जागतिक महिला दिनाच्या चारोळ्या मराठी & हिन्दी 2023 (70+ अतिशय सुंदर) | Jagtik Mahila Din Charoli in Marathi 2023 | जागतिक महिला दिवस चारोळ्या मराठी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Jagtik Mahila Din Charoli in Marathi 2023 | जागतिक महिला दिनाच्या चारोळ्या मराठी & हिन्दी 2023 | जागतिक महिला दिवस चारोळ्या मराठी – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात जागतिक महिला दिनानिमित्त 70+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज चारोळ्या बघणार आहोत. आपण सूत्रसंचालन करताना किंवा भाषण देताना या चारोळ्या चा उपयोग करू शकता.

मित्रांनो जर आपल्याला श्रोत्यांची मने जिंकायची असतील किंवा श्रोत्यांकडून टाळ्यांचा कडकडाट ऐकून घ्यायचा असेल तर चारोळी शिवाय पर्याय नाही. त्यामुळे भाषण देताना किंवा सूत्रसंचालन करताना चारोळी ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथे आपण जागतिक महिला दिनाच्या अशाच सुंदर चारोळ्या बघणार आहोत. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता चारोळीना सुरुवात करुया.

जागतिक महिला दिनाच्या चारोळ्या मराठी | Jagtik Mahila Din Charolya in Marathi

आदिशक्ती तू,
प्रभूची भक्तीतू,
झाशीची राणी तू,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू..!

प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे…
स्वप्नांना तुझ्या नवी क्षितिज लाभू दे…
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

मागे वळून पाहू नकोस,
परिवर्तनाच्या वाटेवर, टाक पाऊले !
तू तर आहेस
आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले !!

नभी झेपावणारी तू पक्षिणी…
सक्षम कर्तव्यदक्ष तू गृहिणी…
प्रसंगी कडाडणारी तू सौदामिनी…
शत्रूस धूळ चारणारी तू रणरागिणी…

कष्टाच्या तुझ्या कणखर हातावर,
खुलेल खरी मेहंदी !
तूच तर आहेस,
पोलीस अधिकारी किरण बेदी !

नारी आहे, शक्ती नराची !
नारी हीच शोभा आहे घराची !!

स्त्री म्हणजे वात्सल्य!
स्त्री म्हणजे मांगल्य!!
स्त्री म्हणजे मातृत्व!
स्त्री म्हणजे कर्तुत्व!!

नारी तूच सावित्री,
नारी तूच जिजाई !
नारी तूच अहिल्या,
नारी तूच रमाई !!

तुम्ही भाऱ्या, भगिनी, दुहिता,
कित्येक वीरांच्या माता !
तुम्ही नवयुगाची प्रेरणा,
या जगताच्या भाग्यविधात्या !!

ती आहे म्हणून सारे विश्व आहे,
ती आहे म्हणून सारे घर आहे,
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,
ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे..

गंभीर नाही तर खंबीर आहे !
वार नाही तर तलवार आहे !!
बोठलेली नाही तर धार आहे !
स्त्री म्हणजे राख नाही तर,
पेटता अंगार आहे!!

आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

विधात्याची निर्मिती तू,
प्रयत्नांची पराकाष्ठा तू.
एक दिवस तरी साजरा कर तुझ्यासाठी तू.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

जिव्हाळ्याने पाहिले तर बहिणीची माया देते !
लहानग्या बाळाला आईची छाया देते !!
अन् तिच्याशी जे पण कोणी नडते !
त्याला ती वाघिणीसारखे फाडते !!

शांत राहणे हा स्त्रीच्या स्वभावाचा भाग आहे !
वरूनी जरी पाणी असले तरी ती आतून आग आहे !!
वागणे तिचे एकदम कडक आणि सक्त आहे !
कारण तिच्या अंगात आई जिजाऊ चे रक्त आहे !!

इतिहास सांगतो आमुच्या स्त्रीनेच शत्रू तुडवला !

लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला !!
जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला !
महाराणी ताराबाईने महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला !!

जागतिक महिला दिवस चारोळ्या मराठी | Mahila Din Charoli in Marathi

ज्याला स्त्री आई म्हणून कळली,
तो जिजाऊंचा शिवबा झाला !!
ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली,
तो मुक्ताई चा ज्ञानदेव झाला !!
ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली,
तो राधेचा श्याम झाला !!
आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली,
तो सीतेचा राम झाला !!

तुझ्या प्रयत्नांना मिळू दे,
यशाची सोनेरी किनार !
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे,
तुझा संसार !!
कर्तुत्व अन सामर्थ्याची,
ओढून घे नवी झालंर
स्त्री शक्तीचा होऊ दे,
पुन्हा एकदा जागर…

घरामधल्या घरपणाचा आधार असते नारी,
सौंदर्याचा हृदयावरला थरार असते नारी,
ईश्वराची मानवतेला भेट असते नारी,
जगण्यामधल्या आपुलकीचे बेट असते नारी.

