माझा आवडता सण होळी निबंध मराठी 2023 (05 सर्वोत्तम नमुने) | Maza Avadta San Holi Essay in Marathi | Majha Avadta San Holi Nibandh in Marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Maza Avadta San Holi Essay in Marathi | माझा आवडता सण होळी निबंध मराठी नमस्कार मित्रांनो, सण म्हंटले की सर्वांसाठी आनंदाची पर्वणीच असते. आपल्या देशात विविध सण साजरे केले जातात. जसे की दिवाळी, दसरा, गणेश चतुर्थी, पोळा, नागपंचमी, होळी, दुर्गाष्टमी आणि नवरात्री इत्यादी. प्रत्येक सणाचे वेगवेगळे महत्त्व असते. प्रत्येकाचा कोणता ना कोणता सण आवडीचा असतो.

माझा आवडता सण होळी हा आहे. होळी हा सण मला खूप आवडतो. मित्रांनो आजच्या या लेखात आपण माझा आवडता सण होळी यावर 5+ अतिशय सुंदर निबंध बघणार आहोत. शाळेत माझा आवडता सण निबंध यावर एक प्रश्न नेहमी विचारला जातो. हा लेख तुम्हाला नक्कीच फायद्याचा ठरेल. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता निबंधाला सुरुवात करुया.

माझा आवडता सण होळी निबंध मराठी | Maza Avadta San Holi Essay in Marathi – निबंध क्र.01

आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात. जसे की दिवाळी, दसरा, होळी, नागपंचमी, गणेश चतुर्थी, नवरात्री इत्यादी. सण म्हंटले की आनंदाची पर्वणीच असते. सण म्हणजे आनंदाचे दिवस. सण म्हणजे एक विरंगुळा. सणामुळेच आपण आपली संस्कृती जपतो. सणांमुळे आपल्याला आपल्या संस्कृतीचे दर्शन होते.

या सर्व सणांमध्ये मला होळी हा सण जास्त आवडतो. होळी या सणाला खूप मजा येते. होळी सणाला आमची आत्या, काका आणि त्यांचा मुलगा रमेश आमच्या घरी येतात. होळीला संध्याकाळी होळी जाळण्यासाठी आम्ही शेतातून ऊस, शेणाच्या गोवऱ्या आणि ज्वारीचा चारा आणतो.

संध्याकाळी आमचे बाबा आणि सर्व काका होळी सजवतात. आई, आत्या, काकू या सर्व होळीची पूजा करतात. त्यानंतर होळी पेटवली जाते. होळी पेटवल्या नंतर आम्ही सर्व जण होळीला 07 फेरे मारतो. नवीन लग्न झालेले जोडपे जोडीने फेरे मारतात. ते जोडीने पूजा देखील करतात.

होळीला फेरे मारत असताना एका हातात पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातात गहू किंवा तांदूळ घ्यावे लागते. होळीला फेरे मारीत असताना पाण्याची सतत धार लावावी लागते आणि तांदूळ होळीत फेकावे लागते. बैल जोडीला देखील होळीचे फेरे घालतात.

पूजा झाल्यानंतर आजी आम्हला हार कडे खायला देते. हारकडे खायला मला खूप आवडते. मी माझे हार लपवून ठेवतो. मला जसे जसे खायचे मन होते तसे मी खातो. ते खूप गोड असल्याने एकाच वेळी जास्त खाता येत नाही. म्हणून मी थोडे थोडे खातो. त्यानंतर आम्ही सर्व मित्र खूप खेळतो.

होळीला सगळ्यात जास्त मजा धुलीवंदनला येते. जो सगळ्या लवकर उठतो तो इतरांना झोपेत असतानाच रांग लावतो. अशी सकाळी सकाळीच धुलीवंदनाची मस्ती सुरू होते. बाबा अमाच्यासाठी खूप सारे वेगवेगळे रंग घेऊन येतात. पिचकारी देखील आणतात. मग आम्ही एका मोठ्या पाण्याच्या टाकीत सर्व रंग मिसळवतो आणि त्यानंतर ते रंगाचे पाणी पिचकारी मध्ये भरतो. काही पिशव्या देखील भरतो.

मग आम्ही पिचकारी ने एकमेकांवर रंग उडवतो. रंगाने भरलेली पिशवी फेकून मारतो. असा धुराडा खेळताना खूप मजा येते. आम्ही सर्व मित्र मिळून संपूर्ण गावभर धुलीवंदान खेळत फिरतो. धुलीवंदन ला जी मजा येते ती कोणत्याही खेळापेक्षा वेगळीच असते. मला रंग खूप आवडतात. त्यामुळे मला होळी आणि रंगपंचमी हे सण खूप आवडतात.

माझा आवडता सण होळी निबंध मराठी | Maza Avadta San Holi Nibandh in Marathi – निबंध क्र.02

आपल्या भारतात अनेक सण साजरे केले जातात. त्यापैकी माझा सर्वात आवडता सण होळी हा आहे. होळी हा सण आपण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा करतो. याला आपण महाराष्ट्रात “शिमगा” असेही म्हणतो.

