असतील धर्म
लाख असतील जाती
सर्वांना एकत्र गुंफणारा
एकच राजा छत्रपती…

शिवाजी महाराजांच्या चारोळ्या

लढण्याची धमक – शिवबा
तलवारीची चमक – शिवबा
गणीमी काव्याचे गमक – शिवबा
स्वराज्याची जनक – शिवबा

युगे युगे तुमचे गुण गाती
आजही अजरामर आहेत या जगती
क्षत्रिय कुलावतंस श्री राजा छत्रपती…

आले किती, गेले किती
उडून गेले भरारा
संपला नाही आणि संपणारही नाही
माझ्या शिवबांचा दरारा…

हिंदू धर्म राखिले,
स्वराज्य स्वप्न साकारीले…
गर्जुनिया केलासी स्वराज्य साजरा
छत्रपती शिवराया तुज मानाचा मुजरा…

वादळासारखे तुटून पडू आम्ही
समजू नका हवेचा झोका
शिवाजी महाराजांचे भक्त आम्ही
नाद कोणी आमचा करू नका…

भगव्या झेंड्याची धमक बघ
मारण्याची आग आहे
घाबरतोस काय कोणाला
येड्या तू शिवबाचा वाघ आहे…

जातीपेक्षा मातीला
आणि माती पेक्षा
छत्रपतींना मानतो आम्ही

राजे तुमच्या सावलीने
सूर्य ही झाकला असता
पाहुनी पराक्रम तुमचा
मुजऱ्याला चंद्र ही
वाकला असता…

जिजाऊ मातेचा लेख तो
मराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोर
मुघलांचा तो काळ होता..

स्वराज्य घडवले शिवबांनी
मावळे होते साथीला
त्रिवार करतो मुजरा
छत्रपती शिवरायाला…

रायगडी मंदिरी वसई माझा राया |
चरणाशी अर्पितो आजन्म ही काया ||
जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती |
प्रथम वंदितो मी छत्रपती शिवराया ||

पिढ्यांची गुलामी संपली
आणि सुखी झाली प्रजा
कारण सिंहासनावर बसला होता
माझा छत्रपती शिवाजी राजा…

किनाऱ्यांची किंमत समजायला
लाटांच्या जवळ जायला लागतं
पाण्याचे मोल कळण्यासाठी
दुष्काळात फिरावं लागतं
आणि शिवरायांचा लाख मोलाच
स्वराज्य समजण्यासाठी
मराठी असावाच लागतं..

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा
तो आपला शिवबा होता
जय शिवराय…

सह्याद्रीच्या कुशीतून
एक हिरा चमकला
भगवा टिळा चंदनाचा
शिवनेरीवर प्रकटला
हातात घेऊनी तलवार
शत्रू वर गरजला
महाराष्ट्रात असा एकच
शिवाजी राजा होऊन गेला

दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन !
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!
आणि
पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला तर
“शिवरायांचा मावळा” होईन!!

अंधार फार झाला,
आता दिवा पाहिजे,
राष्ट्राला पुन्हा एकदा,
जिजाऊंचा शिवा पाहिजे..

मूर्तीचे पावित्र्य तव राखिले
स्वराज्य स्वप्न तव साकारीले..
गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा
शिवराया तुज मानाचा मुजरा…

ना शिवशंकर.. तो कैलाशपती,
ना लंबोदर.. तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो
राजा शिवछत्रपती !!

भूमीवर अधिपत्य गाजविणारे
अनेक भूपती या जगती
जन्मले आणि मेले
परंतु करोडो हृदयांवर
अधिपथ्य गाजवणारे एकच
शिवछत्रपती अवतरले…

छत्रपती शिवाजी महाराज चारोळ्या मराठी | Shivaji Maharaj Charolya in Marathi

छ – छत्तीस हत्तींचे बळ असणारे
त्र – त्रस्त मोघलांना करणारे
प – परत न फिरणारे
ति – तिन्ही जगात जाणणारे
शि – शिस्तप्रिय
वा – वाणिजतेज
जि – जिजाऊंचे पुत्र
म – महाराष्ट्राची शान
हा – हार न मानणारे
रा – राज्याचे हितचिंतक
ज – जनतेचा राजा

इतिहासाच्या पानावर
ज्याने नाव आपले कोरले
जनतेच्या मनावर
जाने स्वराज्याचे स्वप्न रंगविले
भगवा झेंडा हातात घेऊनी
खिंड त्याने लढवली
आपले जीवन अर्पण करून
त्याने स्वराज्याची निर्मिती केली.