ती जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया,
कुठल्याच स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया !
कधी मुलगी, कधी पत्नी, कधी आई होत असते,
सासर माहेर उजळविणारी स्त्री एक ज्योत असते !!

थेंबा थेंबा मधून येथे,
सामर्थ्याचा सागर व्हावा !
विश्वाच्या कल्याणासाठी,
स्त्रीशक्तीचा जागर व्हावा !!

महिला मुक्तीची ही भाषा, फक्त आज पुरतीच नको,
उत्सव आहे महिलांचा, म्हणून फक्त आरती नको !
ओठातला आणि पोटातला तुझा आवाज जन्माला घाल,
तेव्हाच सुरू होईल तुझ्या नव्या युगाची वाटचाल !!

स्त्री म्हणजे एक वाट,
अशक्य ते शक्य करून दाखवणारी,
अन्यायाला न्याय मिळवून देणारी,
अन् स्व-सुखाचा त्याग करून,
दुःखांना कवटाळणारी.!!

स्त्री म्हणजे विश्वास, अन् प्रगतीची खात्री,
तळपत्या उन्हात, डोईवर मायेची छत्री !
स्त्री म्हणजे मंद प्रकाश, न नुसत्या ज्वाला,
प्रेम आपुलकी अन् मायेचा जिव्हाळा !!

ती आई आहे, ती ताई आहे,
ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे, ती जन्म आहे,
ती माया आहे, तीच सुरुवात आहे,
आणि सुरुवातच नसेल तर,
बाकी सारं व्यर्थ आहे.!!

कित्येक रुपे तुझी असती
त्यात प्रेमाचा कळस तू
प्राणवायू कुटुंबा देई
तीच मंगल तुळस तू…

जागतिक महिला दिन चारोळ्या मराठी | Mahila Din Charolya in Marathi

मही म्हणजे पृथ्वी हिला म्हणजे सरस्वती !
शक्ती आणि बुद्धीच्या संगमाने महिला जपते संस्कृती !!
कवेत अंबर घेतानाही पाऊल तिचे जमिनी वरती !
महिला म्हणजे विश्वरूपी बासरीला सुर देणारी श्वासारती !!

व्यापलीस तू सर्व क्षेत्रे
गाठलीस शिखरे यशाची !
कर्तव्याचा सदा राहून तत्पर
लेख शोभसी जिजाऊ, सावित्रीची!!

नव्या युगात वाहिले वारे स्त्रीमुक्तीचे !
संघर्ष पदोपदी केला अन् मिळवले जे न्याय हक्काचे !!
हर क्षेत्रात स्थान मिळवले अव्वल दर्जाचे !
स्त्रीचा सन्मान करणे हेच खरे लक्षण पुरुषार्थाचे !!

स्वीकारून लेण हे मातृत्व !
अंगी उपजत गुण असे दातृत्व !!
धीराने करी हर घडी नेतृत्व !
अनमोल आहे महिलांचे श्रेष्ठत्व !!

स्त्री विना घराला घरपण नाही
ज्या घरात स्त्री नाही ते घर
घर असल्यासारखे वाटतच नाही
स्त्रीमध्ये घराला जोडून ठेवण्याची
अनोखी शक्ती असते
अशा स्त्रीशक्तीला माझा मानाचा मुजरा

चूल आणि मूल आता जग बदललय
आजच्या स्त्रीने स्वातंत्र्य निवडलय.

थेंबा थेंबा मधून येथे
सामर्थ्याचा सागर व्हावा
विश्वाच्या कल्याणासाठी
स्त्रीशक्तीचा जागर व्हावा

आत्मबलाचे तेज घेऊनी, सामर्थ्याचा प्रकाश
लेऊनी आली ही ‘हिरकणी’!

स्त्री मनाची विशालता कळायला,
मन विशाल असावं लागतं !
डबक्यात राहून सागर दिसत नसतो,
त्यासाठी बाहेर यावं लागतं !

