माझे आवडते फूल गुलाब निबंध मराठी (04+ सर्वोत्तम निबंध) | My Favorite Flower Rose Essay In Marathi 2023 | माझे आवडते फूल गुलाब


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

माझे आवडते फूल गुलाब निबंध मराठी | My Favorite Flower Rose Essay In Marathi 2023 – नमस्कार माझ्या मित्र – मैत्रिणींनो, गुलाबाचे फुल कोणाला आवडत नाही. आज आपण या लेखात माझे आवडते फूल गुलाब निबंध मराठी मध्ये बघणार आहोत. शाळेत आपल्याला माझे आवडते फूल या विषयी निबंध लिहिण्यासाठी सांगितले जाते. तेव्हा हे निबंध आपल्याला उपयोगी पडतील.

आज या लेखात आपण माझा आवडता फूल गुलाब या विषयावर 4+ अतिशय सुंदर आणि सोपे भाषण बघणार आहोत. परीक्षेत ही निबंध लिहा आणि पैकीच्या पैकी गुण मिळावा. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता निबंधाला सुरुवात करुया.

माझे आवडते फूल गुलाब निबंध मराठी – निबंध क्र.01

गुलाब फुलावर 10 ओळी निबंध | 10 Lines on Rose in Marathi

  1. पृथ्वीतलावर वेगवेगळ्या रंगाची फुले आहेत.
  2. त्यातील गुलाब हे माझे सर्वात आवडते फूल आहे.
  3. गुलाब हा फुलांचा राजा आहे.
  4. त्याच्या पाकळ्या अतिशय सुंदर दिसतात.
  5. गुलाबाचा सुगंध सर्वांनाच आवडतो.
  6. गुलाबाचे फुल लाल, गुलाबी, पिवळे आणि पांढऱ्या रंगाचे असते.
  7. त्याच्या पाकळ्या पासून गुलाब जल आणि गुलकंद तयार करतात.
  8. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना गुलाबाची फुले खूप आवडत.
  9. मी माझ्या घरासमोर गुलाबाचे रोप लावलेले आहे.
  10. त्याला आलेली फुले मी दर रोज देवाला वाहते.

माझे आवडते फूल गुलाब निबंध मराठी – निबंध क्र.02

माझे आवडते फूल गुलाब

गुलाब हे जगातील सर्वात लोकप्रिय फुलांपैकी एक आहे. लाल गुलाब सर्वात प्रसिद्ध आहे. गुलाबाच्या इतर रंग प्रकारांमध्ये पांढरा, गुलाबी आणि पिवळा यांचा समावेश होतो. पांढरे गुलाब शांततेचे प्रतीक आहे. पिवळे गुलाब मैत्री दर्शवितात. गुलाबी रंग आनंदाचे प्रतीक आहे.

गुलाब झुडपांच्या स्वरूपात वाढतात. फुलांचे कालांतराने फळांमध्ये वाढ होते आणि त्याचप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्या गळून पडल्या की त्यांच्या जागी फळे वाढतात. स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या देठावर काटे असतात. गुलाब सर्वांना आवडणारे फुल आहे.

प्रेमामध्ये गुलाबाला खूप महत्त्व दिलेले आहे. लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे. पाश्चात्य देशात जेव्हा पुरुष हा स्त्रीला लग्नासाठी मागणी घालतो तेव्हा ही मागणी लाल गुलाबाच्या फुलाने च केली जाते.

गुलाबाच्या फुलाचे आकार व त्याची मनमोहक सुगंध आपल्याला आकर्षित करते. गुलाबाला फुलांचा राजा देखील म्हंटले जाते. एवढे सर्व गुण संपन्न असलेले फूल कोणाला आवडणार नाही बरे! म्हणूनच गुलाब फूल माझे आवडते फूल आहे.

-: समाप्त :-

माझे आवडते फूल गुलाब निबंध मराठी – निबंध क्र.03

माझे आवडते फूल गुलाब

गुलाबाचे फुल मला खूप आवडते. गुलाब फूल दिसायला खूप छान असते. ते विविध रंगांमध्ये पाहायला मिळते. लाल, पिवळा, गुलाबी, केशरी, पांढरा.

गुलाबाला खूप पाकळ्या असतात आणि त्याचा छान सुगंध सगळीकडे दरवळतो. गुलाबाचे झाड छोटे आणि काटेरी असते. हे झाड छोटे असल्याने कुठेही लावता येते.

मी माझ्या घरासमोरच्या अंगणात गुलाबाची दोन झाडे लावली आहे. त्याला आता फूल देखील यायला लागली आहे. माझ्या मैत्रिणी दररोज देवाला वाहण्यासाठी गुलाबाची फुले घेऊन जातात. मी सुध्दा दररोज ही फुले देवाला वाहते.

गुलाबाला वर्षभर फुले येतात. गुलाबाच्या फुलांचे अनेक उपयोग आहेत. त्यापासून गुलाब जल, पुष्पगुच्छ, सरबत, गुलकंद बनवतात. तसेच आयुर्वेदिक औषधांमध्ये त्याचा उपयोग केला जातो.

