यशवंतराव चव्हाण भाषण मराठी 2023 [03+] अतिशय सुंदर भाषणे | Yashwantrao Chavan Speech in Marathi 2023 | यशवंतराव चव्हाण यांचे भाषण मराठी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Yashwantrao Chavan Speech in Marathi 2023 | यशवंतराव चव्हाण भाषण मराठी 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार मा. श्री. यशवंतराव चव्हाण यांचे भाषण मराठी मध्ये बघणार आहोत. या लेखात आपण 03+ अतिशय सुंदर आणि जबरदस्त भाषणे बघणार आहोत.

12 मार्च हा दिवस नामदार स्व. यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस होय. त्यांच्या उतुंग अशा कार्याला सन्मान करण्यासाठी हा दिवस आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. आपल्याला शाळा, कॉलेज किंवा कार्यालयात ही भाषणे खूप उपयुक्त पडतील. चला तर मित्रांनो भाषणाला सुरुवात करुया.

यशवंतराव चव्हाण भाषण मराठी | Yashwantrao Chavan Bhashan in Marathi – भाषण क्र.01

आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान झालेले अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग व जमलेल्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो…

आज मी तुम्हाला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, एक थोर विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लोकनेते यांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.

ठाई ठाई पाणावलेली सह्याद्रीची पाती,
देव, रत्न, हिरा जन्मला विठाई पोटी,
चीनचा हा कर्दनकाळ, महाराष्ट्राचा शिल्पकार,
चला करू यशवंतांचा जयजयकार, जयजयकार!

अरे कोण आहे यशवंत? आणि कशाचा जयजयकार? हे दुसरे तिसरे कोणी नसून, हे आहेत देशाच्या राजकारणातील एक महान नेतृत्व, लेखक, महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण …!

यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण देवराष्ट्रे, कराड, कोल्हापूर या ठिकाणी झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी आपले बीए एलएलबी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

1940 साली महात्मा गांधींनी सुरू केलेल्या ब्रिटिश सरकार विरोधी कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. पहिला राजकीय कारावास त्यांना 1932 साली घडला. त्या कारावासाच्या कालावधीत त्यांनी कार्ल मार्क्स व मानवेंद्रनाथ रॉय यांच्या तत्त्वज्ञानाचचा अभ्यास केला आणि त्यांच्यावर रॉय यांच्या विचारांचा प्रभाव पडला. तथापि त्यांची गांधी नेहरूंनी राजकारणात अनुसरलेल्या मार्गावर निष्ठा होती.

इ.स. 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनातही यशवंतरावांनी भाग घेऊन भूमिगत राहून कार्य केले. त्यामुळे ते पकडले गेले व तुरुंगवासाची शिक्षा झाली. पुढे इ.स. 1946 मध्ये मुंबई प्रांताच्या विधिमंडळाची निवडणूक होऊन त्यात ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले व संसदीय सचिव म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर त्यांना पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. महाराष्ट्रातील कृषी, औद्योगिक क्षेत्रात विकासाचा पाया घालण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांनी केली. ते एक उत्कृष्ट प्रशासक होते.

त्यांना राजकारणाप्रमाणे समाजकारण, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रातही विशेष रस होता. त्यांनी भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य संस्कृतीक मंडळाची निर्मिती केली होती. 1949 मध्ये कराड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. यशवंतराव चव्हाण यांचा मृत्यू 21 नोव्हेंबर 1984 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने झाले.

शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन…
घासल्याशिवाय धार नाही,
तलवारीच्या पातीला !
अहो घासल्याशिवाय धार नाही,
तलवारीच्या पातीला ! आणि
यशवंतरावांच्या विचारांशिवाय पर्याय
नाही या महाराष्ट्राच्या मातीला..!!

जय हिंद! जय महाराष्ट्र!

यशवंतराव चव्हाण भाषण मराठी | Yashwantrao Chavan Bhashan in Marathi – भाषण क्र.02

ईश्वराने कोकिळेला कंठ आणि मोराला पिसारा दिला, तसे मानवाला बुद्धी आणि कलेचे वरदान दिले. कला शिकवून येत नाही. ती उपजत असावी लागते. तिला प्रोत्साहन मार्गदर्शन लाभावे लागते. मग आपल्या अलौकिक प्रतिभेतून तो कलावंत सुंदर कला विश्वाची निर्मिती करतो. अशीच एक अभिजात वकृत्वाची कला लाभलेले लोकोत्तर लोकनेता यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस व कार्यास वंदन करून….

सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मान्यवर, माननीय गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो!! आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र या गावी झाला.

यशवंतरावांच्या आईचे नाव विठाबाई तर वडिलांचे नाव बळवंतराव होते. त्यांचे वडील लहानपणीच वारले. त्यानंतर यशवंतराव यांची आई विठाबाई व त्यांचे बंधू ज्ञानदेव यांनी कष्ट करून यशवंतरावांना शिक्षण दिले. त्यांचे प्राथमिक शिक्षण कराड येथे झाले. त्यांनी उच्च शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे घेतले आणि बीए एलएलबी झाले.

