डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी 2023 (05+ सर्वोत्तम भाषणे) | Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi | 14 एप्रिल साठी सर्वोत्तम भाषण


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi 2023 | डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी | 14 एप्रिल साठी सर्वोत्तम भाषण – नमस्कार मित्रांनो, जय भीम! प्रथम आपणास व आपल्या परिवारास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 14 एप्रिल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस होय. 14 एप्रिल बाबासाहेबांची जयंती आपण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करतो. या दिवशी आपण एकमेकांना शुभेच्छा देतो तसेच कार्यक्रमात भाषणेही देतो.

आज आपण या लेखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भाषण मराठी मध्ये बघणार आहोत. या लेखात लहान मुलांसाठी लहान भाषण तसेच मोठ्यांसाठी मोठे भाषण आहेत. या लेखात आपण एकूण 05+ अतिशय सुंदर आणि तडफदार भाषणं बघणार आहोत. म्हणून हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता भाषणाला सुरूवात करूया.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी | Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi – भाषण क्र.01

आभाळ मोजतो आज आम्ही,
भीमा तुझ्यामुळे…
वादळही रोखतो आज आम्ही,
भीमा तुझ्यामुळे…
बंदूक, तोफा अन शस्त्रसाठा,
यांची आम्हा गरजच नाही…
कारण शब्दांनीच पेटवतो रान आम्ही,
भीमा फक्त तुझ्यामुळे…

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अभ्यासू व स्वाभिमानी व्यक्तिमत्व, अन्यायाचा निर्भय शत्रू, बहुजनांचा भाग्यविधाता, स्त्रियांचे कैवारी, धुरंदर राजकारणी आणि मानवतेचे पुजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो.

हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी 14 एप्रिल 1891 रोजी भीमराव नावाचा क्रांती सूर्याचा जन्म झाला.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अशा शब्दात शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या बाबासाहेबांनी अतिशय खडतर परिस्थितीत आपले दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परदेशातील उच्च शिक्षणासाठी त्यांना बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांनी मदत केली.

मूकनायक, बहिष्कृत भारत व समता या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन करून अन्यायकारक मानवी रूढी परंपरांवर जोरदार प्रहार केला. मजूर व कामगारांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.

आयुष्यभर स्वतःचा स्वार्थ सोडून दलितोध्दारासाठी कार्य करणाऱ्या या महामानवाचे महापरिनिर्वाण 06 डिसेंबर 1956 रोजी झाले. शेवटी मी एवढेच म्हणेन –

असा मोहरा झाला नाही,
पुढे न होणार…
भीमरावांचे नाव जगती,
सतत गर्जत राहणार…

जातीवादाला जोरदार टक्कर देऊन समतेची चवदार ओंजळ भरणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यास कोटी-कोटी अभिवादन करून मी माझ्या भाषणास पूर्णविराम देतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भीम!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी | Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi – भाषण क्र.02

दीन-दलितांच्या उधारा,
केले जीवाचे रान.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते,
लिहिले भारतीय संविधान.
केला चवदार तळ्याचा सत्याग्रह,
मनुस्मृतीचे केले दहन.
अशा या महामानवाला,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना,
करतो मी नमन! करतो मी नमन!

बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो.

कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अर्थ –

बा – बाणेदार ते स्वभावाने
बा – बारकाईने अभ्यास करणारे
सा – साधक ते बौद्ध धर्माचे
हे – हेतू ज्यांचा सर्वसामान्यांचा विकासाचा
ब – बदल समाजात घडवून आणणारे.

आं – आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणीला
बे – बेधडक सत्याग्रह केला चवदार तळ्याचा
ड – डगमगले नाही संकटे आल्यावर
क – कर्ते समाज उन्नतीचे
र – रचयीते भारतीय संविधानाचे..

अनेक वर्ष चार्तुवर्णावस्थेच्या नावाखाली, अन्याय सहन करणारे समाज बांधव. ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते. अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.

होते अंधारलेले जीवन,
दिसत नव्हता प्रकाशाचा किरण.
पुसण्या त्यांचे अश्रू,
देण्या दीनं-दलितांना नवसंजीवन.
अवतरला एक महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव…

अशा या महामानवाचा, युगप्रवर्तकाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील “महू” या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते.

आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे, रामजींमुळे. तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचा आसमंत ठरला. यात तीळ मात्र शंका नाही. मुळातच अभ्यासाची आवड असल्याने आंबेडकरांनी बी. ए., एम. ए., मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स, डि.लीट. अशा अनेक पदव्या संपादन केल्या.