तू जिजाऊ, तू सावित्री,
अहिल्याची तू लेक आहे…
तू कल्पना, तू सुनिता,
आकाशात तुझी झेप आहे…

तू उषा, तू सायना,
तू मेरी, तूच मल्लेश्वरी आहे…
घे आसमानी उंच भरारी
प्रेरणेचे तू महारूप आहे …

घरा स्वर्ग बनवी तू
अन्नपूर्णा तूच आहे…
तुटक्या झोपडीस महाल करी
हरहुन्नरीचे तू प्रतिक आहे…

जागतिक महिला दिन चारोळी मराठी | Jagtik Mahila Din Charoli in Marathi

अब्रू राखण्या ना कृष्ण आता
दंड देण्यास ना शिवबा आहे…
उठ, उठ घे तलवार हाती
सहनशीलता अन् शौर्याचे तू गीत आहे…

जरी दिसशी नाजूक, सुकुमार तू
इथे कमजोर कोण आहे…
तूच सकळाची दिशादर्शनी
अन् विश्वाची तू आस आहे…

जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी,
त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी !

तीच आहे सृजनाची निर्मिती,
तिच्यामुळे तेवतात दिव्यातील वाती,
चहूकडे प्रकाश देऊनी जगतास ती उध्दारी !
त्यो विश्वशक्तीचे नाव आहे नारी !

ज्योतिबांची ती क्रांतिज्योती सावित्री
त्यागाची प्रतीक ती शिवबाची जिजाई,
भीमरावांची सावली, ती रमाई,
रणांगणांवर लढते जशी राणी लक्ष्मी
त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी!

विधात्याने घडवली सृजनांची
सावली, निसर्गाने भेट दिली आणि
घरी आली लेक लाडकी.
महिला दिनाच्या शुभेच्छा.

तू आदिशक्ती तुच महाशक्ती
वरदायिनी कालिका, तुझ्या कृपेने
सजला नटला संसार हा जगाचा
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

जागतिक महिला दिवस चारोळ्या हिंदी | जागतिक महिला दिनाच्या चारोळ्या हिन्दी | Jagtik Mahila Din Charoli in Hindi

हमसे क्या टकरायेगी
गर्दीशे जमाने की !
हमको तो आदत पड गई है
गम मे भी मुस्कुरानेकी !!

नारी को निंदो नही
नारी नर की खाण !
जिस खाण मे पैदा हुए
राम-कृष्ण-हनुमान !!

कोमल हैं, कमजोर नही
शक्ती का नाम ही नारी है !
जग को जीवन देनेवाली
मौत भी इससे हरी है !!

उन्हे लगता है हमे
आदत है सदा हसने की
लेकिन उन्हे क्या पता
ये हमारी अदा हे गम छुपाने की

ना कुछ पाती हू, ना कुछ होती हु
सब कुछ यहा लुटाकर जाती हूँ !
इससे अलग मेरी कोंनसी कहानी है
कभी सावित्री तो कभी सीता बनकर
अग्निपरीक्षा मुझे देनी है !!

हजारो फुल चाहिये,
एक माला बनाने के लिए,
हजारो बूंद चाहिये,
समुंदर बनाने के लिए,
पर एक स्त्री
अकेले ही काफी है,
घर को स्वर्ग बनाने के लिए..

सब कुछ करके कुछ न कहना,
उन्हे थोडा भी गुमान नही,
महिला होना इतना भी आसान नही.

मुस्कुराकर, दर्द भूला कर,
रिश्तों में बंद है दुनिया सारी
हर पग को रोशन करने वाली
वो शक्ती है एक नारी.

ऐ औरत तुझे क्या कहू,
तेरी हर बात निराली है.
तू एक ऐसा पौधा है, जिस घर रहे,
वहा हरियाली ही हरियाली है!

मा मेरी, अभिमान है तू,
बहन मेरी, शान है तू,
नारी तू अबला नाही,
सहनशीलता की पहचान है तू!

सारांश | जागतिक महिला दिनाच्या चारोळ्या मराठी आणि हिंदी

मित्रांनो, वरील लेखात आपण जागतिक महिला दिनाच्या चारोळ्या मराठी आणि हिंदी भाषेत बघितल्या. वरील चारोळ्या या खूप सुंदर आणि धडाकेबाज आहे. आपण जागतिक महिला दिन भाषण देताना या चारोळ्या वापरू शकता. यामुळे तुमच्या भाषणाला एक वेगळेच आकर्षण प्राप्त होते.

मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त हा आमचा छोटासा प्रयत्न आपल्याला कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपल्या काही कल्पना, सूचना असतील तर ते ही आम्हला कळवा. आपले स्वागतच आहे. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

जागतिक महिला दिनाच्या चारोळ्या मराठी & हिन्दी 2023 | Jagtik Mahila Din Charoli in Marathi 2023 | जागतिक महिला दिवस चारोळ्या मराठी जागतिक महिला दिवस चारोळ्या हिंदी | जागतिक महिला दिनाच्या चारोळ्या हिन्दी | Jagtik Mahila Din Charoli in Hindi Jagtik Mahila Din Charolya in Marathi जागतिक महिला दिन चारोळी मराठी Mahila Din Charolya in Marathi

Leave a Comment