यशवंतराव लहानाचे मोठे होत असतानाच ते राजकारणातही सक्रिय होते. 1942 मध्ये स्वातंत्र्यलढ्यात भूमिगत होऊन त्यांनी कार्य केले. एक नोव्हेंबर 1956 मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची निवड झाली, तसेच 01 मे 1960 महाराष्ट्र राज्याची उत्साही वातावरणात स्थापना झाली. या नवीन राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले.

पुढे त्यांनी केंद्रात संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री ही महत्त्वाची मंत्रिपदे सांभाळली. या सर्वच खात्यात त्यांनी स्वतःच्या कार्याचा ठसा उमटविला. या सर्व काळात त्यांना सदैव साथ त्यांची पत्नी सौ. वेणूताई यांनी दिली.

अगदी शून्यातून यशवंतराव चव्हाण यांनी आपलं नाव आपल्या कामगिरीच्या जोरावर उभे केलेले होते. आपण केलेल्या कष्टाची जाण त्यांना होती. कोणत्याही पदाचा त्यांनी कधीही गैरवापर होऊ दिला नाही. आपल्या समाजातील दारिद्र्य मिटवून टाकणं हे त्यांचं एक स्वप्न होत.

महाराष्ट्राला व देशाला कसे प्रगतीपथावर नेता येईल हाच विचार त्यांनी नेहमी केला. ते प्रगत विचारांचे नेते होते. महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. आपल्या कर्तुत्वाने राज्यातच नव्हे तर देशात आपले नाव उंचावणारे यशवंतराव चव्हाण हे बालपणापासूनच एक विचारी, विवेकी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.

अतिशय खडतर परिस्थितीतून त्यांनी स्वतःचे व्यक्तित्व घडवले होते. गरिबी म्हणजे काय? संघर्ष म्हणजे काय? हे त्यांनी बालपणापासून अनुभवले होते. आपल्या पुढच्या काळात नेतृत्व करत असताना जनसामान्यांना अशा अडचणींना सामोरे जावे लागू नये. याची काळजी यशवंतराव चव्हाण यांनी नेहमीच केली.

25 नोव्हेंबर 1984 रोजी त्यांचे निधन झाले. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेली मेहनत खूप मोलाची आहे. परंतु आज जी महाराष्ट्राची परिस्थिती आहे, त्यानुसार पुन्हा यशवंतराव चव्हाण यांच्यासारखं व्यक्तिमत्व घडावं अशी इच्छा संपूर्ण महाराष्ट्र करत आहे. आज खरंतर महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्वाची गरज आहे.

म्हणून जाता जाता शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते…

थोर महात्मे होऊन गेले,
चारित्र्य त्यांची पहा जरा !
आपण त्यांच्या सम व्हावे,
हाच सापडे बोध खरा !!

जय जवान! जय किसान! जय विज्ञान!

यशवंतराव चव्हाण भाषण मराठी | Yashwantrao Chavan Speech in Marathi – भाषण क्र.03

आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, सुज्ञ परीक्षक, गुरुजन वर्ग तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांचे कार्य जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असणारा श्रोतावर्गहो, आज 12 मार्च… स्व. यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस…

जन्मा येणे दैवा हाती
करणी जग हासवी !

खरोखरच, यशवंतराव हे जरी आपल्यात नसले तरी, त्यांचे कार्यकर्तृत्व, त्यांचे विचार मात्र आजही जिवंत आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक आणि भारतीय घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर भारताचे आणि महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व करणारे नेते, महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री आणि माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण हे होते.

यशवंतराव चव्हाण यांचे पूर्ण नाव यशवंत बळवंत चव्हाण असे होय. ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म 12 मार्च 1913 मध्ये सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र गावात झाला. बालपणातच त्यांना आपल्या वडिलांना गमवावे लागले. त्यानंतर आई विठाबाईंनी आपल्या भावाच्या मदतीने मुलांना सांभाळले आणि शिकवले.

यशवंतराव देवराष्ट्र व सोनहिऱ्याच्या आठवणी अनेक ठिकाणी सांगत असे. तेथील माणसांच्या बद्दल ते म्हणतात, “उत्तम जमिनीत बी पेरले म्हणजे पिक चांगले फोफावते. तशी इथली माणसे आणि मने ! यांच्यात द्वेषाची धग नाही.” अशा बालपणीच्या आठवणी यशवंतरावांनी पुन्हा पुन्हा अळविल्या आहेत. कृष्णकाठ मध्ये त्यांनी आपल्या आईच्या ओवीची आठवण काढली आहे.

नका, बाळांनो डगमगू,
चंद्र सूर्यावरील जाईल ढगू…

यशवंतराव आईच्या प्रेमळ, संजीवनी छत्राखाली वाढत होते. घडत होते. मिठाई तशी अत्यंत सोशील, काटकसरी स्वभावाची, शांत, गंभीर माऊली होती. तिने पतीच्या निधनाच्या दुःखातून स्वतःला सावरले.

