गुढीपाडवा कविता मराठी 2023 (07+ अतिशय सुंदर कविता) | Gudipadwa Kavita in Marathi 2023 | गुढीपाडव्याच्या कविता मराठी

Gudipadwa Kavita in Marathi 2023 | गुढीपाडवा कविता मराठी 2023 – नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो, आमच्या ordar.in या मराठी ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या लेखात गुढीपाडवा या सणाविषयी 07+ अतिशय सुंदर कविता मराठी मध्ये बघणार आहोत.

मित्रांनो, प्रथम आपल्याला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो या गुढीपाडवा कविता तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता कवितेला सुरुवात करुया.

गुढीपाडवा कविता मराठी – कविता क्र.01

जल्लोष करूया नववर्षाचा
प्रभू रामचंद्रांच्या आगमनाचा
सण हा उत्साहाचा
मराठमोळ्या अस्मितेचा

वसंताच्या सुरुवातीला आला चैत्र पाडवा
पसरावा सगळीकडे साखरेचा गोडवा
माणसा माणसातला विश्वास वाढावा
सोडून सारे राग द्वेष, साजरा करूया हा गुढीपाडवा

ब्रह्मदेवाने आज या शुभ दिनी
निसर्गरम्य ही सृष्टी रचली
मंगलमय मुहूर्ताला या
प्रत्येक दाराशी गुढी सजली

गुढी उभारू नवचैतन्याची
प्रभू रामचंद्रांच्या विजयाची
सुखाची समृद्धीची
आणि प्रत्येकातल्या माणुसकीची

नव्या वर्षी नवे स्वप्न पाहू
देवाच्या चरणी सुंदर फुले वाहू
आणि नव्या उमेदीने नवा ध्यास हा घेऊ
बंधूभावाने व एकजुटीने आपण सारे राहू

सर्वांना नूतन वर्ष आनंदाचे
जावो हीच सदीच्छा
नव वर्ष आणि गुढीपाडव्याच्या
सर्वांना खूप खूप शुभेच्छा

गुढीपाडवा कविता मराठी – कविता क्र.02

सण हा नवीन वर्षाचा
आनंद सोबत घेऊन आला
नवे प्रतिक चैतन्याचे
तेजाने न्हाऊन गेला

गुढी उभारू प्रेमाची
बांधू साखळी एकीची
आनंद वाहला चहूकडे
घेऊनी शिदोरी सुखाची

तोरण सजले दारी
साथ दिली रांगोळीने
उत्साह दंगला सर्वीकडे
गोड अशा प्रीतीने

आकाशी रंगला हा गंध
सोहळा मनी गुंतला
हर्ष नवा आला
ह्या वसंताच्या अस्मितेला

पसरला चहू दिशांना
हा साखरेतला गोडवा
विश्वासाने साजरा करू
हा सण गुढीपाडवा

गुढीपाडवा कविता मराठी – कविता क्र.03

होळीत जाळूनी हेवेदावे
संपवली धुळवड द्वेशाची
प्रेम रंगांची खेळूनी पंचमी
गुडी उभारली नवाशेची

उगवली आज नवी प्रभात
घेऊन आली मराठी वर्ष
दारात उभी ही गुढी स्वागता
मराठी मनात ओसांडतो हर्ष

सोसली पानगळ तरुतरुणी
शिशिराने केली जरी दशा
वसंत आला निसर्ग फुलवीत
चैत्रपालविणे नटली नवी उषा

नवे संकल्प मराठी मनाचे
नव्या वर्षी मनामनात बांधू
नाते तुमचे आमचे अतूट हे
आपुलकीच्या धाग्यांनी सांधू

मनाच्या द्वारी उभारूया गुढी
रोज करेल जी स्वागत आपले
नको निमित्त ते सणावाराचेच
माणुसकीचे बंध मनात जपले

शुभ गुढीपाडवा प्रियजनांनो
मंगलमय तुम्हास मराठी वर्ष
सरोत सारे दुःखाचे क्षण नि
आयुष्या लाभो सुखाचाच स्पर्श

गुढीपाडवा कविता मराठी – कविता क्र.04

शुभारंभ करी शक गणनेचा
करुनी पराभव दुष्ट जणांचा
शालीवाहन नृपती आठवा
चैत्रमासिचा गुढीपाडवा

