जागतिक महिला दिन भाषण मराठी 2023 (05+ अतिशय सुंदर भाषणे) | Jagtik Mahila Din Bhashan Marathi | Women’s Day Speech In Marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

जागतिक महिला दिन भाषण मराठी 2023 | Jagtik Mahila Din Bhashan Marathi 2023 | Women’s Day Speech In Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, 08 मार्चला, महिलांच्या सन्मानार्थ जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आज आपण या लेखात जागतिक महिला दिनानिमित्त भाषण मराठी तून पहाणार आहोत. या ठिकाणी आपण 05+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज भाषणे बघणार आहोत. ही भाषणे आपण लिहून देखील घेऊ शकता.

प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जागतिक महिला दिनानिमित्त ची ही 05 भाषणे अगदी सोप्या भाषेत लिहिली आहेत. जेणेकरून आपल्याला पाठ करणे सोपे होईल. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता भाषणाला सुरुवात करुया.

जागतिक महिला दिन भाषण 10 ओळी

  1. दरवर्षी 08 मार्चला “जागतिक महिला दिन” साजरा केला जातो.
  2. 08 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्ज चौकात ऐतिहासिक निदर्शने केली.
  3. 1910 साली सर्व महिला प्रतिनिधींसह 8 मार्च या दिवसाला महिला दिन म्हणून मान्यता मिळाली.
  4. महिलांनी आपल्या स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो.
  5. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिन 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला.
  6. महिला विषयी सन्मान, आदर, प्रेम व्यक्त करणे हा या महिला दिनाचा हेतू होय.
  7. या दिवशी सर्व कर्तुत्वान महिलांचा सत्कार केला जातो.
  8. या दिवशी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात.
  9. मंडळातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करून महिला दिन साजरा केला जातो.
  10. स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.

जागतिक महिला दिन भाषण मराठी | Women’s Day Speech In Marathi – भाषण क्र. 01

आदिशक्ती तू,
प्रभूची भक्तीतू,
झाशीची राणी तू,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू..!

आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ व येथे जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो….

सर्वप्रथम शतवार नमन आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई, मदर टेरेसा व समस्त महिला वर्गाला…

8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या.

या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी जोरदार मागणी ही केली.

अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 08 मार्च हा “जागतिक महिला दिन” म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लास झेटकीन या कम्युनिस्ट कार्यकर्ती ने मांडला आणि तो पासही झाला.

यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून 1918 साली इंग्लंडमध्ये व 1919 साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.

महिलांच्या प्रति सन्मान, आदर आणि प्रेम व्यक्त करण्याच्या उद्देशाने जागतिक महिला दिवस संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते…

तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यश,
यशाची सोनेरी किनार !
लक्ष लक्ष दिव्यांनी उधळू दे,
तुझा प्रेमळ संसार !!
कर्तृत्व अन् सामर्थ्याची,
ओढून घे नवी झालर !
श्री शक्तीचा होऊ दे,
पुन्हा एकदा जागर !!

माझ्या आयुष्यातील समस्त स्त्री वर्गाला, माझे आयुष्य प्रेमाने फुलवून मायेची व सुरक्षिततेची पांघरन घालून माझे आयुष्य सुंदर बनवल्या बद्दल शत-शत नमन करते…
आपणा सर्वांना महिला दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

!! स्त्री शक्ती युगे युगे !!

जागतिक महिला दिन भाषण मराठी | Women’s Day Bhashan In Marathi – भाषण क्र. 02

सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित स्वतःच्या अस्तित्वासाठी आजही लढणाऱ्या सर्व तमाम महिला भगिनींनो. प्रथम तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

दरवर्षी ८ मार्च हा दिवस जगभर “जागतिक महिला दिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 08 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे वस्त्रोद्योगात काम करणाऱ्या महिलांनी सामूहिकपणे मोठी ऐतिहासिक अशी निदर्शने केली. त्यांनी कामाचे तास कमी करणे, सुरक्षितता इत्यादी मागण्या केल्या. जगाच्या इतिहासात अशा प्रकारे स्त्रियांनी संघटित होऊन केलेला हा पहिला मोठा संघर्ष मानला जातो.

