माझे गाव निबंध मराठी (04+ सर्वोत्तम निबंध) | My Village Essay in Marathi 2023 | माझे गाव स्वच्छ गाव निबंध मराठी | माझे गाव आदर्श गाव निबंध मराठी 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

My Village Essay in Marathi | माझे गाव निबंध मराठी | माझे गाव स्वच्छ गाव निबंध मराठी | माझे गाव आदर्श गाव निबंध मराठी – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात माझे गाव या विषयावर 04+ अतिशय सुंदर आणि सोपे निबंध बघणार आहोत. त्याचप्रमाणे आज आपण या लेखात माझे गाव स्वच्छ गाव निबंध मराठी मध्ये बघणार आहोत. आपल्याला शाळेत या माझे गाव या विषयावर निबंध लिहिण्यासाठी सांगितले जाते. परिक्षेत देखील या विषयावर 05 ते 10 गुणांसाठी एक प्रश्न हमखास विचारला जातो.

अशा वेळी आपल्याला आपल्या गावाबद्दल थोडक्यात पण उद्देसुद माहिती लिहायची असते. आपल्या गावच सुंदर असं वर्णन आपल्याला करायचे असते. आपल्या गावाचे वैशिष्ट्य, गावाची एकूण लोकसंख्या, गावाचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, कृषी सेवक, गावात राबविलेल्या विविध स्वच्छता विषयक योजना इत्यादी विषयी थोडक्यात माहिती लिहावी.

माझे गाव निबंध मराठी | My Village Essay in Marathi – निबंध क्र.01

माझ्या गावाचे नाव पाचपिरवाडी असे आहे. माझे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्यातील गंगापूर तालुक्यातील आहे. आमच्या गावात पाच पिर बाबांचा दर्गा आहे. तेथे पीर बाबांच्या पाच कबरी आहेत. त्यामुळे आमच्या गावाच नाव पाचपिरवाडी असे ठेवण्यात आले आहे.

माझे गाव नदीच्या काठावर आणि डोंगराच्या कुशीत वसले आहे. गावाचे वातावरण अगदी निसर्गरम्य आणि सुंदर असे आहे. आमच्या गावाची लोकसंख्या जवळपास 1000 आहे. गावातील सर्व लोक खूप चांगले असून एकमेकांना मदत करण्यासाठी नेहेमी तत्पर असतात.

आमच्या गावाचे सरपंच श्री. सुनिल जारवाल हे आहेत. ते खूप हुशार आणि गावाच्या विकासासाठी झटणारे असे सरपंच आहेत. ते सामान्य लोकांच्या मदतीसाठी नेहेमी तत्पर असतात. त्यांनी गावात शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविली आहे. ते खूप प्रमाणिक असे नेते आहेत. संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी असते.

आमच्या गावाचे ग्रामसेवक श्री. जाधव हे आहे. तलाठी श्रीमती शिंदे, आरोग्यसेवक श्री. बिघोत तर कृषी सेवक हे श्री. घुनावत आहेत. हे सर्व कर्मचारी आपले काम प्रामाणिकपणे करतात. गावातील गरीब व पत्र अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ते नेहेमी तत्पर असतात.

मागच्या वर्षी आमच्या गावाला राज्यातील सर्वात स्वच्छ गाव असण्याचा पुरस्कार मिळाला. एक आदर्श गाव म्हणून सुद्धा आमच्या गावाला पुरस्कार मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. गावाचे सरपंच श्री. जारवाल यांचा सत्कार करण्यात आला होता. तो क्षण आमच्यासाठी खूप आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता.

गावात प्रत्येक घरी शौचालय बनवले असून गाव हांगनदरी मुक्त करण्यात आले आहे. गावासाठी वेगवेगळ्या 05 विहिरी बनविल्या आहेत. त्यातून गावात पाइपलाइन द्वारे पाणी आणले आहे. घरोघरी नळ काढण्यात आले आहेत. गावात दोन पाणवठे आहेत आणि जनावरांसाठी पाणी पिण्यासाठी तीन हौद देखील आहेत.

गावात प्रत्येक घरी सांडपाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गावात प्रत्येकाच्या घरी एक परसबाग आहे त्याच्यात विविध फळझाडे आणि फुलांची झाडे लावण्यात आली आहेत. त्याने गावात एक सुंदर आणि उल्हास दायक असे वातावरण निर्माण झाले आहे.