राजे तुम्ही होता म्हणून दिसले
मंदिरांना कळस
आणि दारात तुळस
राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले
सुहासिनींचे कपाळ आणि
हिंदवी स्वराज्याची सकाळ
!!जय भवानी जय शिवाजी!!

कोटी देवांची अब्जावती मंदिरे असताना
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर
अधिराज्य करतात
त्यांना “छत्रपती शिवाजी महाराज” म्हणतात

स्त्रियांचा सन्मान करी
स्त्रियांचा राखी मान
जिजा माऊलीने जन्म दिला
सर्व माऊलींना शिवबांचा अभिमान

झंझाविला भगव्याचा समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही
घडविले श्री चे स्वराज्य तुम्ही
ऐसे श्रीमंत योगी
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत
श्री राजा छत्रपती तुम्ही

राजे आजवर असंख्य जाहले,
पण, शिवबा सारखा कुणी न जाहला,
गर्व असे आज महाराष्ट्राला
एकच राजा तो शिवबा जाहला…

गगनभेदी नजर ज्यांची,
पहाडासम विशाल काया
धगधगता सूर्य झुकतो,
वंदितो प्रभू शिवराया…

प्रजेला ज्यांनी समजले मायबाप,
मात्र शत्रूंचा झाला थरकाप
स्त्रीला दिला मातेचा सन्मान,
छत्रपती शिवरायांचा आहे,
आम्हाला अभिमान…

स्वराज्यावरती सदा मोगल, आदिलशाहीच्या वाकड्या नजरा !
पाडाव केला त्यांचा त्या शेर शिवराजांना माझा मानाचा मुजरा !!

आयुष्य वेचले रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी!
झटत राहिलात रयतेचे स्वराज्य उभारणीसाठी !
रयतेला स्वातंत्र्याचा सूर्य दाखवणारे तुम्ही शिवछत्रपती !
जयंती निमित्त मनोभावे वंदन करतो कोटी कोटी !!

स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूला नडला होता !
प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाला फाडला होता !
पुण्यात शाहिस्तेखानाला पुरता कोंडला होता !
पुरंदरच्या पायथ्याला मिर्झा राजांशी चातुर्याने लढला होता !
आग्र्याला जाऊन खुद्द औरंगजेबाला भिडला होता !
महाराष्ट्राच्या मातीत असा युगपुरुष शिवबा राजा घडला होता !

अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तळपत होती
शिवरायांची तलवार
स्वराज्य स्थापन करून बनले
सर्वसामान्य रयतेचे आधार
आदर्श महाराष्ट्र घडविणारे
तेच खरे शिल्पकार…

पिढ्यानपिढ्याची गुलामगिरी संपली
आणि सुखी झाली प्रजा !
कारण सिंहासनावर बसला होता
छत्रपती शिवाजी राजा !

शिवाजी महाराज चारोळ्या हिंदी | Shivaji Maharaj Charolya in Hindi

पाणी पीना है तो मटकी से पियो,
ग्लास मे क्या रखा है !
अरे प्यार करना है तो
शिवाजी महाराज से करो
ये लडकियों में क्या रखा है !!

शिवाजी वीर मराठा सब कहे,
सुने शिवाजी नाम !
लोहा मुघलो से लिया
बहुत बढा ये काम !!

कई किलो को जीत कर,
दिया उसे संदेश !
ताकत हम मे कम नही,
छोडो मेरा देश !!