‘मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो’, ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे जो प्राशन करील तो वाघासारखा गुरगुल्याशिवाय राहणार नाही’ असे मौलिक विचार त्यांनी सांगितले.

‘माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी, विद्यासागरच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल’ असे त्यांचे मत होते. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला.

बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यांना पाणवट्यावर पाणी भरण्याचा, पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. त्यापैकी एक होते महाड येथील चवदार तळे. तेथील स्पृश्य लोक अस्पृश्यांना पाणी भरू देत नव्हते.

त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. बाबासाहेबांनी सर्वप्रथम पाणी ओंजळीने पिले. त्यानंतर अनुयायांनी चवदार तळ्याचे पाणी पिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असे मत होते की, दलितांच्या सर्व समस्या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत. म्हणून 25 डिसेंबर 1927 रोजी आंबेडकरांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले.

भारतीय संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. असे या महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपणा सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं? अन्यायाविरुद्ध लढावं कसं? संघर्षातून घडावं कसं? वादळात सामोर उभा राहावं कसं? आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावा कसं? हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपणालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला दाखवून दिले.

सर्वसामान्यांचे आधार,
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार…
ज्या ज्ञानसूर्याने दूर केला,
दिन-दलितांच्या जीवनातील अंधार…
अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना,
वंदन करतो मी त्रिवार…

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भीम!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी | Dr Babasaheb Ambedkar Bhashan Marathi – भाषण क्र.03

युगा-युगांचा आज काळोख संपला होता !
मानवतेचा महानायक प्रज्ञा सूर्य जन्माला होता !!

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, आदरणीय शिक्षक आणि माझ्या मित्रांनो! आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. या निमित्ताने मी माझे दोन शब्द तुमच्यासमोर सादर करत आहेत ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.

मित्रहो ज्याप्रमाणे सूर्याचे तेज, सागराची खोली आणि आकाशाची उंची शब्दात मांडता येत नाही. अगदी तसेच बाबासाहेबांची महती शब्दात सांगणे केवळ अशक्य आहे. 14 एप्रिल 1891 या दिवशी मध्य प्रदेशातील महू या गावी भीमरावांचा जन्म झाला. शिक्षणापासून, विकासापासून लांब असलेल्या एका समाजात त्यांचा जन्म झाला.

त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी स्वीकारावी लागली. पण यामुळे खचतील ते बाबासाहेब कसले. या संघर्षातून त्यांनी अस्पृश्य आणि दिन दलितांचा उद्धार हेच जीवनाचे ध्येय ठरविले. आपले ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षण हे एक मात्र हत्यार आहे, हे बाबासाहेबांनी फार लवकर ओळखले. ते म्हणायचे “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!” कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.

बाबासाहेबांनी प्रचंड कष्ट आणि संघर्षातून अमेरिकेतील थेट कोलंबिया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. आपल्या देशातील शोषित माणसांच्या समूहाला एकत्रित करण्यासाठी या शिक्षणाचा त्यांनी वापर केला.

मोजावी किती उंची,
तुमच्या कर्तुत्वाची !
बाबासाहेब तुम्हीच शिकवली
व्याख्या जगाला,
माणसातल्या माणुसकीची !!

बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केले, स्त्री शिक्षण स्त्रियांचे मूलभूत हक्क यासाठी कार्य केले, महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, नाशिक येथे काळाराम मंदिरासाठीचा संघर्ष केला, जातिभेद, अस्पृश्यता निवारण यासाठी कार्य केले, शैक्षणिक संस्थांची स्थापना केली, अशी कितीतरी कामे बाबासाहेब आपल्या जीवन काळात करत राहिले. परंतु त्यांच्या कर्तुत्वाचा कळस म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती होय.

आज आपला हा देश ज्या नियमानुसार चालतो, त्या भारतीय संविधानाच्या निर्मितीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता. असे हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, मानवी हक्कांचे कैवारी, जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ, लेखक, समाजसुधारक बाबासाहेब दिनांक 06 डिसेंबर 1956 रोजी बुद्धवासी झाले.
शेवटी या महामानवाला अभिवादन करून एवढेच म्हणेन

सूर्याचे तेज कधी मिटणार नाही !
सागराचे पाणी कधी आटणार नाही !
एकच काय हजार जन्म झाले तरी,
बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाहीत.!

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भीम!

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी | Dr Babasaheb Ambedkar Bhashan Marathi – भाषण क्र.04

सागराचे पाणी कधी आटणार नाही !
भिमाची आठवण कधी मिटणार नाही !
अरे एकच जन्म काय,
हजार जन्म घेतले तरी…
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार,
कधी ही फिटणार नाही..!!