पुढे 1990 मध्ये विविध देशातील महिला प्रतिनिधी सह कार्यकर्त्या क्लारा झेटकीन यांनी 08 मार्च हा दिवस “जागतिक महिला दिन” म्हणून साजरा करण्यात यावा हा ठराव मांडला. तो ठराव पास झाला. तेव्हापासून 08 मार्च हा दिवस स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यासाठी सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

स्त्री ही क्षण काळाची पत्नी व अनंत काळाची माता आहे. तिला आई, बहीण, मुलगी, पत्नी, मैत्रीण, आत्या, काकी, मावशी, आजी इत्यादी अनेक नाती हळुवार जोपासावी लागतात. स्त्री ही सृष्टीचे जीवन चक्र अविरतपणे चालू ठेवण्याचे कार्य करते. ती सृजनशील आहे. प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा स्त्री असते. स्त्री शिवाय कुटुंब नाही व कुटुंबशिवाय समाज नाही. सासर व माहेरच्या दोन्ही घरांना ती नकळतपणे जोडते.

स्त्री आपले मूल संस्कारशील, अद्वितीय घडावे म्हणून जीवाचे रान करते. मुल पोटात वाढवण्यापासून ते सुसंस्कृत व्यक्ती घडवण्यापर्यंत संपूर्ण जबाबदारी स्त्री विना तक्रार पार पाडते. त्यामुळेच साने गुरुजी व शिवाजी महाराजांसारखे अनेक महान पुरुष घडले. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. ती संकटात पुरुषाची ढाल बनते. त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यासारखे थोर पुरुष महान कार्य करू शकले.

स्त्री फक्त कुटुंबासाठी झटत नाही तर झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यासारख्या अनेक स्त्रिया मातृभूमीच्या रक्षणासाठी रणरागिणी झाल्या. सावित्रीबाई फुले लग्नानंतर शिकून भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अतुलनीय योगदान दिले.

आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. गावच्या सरपंच पदापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत ती आघाडीवर आहे. भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, अंतराळवीरांगणा कल्पना चावला, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, स्त्री सुधारक व समाजसेविका रमाबाई रानडे, पहिल्या महिला पोलीस अधिकारी किरण बेदी, समाजसेविका मदर तेरेसा, गायिका लता मंगेशकर, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, पहिल्या महिला पायलट सरला ठकराल, तसेच महिला खेळाडू पी. टी. उषा, सायना नेहवाल, पी. व्हि. सिंधू इत्यादी अनेक स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले आहे.

आज स्त्रीचा गौरव केला जातो. पण तरी देखील महिलांच्या समोर अनेक समस्या आ वासून आहेत. स्त्री भ्रूणहत्या, लैंगिक अत्याचार, अंधश्रद्धा, जुन्या चालीरीती इ. समस्या पदोपदी महिलांना भेडसावतात. त्या समस्या जर दूर केल्या तर नक्कीच स्त्रियांचे कार्यक्षेत्र विस्तारेल.

महिलांनो आजच्या आधुनिक युगात तुम्ही स्वतः पासून बदल करा. कारण पुढची पिढी कशी घडवायची हे तुमच्याच हातात आहे. तुम्ही अखंड प्रेमाचा व प्रेरणेचा स्त्रोत आहात. स्वतः खंबीर रहा जीवनात येणाऱ्या संकटांचा जिद्दीने सामना करा. कधीही वाईट गोष्टीचा तग धरू नका. कारण जगण्यासाठीच नव्हे तर या पृथ्वीतलावर जन्म घेण्यासाठी देखील तुम्हाला संघर्ष करावा लागतोय.

स्त्रीशक्तीचा पुरेपूर वापर करून एक चांगली व्यक्ती बनवून दाखवा. आपले वाचन, लेखन इत्यादी छंद जोपासून नेहमी आनंदी रहा. कोणत्याही क्षेत्रात आपला चांगला ठसा उमटवा. आत्मनिर्भर बना. ईश्वराने दिलेल्या सुंदर स्त्री जन्माचा उपयोग करताना कधीच पंखातलं बळ कमी होऊ देऊ नका. थोर स्त्रियांचे विचार, चारित्र्य सदैव स्मरणात ठेवा.

शेवटी मी इतकेच म्हणेन की…
नारी तू घे अशी उंच भरारी !
फिरून पाहू नकोस माघारी !!

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

जागतिक महिला दिवस भाषण मराठी | Jagtik Mahila Din Bhashan Marathi – भाषण क्र. 03

नऊ महिने पोटात ठेऊन
आपल्या पहिल्या श्वासापर्यंत
वेदना सहन करते ती “आई”
आपल्या रक्तातील असून
दुसऱ्या घरी नांदायला जाते
परंतु रक्षाबंधनाला न विसरता
राखी बांधायला येते ती “बहीण”
मुलगी कोणाची, बहीण कोणाची
तरीही अखेरच्या श्वासापर्यंत
आपल्याला साथ देते ती “पत्नी”
जिला आपल्या मनातील
गुपित सांगतो ती “मैत्रीण”

पुरुषांच्या जीवनात महिलेचे प्रमुख स्थान आहे. खरंतर महिलेशिवाय आपले जीवन दिवा असून ज्योत नसल्यासारखे आहे.
नमस्कार, मी सुप्रिया सुळे, प्रथम तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

हसत मुखाने गीतही आले
आज हो तुमच्यापुढे
या नारीशक्तीचे स्वागत करण्या
शब्द फुलांचे सडे
या इथे उतरली माता.. त्या
रायगडाची माची
बांधुणी पुत्र पाठीशी लढली
राणी झाशीची
हिमालयाच्या शिखरावरती
झेंडा घेऊन चडे
या नारिशक्तीचे स्वागत करण्या
शब्द फुलांचे सडे.