गावातील जिल्हा परिषद शाळेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. कारण शाळा ही विद्येचे मंदिर असते. आणि शिक्षणाचे महत्व आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे गावाच्या शाळेची जुनी इमारत तोडून त्या ठिकाणी नवीन मजबूत इमारत बनविण्यात आली आहे. शाळेत 10 संगणक देखील बसवण्यात आले आहे.

शाळेचे मैदान व्यवस्थित करून त्याच्यात झाडे लावण्यात आली आहे आणि मुलांसाठी खेळाचे विविध साहित्य देखील लावण्यात आले आहे. शाळेत सुलभ शौचालय बनवले आहे. शाळेतील शिक्षक मुलांना कसे शिकवतात त्याकडे गावातील लोकांचे विशेष लक्ष असते.

गावातील आशा वर्कर आणि आरोग्य सेवक हे गावातील लोकांना आरोग्य बद्दल नेहेमी जनजागृती करत असतात. आजारी लोकांची मदत करतात. कृषी सेवक दर महिन्याला कृषी शाळा आयोजित करतात. कृषी शाळेत शेतीसंबंधी योजना तसेच शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मार्गदर्शन करतात.

अशा प्रकारे माझे गाव हे आदर्श गाव ठरले आहे. मला माझ्या गावाबद्दल सांगताना खूप अभिमान वाटतो. माझे गाव सर्वात चांगले गाव आहे. माझे गाव स्वच्छ गाव आहे. तसेच माझे गाव आदर्श गाव आहे.

-: समाप्त :-

माझे गाव निबंध मराठी | My Village Essay in Marathi – निबंध क्र.02

माझ्या गावचे नाव ताड पिंपळगाव आहे. माझे गाव खूप सुंदर आणि हिरवेगार आहे. माझ्या गावी माझे आजी आजोबा राहतात. ते शेती करतात. माझ्या गावी गाय, बैल, म्हशी सुद्धा आहेत. घराच्या सभोवताल झाडे आहेत. त्यामुळे तेथे गारवा वाटतो.

माझ्या गावी एक शाळा आहे. तेथे दहावी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. एक दवाखाना आहे तो गावातील लोकांसाठी दिवस-रात्र सुरू असतो. गावात एक पोलीस स्टेशन सुद्धा आहे. माझ्या गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती शेती करतो. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.

गावातील वातावरण प्रदूषण मुक्त आहे. सर्वत्र हिरवळ, हिरवीगार झाडे, नद्या, झरे, तलाव, मैदान, डोंगर असे निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळते. गावात सर्व प्राणी बघायला मिळतात. पक्षांचा किलबिलाट कानावर पडतो.

पावसाळ्यात मातीचा सुगंध सर्वत्र दरवळतो. गवतील सर्व लोक शेतात काम करतात. जनावरे चारतात. मोर नाचताना दिसतात. असे हे माझे गाव मला खूप प्रिय आहे. माझे गाव सौंदर्याचे प्रतीक आहे. माझ्या गावची निसर्गरम्य सुंदरता लक्ष वेधून घेणारी आहे.

-: समाप्त :-

माझे गाव स्वच्छ गाव निबंध मराठी | My Village Essay in Marathi – निबंध क्र.03

अभिमानाने सांगतो, ऐका तुम्ही राव !
स्वच्छ, सुंदर, घाणीमुक्त माझे गाव !!

माझ्या गावाचे नाव सावंतवाडी आहे. माझे गाव छोटेसे, सुंदर आणि आदर्श आहेत. माझे गाव लगेच आदर्श, स्वच्छ, सुंदर, घाणीमुक्त बनले नाही. घाणीमुक्त, स्वच्छ गाव करण्यासाठी गावातील प्रत्येकाने सर्व लोकांनी प्रयत्न केले. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली. लोकांनी स्वयंप्रेरित होऊन सहविचार बैठक घेतली.