गुलाबाला नेहमी स्नेहाचे आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. आदर सत्कार करताना समारंभात गुलाब देऊनच स्नेह भाव व्यक्त केला जातो. गुलाब हे सुंदरते बरोबरच बहुपयोगी फुल आहे. म्हणून गुलाबाला फुलांचा राजा असे म्हटले जाते.

-: समाप्त :-

माझे आवडते फूल गुलाब निबंध मराठी – निबंध क्र.04

माझे आवडते फूल गुलाब

गुलाबाचा वापर प्रत्येक धार्मिक ठिकाणी केला जातो. यामुळे गुलाबाचे महत्त्वही खूप आहे. आणि हे फुल दिसायलाही खूप सुंदर आणि आकर्षक असे असते. त्यामुळे गुलाबाला हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मामध्ये महत्त्वाचे सुद्धा मानले जाते. तर चला आपण आज गुलाबा विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

गुलाबाच्या फुला विषयी माहिती.

गुलाबाचे फुल हे जगातील सर्वात सुंदर फुलांमधून एक आहे. ज्याला हल्ली तर लोक प्रेमाचे प्रतीक मानतात. परंतु तुम्हाला माहित आहे का? पृथ्वीतलावर गुलाबाचे फुल 33 करोड वर्षा आधीपासून उपलब्ध आहे.

मित्रांनो जगातील सर्वात जुन्या फुलांमधून सर्वात जुने फुल म्हणून गुलाबाला मानले जाते. कारण गुलाबाचे फुल हे 1000 वर्षे जुने मानले जाते. हे फुल जर्मनीमध्ये एका भिंतीवर चर्चच्या भिंतीवर वाढतो. आणि म्हटले जाते की ते त्या ठिकाणी इसवी सन पूर्व 815 पासून उपलब्ध आहे.

आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, सण १९४५ मध्ये जर्मनीच्या चर्चवर बॉम्ब टाकून चर्च नष्ट करण्यात आले होते. आणि त्याच्या चपेटमध्ये हे रोपटे सुद्धा आले होते. परंतु काही वर्षानंतर हे रोप पुन्हा उगुन आले. कारण याची काही मुळे जिवंत होती.

संपूर्ण जगामध्ये कुलाबाची शंभर पेक्षा अधिक प्रजाती आढळल्या जातात. प्रकृतिक रूपाने काळया रंगाच्या गुलाबाला सोडून जवळजवळ प्रत्येक रंगाचे गुलाब आढळले जाते. परंतु निळ्या रंगाचा गुलाब नाही आढळत.

गुलाबाचे झाड काही ठिकाणी रोपट्यासारखे असते. तर काही ठिकाणी वेलीसारखे असते. या फुलांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होत आहे.

भारतातील गुलाबाच्या फुलांची निर्यात ही मोठ्या प्रमाणावर होते. गुलाब ही विविध प्रकारची व रंगाची असतात. गुलाब हे मैत्रीचे, प्रेमाचे आणि शांततेची प्रतीक आहे असे म्हटले जाते. त्याचबरोबर वेगवेगळ्या रंगांचे गुलाब वेगवेगळ्या भावना दर्शवितात.

गुलाब सुवासिक फूल असल्याने पूजेसाठी वापरतात. याशिवाय घरात येणाऱ्या पाहुण्यांचे अभिनंदन म्हणून गुलाब पुष्प दिले जाते. विविध सत्कार समारंभांमध्ये देखील गुलाब फूल दिले जाते.

वास्तुशांती, लग्न, विविध सामाजिक कार्यक्रम, कौटुंबिक कार्यक्रम व धार्मिक कार्यक्रमांमध्ये गुलाब फुलांचा पूजेसाठी वापर केला जातो. तसेच सजावट करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात गुलाब फुले वापरली जातात.

स्त्रिया केसांमध्ये गुलाबाचे फुल लावतात. अत्तर, शरबत, गुलाबजल, रोजमेरी, तेल इत्यादी गुलाबापासून बनवले जातात. याशिवाय काही आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी ही गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केला जातो.

एखादी सामान्य स्त्री देखील ज्यावेळी गुलाबाचे फुल केसांमध्ये माळते त्यावेळी तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. बऱ्याच ठिकाणी चव वाढवण्यासाठी खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा गुलाब वापरले जातात. एवढे गुण वैशिष्ठ्य असलेलं गुलाब कुणाला आवडणार नाही बरे!! म्हणूनच गुलाब हा माझा आवडता फुल आहे.
धन्यवाद !

-: समाप्त :-

सारांश | माझे आवडते फूल गुलाब निबंध मराठी | My Favorite Flower Rose Essay In Marathi

मित्रांनो, वरील लेखात आपण माझे आवडते फूल गुलाब या विषयी निबंध बघितली. वरील लेखात आपण माझा आवडता फुल गुलाब या विषयावर 4+ अतिशय सोपे आणि सुंदर निबंध बघितले. आम्हाला अशाच नाही तर खात्री आहे की आपल्याला वरील निबंध नक्कीच आवडली असतील. आपल्याला परीक्षेमध्ये वरील निबंध नक्कीच उपयोगी पडतील.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

My Favorite Flower Rose Essay In Marathi

My Favorite Flower Rose Essay In Marathi

Leave a Comment