माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी 2023 (04+ सर्वोत्तम निबंध) | Unhalyachi Sutti Nibandh in Marathi 2023 | My Summer Vacation Essay in Marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Unhalyachi Sutti Nibandh in Marathi 2023 | माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी | My Summer Vacation Essay in Marathi – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात माझी उन्हाळ्याची सुट्टी या विषयावर 04+ अतिशय सुंदर निबंध बघणार आहोत. आज आपण या लेखात तुम्ही उन्हाळ्याची सुट्टी कशी घालवली? तुम्ही कुठे कुठे फिरायला गेला होता? या सर्व बाबी आज आपण या लेखात पाहणार आहोत.

मित्रांनो, परीक्षेत या विषयावर एक प्रश्न 5 ते 10 गुणांसाठी हमखास विचारला जातो. आज या लेखातील निबंधाचा अभ्यास करा आणि परीक्षेत उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण व्हा. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता निबंधाला सुरुवात करुया.

उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी | Summer Vacation Essay in Marathi – निबंध क्र.01

20 एप्रिल रोजी आमची मुख्य परीक्षा संपली. त्या दिवशी आमचा शेवटचा पेपर होता. आमचे मुळ गाव छत्रपती संभाजीनगर जिल्यातील पाचपिरवाडी हे डोंगराच्या कुशीत आणि नदीच्या कडेला वसलेले एक छोटेसे गाव. आमचे पप्पा शासकीय नोकरी च्या निमित्ताने मुंबईला राहतात. आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत मुंबईला राहतो.

आमच्या शाळेला 21 एप्रिल पासून उन्हाळ्याची सुट्टी लागणार हे आम्हाला अगोदरच माहीत होते, त्यानुसार पप्पांनी अगोदरच सर्व नियोजन करून ठेवले होते. सुट्टीत आम्ही सर्व आमच्या मूळ गावी जाण्याचे ठरवले होते. माझे मामाचे गाव देखील तिकडेच आहे. पप्पांनी आमच्या सर्वांचे ट्रेन चे तिकीट काढून ठेवले होते.

आम्ही सर्व म्हणजेच मी व माझी लहान बहीण, मम्मी पप्पा आम्ही रेल्वे ने गावी गेलो. आम्हला गावी जायला 12 तास लागतात. आम्ही संध्याकाळी ठाणे रेल्वे स्थानकाहून बसलो ते सकाळी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर उतरलो. तेथे आमचे काका आणि मामा आम्हाला घ्यायला आलेले होते. मी गेल्यागेल्या मामाला मीठी मारली.

मग आम्ही सर्व मामांच्या गाढी मध्ये बसून काकांच्या गावी गेलो. रस्त्याने जात असताना मंद झुळूक वारा, शेतातील हिरवळ, कडक ऊन या सर्वांमुळे मनाला एकदम प्रसन्न वाटले. गावी पोहोचल्यानंतर आजी-आजोबांनी आम्हाला कडेवर घेतलं आणि प्रेमाने आमचे चुंबन घेत आजी म्हणाल्या “किती मोठी झाली माझी पोरं. खूप दिसानी आलेत बघ. आता हा एक महिना आम्हाला द्यायचा हं!”

आमच्या काकाला दोन मुले आहेत. त्यांचे नाव राम आणि शाम असे आहेत. अजून त्याचे काही मित्र मैत्रिणी आम्हाला भेटायला आल्या. मग आम्ही सर्व मिळून घराच्या अंगणात खेळू लागलो. संध्याकाळी काकिनी आम्हाला खाण्यासाठी मस्त गोड जेवण बनवले. आम्ही संध्याकाळी जेवण करून लवकर झोपलो.

सकाळी आम्ही लवकर उठलो आणि अंघोळ करायला विहिरीवर गेलो. तिकडेच आम्ही झाडावर पिकलेले आंबे काढले. मग आम्ही घरी येऊन जेवण केले. दुपारी नदीवर पोहायला जाणे, मासे पकडणे, गोट्या खेळणे, लपाछपी खेळणे, झाडावर चडणे या सर्व गोष्टी आम्ही उन्हाळ्याच्या सुटीत केल्या.

खरंच! खूप मजा आली गावी. अजूनही ते दिवस आठवले की मनात एक उल्हास येतो. पुन्हा गावी जावे असे वाटते. पण काय करणार? या धावपळीच्या जीवनात निवांतपणा, सुखी समृद्ध जीवन या सर्व गोष्टी हरवल्या आहे. गाव म्हणजे निवांतपणा, साधेपणा यांचं स्वर्गच होय.

