माझे आदर्श शिक्षक निबंध मराठी (05+ सर्वोत्तम निबंध) | Maze Adarsh Shikshak Nibandh Marathi 2023 | माझे आदर्श शिक्षक निबंध


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

माझे आदर्श शिक्षक निबंध मराठी | Maze Adarsh Shikshak Nibandh Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आपल्या जीवनातील पहिली गुरु ही ‘आई’ असते आणि दुसरे गुरु हे आपले ‘शिक्षक‘ असतात. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मित्रांनो शाळेत माझे आदर्श शिक्षक या विषयावर एक निबंध लिहिण्यास नक्की सांगितले जाते.

आणि म्हणूनच आज आम्ही या लेखात माझे आदर्श शिक्षक या वर निबंध आपल्यासाठी आणले आहे. आज आपण या लेखात माझा आदर्श शिक्षक या विषयावर 5+ अतिशय सुंदर आणि सोपे निबंध बघणार आहोत. आम्हाला खात्री आहे की आपल्याला ही निबंध नक्की आवडतील. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालविता निबंधाला सुरुवात करुया.

माझे आदर्श शिक्षक निबंध मराठी – निबंध क्र.01

माझे आदर्श शिक्षक निबंध 10 ओळी

  1. मी इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे.
  2. माझ्या शाळेचे नाव रेशमाई विद्यामंदिर असे आहे.
  3. माझ्या शाळेतील श्री. दाबके सर हे माझे आदर्श शिक्षक आहेत.
  4. ते माझे आवडते शिक्षक आहे व मी त्यांचा खूप आदर करतो.
  5. श्री. दाबके सर हे गणित व विज्ञान हे विषय शिकवतात.
  6. त्यांच्या कडे शिकवण्याची एक अद्भुत कला आहे.
  7. त्यांनी शिकवलेली सर्व समीकरणे लगेच लक्षात राहतात.
  8. त्यांचा स्वभाव खूप शांत आहे. पण जर आपण अभ्यास केला नाही तर ते रागावता देखील.
  9. ते सर्वांचे आवडते शिक्षक आहे. ते नेहेमी सर्वांची मदत करतात.
  10. ते आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन करतात.

माझे आदर्श शिक्षक निबंध मराठी – निबंध क्र.02

माझे आदर्श शिक्षक

ज्यावेळी आपण या जगात येतो, तेव्हा आपल्या आयुष्यातील पहिली गुरु ही आपली आई – वडील असतात व दुसरे गुरु हे शिक्षक असतात. ज्या प्रमाणे आपल्या आयुष्यात आई – वडीलांचे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

लहान मूल हे मातीच्या कच्च्या मडक्यासारखे असतात. त्यांना जसे घडवले तसे ते घडतात. शिक्षक हा मुलांचे आयुष्य घडविणारा एक कुंभराच असतो.

आज मी आपल्या समोर माझ्या आदर्श शिक्षांबद्दल माझ्या मनातील विचार सांगणार आहे. मी इयत्ता आठवी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव श्री. गणेश विद्यालय, देवगाव (रं) असे आहे. तसे पाहता आमच्या शाळेतील सर्वच शिक्षक वृंद हे चांगले आहे. ते सर्व खूप छान शिकवतात.

परंतु या सर्वांमध्ये माझ्या आवडत्या शिक्षिका या श्रीमती रामटेके मॅडम या आहेत. त्या माझ्या आदर्श शिक्षिका आहेत. श्रीमती रामटेके मॅडम या शारीरिक शिक्षण या विषयाच्या शिक्षिका आहेत. त्यांचा स्वभाव शांत आणि मनमिळाऊ आहे. त्या आमचे म्हणणे ऐकून घेतात. आम्हाला निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहन देतात.

शाळेत जर कोणी आजारी पडला तर त्या लगेच त्याला दवाखान्यात घेऊन जातात. नंतरही त्याची विचारपूस करीत असतात. त्यांचे शिकवणे मला खूप आवडते. त्यांच्या शिकवण्यामधे जादू आहे. त्यांनी शिकवलेली धडे लगेच लक्षात राहतात. मागच्या वर्षी मी शारीरिक शिक्षण या विषयात 100 पैकी 96 गुण मिळवले होते. याचे श्रेय फक्त रामटेके मॅडम यांना जाते.

श्रीमती रामटेके मॅडम या शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात आग्रेसर असतात. त्या शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात सूत्रसंचालन करतात. त्यांचा आवाज ही खूप मधुर आणि गोड आहे. मला या शाळेत आतापर्यंत 03 वर्षे पूर्ण झाली परंतु मी आतापर्यंत त्यांना कधीही चिडचिड करताना किंवा रागवताना पाहिले नाही.

मागच्या वर्षी त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार आपल्या राज्याचे राज्यपाल यांच्या हाती देण्यात आला. ही बाब आमच्या साठी व आमच्या शाळेसाठी खूप अभिमानाची ठरली. श्रीमती रामटेके मॅडम यांच्यामुळेच आमच्या शाळेचा मान उंचावली.