होळी हा सण आपण दोन दिवस आनंदाने साजरा करतो. होळीच्या पहिल्या दिवशी आपण वाळलेले गवत, काटक्या गोवऱ्या इत्यादी एकत्र करून होळी पेटवतो. या होळीत आपण होलिकेचे दहन करतो. त्याचबरोबर आपल्या मनातील वाईट विचारांचे देखील आपण होळीत दहन करतो. असे मानले जाते की, या दिवशी भगवान विष्णू ने आपला भक्त प्रल्हाद याचे राक्षस राजा हिरण्यकश्यप व होलिका यांच्या कूटनिती पासून रक्षण केले.

होळीच्या दुसऱ्या दिवसाला धुळवड किंवा धुलीवंदन असे म्हणतात. या दिवशी सर्वजण खूप आनंदी व उत्साही दिसतात. लोक एकमेकांना रंग लावतात. मी सुद्धा माझ्या मित्रांना या दिवशी रंग लावतो. मी माझ्या मित्र व नातेवाईकांना होळीच्या शुभेच्छा देतो. या दिवशी अनेक घरी स्वादिष्ट असे पदार्थ बनवले जातात.

असा हा होळीचा सण सर्वांना एकता, प्रेम व बंधुभावाचा संदेश देतो. मला हा होळी सण खूप खूप आवडतो. मी दरवर्षी होळी सणाची खूप आतुरतेने वाट पाहतो.

माझा आवडता सण होळी निबंध मराठी | Majha Avadta San Holi Essay in Marathi- निबंध क्र.03

होळी हा आनंदाचा, उत्साहाचा व रंगाचा सण आहे. हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. होळीला हुताशनी पौर्णिमा किंवा शिमगा असेही म्हणतात.

होळी या सणाची सुरुवात होलिका दहनाने होते. गावा ठिकाणी सर्व गावकरी मिळून पौर्णिमेच्या संध्याकाळी एकच होळी पेटवतात. पारंपारिक पद्धतीने होळीचे पूजन केले जाते. होळीला नारळ अर्पण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवीला जातो.

होळी पेटवल्यावर लोक त्या भोवती होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हणत प्रदक्षिणा काढतात असे मानले जाते की होळीमध्ये वाईटाचा नाश होतो.

होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन किंवा धुळवड साजरी केली जाते. या दिवशी लोक आपापसातील मतभेद विसरून एकमेकांना रंग, गुलाल लावतात. एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देतात. लहान मुले पिचकारीने एकमेकांवर रंग उडवतात.

लहान मुलांना हा सण खूपच आवडतो. घराघरात गोड पदार्थ बनवले जातात. सगळीकडे रंगाची उधळण होते. सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते. सर्वांनाच होळी हा सण खूप आवडतो. या सणाला प्रेमाचा बंधुत्वाचा व एक्क्याचा सण असे म्हणतात.

माझा आवडता सण होळी निबंध मराठी | Majha Avadta San Holi Nibandh in Marathi- निबंध क्र.04

होळी हा भारतातील एक मुख्य आणि प्राचीन सण आहे. जो आज जगभरात प्रसिद्ध आहे. हा सण दरवर्षी हिंदू फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या सणाला रंगांचा सण असेही म्हणतात. होळी सणाच्या काळात निसर्गात वसंत ऋतूमुळे काही चांगले बदल झालेले असतात. त्यामुळे या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून आनंद उत्सव साजरा करतात.

हा सण दोन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी संध्याकाळी होलिका दहन केली जाते. या होलिका दहनाची एक पौराणिक कथा आहे. प्राचीन काळी हिरण्यकशप नावाचा एक असुर होता. भगवान विष्णूचा तो द्वेष करीत असे. परंतु हिरण्यकशपचा मुलगा प्रल्हाद विष्णूचा परमभक्त होता. हे हिरण्यकशपला आवडत नसे. हिरण्यकश्यप ने आपला मुलगा प्रल्हादला ठार मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही.

शेवटी हिरण्याकश्यपणे आपली लहान बहीण होलिकाला बोलावले. होलीकेला आगीतही बस्म न होण्याचे वरदान मिळाले होते. हिरण्यकश्यपच्या आज्ञेनुसार होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन आगीत बसली. भगवान विष्णूला ते आवडले नाही आणि त्या आगीत होलिका भस्म झाली. म्हणूनच आपण होलीका दहन करतो.

होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळून धुलीवंदन साजरे केले जाते. या दिवशी लोक आपापसातले सर्व मतभेद विसरून एकत्र येतात. एकमेकांना रंग लावतात. या दिवशी लोक घरात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतात. लोक रंग लावून एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देतात. संगीत वाजवून, नृत्य करून लोक आनंद व्यक्त करतात. सगळीकडे आनंद व उत्साहाचे वातावरण असते.