अडचणीच्या काळातही तिने मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यासच घेतला होता. शिक्षण ही एक शक्ती आहे, असे समजून तिची धडपड चालू होती. पुढे यशवंत मोठा होऊ लागला. तेव्हा त्याच्या शिक्षणाचा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. एकीकडून चव्हाण कुटुंबाचे जीवन कष्टमय धडपडीतून जात असताना परिस्थितीचे दाहक चटके ही त्यांना बसत होते.

आर्थिक विवंचनेचा एक काळा ढग त्यांच्या डोक्यावर तरंगत असे. पण एवढ्या लहान वयात व अशा परिस्थितीतही यशवंतराव कधी दुःखी, नाराज झालेले दिसत नाहीत. उलट भोवतालच्या लोकजीवनाचे निरीक्षण करण्यात आणि त्या लोक जीवनात समरस होण्यात त्यांना आनंद होता.

यशवंतरावजी वयाच्या सोळाव्या वर्षी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. 1942 च्या आंदोलनात त्यांनी सर्व सातारा जिल्हा उतरविला होता. 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही काळ सातारा येथे वकिली करून ते 1952 पासून पूर्ण वेळ राजकारणात उतरले.

दैभाषिक महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काही काळ ‘पुरवठा मंत्री’ त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून 1956 ते 1960 त्यांनी काम केले. तर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीवर ते स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले 1962 ते 1984 एवढा प्रदीर्घकाळ ते भारताचे संरक्षण, गृह, अर्थ, परराष्ट्र आणि व्यवहार मंत्री होते. तर काही काळ विरोधी पक्षनेते व भारताचे उपपंतप्रधान होते. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले यशवंतरावजी अखिल भारतीय नेते झाले. हे त्यांचे असामान्यत्वच आहे.

कृषी-औद्योगिक समाज रचना, सहकारातून समाज प्रगती, विविध औद्योगिक वसाहती, सहकारी बँका, पतसंस्था, पूरक संस्था यांची उभारणी कोयना सारखी मोठी धरणे व छोटी शेततळी योजना, जलसंधारण कामे, विभागीय विद्यापीठांची उभारणी, लेखकांना उत्तेजन आणि पुरस्कार योजना, साहित्य संस्कृती मंडळ निर्मिती, विश्वकोश निर्मिती मंडळ अशी चौफेर दृष्टी ठेवून केलेली रचनात्मक कामे हे स्व. यशवंतरावजींचे कार्य कर्तृत्वच आहे.

सामान्य लोकांचा समाजकारणात राजकारणात सहभाग असावा म्हणून पंचायत राज जिल्हा परिषद निर्मिती स्थानिक नेतृत्वाला संधी व कार्यकर्तुत्वाचे डोंगर उभा करण्याचे आवाहन हे सारे यशवंतरावांनी आपल्या कार्यकाळात करून घडवून दाखविले.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी भारतावर चीनने विश्वासघातकी आक्रमण केल्यावर देशातील एक कणखर नेता म्हणून संरक्षण मंत्रीपदी स्व. यशवंतराव चव्हाण यांनाच बोलावले आणि त्यांनी आपली कर्तबगारी दाखविली.

1962 ते 1994 इतका प्रदीर्घकाळ ते केंद्रात मंत्री होते. दिल्लीत त्यांनी महाराष्ट्राचा दबदबा निर्माण केला होता. महाराष्ट्र या नावातील शक्ती देशाला दाखवून दिली होती. यामागे त्यांचा सखोल अभ्यास, निर्णय क्षमता, परिश्रम, प्रखर देशभक्ती व लोकहित दृष्टी होती.

शेवटी मी एवढेच म्हणेन की…
असा मोहरा झाला नाही
पुढे न होणार ..
यशवंतरावांचे नाव
सतत गर्जत राहणार…

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

सारांश | यशवंतराव चव्हाण भाषण मराठी | Yashwantrao Chavan Speech in Marathi 2023

मित्रहो, वरील लेखात आपण यशवंतराव चव्हाण भाषण मराठी तून पाहिले. वरील लेखात आपण एकूण 03 अतिशय सुंदर आणि धडाकेबाज भाषणे पाहिली. आम्हाला आशाच नाही तर खात्री आहे की आपल्याला वरील भाषणे नक्कीच उपयोगी पडतील. आपल्या शाळा, कॉलेज किंवा कार्यालयात ही भाषणे द्या आणि श्रोत्यांची मने जिंकून घ्या.

आपल्याला जर ही भाषणे आवडली असतील तर ही भाषणे आपल्या गरजू विद्यार्थ्यांना, मित्रांना नक्की शेअर करा. आपण आपले विचार Comment द्वारे आम्हला सांगू शकता. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Yashwantrao Chavan Bhashan in Marathi | यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी भाषण मराठी | यशवंतराव चव्हाण भाषण मराठी 2023 | Yashwantrao Chavan Speech in Marathi 2023 | यशवंतराव चव्हाण यांचे भाषण मराठी Yashwantrao Chavan Bhashan in Marathi | यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी भाषण मराठी | यशवंतराव चव्हाण भाषण मराठी 2023 | Yashwantrao Chavan Speech in Marathi 2023 | यशवंतराव चव्हाण यांचे भाषण मराठी

Leave a Comment