त्यांच्या कडे बघून मलाही मोठे होऊन शिक्षक होण्याची इच्छा आहे. मी सुध्धा त्यांच्यासारखा एक आदर्श शिक्षक होण्याचा प्रयत्न करील. समाजामध्ये शिक्षकाचे खूप महत्त्व आहे. शिक्षक हा समाजाचा एक महत्त्वाचा अंग आहे. आणि मलाही समजाचा एक महत्त्वाचा अंगा होण्याची इच्छा आहे. धन्यवाद!

-: समाप्त :-

माझे आदर्श शिक्षक निबंध मराठी – निबंध क्र.03

माझे आदर्श शिक्षक

शिक्षक – शब्दांनी ज्ञान वाढवणारे
जगण्यातून जीवन घडवणारे
मूल्यातून तत्वे शिकवणारे
समाजाला योग्य दिशा दाखवणारे

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शिक्षकाला अमूल्य स्थान असते. आई – वडील हे आपले पहिले गुरू असतात, तर शिक्षक हे आपले दुसरे गुरु असतात. शिक्षक आपल्याला शिकवता-शिकवता चांगले संस्कार देण्याचे महान कार्य करतात. आम्हा विद्यार्थ्यांच्या चिमुकल्या पंखात आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य शिक्षक निर्माण करतात.

असेच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे आदर्श शिक्षक पवार सर माझे प्रेरक शिक्षक आहेत. ते एक शिस्तप्रिय व सामाजिक प्रिय शिक्षक आहेत. त्यांना सर्व विषयाचे सखोल ज्ञान आहे. त्यांच्यामुळे आमची शाळा जिल्ह्यात आदर्श शाळा ठरली आहे.

पवार सर आमच्या गावात राहत असल्याने आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. ते रविवारी सुट्टीच्या दिवशीही आमचे स्कॉलरशिप तसेच इतर स्पर्धा परीक्षांचे नियमित तास घेतात. त्यामुळे त्यांचे अनेक विद्यार्थी शासकीय नोकरीत मोठ्या पदावर आहेत. ते आम्हाला आमचे अंगभूत गुण ओळखून अधिक मार्गदर्शन करतात. माझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांच्याजवळ असतात.

त्यांना तंत्रज्ञानाची विशेष आवड आहे. त्यांचे स्वतःचे यूट्यूब चैनल, ब्लॉग आहेत. ते खूप छान व्हिडिओ बनवून आम्हाला पाठवतात. हे कार्य ते पूर्वीपासून गेली चार-पाच वर्षे करीत आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व दूर पोहोचले आहेत.

गावातील सर्व नागरिकांचे शारीरिक, मानसिक बळ वाढवण्याचे विशेष कार्य आमचे सर करतात. सरांचे हे कार्य अचंबित करणारे आहे. मला त्यांच्यात थोर समाजसेवक संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, आद्य शिक्षक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादी दिसतात.

आमच्या सरांचे अखंड ज्ञानदान तसेच समाजसेवेचे व्रत चालूच आहे. मला त्यांचा खूप खूप अभिमान वाटतो. पवार सरांमुळे गावात शिक्षणाप्रती जण जागृती झाली आहे. शासकीय योजनांची पारदर्शक पणे अंमलबजावणी होत आहे. शिक्षणापासून कोणीच वंचित राहू नये असे सरांचे धेय आहे. म्हणूनच श्री. पवार सर माझे आदर्श शिक्षक आहे.

-: समाप्त :-

माझे आदर्श शिक्षक निबंध मराठी – निबंध क्र.04

माझे आदर्श शिक्षक

श्री. काळे सर हे माझे प्रेरक तसेच आदर्श शिक्षक आहेत. ते खूप हुशार, शिस्तप्रिय, वक्तशीर तसेच प्रामाणिक आहेत. ते आम्हाला गणित हा विषय शिकवतात. त्यांची शिकवण्याची पद्धत खूप सोपी असून सर्वांना लवकर समजते. सर गणित विषय शिकवताना फक्त पुस्तकातील उदाहरणे सोडवून घेत नाहीत. तर दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरण सोडवून घेतात. त्यामुळे आम्हाला गणित विषयाची गोडी लागली आहे.

कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला योग्य आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो. त्याचप्रमाणे शिक्षक हे आपल्याला योग्य वळण लावून आदर्श, संस्कारशील नागरिक घडवतात. सर फक्त पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर शाळेत आयोजित इतर सर्व स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करतात. त्यांच्यामुळे मी अभ्यासाबरोबर खेळ, नृत्य, गायन, वकृत्व, निबंध इत्यादी स्पर्धेत भाग घेऊ लागलो आहे.

शिक्षकांचा दर्जा हा देवासमान असतो. ते आपले खरे मार्गदर्शक, मित्र असतात. काळे सर मला नेहमी म्हणतात की, “तू तुझ्या जीवनात खूप मोठा हो त्याचबरोबर एक आदर्श व्यक्ती बन.” ते आमच्यावर खूप चांगले संस्कार करतात.

मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. कारण मला श्री. काळे सरांसारखे आदर्श, अष्टपैलू, व्यक्तिमत्व असलेले शिक्षक लाभले आहे. श्री. काळे सर हे माझे आदर्श शिक्षक आहेत.

-: समाप्त :-

माझा आदर्श शिक्षक निबंध मराठी – निबंध क्र.05

माझे आदर्श शिक्षक

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा,
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः

गुरुचे स्थान हे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत माणूस शिकतो. आपल्याला चांगले शिकवण्याचे व घडवण्याचे कार्य गुरु करतात. आई ही मुलाला घडवणारी पहिली गुरु आहे. त्यानंतर त्या मुलाला चांगला विद्यार्थी व व्यक्ती म्हणून घडविण्याचे कार्य शाळेतील “शिक्षक” करतात.

कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन घडवतो. तसेच शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात. आपल्या भारतीय संस्कृतीत शिक्षकाला खूप महत्त्व दिले जाते. शिक्षक विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही. तर व्यवहारिक व आध्यात्मिक ज्ञान सुद्धा देतात. विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न करण्याचा प्रयत्न शिक्षक करत असतात.

माझ्या शाळेत सुमारे 20 शिक्षक आहेत. त्यातील काही शिक्षक आम्हाला विषयानुसार शिकवतात. ती सर्वच शिक्षक प्रेमळ, दयाळू आहेत. परंतु त्यातील चोपडे गुरुजी मला खूप आवडतात. ते आम्हाला मराठी विषय शिकवतात. त्यांचे हस्ताक्षर खूपच सुंदर, स्वच्छ व रेखीव आहे. एखादा पाठ शिकवताना ते आपल्या परिसरात घडणाऱ्या तसेच अद्यावत असणाऱ्या घटना व गोष्टींचा उदाहरण म्हणून उपयोग करतात.

मराठीचे व्याकरण शिकवताना ते खूप उदाहरणे देऊन व समजावून सांगतात. आम्हाला खूप मजेदार गोष्टी सांगतात. त्यामुळे त्यांच्या तासाला आम्हाला अजिबात कंटाळा येत नाही. मराठीतील कविता अगदी सूर, ताल व अभिनयासहित करून दाखवतात. एखादा धडा समजला नाही किंवा प्रश्नांचे उत्तर समजले नाही तर ते पुन्हा पुन्हा न कंटाळता समजावतात.

मराठी हा विषय जरी त्यांचा असला, तरी ते खूप सुंदर चित्र काढतात. त्यांना चित्रकला, संगीत व खेळ यांची आवड आहे. त्यामुळे ते आम्हाला वेगवेगळे चित्र काढून त्यात रंगसंगती कशी असावी? हे समजावून सांगतात. तसेच त्यांना जर वेळ असेल तर ते मैदानात मुलांना खेळाचे नियम समजावून सांगतात. न खेळणाऱ्या मुलांना खेळाचे महत्व पटवून देऊन खेळण्यास प्रोत्साहित करतात. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करतात.

म्हणूनच चोपडे गुरुजी मला खूप खूप आवडतात. तसेच ते वर्गातील इतर मुलांना सुद्धा आवडतात. मला मोठे होऊन त्यांच्या सारखे शिक्षक व्हायचे आहे. चोपडे मास्तर हे माझे आदर्श शिक्षक आहेत.

-: समाप्त :-

सारांश | माझे आदर्श शिक्षक निबंध मराठी | Maze Adarsh Shikshak Nibandh Marathi

मित्रांनो, वरील लेखात आपण माझे आदर्श शिक्षक या वर निबंध मराठी तून बघितले. वरील लेखात आपण माझा आदर्श शिक्षक या विषयावर एकूण 05+ अतिशय सोपे आणि सुंदर निबंध बघितले. शाळेत परीक्षेमध्ये आपल्याला माझे आदर्श शिक्षक किंवा माझे आवडते शिक्षक या विषयी निबंध लिहायला सांगितल्यास वरील निबंध आपल्याला नक्कीच खूप उपयोगी पडणार आहे.

मित्रहो, आम्हाला खात्री आहे की वरील निबंध आपल्याला नक्कीच आवडली असतील. आपले काही विचार असेल तर ते आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. या लेखाला नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे शीर्षक असेही असू शकते –

  • माझे आवडते शिक्षक निबंध मराठी
  • Majhe Aadarsh Shikshak Nibandh Marathi
  • Majhe Adarsh Shikshak Essay in Marathi
  • Maze Adarsh Shikshak Essay in Marathi
  • Maza Adarsh Shikshak Nibandh Marathi
  • Majhe Adarsh Shikshak Nibandh Marathi
  • माझे आदर्श शिक्षक निबंध मराठी
  • Maze Adarsh Shikshak Nibandh Marathi

Leave a Comment