नमस्कार! सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो…

आज मी आपल्यासमोर दिन-दलितांचे कैवारी, ‘शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा!’ असा सर्वांना दिव्य संदेश देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्ती बद्दल बोलणार आहे. सर्वप्रथम सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा !

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते.

बाबासाहेबांच्या घरची परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण झाले. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांची प्रखर बुद्धिमत्ता पाहून त्यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी पाठविले. तेथे त्यांनी एमए, पीएचडी ही पदवी घेतली व इंग्लंडला जाऊन कायद्याचा खूप अभ्यास केला.

भारतात आल्यावर पदोपदी अस्पृश्य म्हणून होणारा अपमान, अवहेलना त्यांना सहन होईना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 साली राजश्री शाहू महाराजांच्या मदतीने “मूकनायक” हे पक्षीक काढले. 1927 साली रायगड जिल्ह्यातील महाड येथे अस्पृश्य परिषद भरली होती. तेथे जमलेल्या हजारो लोकांच्या साक्षीने महाडच्या चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी पाऊल उचलले.

त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. भारत देश स्वातंत्र्य झाल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री झाले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ते ओळखू लागले त्यांनी अनटचे बल हा इंग्रजी ग्रंथ लिहिला त्यांच्या ग्रंथालयात हजारो पुस्तके होती अशा या महामानवाचा मृत्यू 6 डिसेंबर १९५६ रोजी झाला भारत सरकारने त्यांना मरणोपरांत भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गोरगरिबांसाठी, बहुजनांसाठी केलेले महान कार्य, अविरत परिश्रम बघून एव्हढेच म्हणावेसे वाटते की –

बुद्धांसारखं होतं ज्ञान !
देऊन गेले संविधान !!
मिळवून दिले समाजात स्थान !
बाबासाहेब आमचे प्राण !!

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भीम!

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी | Babasaheb Ambedkar Jayanti Bhashan Marathi – भाषण क्र.05

संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि सदाचाराचा मध्यम मार्ग दाखवणारे महाकरुनीय तथागत गौतम बुद्ध, समतेची आणि सदाचाराची शिकवण देणारे संत कबीर, स्त्री शिक्षणाचे जनक महान क्रांतिवीर महात्मा फुले, बहुजनांचे राज्य प्रस्थापित करणारे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि बहुजनांचे उद्धारक, प्रज्ञावंत, प्रज्ञासूर्य, स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब अर्थात भीमराव रामजी आंबेडकर या सर्व महामानवांना आणि महान मातेंना माझे कोटी कोटी प्रणाम!!

आजचा माझा विषय आहे, सर्वव्यापी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर! बंधूंनो बाबासाहेबांचे विचार सर्वच क्षेत्रात व्यापलेले आहेत. त्यांचे कार्य सूर्याच्या तेज्यासारखे उजेड, ऊर्जा, बळ आणि प्रेरणा देणारे आहेत. सूर्य कधीच भेदभाव करत नाहीत, तो नदी-नाले, डोंगर-दरी, कडे-कपारी पर्यंत जाऊन पोहोचतो. तसेच बाबासाहेबांचे कार्य सर्व मानवासाठी आहे. ते कोणी एका विशिष्ट जातीत धर्मासाठी किंवा शहरा- खेड्यातल्या लोकांसाठी नसून तर बाबासाहेबांचे विचार सर्व भारतीयांना प्रेरणा देणारे आहेत. म्हणूनच तर त्यांना सर्वव्यापी ही उपाधी दिली जाते.

डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी या देशाचा संविधान लिहिलं. अहोरात्र कष्ट करून, आपल्या जीवाचं रान करून आणि पावाचे तुकडे खाऊन बाबासाहेबांनी या देशाचा संविधान लिहिलं. अहो उजवा हात थकला तर डाव्या हाताने लिहायचे. डावा हात थकला तर उजव्या हाताने लिहायचे.

अशाप्रकारे 02 वर्ष 11 महिने 18 दिवसांनी बाबासाहेबांनी या देशाचा संविधान लिहिलं. अहो ज्या बाबासाहेबांना या देशात वाचण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते. त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की त्याच पुस्तकावर या भारत देशाचा पूर्ण राजकारभार चालतो. म्हणून तर या ठिकाणी मला म्हणावसं वाटतं.-

अहो असे होते माझे भीमजी
तसे पुन्हा कोणीच होणार नाही
स्वतःचा सुख संसार सोडून
या समाजाला कोणी पाहणार नाही
अहो समाज सुधारण्यासाठी पावाचे तुकडे
खाऊन कोणीच दिवस काढणार नाही
अहो बाबासाहेबांची तर सोडाच पण,
त्यांच्या अस्तीच्या कणांची सरही,
कुणाच्या बापाच्या बापाला होणार
कुणाच्या बापाला होणार नाही.!!