-: समाप्त :-

माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी | My Summer Vacation Essay in Marathi – निबंध क्र.02

उन्हाळा हा ऋतू सर्वांनाच आवडतो. माझा सुद्धा हा आवडता ऋतू आहे. उन्हाळ्यात अभ्यासाचा ताण नसतो आणि भरपूर खेळायला मिळतं. वर्षभर मी या सुट्टीची वाट बघत असतो. दरवर्षी उन्हाळ्यात मी काहीतरी नवीन गोष्टी करतो. यावर्षी मी माझा आवडता छंद जोपासण्याचे ठरवले.

मला पोहणे फार आवडते. मागील वर्षांच्या सुट्टीमध्ये मी मामाच्या गावी गेलो होतो. तेथे मला मामांनी नदीमध्ये पोहायला शिकवले. तेव्हापासून मला पोहण्यात आवड निर्माण झाली. त्यामुळे मी यावर्षी पोहण्याची ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली. माझे बाबा दररोज मला क्लासेसला सोडून देत असत. तेथे मी नवीन मित्र सुद्धा बनवले. यावर्षीच्या उन्हाळी सुट्टीत मी माझा छंद पूर्ण केला. मी माझ्या मित्रांसोबत धमाल केली.

बघता बघता सुट्ट्या संपून कधी शाळा सुरू होण्याचा दिवस जवळ आला कळलच नाही. वर्षभर मी या ऋतूची आणि या सुट्ट्यांची वाट बघतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीचा सुट्टीचा अनुभव कायम माझ्या स्मरणात राहील.

-: समाप्त :-

माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी | Unhalyachi Sutti Nibandh in Marathi – निबंध क्र.03

वार्षिक परीक्षा संपल्यानंतर आपल्याला सुट्टी असते. ती सुट्टी म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी! या उन्हाळ्याच्या सुट्टीत माझे वडील मला आमच्या मूळ गावी घेऊन जाऊ शकले नाही. तरी मी निराश झालो नाही. मी या सुट्टीत काय काय करायचे याची आखणी केली.

मला हे समजले होते की, उन्हाळ्याच्या सुट्टीत मला मन व्यस्त ठेवण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. सुट्ट्यांमध्ये रोज सकाळी लवकर उठून घाई करण्याची गरज नाही. पण मी सूर्य उगवण्याआधी उठण्याचे ठरवले. या सुट्टीत मी नेहमी पहाटे पाच वाजता उठून फिरायला जात असे. त्यामुळे माझे मन ताजे तवान व्हायचे.

माझ्याकडे मनोरंजक असा वेळही असायचा. मी काही व्यायाम आणि योगासनेही केली. त्यामुळे मला निरोगी आणि तणावरहित राहण्यास मदत झाली. माझी खोली पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी माझ्याकडे खूप वेळ होता. मी माझी संपूर्ण खोली स्वच्छ केली.

मी ग्रंथालयातून आणलेली पुस्तके आणि मासिके वाचण्यात माझा वेळ घालवला. दुपारी मी माझ्या मित्रांसोबत कॅरम किंवा पत्ते खेळायचो. कधी कधी मी शास्त्रीय संगीत आमच्या टेप रेकॉर्डर वर ऐकत असे. मी माझ्या आईला स्वयंपाक घरातही मदत करायचो.

वृत्तपत्रातील शब्दकोडे सोडविण्यात थोडा वेळ घालवत असे. संध्याकाळी मैदानात मित्र-मैत्रिणी सोबत खो-खो, लापाछपी, क्रिकेट, लगोरी असे खेळ खेळायचो. मी यावर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खूप नवीन गोष्टी शिकलो. गायन, पोहणे, चित्रकला आणि संगणकाचा वापर करायला शिकलो.

याशिवाय पत्र लिहायला शिकलो. आणि काही पत्रे मी सुट्ट्यांमध्ये गावी गेलेल्या माझ्या मित्रांसाठी लिहिली. अशा प्रकारे माझ्या सुट्टीतील दिनक्रम होता. मला इतरांप्रमाणे एखाद्या ठिकाणी जाऊन सुट्ट्यांचा आनंद घेता आला नाही. पण मी शक्य तितका सुट्टीचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न करून माझ्या आवडत्या गोष्टी करण्याचा आणि शिकण्याचा प्रयत्न केला याचा मला खरोखर आनंदच आहे.

-: समाप्त :-

माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी | Unhalyachi Sutti Nibandh in Marathi – निबंध क्र.04

वार्षिक परीक्षा संपली की, मला उन्हाळ्याच्या सुट्टीचे वेध लागतात. शाळा नाही, अभ्यास नाही, आता खूप खेळायला मिळेल म्हणून मला आनंद होतो. उन्हाळ्याची सुट्टी ही अशी इतर सुट्ट्यांपेक्षा वेगळी आणि खूप खूप मजेची असते.