आज जागतिक महिला दिन ! आज संपूर्ण जगभरात महिलांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत. WhatsApp वर शुभेच्छा दिल्या जात आहेत. Status वर महिलांचे फोटो ठेवले जातात. परंतु स्त्रियांचे महत्त्व फक्त या एका दिवसापुर्तेच मर्यादित आहे का? प्रत्येक दिवस स्त्रीचा का असू शकत नाही? बैलपोळ्याला ज्याप्रमाणे वर्षभर दावणीला बांधलेल्या बैलाची एक दिवस मिरवणूक काढून त्याला गोडधोड खायला दिले जाते आणि पुन्हा वर्षभर बांधायला मोकळे. अशी तर आपल्या स्त्रियांची अवस्था होत नाही ना? यावर गंभीरतेणे विचार करायला हवा.

स्त्री म्हणजे काही वेगळं नसतं. स्त्री सुद्धा एक मनुष्य असते. त्याला पण तिचे आयुष्य असते. तुडवली तर नागिन नसते. डिवचली तर वाघीण असते. तान्ह्या बाळाची निज असते. कडाडली तर वीज असते. आणि बरं का तिच्याच गर्भात साऱ्या भविष्याचे बीज असते. स्त्री म्हणजे एक शक्ती असते.

स्त्रीमध्ये अफाट शक्ती असते, असे आपण म्हणतो. परंतु तिचे रक्षण करण्यासाठी तिला वडील, भाऊ, नवरा, मुलगा यांची गरज का भासते. ती स्वतःचे रक्षण स्वतः का करू शकत नाही. त्याला एकच कारण, तिच्या मनात लहानपणापासून बिंबवले जाते की, तू मुलगी आहेस, बाहेर नको जाऊ नकोस, हे काम नको करूस, कुठे बाहेर जायचे असल्यास दादाला सोबत घेऊन जा. खेळ खेळतानाही मुलींना आपण भांडी आधी घेऊन देतो. यापेक्षा लहानपणापासूनच आपण जर मुलींना कराटे, कुस्ती, बॉक्सिंग यासारखी खेळ शिकवले. तर त्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांना कोणत्याही पुरुषाची मदत लागणार नाही.

स्त्री सगळं दुःख पचवू शकते. सगळे वार परतवून लावू शकते. पण तिच्या आत्मसन्मानावर झालेला वार, ती कधीच पचवू शकत नाही.

अवघ्या कुटुंबाच तू आभाळ
त्यातच सामावलेलं तुझं रंग
हा एक तरी दिवस तू
फक्त स्वतःसाठी जगून बघ.

सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

जागतिक महिला दिनाचे भाषण मराठी | Mahila Din Bhashan Marathi – भाषण क्र. 04

वार नाही तलवार आहे…
ती समशेरीची धार आहे…
स्त्री म्हणजे अबला नाही…
ती तर धगधगता अंगार आहे. !!

सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या महिला भगिनींनो…

सर्वप्रथम आपण सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, “मै मेरी जासी नही दूँगी” असे इंग्रजांना ठणकावून सांगून संघर्ष करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, मुलींना, स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले अशा सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन…

दरवर्षी 08 मार्च हा दिवस जगभर “जागतिक महिला दिन” म्हणून उत्साहात साजरा केला. जातो. 08 मार्च 1908 मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क वस्त्र उद्योगातील हजारो स्त्रियांनी जमून कामाचे तास कमी करणे व सुरक्षितता इत्यादी मागण्या केल्या व निदर्शने केली.

स्त्रियांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेला हा पहिलाच लढा होता. सण 1990 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत क्लारा झेटगी यांनी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा हा ठराव मांडला व तो पासही झाला. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो.

या दिवसाचा मुख्य हेतू महिला सबलीकरण करणे हा आहे. हा दिवस महिलांप्रती आदर, प्रेम व्यक्त करण्याचा आहे. स्त्रीला अनेक नाती जोपासावी लागतात. प्रत्येक कुटुंबाचा आधारस्तंभ स्त्रीच असते. स्त्री आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून जीवाचे रान करते. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.