या सणाच्या निमित्ताने लोकांचे आपापसातील वाद नष्ट होऊन त्यांच्यातील प्रेम वाढते. हा सण केवळ हिंदूच नव्हे इतर सर्व समाजातील लोकही आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. म्हणूनच या सणाला प्रेमाचा आणि बंधुत्वाचा सण देखील म्हटले जाते.

माझा आवडता सण होळी निबंध मराठी | Maza Avadta San Holi Essay in Marathi – निबंध क्र.05

आपल्या देशात दरवर्षी अनेक सण, उत्सव साजरे केले जातात. परंतु या सर्वांमध्ये माझा आवडता सण होळी आहे. होळी सणांमध्ये मला रंगाचा भाग जास्त आवडतो. दरवर्षी सर्व प्रकारचे रंग माझ्याकडे असतात, परंतु माझा सर्वात जास्त आवडता रंग लाल व गुलाबी आहे.

होळी हा सण रंगाचा,
होळी हा सण प्रेमाचा,
लहानपणापासून मोठ्यांपर्यंत
मौज-मजा नि मस्तीचा

होळी हा सण वसंत ऋतूंमध्ये येतो. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. परदेशी पर्यटक ही हा सण पाहण्यासाठी खास भारतात येतात. लहान मुलांचा तर आवडता सण असल्यामुळे एक दिवस अगोदरच याची तयारी केली जाते. पिचकारी, वेगवेगळे रंग खरेदी केले जातात.

होळी सणाची सुरुवात होलिका दहनाने होते. होळी साजरी करण्यासाठी वाळलेले गवत, लाकडी, शेणाच्या गोवऱ्या इ. साहित्य एका ठिकाणी रचून ठेवले जाते. मग स्त्रिया मनोभावे होळीची पूजा करतात. नारळा अर्पण केले जाते. पुरणाचा नैवेद्य दाखविला जातो.

होळी हा सण साजरा करण्यामागे एक प्राचीन कथा आहे. हिरण्यकश्यप नावाच्या राक्षसाने मृत्यूलोखावर विजय मिळवला. लोक त्याला खूप घाबरू लागले. लोकांनी देवाची पूजा करू नये असे त्याने सांगितले. परंतु त्याचा पुत्र फक्त प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. त्याने भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी त्याची बहीण होलीकाला बोलावले.

तिला आज्ञा दिली की, प्रल्हादाला घेऊन आगीमध्ये बस व त्याला जळून भस्म कर. परंतु होलीका आगीमध्ये जळू शकत नव्हती, कारण तिला तसे वरदान मिळाले होते. परंतु वरदान नसूनही ती जळून भस्म झाली. सत्याचा विजय झाला, वाईट प्रवृत्तीचा नाश झाला. देवाने आपल्या भक्ताचे रक्षण केले. म्हणून त्या दिवसापासून होळी हा सण साजरा केला जातो.

होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते. तिलाच काही भागात धुळवड असेही म्हणतात. या दिवशी राग, अहंकार विसरून एकमेकांना रंग लावला जातो. पूर्वी गुलाल, हळद लावून होळी साजरी केली जायची. आता मात्र कृत्रिम रंग आले आहेत.

असा हा सण लहान-मोठे सर्वजण साजरा करतात. या सणाने सर्वांना प्रेम व एकात्मतेची शिकवण दिली आहे. आपणही प्रत्येकाने होळीला नैसर्गिक रंगाचा वापर करण्याचा निश्चय करूया. या सणाचे पावित्र्य आहे तसेच ठेवूया.

सारांश | माझा आवडता सण होळी निबंध मराठी | Maza Avadta San Holi Nibandh

मित्रांनो वरील लेखात आपण माझा आवडता सण होळी या विषयी 05 अतिशय सुंदर निबंध बघितली. ही निबंध अगदी सोपी आहे. हे निबंध तुम्ही लिहून ही घेऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेत माझा आवडता सण यावर एक निबंध लिहिण्यासाठी एक प्रश्न नक्की विचारला जातो. त्यामध्ये तुम्ही हे निबंध लिहू शकता.

मित्रांनो आपल्या हा लेख कसा वाटला आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपल्या काही सूचना की मत असेल तर ते ही आम्हला कळवा. येथे तुमच्या विचारांचे स्वागत आहे. हा लेख आपल्या गरजू विद्यार्थ्यांना, मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

माझा आवडता सण होळी निबंध मराठी 2023 (05 सर्वोत्तम नमुने) | Maza Avadta San Holi Essay in Marathi | Majha Avadta San Holi Nibandh in Marathi Maza Avadta San Holi Nibandh in Marathi माझा आवडता सण होळी निबंध मराठी 2023 (05 सर्वोत्तम नमुने) | Maza Avadta San Holi Essay in Marathi | Majha Avadta San Holi Nibandh in Marathi Maza Avadta San Holi Nibandh in Marathi

Leave a Comment