तसेच बाबासाहेबांकडे कायदेमंत्री, कामगार मंत्री आणि जलसंधारण मंत्री हे तीन खाते होते. तेव्हा कामगार नेते या नात्याने बाबासाहेबांनी सर्वच कामगारांवर फार मोठे उपकार केले आहेत. कारण पूर्वी अधिकारी असो किंवा कर्मचारी असो प्रत्येकाला तब्बल 14-14 तास काम करावे लागत असे. परंतु बाबासाहेबांनी त्या चौदा तासाचे फक्त आठ तास केले. इतकंच नव्हे तर आठवड्यातून एक सुट्टी मिळावी यासाठी बाबासाहेबांनी तरतूद केली आणि ती मिळवूनही दिली.

तसेच कायदेमंत्री या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल या कायद्याची संकल्पना 1956 झाली संसदेत मांडली. आणि हे हिंदू कोड बिल हा कोणी एका जाती-धर्माच्या स्त्रियांसाठी नसून तो अखंड भारतातील स्त्रियांसाठी होता. परंतु या हिंदू सनातनीच्या विरोधामुळे हे बिल रखडले गेले. देशातील सर्व स्त्रियांसाठी असलेले हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे बाबासाहेबांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला.

इतकंच नव्हे तर जलसंधारण मंत्री या नात्याने बाबासाहेबांनी “नदीजोड प्रकल्प” ही संकल्पना 70 वर्षांपूर्वी नेहरू सरकार पुढे मांडली होती. परंतु पंडित नेहरूंनी बाबासाहेबांच्या विचारांकडे दुर्लक्ष केले.

अहो मला सांगा जर 70 वर्षांपूर्वी ही नदीजोड प्रकल्प संकल्पना अमलात आणली असती तर आज 12 ही महिने देशातील सर्वच राज्यांमध्ये पाणीच पाणी राहिले असते. तर आज कोणत्या शेतकऱ्याने आत्महत्या केली असती हो? आज काल जे ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन होत आहेत, याची आज कदाचित वेळच आली नसती.

इतकेच नव्हे तर मनुस्मृती सारख्या ग्रंथाने आपल्या भारत देशातील लोकांची मने विषमतेशी पक्की बांधून ठेवलेली होती. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आबेडकरांनी मनुस्मृती जाळून लोकांच्या मनातील विषमता जाळली. म्हणून मला या ठिकाणी म्हणावसं वाटत –

हजारो वर्षांपासून मनामध्ये
एक राग होता!
मनुस्मृती नावाचा एक
विषारी साप होता!!
आज पर्यंत त्याला कोणीच
पेटवू शकले नाही !
परंतु त्याला पेटवणारा
एकच वाघ होता!!
एकच वाघ होता!!

तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशातील सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांची अतिशय सुरेख सांगड घातली होती. आपला भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि भारतीय समाज हजारो जाती-धर्मांमध्ये विखुरला गेलेला आहे. त्यामुळे त्यांनी गरिबी निर्मूलन करण्यासाठी समाजातील सगळ्यात खालचा जो वर्ग आहे त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यासाठी भारतीय संविधानामध्ये विविध तरतुदी केल्या.

शेतीला उद्योगाचा दर्जा, शेती सुधारणा कायदा, कामगारांविषयी विमा योजना, स्त्रियांविषयीचे हिंदू कोड बिल, स्त्रियांना योग्य कामाचा योग्य मोबदला, वैद्यकीय सेवा अशा विविध योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्र उभारणीसाठी आपल्या विचारांनी अमलात आणल्या.

आणि म्हणून सत्य परिस्थिती जर आपण पाहिली तर हिमालयाच्या शिखराची उंची मोजण्यात आली आहे. अथांग अशा समुद्राची खोली ही मोजण्यात आली आहे. सूर्यकिरणांच्या प्रकाशाची प्रखरता ही आजमावण्यात आली आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्यक्तिमत्त्वाची उंची त्यांच्या विद्वत्तेची खोली आणि त्यांची अफाट अशा देशभक्तीची प्रखरता आजमावने आजपर्यंत कोणालाही जमली नाही आणि मी गर्वाने सांगू शकते की कोणाला जमणारही नाही.