आज प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर स्त्री आहे. पण तरीही स्त्रियांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. आजच्या स्त्रीने आत्मनिर्भर बनले पाहिजे आणि निर्भयपणे संकटांचा सामना केला पाहिजे. कारण पुढची पिढी कशी घडवायची हे महिलांच्या हातात आहे.

स्त्री सन्मानाची सुरुवात आपण आपल्या घरापासून करायला हवी. तरच आपला भारत देश सुरक्षित, सक्षम आणि बलवान होईल.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.
जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

जागतिक महिला दिन भाषण मराठी | Women’s Day Speech In Marathi – भाषण क्र. 05

ती आहे म्हणून…
सारे विश्व आहे !
ती आहे म्हणून…
घराला घरपण आहे !
ती आहे म्हणून…
सुंदर नाती आहेत !
आणि ती आहे म्हणून..
नात्यांमध्ये प्रेम आहे !

आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो…

सर्वांना माझा नमस्कार !!!

सर्वप्रथम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई, बहीण, पत्नी व लेकीची भूमिका साकारणाऱ्या सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!

दरवर्षी 08 मार्च हा दिवस आपण “जागतिक महिला दिन” म्हणून उत्साहात साजरा करतो. 08 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी कामाचे तास कमी करणे व सुरक्षितता इत्यादी मागण्या करून निदर्शने केली. स्त्रियांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेला हा पहिलाच लढा होता.

हा दिवस महिलांचे सबलीकरण व स्त्रीशक्तीचे सन्मान करण्यासाठी जगभर साजरा केला जातो.

स्त्री ला अनेक नाती जोपासावी लागतात. आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून ती आपल्या जीवाचे रान करते. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.

नारी हीच शक्ती आहे नराची…
नारी हीच शोभा आहे घराची .!

जागतिक महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्काविषयी जागरूक करणे होय.

आज पुरुषांबरोबर स्त्रिया देखील सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. परंतु आज देखील स्त्री सुरक्षित नाही हे खेदाने बोलावेच लागेल. लैंगिक शोषण, अत्याचार, हुंडाबळी, भ्रूणहत्या या गोष्टींमुळे स्त्रियांच्या, मुलींच्या मनात भीतीची, असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मुलीचा जन्म झाल्यावर तिचा तिरस्कार केला जातो. स्त्रियांचा अपमान केला जातो. स्त्री पुरुष समानता ही भावना आचरणात आणायला हवी.

शेवटी जाता जाता मी एवढेच म्हणेन की..

तुझ्या प्रयत्नांना मिळू दे,
यशाची सोनेरी किनार !
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे,
तुझा संसार !!
कर्तुत्व आणि सामर्थ्याची,
ओढून घे नवी झालर !
स्त्री शक्तीचा होऊ दे,
पुन्हा एकदा जागर !!

सारांश | जागतिक महिला दिनाचे भाषण मराठी | Jagtik Mahila Din Bhashan Marathi 2023

जागतिक महिला दिनाचे भाषण मराठी | Jagtik Mahila Din Bhashan Marathi 2023 – मित्रांनो, वरील लेखात आपण जागतिक महिला दिनाचे 05+ अतिशय सुंदर, सोपे आणि धडाकेबाज भाषणे पाहिली. महिलांच्या प्रति आदर, प्रेम आणि सन्मानासाठी हा आमचा छोटासा प्रपंच. एका स्त्रीचे पुरुषाच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. एवढे असूनही तिच्यावर अनादिकालापासून अन्याय, अत्याचार करण्यात आले आहेत. हे कुठेतरी थांबायला हवेच.

मित्रांनो वरील भाषणे आपल्याला कशी वाटली? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपल्या जर काही सूचना, मत किंवा मार्गदर्शन असेल तर आम्हला Comment द्वारे नक्की कळवा. आपल्या मतांचे स्वागतच आहे. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

जागतिक महिला दिन भाषण मराठी 2023 | Jagtik Mahila Din Bhashan Marathi 2023 | Women’s Day Speech In Marathi 2023 | जागतिक महिला दिनाचे भाषण मराठी | जागतिक महिला दिवस भाषण मराठी | जागतिक महिला दिन भाषण मराठी 2023 | Jagtik Mahila Din Bhashan Marathi | Women’s Day Speech In Marathi | जागतिक महिला दिनाचे भाषण मराठी | जागतिक महिला दिवस भाषण मराठी 2023 | Women’s Day Speech In Marathi 2023 | जागतिक महिला दिनाचे भाषण मराठी | महिला दिवस भाषण मराठी | Jagtik Mahila Din Bhashan Marathi 2023

Leave a Comment