या बैठकीत गाव घाणीमुक्त बनवण्यासाठी नियोजन करण्यात आले. ज्यात शौचालय बांधणे व त्याचा वापर करणे. कचऱ्या पेट्यांचा वापर करणे. वृक्षरोपण व वृक्ष संगोपन करणे. प्लास्टिक बंदी, तंबाखू धूम्रपान करण्यास बंदी, स्वच्छतेच्या साधनांचा वापर या गोष्टींचा समावेश होता. गावातील साफसफाईवर लक्ष केंद्रित करण्यात आले. लोकांनी घरे स्वच्छ केली. परिसर स्वच्छ केला. गावातील शाळांमध्ये स्वच्छतेवर आधारित स्पर्धा घेण्यात आल्या.

स्वच्छता अंगीकारूया, घाणीला दूर सारुया,
गावाला स्वच्छ, घाणीमुक्त करायचे आहे !
यासाठी सर्वांनी योगदान द्यायचे आहे !!
शौचालयाचा वापर करू, प्लास्टिकला दूर सारू,
चला आपले गाव स्वच्छ, सुंदर, घाणीमुक्त करू !!!

गावात जागोजागी स्वच्छ, घाणीमुक्त गाव बनवण्यासाठी अशा स्लोगन लिहिण्यात आले, बॅनर लावण्यात आले. त्या संबंधीत चित्रे पेंट करण्यात आली.

याप्रमाणे नियोजनानुसार प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात आली. गावातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, शाळेतील शिक्षक, आरोग्य कर्मचारी, तंटामुक्त समितीतील सदस्य, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, गावातील सर्व स्त्री-पुरुष या दिशेने प्रयत्न करू लागले. आणि त्याचे फळ आम्हाला मिळाले, “स्वच्छ घाणीमुक्त गाव.”

अभिमानाने सांगतो, ऐका तुम्ही राव !
स्वच्छ, सुंदर, घाणीमुक्त माझे गाव !!

-: समाप्त :-

माझे गाव आदर्श गाव निबंध मराठी | माझ्या स्वप्नातील गाव निबंध मराठी – निबंध क्र.04

गाव असते लहान
तरी असते किती छान
तरी गाव असते लहान

गाव म्हटले म्हणजे हिरवळ, पक्षांचा किलबिलाट, प्राण्यांचे आवाज, अद्भुत निसर्ग सौंदर्य, शांत जीवन होय. भारत कृषीप्रधान देश आहे. भारत देश अनेक खेडेगाव मिळून तयार झाला आहे. गाव भारताचा पाठीचा कणा आहे. म्हणूनच देशाच्या विकासामध्ये गाव महत्त्वाची भूमिका बजावतात.

अंगणात रांगोळी, तुळशीचे पूजन !
चूल पेटे सत्वरी, बैलांसवे नांगरण !!

माझ्या कल्पनेतील गावामध्ये एक नदी असावी. शहरासारखी गर्दी नसावी. सुटसुटीत घरे असावी. सगळ्यांची घरे सारखी असल्यास माझ्या गावाची रचना खूप छान दिसेल. हिरवीगार झाडे गावाच्या चहूबाजूंनी असावीत. त्यामुळे स्वच्छ वातावरण अनुभवता येईल.

थोडी तरी ठेवा जान !
सार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण !!

स्वच्छतेतून ग्राम विकासाचा मार्ग दाखविणारे थोर समाजसुधारक ग्राम सुधारणेचे जनक “श्री. संत गाडगेबाबा” यांचे अनमोल विचार माझ्या गावात असावे. गावात कुठेही प्रदूषण नसावे. महिन्यातून एकदा श्रमदानाच्या माध्यमातून गावात नेहमी स्वच्छता मोहीम आचरणात आणावी. प्रत्येकाने आपले घर, अंगण स्वच्छ, नीटनेटके ठेवावे. घर तिथे शौचालय असावे. सांडपाण्याची गटारे, परसबागा, फळबागा, फुलझाडे असावीत. गोबर गॅस योजना प्रत्येक घरी असावी. त्यामुळे इंधन बचतीस मदत मिळेल.

निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव !
नेहमीच घेतो माझ्या अंतर्मनाचा ठाव !!