उन्हाळ्याच्या सुट्टीत काही वेळेला आई बाबा बाहेरगावी जाण्याचे बेत आखतात. तर कधी बाहेर गावचे पाहुणे आमच्याकडे येतात. मग आमच्या वरची बंधने आपोआपच गळून पडतात. अनेक मजेदार कार्यक्रम आखले जातात. त्यातून मनसोक्त आनंद लुटला जातो. खाण्यापिण्याची धमाल असते. थंडपेय, आईस्क्रीम, केक, जांभूळ, करवंदे यांची रेलचेल होते. विशेष म्हणजे या सुट्टीत मिळणारा आंबा सुट्टीची गोडी अधिकच वाढवतो.

उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही फार्म हाऊस वर जातो. तेथे आम्ही मनसोक्त फिरतो. फार्म हाऊसवर मोसंबीची, चिकुची, संत्र्यांची आणि नारळाच्या बागा आहेत. तेथे आम्ही झाडावर पिकलेली मोसंबी, चिकू, संत्री तोडून खातो. आम्ही सर्व तिथेच असलेल्या वॉटर पार्कला देखील जातो. वॉटर पार्कला तर आम्ही खूप धमाल करतो.

उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही आपल्या मित्रांचे ग्रुप जमवून क्रिकेटचे सामने, फुटबॉलचे सामने अशा मैदानी खेळांचा मनमुराद आनंद लुटतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत काही मुले विविध नवीन गोष्टी शिकतात. तसेच गोष्टींची पुस्तके वाचण्यात मजेशीर वेळ जातो. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी पोहायला व बुद्धिबळ खेळायला शिकलो. गिर्यारोहणासाठीही गेलो. अशा विविध प्रकारे आनंद देणारी ही सुट्टी कोणाला आवडणार नाही बरे?!

-: समाप्त :-

परीक्षेत नेहेमी विचारले जाणारे प्रश्न –

  1. तुम्ही तुमची उन्हाळ्याची सुट्टी कशी घालतात ते तुमच्या शब्दात लिहा स्वमत.

    मी माझी उन्हाळ्याची सुट्टी खूप मजेत घालवतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या मामाच्या गावी जातो. तेथे मी खूप धमाल करतो. तेथे मी मित्रांसोबत नदीवर पोहायला जातो, मासे पकडतो, झाडावरचे आंबे काढतो. मित्रांसोबत खो खो, लपाछपी, लगोरी, क्रिकेट, लंगडी इत्यादी खेळ खेळतो.

  2. तुम्ही बालवयात अनुभवलेल्या सुट्टीतील गोष्टीचे वर्णन करा.

    मी लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावी जायचो. तेथे जमलेल्या मित्रांसोबत मी खूप मजा करायचो. नदीवर पोहायला जाणे, मासे पकडणे, जनावरे चारायला माळ रानावर घेऊन जाणे, विविध खेळ खेळणे, संध्याकाळी आजीच्या गोष्टी ऐकणे, असा आमचा दिनक्रम ठरलेला असायचा.

  3. उन्हाळी सुट्टीतील तुम्ही अनुभवलेल्या आठवणी लिहा.

    उन्हाळी सुट्टीतील मी अनुभवलेले अनुभव आजही आठवले तर मन अगदी आनंदाने ताजेतवान होऊन जाते. उन्हाळी सुट्टीत शाळेला सुट्टी असल्याने सकाळी लवकर उठून शाळेला जाण्याची घाई नसते. अभ्यास करण्याची सक्ती नसते. उन्हाळी. सुट्टीत पप्पा आम्हाला फिरायला बाहेर घेऊन जायचे. नवनवीन प्रेक्षणीय स्थळ बघण्यासाठी आम्ही जायचो. तेथे खूप मजा यायची.

सारांश | Unhalyachi Sutti Nibandh in Marathi | माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी

मित्रांनो वरील लेखात आपण माझी उन्हाळ्याची सुट्टी या विषयावर 04+ अतिशय सुंदर निबंध मराठी मध्ये बघितले. उन्हाळ्याची सुट्टी या विषयावर निबंध असा प्रश्न 5 ते 10 गुणासाठी हमखास विचारला जातो. त्यामुळे आपण वरील निबंधाचा अभ्यास करून परीक्षेत चांगले गुण मिळवा.

मित्रांनो आम्हाला आशा नाही तर खात्री आहे की आपल्याला वरील निबंध नक्की आवडले असतील. आपले काही विचार किवा मार्गदर्शन असतील तर आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपल्या मित्रांना हे निबंध नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Essay in Marathi on My Summer Vacation
Summer Vacation Essay Examples in Marathi
माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी
Unhalyachi Sutti Nibandh in Marathi
My Summer Vacation Essay in Marathi

Leave a Comment