जागतिक ग्राहक दिन माहिती मराठी | संपूर्ण माहिती | इतिहास | का साजरा करतो | Jagtik Grahak Din Information in Marathi 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Jagtik Grahak Din Information in Marathi 2023 | जागतिक ग्राहक दिन माहिती मराठी 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात जागतिक ग्राहक दिनाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जागतिक ग्राहक दिन (World Consumer Day) आपण का साजरा करतो? 15 मार्च लाच आपण जागतिक ग्राहक दिन का साजरा करतो? जागतिक ग्राहक दिनाचा संपूर्ण इतिहास आज आपण येथे बघणार आहोत.

का साजरा करतो आपण जागतिक ग्राहक दिन?

पूर्वी व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असे. या फसवणुकीचा ची दखल घेण्यासाठी कायद्याची गरज होती.

आधुनिक काळात जगणारा ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा असतो. आजच्या स्पर्धात्मक युगात ग्राहक बाजारपेठेत होणाऱ्या खरेदी विक्रीच्या व्यवसायाचा केंद्रबिंदू बनला आहे.

वाजवी किंमत आणि शुद्धता या ग्राहकाच्या मुख्य गरजा आहेत. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा बनविला गेला. या कायद्यानुसार आता कोणताही ग्राहक अनुचित व्यापाराची तक्रार करू शकत शकतो.

यासाठी त्यांना संपूर्ण अधिकार देण्यात आले आहे पूर्वीच्या काळात व्यवसायिकांच्या व्यवहारात होणारी हेराफेरी लक्षात घेऊनच हा कायदा बनवण्यात आला. दरवर्षी 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो.

ग्राहक संरक्षण कायद्यामुळे सर्व ग्राहकांना सुरक्षेचा अधिकार, उत्पादनाबाबतच्या माहितीचा अधिकार, निवडीचा अधिकार, तक्रार निवारणाचा अधिकार आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. या आधारे एखाद्या उत्पादन सेवेबाबत जाणून घेणे, त्याबाबत तक्रार असल्यास त्याची निरसन करून घेण्याचा हक्क नागरिकांना मिळू शकला. या कायद्यामुळे ग्राहकांचे हक्क जोपासण्याचे दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले.

जागतिक ग्राहक दिनाचा इतिहास

अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये 15 मार्च 1962 मध्ये तात्कालीन राष्ट्राध्यक्ष ‘जॉन केनेडी‘ यांनी ग्राहकांच्या अधिकाराबद्दल भाषण केले होते. ग्राहक हक्काबद्दल भाष्य करणारे ते पहिले नेते ठरले होते. ग्राहक हक्कांची चळवळ चालवणाऱ्या नागरिकांनी 1983 मध्ये पहिल्यांदा जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यास सुरुवात केली.

भारतात 1986 मध्ये 24 डिसेंबरला ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला. तर सन 1991 आणि 1993 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली. या कायद्याचा जास्तीत जास्त वापर केला जावा म्हणून डिसेंबर 2002 मध्ये पुन्हा या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. नंतर 15 मार्च 2003 पासून या कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. तथापि या कायद्यात सुद्धा 1987 मध्ये सुधारणा करण्यात आली होती.

भारताचा एखादा नागरिक म्हणून राज्यघटनेने आपल्याला नागरिकत्वाचे हक्क दिले. तसेच ग्राहक म्हणूनही आपल्याला काही अधिकार देण्यात आले आहेत. त्यातील पहिला आणि सर्वात मोठा हक्क म्हणजे ग्राहकांना दिलेल्या किमतीच्या समान वस्तू त्यांना मिळाली पाहिजे.

वाजवी किंमत आणि शुद्धता या ग्राहकांच्या मुख्य गरजा आहेत. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा बनविला गेला आहे. त्या कायद्यानुसार आता कोणताही ग्राहक अनुचित व्यापाराची तक्रार करू शकतो. यासाठी त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत.

ग्राहक म्हणून मिळालेले एकूण 06 हक्क जाणून घ्या

1) सुरक्षेचा हक्क

आपण एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा त्या वस्तूच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी उत्पादकांनी घेणं अनिवार्य असतं.

2) माहितीचा हक्क

एखाद्या उत्पादनाबद्दल सर्व माहिती मिळवणं हा ग्राहकांचा हक्क आहे. त्या उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, संख्या, शुद्धता, किंमत या सर्वांची माहिती मिळवण्याचा हक्क आहे.

3) निवड करण्याचा अधिकार

आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. वस्तू खरेदी करण्यासाठी जर तुम्ही एखाद्या दुकानात गेला आणि त्या ठिकाणी तुम्हाला फक्त एकाच ब्रॅंडच्या वस्तू दुकानदार विकत घेण्यास सांगत असेल तर लक्षात घ्या की, हे तुमच्या हक्कांचं उल्लंघन आहे.

4) तुमचं म्हणणं मांडण्याचा हक्क

जर तुम्हाला वाटत असेल तुमची फसवणूक झाली आहे तर तुम्हाला तुमचं म्हणणं योग्य ठिकाणी मांडण्याचा पूर्ण हक्क आहे.

5) तक्रार करण्याचा आणि निवारण करून घेण्याचा हक्क

जर ग्राहकाची फसगत झाली असेल तर त्याला तक्रार नोंदवण्याचा हक्क आहे. जर तक्रार रास्त असेल तर तिचं निवारण होईल असा हक्क कायद्यानं ग्राहकाला दिला आहे.

6) ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार

ग्राहक हक्क शिक्षणाच्या अभावामुळं ग्राहकांची फसवणूक होते असं ग्राहक हक्क चळवळ कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

ग्राहकांनी आपले हक्क काय आहेत हे नेहमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी सरकार वेगवेगळे उपक्रम राबवत असतं, तसंच स्वयंसेवी संस्था शिबिरं किंवा कार्यशाळा घेत असतात.

सारांश | जागतिक ग्राहक दिन माहिती मराठी | Jagtik Grahak Din Information in Marathi 2023

मित्रांनो, वरील लेखात आपण जागतिक ग्राहक दिनाचा इतिहास, जागतिक ग्राहक दिंन साजरा करण्याचे कारण आणि एक ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेले 06 हक्क आपण जाणून घेतले.

मित्रानो, आपल्याला ही माहिती कशी वाटली? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपल्या मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Jagtik Grahak Din Information in Marathi 2023 | World Consumer Day Information in Marathi |

Leave a Comment