संत गाडगे बाबा भाषण मराठी (05 अतिशय सुंदर भाषणे) | Sant Gadge Baba Speech in Marathi 2023

संत गाडगे बाबा भाषण मराठी | Sant Gadge Baba Speech in Marathi – नमस्कार मित्रांनो, 23 फेब्रुवारी रोजी थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती. आज आपण या लेखात संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त 5 अतिशय सुंदर भाषण बघणार आहोत. हे भाषण अगदी सोपे आहेत, जेणेकरून आपल्याला पाठ करणे सोपे होईल.

संत गाडगेबाबा भाषण आपण लिहून देखील घेऊ शकता. ज्यांना मोठे भाषण हवे आहेत त्यांच्यासाठी याच्यात काही भाषणे मोठी देखील आहेत. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता भाषणाला सुरुवात करुया.

संत गाडगेबाबा भाषण मराठी 10 ओळी – भाषण क्र.01

  1. संत गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 साली शेंडगाव, अमरावती येथे झाला.
  2. त्यांचे पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर असे होते.
  3. ते गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते.
  4. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी व आईचे नाव सखुबाई असे होते.
  5. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भेट देत असत.
  6. संत गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते.
  7. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा, रूढी, परंपरा यावर ते टीका करत.
  8. समाजातील शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण संत गाडगेबाबा देत असत.
  9. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात धर्मशाळा, अनाथालये, आश्रम व विद्यालये सुरू केली.
  10. “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” या भजनाचा प्रसार करणाऱ्या संताचे 20 डिसेंबर 1956 रोजी अमरावती जवळ देहांत झाले.

संत गाडगेबाबा भाषण मराठी – भाषण क्र.02

“देव नाही दगडात
देव नाही दगडात !
देव दाखविला तुम्ही
माणसाच्या हृदयात !!”

स्वातंत्र्यापूर्वीचा कालखंड, महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचे साम्राज्य पसरलेले होते. साधे, भोळे, अज्ञानी लोक देवळातील दगडाच्या देवाच्या मागे लागले होते. अशावेळी या सामान्य माणसांना मनुष्याच्या हृदयातील देवाची ओळख करून देणाऱ्या महान संताचा जन्म महाराष्ट्रात झाला.

असा हा माणसातील देव शोधणारा संत म्हणजे संत गाडगेबाबा होय. विदर्भातील शेणगावी 23 फेब्रुवारी 1876 रोजी बाबांचा जन्म झाला. त्यावेळी समाजावर अन्याय अत्याचाराचे डोंगर रचले जात होते.

त्यातून दुःखांच्या नद्या वाहत होत्या. अंधश्रद्धेचे थैमान माजले होते. मुक्या प्राण्यांचे बळी दिले जात होते. रक्ताचे पाठ वाहत होते. माणसांचा चिखल होत होता.

सावकार गरिबांच्या गळ्यात फास आवळत होते. हे सारे काही बाबांनी जवळून पाहिले. त्यांना ते सहन झाले नाही. अखेर त्यांनी घर-संसाराचा त्याग केला आणि परिश्रमाचे व्रत स्वीकारले.

सोडून सर्व घरदार,
तोडीले पाश मायेचे !
अनवाणी फिरून पायी,
अश्रू पुसले बहुजनांचे !!

डोक्यावर झिंज्या, अंगावर चिंध्या, एका हाती खराटा, फुटक्या मडक्याच्या खापराचे भोजनपात्र असा बाबांचा वेश होता. ज्या गावात बाबा जात ते गाव हातातील खराट्याने स्वच्छ करत व संध्याकाळी गावातील लोकांच्या मनातील घाण कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छ करत.

“हाती घेऊन खराटा !
अवघ्या झाडील्या रे वाटा !!”

पुराणातील भाकडकथा बाबांनी कीर्तनात कधीच सांगितल्या नाहीत. बाबांचे किर्तन म्हणजे सर्वसामान्य माणसांना जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ होता.

अडाणी राहू नका. पोरांना शाळेत पाठवा. सावकाराचे कर्ज काढू नका. मुक्या प्राण्यांचा बळी देऊ नका. दगडाच्या देवाची पूजा करू नका. देव दगडात नाही, अरे देव तर माणसांच्या हृदयात आहे. बाबांचा हा उपदेश सामान्यांच्या जीवनाला दिशा देणारा होता.

माणसांच्या हृदयातील देव शोधून दाखवणाऱ्या या संताने अंधश्रद्धेला प्रखर विरोध केला. अनेक प्रसंगी स्वतः पुढाकार घेऊन सामान्य माणसांना अंधश्रद्धेपासून परावृत्त करण्याचे काम गाडगेबाबांनी केले.

तहान भुकेची पर्वा न करता बहुजन समाजाची दुःखी स्थिती पहाता त्यांचे दुःख आपल्या हातांनी पुसण्यासाठी अनवाणी पायांनी बाबा वणवन भटकत राहिले.

हातातील घाडग्या मुळे लोक त्यांना गाडगेबाबा म्हणत. एखाद्या गावातील लोक अंगावरील चिंध्यामुळे चिंधेबाबा म्हणत, तर विदर्भ मराठवाड्यात बाटीबाबा म्हणत. पण खऱ्या अर्थाने ते रंजल्या गांजलेल्यांचे बाबा होते.

संत गाडगेबाबा म्हणजे मानवतेची पुजारी होते. माणसातील देव शोधणारे खरे आणि वीर बुद्धिवंत होते. मानवाची पूजा करणाऱ्या या थोर संताकडे पाहिले की, संत तुकारामांच्या अभंगाची आठवण होते.

जे का रंजले गांजले !
त्यासी म्हणे जो आपुले !!
तोचि साधू ओळखावा !
देव तेथेचि जाणावा !!

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.
जय हिंद! जय महाराष्ट्र!!

संत गाडगेबाबा भाषण मराठी – भाषण क्र.03

Leave a Comment