गुढीपाडवा कसा साजरा करावा 2023 | साहित्य | पूजा विधी काय असते | Gudipadwa Kasa Sajara Karava| गुढीपाडव्याचा पूजा विधी कसा आहे?

Gudipadwa Kasa Sajara Karava | गुढीपाडवा कसा साजरा करतात? – नमस्कार माझ्या मित्र-मैत्रिणींनो, सध्या कसे वातावरण अगदी प्रसन्न वाटत आहे ना. रस्त्याने जाताना झाडांना अगदी सुंदर, ताज्या कलरची फुले आणि पालवी दिसत आहे. ही सगळी चिन्ह आहेत ते वसंत ऋतुची. वसंत ऋतू म्हणजेच नवीन वर्षाचा स्वागत करणार ऋतू होय.

नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होते. यावर्षी म्हणजे 2023 मध्ये गुढीपाडवा सण हा दिनांक 22/03/2023 रोजी आहे.आज आपण या लेखात गुढीपाडव्याचा पूजा विधी कसा आहे?, गुढीपाडवा कसा साजरा करतात? गुढीपाडव्याच्या विशेष महत्त्व याबद्दल माहिती बघणार आहोत. चला तर वेळ वाया न घालवता माहितीला सुरुवात करुया.

गुढीपाडवा कसा साजरा करावा?

गुढीपाडवा कसा साजरा करावा? त्यासाठी साहित्य काय काय लागणार? पूजा विधी कशी आहे? या सर्वांची माहिती आपण पुढे स्टेप बाय स्टेप पाहुयात.

गुढी उभारण्यासाठी साहित्य

एक छान आणि सुंदर गुढी उभारण्यासाठी खालील प्रमाणे साहित्य लागणार आहे.

 1. एक 07 ते 10 फुट लांबीचे बांबू.
 2. एक पितळाचा किंवा स्टील चा तांब्या
 3. हळद आणि कुंकू
 4. एक नवीन वस्त्र – रेशीम कापड किंवा साडी
 5. कापड बांधण्यासाठी एक दोर किंवा नाडी
 6. नवीन पालवी फुटलेले आंब्याचे डहाळे
 7. नवीन पालवी फुटलेले लिंबाचे डहाळे
 8. कडुनिंबाचा पाला
 9. सखरीच्या गाठी
 10. खडी साखर
 11. पेढे
 12. फुलांची माळ आणि फुले
 13. संपुर्ण जेवणाचा नैवेद्य
 14. आणि एक खास नैवेद्य

गुढी उभारण्याची पद्धत

चला तर आता आपण गुढी उभारुया.

 1. सर्वप्रथम बांबूची काठी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी.
 2. मग त्याला गंधाच्या पाच पट्ट्या ओढायच्या .
 3. त्यानंतर तांब्याला देखील गांधाच्या पाच पट्ट्या ओढाव्यात.
 4. आता जे रेशीम कापड किंवा साडी आपण घेतली आहे त्याला योग्य ती आढी घालून घ्यावी.
 5. त्यानंतर हे घडी घातलेले वस्त्र, आंब्याचे डहाळे, लिंबाचे डहाळे, गाठी आणि फुलांचे हार हे सर्व बांबूच्या वरच्या टोकाला दोराने बांधून घ्यावेत.
 6. त्यावर तांब्या उलटा बसवावा.
 7. आता छान प्रकारे गुढी तयार झाली आहे.

गुढीपाडव्याची पूजा विधी

गुढी तयार झाल्यानंतर ती गच्चीवर, खिडकीत किंवा दारात तुळशीच्या जवळ अशा थोड्या उंच ठिकाणी लावावी. गुढीची पूजा पुढील प्रमाणे करावी.

 1. प्रथम गुढीला हळद कुंकू लावावी.
 2. त्यानंतर त्याची आरती ओवाळवी.
 3. गुढीला फुल आणि खडीसाखर वाहुव्यात.
 4. पेड्याचे नैवैद्य दाखवावे.
 5. महत्वाचे म्हणजे या दिवशी एक खास प्रकारचे नैवेद्य दाखवावे लागते.
 6. त्यासाठी साहित्य कडुलिंबाचा पाला, काळी मिरी, गुळ, भाजलेला ओवा, जिरे, काळे मीठ आणि धने लागते.
 7. हे सर्व साहित्य मिळवून वाटून घ्यायचे आहे.
 8. हेच पावडर अजाचे विशेष नैवद्य असते.
 9. आणि दुपारचे जेवण बनवल्यानंतर श्रीखंड पुरीचा नैवद्य दाखवयाचा असतो. गुढीपाडव्याचा हा खास बेत असतो.
 10. यामध्ये श्रीखंड पुरी, वरण भात, मसाले भात आणि आपल्या आवडीची भाजी या सर्व बाबी असतात.
 11. शेवटी संध्याकाळी गुढीला साखरेचा नैवेद्य दाखवून गुढी उतरवून घ्यावी.

गुढीपाडव्याचे महत्त्व

गुढीपाडव्याला साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. त्यामुळे या दिवशी सगळी चांगली कामे केली जातात. या दिवशी काम करण्यासाठी कुठलाही मुहूर्त बघितला जात नाही.

पुराणांमध्ये अशी अख्यायिका आहे की प्रभु श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपवून आयोध्येला परतले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी प्रजेने आपापल्या घरासमोर विजयाची आणि सुखाची गुढी उभारली होती.

या दिवशी लोक नवीन कार्याला सुरुवात करतात. नवीन वस्तू विकत घेतात. या दिवशी लोक शोभायात्रा काढतात. आपली पारंपरिक वेशभूषा करतात. अशा प्रकारे मोठ्या उत्साहात गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो.

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नव वर्षाचा पहिला दिवस. हा सण चैत्रशुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. नववर्षाचा हा पहिला दिवस अतिशय पवित्र मानला जातो.

सारांश | गुढीपाडवा कसा साजरा करतात? | Gudipadwa Kasa Sajara Karava

मित्रांनो, वरील लेखात आपण गुढीपाडवा हा सण कसा साजरा करावा? गुढीपाडव्याला कोणकोणते साहित्य लागते? पूजा कशी करावी? गुढीपाडव्याची पूजा विधी कशी आहे? गुढीपाडव्याचे महत्त्व काय? या सर्व बाबी बघितल्या.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपल्या काही सूचना, मत असतील तर ते ही आम्हला कळवा. आपल्या गरजू मित्र – मैत्रिणींना ही माहिती नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Leave a Comment