हिरवीगार शेती गावाचे सौंदर्य वाढवतात. म्हणून पारंपारिक व आधुनिक तंत्रज्ञानाची शेती यांचा संगम असावा. गावात सांस्कृतिक केंद्र व मनोरंजनासाठी नाट्यगृह, चित्रपटगृह, क्रिडांगण असावे. त्यामुळे अनेक कलागुणांना प्रोत्साहन देता येईल. गावात प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे व मोकळे मैदान असावीत. मोबाईल टावर, आधुनिकीकरणाची साधने असावीत. त्यामुळे आपल्या देशातील व जगातील ताज्या घडामोडी ची माहिती मिळेल.

गावात सर्वात मोठी आवश्यकता असते ती शाळा, महाविद्यालय, वाचनालय व बँक. माझ्या गावात या साऱ्या गोष्टी असाव्यात. गावातील लोकांचे आरोग्य जपण्यासाठी योग्य पाणीपुरवठा, वीजपुरवठा, वैद्यकीय सेवा यांची आवश्यकता असते. ही सर्व कामे होण्यासाठी प्रशासकीय कार्यालय हवीत. ग्रामपंचायतीमार्फत जनतेची कामे वेळेवर व प्रामाणिकपणे झाली पाहिजे. त्यामुळे गाव तंटामुक्त व व्यसनमुक्त होण्यास मदत मिळेल. राजकीय ताणतणाव संघर्ष नसावा.

विविध सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करून गावाच्या रीती-परंपरा, आपली संस्कृती जपली पाहिजे. सर्व सण, उत्सव उत्साहाने एकत्र साजरे करावे. आठवडी बाजार, यात्रा यांची धमाल असावी. गावाच्या देखण्या मंदिरात रोज नित्य हरिपाठ व्हावा. बाळगोपाळांना आजीची शिकवण असावी. गावामुळे आपली संस्कृती पिढ्यानपिढ्या जिवंत ठेवता यावी.

घरोघरी, दारोदारी धान्याच्या राशी !
प्रत्येक जण मजेत कुणी ना उपाशी !!
हर एक हाताला नगदी असावे काम !
असा असावा माझा गाव! माझा गाव !!

गावातील शेतकरी संपन्न व आत्मनिर्भर असावा. गावात जीवनावश्यक कामे पूर्ण होण्यासाठी लघुउद्योग, जोडधंदा यांना प्रोत्साहन द्यावे. माझ्या गावातून गुन्हेगारी हद्दपार असावी. असुरक्षिततेची भावना नसावी. लोकांनी सुख समाधानाने राहावे. माझ्या कल्पनेतील गाव आकारण्यासाठी लोकांच्या मनोवृत्तीत बदल आवश्यक आहे.

एकमेकांविषयी जिव्हाळा असावा कारण प्रेम व सहकार्याने केलेले काम टिकाऊ होते. प्रेमाने लोकात परिवर्तन घडवून आणण्यासाठी पूज्य विनोबांची ग्रामदानाची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. सहकारिता, सदभावना, सदगुण, सप्रेम यांचा संगम गावात असावा.

जीवाला जीव देणारी माणसे म्हणजे गाव !
माणसातील माणुसकी म्हणजे गाव !!

-: समाप्त :-

सारांश | My Village Essay in Marathi | माझे गाव निबंध मराठी

मित्रांनो वरील लेखात आपण माझे गाव या विषयी 04+ अतिशय सुंदर आणि सोपे निबंध बघितले. वरील लेखात आपण माझे गाव स्वच्छ गाव निबंध मराठी तसेच माझे गाव आदर्श गाव निबंध मराठी तून पाहिले. हे निबंध आपल्याला शाळेत व परीक्षेत खूप उपयोगी पडणार आहे.

मित्रांनो आम्हला आशा आहे की आपल्याला वरील निबंध नक्की आवडले असतील. आपले आमच्याबद्दल जे काही विचार किवा आमच्यासाठी काही मार्गदर्शन असतील तर आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. हा लेख आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Maze Gav Nibandh Marathi
Maze Gav Nibandh in Marathi
Maze Gav Essay in Marathi
Maze Gav Adarsh Gav Nibandh Marathi
Maze Gav Swachch Gav Nibandh Marathi

माझे गाव निबंध मराठी | My Village Essay in Marathi 2023 | माझे गाव स्वच्छ गाव निबंध मराठी | माझे गाव आदर्श गाव निबंध मराठी 2023

Leave a Comment