अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान, असा करा क्लेम | Rabbi Pik Vima Claim 2022-23 | पिक विमा क्लेम कसा करावा?


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान, असा करा क्लेम | Rabbi Pik Vima Claim 2022-23 | पिक विमा क्लेम कसा करावा? | Crop Loss Claim 2022-23 – नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांच्या नुकसान भरपाई साठी कसा क्लेम करावा? कोणत्या App किंवा Website वरुन क्लेम करावा? कशा पद्धतीने क्लेम करावा? याची सर्व माहिती आज आपण बघणार आहोत.

आमचा मुख्य हेतू हाच आहे की भोळ्या भाबड्या शेतकऱ्याला कोणी लुबाडू नये, त्याची दिशाभूल कोणी करू नये. बळीराजाला एक मदत म्हणून हा एक छोटासा प्रपंच.

क्लेम करण्याच्या अटी व शर्ती

हवामानातील प्रतिकूलता याच्यामुळे तुमचा हारबरा असेल गहू असेल ज्वारी असेल कांदा असेल या शेती पिकांचा अतोनात नुकसान होतंय.

काही भागांमध्ये गारपीट झाली आहे. काही भागांमध्ये जोराचा पाऊस पडतोय या सर्वांमुळे तुमच्या पिकाचे नुकसान झालेलं असेल तर तुमच्याकडे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी सध्या एकच पर्याय तो म्हणजे तुमचा पिक विमा.

जर तुम्ही रब्बीचा पिक विमा काढलेला असेल तर तुम्ही या रब्बीच्या पिक विम्याचा क्लेम करून नुकसानाची भरपाई मिळवू शकता आणि याच्यासाठी तुम्हाला तुमच्या या पिक विमा साठी तुम्हाला दावा दाखल करावा लागेल.

क्लेम करण्याच्या पद्धती | पिक विमा क्लेम कसा करावा | Crop Loss Claim

मित्रांनो क्लेम सादर करण्यासाठी दावा दाखल करण्यासाठी तुम्हाला दोन पद्धती आहेत. एक तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने क्लेम करू शकता. दुसरी पद्धत आहे ऑनलाइन.

ऑफलाइन पद्धतीने पिक विमा कंपनीचे जे टोल फ्री नंबर देण्यात आलेले आहेत, तुमच्या तालुक्याचे काही प्रतिनिधीचे नंबर तुमच्याकडे असतील तर त्या नंबर वरती किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी तुम्ही हा ऑफलाईन पद्धतीने क्लेम करू शकता.

याच्या व्यतिरिक्त दुसरी महत्त्वाची आणि सोपी पद्धत आहे ती म्हणजे ऑनलाईन पद्धतीने क्लेम करणे. याच्यासाठी तुम्ही Crop Insurance या अप्लिकेशनच्या माध्यमातून क्लेम करू शकता.

क्लेम करण्यासाठी तुम्हाला 72 तासाची मुदत असते. याच्यासाठी नुकसान झालेली तारीख आणि जो तुम्ही क्लेम करत आहात त्या क्लेमची तारीख याच्यामध्ये फक्त तीन दिवसाचा फरक असणे आवश्यक आहे.

अशा प्रकारचे दोन्ही तारकासह तुम्हाला हा ऑनलाईन पद्धतीने हा क्लेम करायचे आहे.

तर मित्रांनो पुढील व्हिडिओच्या माध्यमातून हाच क्लेम कशाप्रकारे करायचा हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

पिक विमा क्लेम कसा करावा | Crop Loss Claim 2022-23

Application Link – Crop Insurance

प्रधानमंत्री पिक विमा योजना माहिती नवीन GR

सारांश | अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान, असा करा क्लेम | Rabbi Pik Vima Claim 2022-23

शेतकरी मित्रांनो, वरील माहिती ही प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही माहिती आपल्या गरजू भोळ्या भाबड्या शेतकऱ्या पर्यंत नक्की पोहोचवा. या लेखाला जास्तीत जास्त शेअर करा.

राज्यात जास्त पाऊस, वादळी वारा, पूर, गार पिट, पावसाचा खंड आणि इतर नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना या नुकसानी करिता भरपाई मिळावी म्हणून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवली जाते. याच प्रधानमंत्री पिक विमा योजना (Pradhan Fasal Bima Yojana 2022 GR) खरीप हंगाम 2022 साठी राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी अर्ज केकेले आहेत.

वरील माहिती आपल्याला कशी वाटली आम्हला Comment द्वारे नक्की कळवा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Leave a Comment