खरंच! बाबासाहेब हे सर्वव्यापी होते. अहो कित्येकदा बाबासाहेबांची ओळख फक्त राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून केली जाते. परंतु आपण जर त्यांचा सखोल अभ्यास केला तर आपल्या हे लक्षात येईल की बाबासाहेब हे फक्त घटनेचे शिल्पकारच नव्हे तर अर्थशास्त्र तज्ञ, समाजशास्त्र तज्ञ, विधी तज्ञ, फेमस वकील, सर्वोत्कष्ट राजकारणी, उत्तम प्रशासकही होते.

इतकच काय तर नाशिक येथील काळाराम मंदिर, पुणे करार, चवदार तळ्याचे सत्याग्रह, मनुस्मृति दहन प्रत्येक मानव जातीच्या कल्याणासाठी लिहिलेले संविधान, संविधानातील विविध महत्त्वाच्या तरतुदी, विविध मंत्रिपदे, बीए, बीएससी, एमए, एमएससी, पीएचडी, एलएलबी, डिलीट, बॅरिस्टर लॉ अशा विविध पदव्या बाबासाहेबांनी भूषविल्या आणि बौद्ध धर्माचा अभ्यास करून नागपूर येथे लाखो लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली.

खरंच! इतकी दाही दिशा व्यापक कार्य करणे एका व्यक्तीला खरोखरच अशक्य आहे. परंतु एक महामानव असाही जन्माला आला की ज्याने ही दाही दिशा व्यापक कामे केली आणि त्या महामानवाचं नाव आहे भारतरत्न सर्वव्यापी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर! म्हणून तर मला या ठिकाणी म्हणावसं वाटतं की,-

माझ्या भीमाची कीर्ती अमाप आहे !
साऱ्या जगावर त्याची छाप आहे !
आणि म्हणूनच सरी दुनिया म्हणते,
भीम तुमच्या बापाचा ही बाप आहे !

सारांश | Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi | डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी

मित्रांनो, वरील लेखात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भाषण बघितली. ही भाषणे लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. वरील लेखात आपण एकूण 05+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज भाषणे बागितली. या पैकी कोणतेही भाषण आपल्या शाळेत किंवा कार्यक्रमात देऊन प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंका.

मित्रांनो आपल्याला आमचा हा छोटासा प्रपंच कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही विचार किवा मार्गदर्शन असतील तर ते ही कळवा. बाबासाहेबांची ही भाषणे आपल्या गरजू विद्यार्थ्यांना, मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी 2023 | Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi | 14 एप्रिल साठी भाषण मराठी | डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी | Dr Babasaheb Ambedkar Bhashan Marathi | Babasaheb Ambedkar Jayanti Bhashan Marathi

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी 2023 | Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi | 14 एप्रिल साठी भाषण मराठी | डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी | Dr Babasaheb Ambedkar Bhashan Marathi | Babasaheb Ambedkar Jayanti Bhashan Marathi

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी 2023 | Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi | 14 एप्रिल साठी भाषण मराठी | डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी | Dr Babasaheb Ambedkar Bhashan Marathi | Babasaheb Ambedkar Jayanti Bhashan Marathi

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी 2023 | Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi | 14 एप्रिल साठी भाषण मराठी | डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी | Dr Babasaheb Ambedkar Bhashan Marathi | Babasaheb Ambedkar Jayanti Bhashan Marathi डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी 2023 | Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi

6 thoughts on “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी 2023 (05+ सर्वोत्तम भाषणे) | Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi | 14 एप्रिल साठी सर्वोत्तम भाषण”

  1. खूपच छान. नवीन पिढीला बाबासाहेबांबद्दल भाषण करण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने व अतिशय उत्कृष्ट भाषणे आयटी मिळू शकतात व ते थोडीशीच मेहनत घेऊन बाबासाहेबांबद्दल खूप काही बोलू शकतात. धन्यवाद तुम्हाला.

  2. खूपच छान भाषणे आहेत.सर्वांना प्रेरेक ठरतील असे विचार आहेत.थोर महान कार्य करणारे महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना हृदयापासून नमस्कार……… आणि त्यांचे कार्य आणि विचार आपणापर्यंत पोहचवणारे सर्व विद्यार्थी यांना धन्यवाद !!!!!…आभारी आहोत !!!!!!

  3. खुप सुंदर उपक्रम आपण घेतला आपले मनापासून आभार व शुभेच्छा 💐💐💐 pdf पण शेअर करायला पाहिजे होते म्हणजे शेअर करता आले असतील pdf

Leave a Comment