जुने दुनिया झुककर
करती है सलाम
शिवाजी राजे भोसले है
उनका नाम !!

बहादुरी मेरी आत्मा है !
विचार और विवेक मेरी पहचान है !
क्षत्रिय मेरा धर्म है !
छत्रपती शिवराय मेरे भगवान है !
हा मै मराठी हू !
!!जय शिवराय!!

वे ही जीवित थे
वह एक जीवित महाराष्ट्र था
लेकिन अपने ही परिवार को भूल जाना
जनता से हाथ मिलाते हुए
यह आपका “शिवा” था
!! जय शिवराय!!

सत्य और धर्म की राह पर चलना
हमे शिवछत्रपतीने सिखाया था !
उनके आगे मुगल बादशहा ने भी
आपणा सर झुकाया था !!

भारत मा का अनमोल संतान
जिसने बढाई देश की शान
वह थे शिवाजी राजे योद्धा महान !

शहाजी राजे जिनके पिता
राजमाता जिजाऊ जिंनकी माता!
वह है शिवाजीराजे भोसले
हम सबके भाग्यविधाता !!

शिवाजी ने सौगंध दिलाई,
इस माटी के लिए हम मर मिटे !
शीश कट जाये मंजूर है,
मगर मुघलो आगे शिश ना झुके !!

हम शेर है,
शेरो की तरह हसते है !
क्योकि हमारे दिलो मे,
छत्रपती शिवाजी बसते है !!

देश के अभिमान शिवाजी
राष्ट्र की शान शिवाजी
स्वराज्य का दुसरा नाम शिवाजी
ओर हर हिंदू की पहचान
छत्रपती शिवाजी !!

सारांश | शिवाजी महाराज चारोळ्या मराठी & हिंदी | Shivaji Maharaj Charolya in Marathi & Hindi

शिवाजी महाराज चारोळ्या मराठी & हिंदी | Shivaji Maharaj Charolya in Marathi & Hindi – मित्रांनो वरील लेखात आपण आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारोळ्या मराठी आणि हिंदी भाषेत बघितल्या. येणाऱ्या 19 फेब्रुवारी च्या शिवजयंती निमित्त चारोळ्या आपण बघितल्या. वरील लेखात आपण 100+ शिवजयंती चारोळ्या बघितल्या.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपल्या गरजू विद्यार्थ्यांना, मित्रांना ह्या शिवजयंती चारोळी नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

शिवाजी महाराज चारोळ्या मराठी | Shivaji Maharaj Charolya in Marathi शिवाजी महाराज चारोळी मराठी | छत्रपती शिवाजी महाराज चारोळी शिवाजी महाराज चारोळ्या मराठी | Shivaji Maharaj Charolya in Marathi शिवाजी महाराज चारोळी मराठी | छत्रपती शिवाजी महाराज चारोळी शिवाजी महाराज चारोळ्या मराठी | Shivaji Maharaj Charoli in Marathi शिवाजी महाराज चारोळी मराठी | छत्रपती शिवाजी महाराज चारोळी शिवाजी महाराज चारोळ्या मराठी | Shivaji Maharaj Charolya in Marathi शिवाजी महाराज चारोळी मराठी | छत्रपती शिवाजी महाराज चारोळी शिवाजी महाराज चारोळ्या मराठी | Shivaji Maharaj Charoli in Marathi शिवाजी महाराज चारोळी मराठी | छत्रपती शिवाजी महाराज चारोळी

शिवाजी महाराज चारोळ्या मराठी | Shivaji Maharaj Charolya in Marathi शिवाजी महाराज चारोळी मराठी | छत्रपती शिवाजी महाराज चारोळीशिवाजी महाराज चारोळ्या मराठी | Shivaji Maharaj Charolya in Marathi शिवाजी महाराज चारोळी मराठी | छत्रपती शिवाजी महाराज चारोळीशिवाजी महाराज चारोळ्या मराठी | Shivaji Maharaj Charolya in Marathi शिवाजी महाराज चारोळी मराठी | छत्रपती शिवाजी महाराज चारोळी

Leave a Comment