किरण कोवळे रवीराजाचे
उल्हासित करते मन सर्वांचे
प्रेम भावना मनी साठवा
हेच सांगतो गुढीपाडवा

घराघरांवर उभारूया गुढी
मनामनातील सोडून अढी
संदेश असा हा देवी मानवा
चैत्र प्रतिपदा – गुढीपाडवा

जुन्यास कोणी म्हणते सोने
कालबाह्य ते सोडून देणे
नव्या मनुचे पाईक व्हा
हेच सांगतो गुढीपाडवा

नववर्षाचा सण हा पहिला
वसंत ऋतूने सुरु जाहला
प्रण करूया मनी नवा
हेच सांगतो गुढीपाडवा

गुढीपाडवा कविता मराठी – कविता क्र.05

गुढीपाडव्याचा सण
आता उभारा रे गुढी
नव्या वर्षाचे देन
सोडा मनातली अडी

गेलं सालं गेली आढी
आता पाडवा पाडवा
अरे उठा झाडा अंगण
गुढीपाडव्याचा सण

आता अंगण झाडूनी
गेली राधी महारीन
हा हा म्हणता म्हणता
गेली रामप्रहर निघूनी

आता पोतारा रे घर
सुधारा रे पडझडी
करिसन सारवण
दारी उभारा रे गुढी

चैत्राच्या या उन्हामंधी
जीव व्हये कासावीस
रामनाम घ्या रे आता
रामनवमीचा दिस

आता गुढीपाडव्याले
म्हणा गुढी उभारणी
काय लोकाची बी तऱ्हा
कसे भांग घोटा पेले

असं म्हणू नही कधी
जसं उभ्याले आडवा
गुढी उभारती त्याले
कसं म्हणती पाडवा
गुढी उभारती त्याले
कसं म्हणती ‘पाडवा’

गुढीपाडवा कविता मराठी – कविता क्र.06

सृष्टी स्वागतास उभी
सप्तरंगी न्हावून आली
नववर्षाची गुढी
पाडव्याच्या क्षणी सजून आली

बारा वर्षाचा वनवास संपवून
राम अयोध्येसी आले
आज तो शुभदिन
गुढी दारावर सजे

दारी रांगोळ्यांचा रंग
दारी तोरण आंब्याचे
गुढी उंच उभारूया
करू पूजन मांगल्याचे

गुडी सप्तरंगी झाली
अंगणाची शान
कडुनिंब गूळ फुल
यांच्या प्रसादाचा मान

ध्वजा समृद्धीची जावो
उंच उंच आसमंतात
सुख वैभव मिळू दे
क्षणोक्षणी आयुष्यात

धन वैभव मिळावे
निरोगी आयुष्य लाभावे
घरोघरी लक्ष्मी वसु दे
हेच मागणे आमुचे

गुढीपाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा

गुढीपाडव्याच्या कविता मराठी | Gudipadwa Poem in Marathi – कविता क्र.07

आनंदाची उधळण करीत
चैत्र पंचमी दारी आली…

नव्या ऋतूत नव्या जीवनात
उत्साहाची पालवी फुलली …

कडुनिंब दुःख निवारी
साखर सुख घेऊन येई…

पानाफुलांचे तोरण बांधून दारी
इच्छा आकांक्षांची गुढी
उभारूया आपल्या दारी…

सारांश | गुढीपाडवा कविता मराठी | Gudipadwa Kavita in Marathi

मित्रानो, वरील लेखात आपण गुढीपाडवा कविता मराठी मध्ये बघितल्या. वर एकूण 07+ अतिशय सुंदर गुढीपाडव्याच्या कविता बघितल्या. मित्रांनो आपल्याला या कविता कशा वाटल्या आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

गुढीपाडव्याच्या आपणास व आपल्या कुटुंबियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

1 thought on “गुढीपाडवा कविता मराठी 2023 (07+ अतिशय सुंदर कविता) | Gudipadwa Kavita in Marathi 2023 | गुढीपाडव्याच्या कविता मराठी”

  1. अत्यंत आनंदायी गुढीपाडवा साजरा करित आहोत आम्ही सर्व ह्या कवितांच्या माध्यमातून
    इतक्या सहज आमच्याकरिता उपलब्द करून दिल्या बद्दल आपले खूप खूप आभार
    व गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

    Reply

Leave a Comment