महात्मा फुले भाषण मराठी 2023 (05+ सर्वोत्तम भाषणे) | Mahatma Phule Speech in Marathi 2023 | महात्मा ज्योतिबा फुले भाषण मराठी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Mahatma Phule Speech in Marathi 2023 | महात्मा फुले भाषण मराठी – नमस्कार मित्रांनो, 11 एप्रिल रोजी आपले क्रांतिसुर्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. आज आपण या लेखात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त 05+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज भाषण बघणार आहोत.

महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त भाषण देण्यासाठी आपण उत्तम भाषण शोधत आहात? तर इथे आपला शोध समाप्त होतो. कारण आज या लेखात आपण 05 अतिशय सुंदर महात्मा फुले यांच्यावर भाषण बघणार आहोत. महात्मा फुले यांच्या थोर कार्याला वंदन करून मी या लेखाला सुरुवात करतो.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर 10 ओळी | 10 Lines on Mahatma Phule

  1. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला.
  2. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई असे होते.
  3. त्यांचे पूर्ण नाव ज्योतीराव गोविंदराव गोरे असे होते. त्यांचे वडील फुलांचा व्यवसाय करत म्हणून लोक त्यांना फुले या नावाने ओळखु लागले.
  4. महात्मा फुले यांनी समाजातील विषमता, अनिष्ट रूढी परंपरा, जातिभेद या सर्वांना प्रखर विरोध केला.
  5. महात्मा फुले यांनी स्त्रीयांवर होत असलेले अन्याय, अत्याचार बघून स्त्री शिक्षणाचे महत्त्व जाणले.
  6. म्हणून त्यांनी सण 1948 साली पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची शाळा सुरू केली.
  7. ही शाळा देशातील पहिली मुलींची शाळा होती व त्या शाळेत मुलींना शिकविणाऱ्या महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या.
  8. ज्योतिबा फुले यांनी शेतकर्यांचे आणि कष्टकऱ्यांच्या दुःख इंग्रज सरकार समोर आणले.
  9. महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचे आसूड, ब्राम्हणांचे कसब असे अनेक ग्रंथ लिहिले.
  10. ज्योतिबा फुले यांच्या याच संघर्षामुळे, अन्याय विरुद्धच्या लढ्यामुळे, समाज सुधारणेच्या महान कार्यामुळेच ते लोकांच्या मनातले खरे महात्मा बनले.

महात्मा फुले भाषण मराठी | Mahatma Phule Speech in Marathi – भाषण क्र.01

आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू-भगिनींनो… मी आज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.

अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या…
अठरा विश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या,
अशा हरिजन-गिरीजन, अडलेल्या-नडलेल्या
आणि वर्णव्यवस्थेच्या चौकटीत पिडलेल्या…

दिन दलितांचा ज्या महान पुरुषाने उद्धार केला असे महामानव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. यांच्या पवित्र स्मृतीस, त्यांच्या प्रतिमेस प्रथमतः अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ शोधून महाराजांना आणि त्यांच्या महान कार्याला पुन्हा लोकमानसात आणणारे शिवजयंतीचे जनक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले !

स्वतःच्या घरादाराचा विचार न करता संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाजासाठी व्यतीत करणारे वंचितांचे उद्धार करते… स्त्री शिकली तर समाज सुधारणेला वेग येईल या विश्वासावर तात्कालीन कर्मठ विचारांवर मात करत स्वतःच्या पत्नीला प्रथम शिकवून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

असे स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला. गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असून त्यांचे वडील फुलांचा व्यवसाय करत म्हणून लोक त्यांना फुले या नावाने ओळखू लागले.

महात्मा गांधीजींनी ज्यांना खरा महात्मा म्हणून उल्लेख केला असे महात्मा…
सामाजिक क्रांतिकारक असा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्यांचा उल्लेख केला असे महात्मा…
घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना आपले गुरु मानले असे महात्मा…
सामान्य शेतकरी कुटुंबातील ज्योतिबा आपल्या कार्याने महान बनले…

विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नितीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्तविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले…

ज्योतिबा हे शूद्र – अतिशुद्रांच्या गुलामगिरीचे, दुःखाचे कारण अविद्या – अज्ञान आहे असे म्हणत.

जैसे बोलणे बोलावे, तसे चालणे चालावे !
मग महंत लिला, स्वभावाचे अंगी बने !!

या वचनाची सार्थकता सिद्ध करणारा महात्मा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय.

अस्पृश्यांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून दिला. तसेच बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून विधवा विवाहास प्रोत्साहन त्यांनी दिले. रात्र शाळेची सुरुवात करून दारूची दुकाने बंद करण्यासाठी आंदोलन करून या आणि अशी असंख्य समाज हिताची कामे करून महात्मा फुलेंनी समाज सुधारणेचा झेंडा सर्व दूर फडकवला.

आपल्या कार्यामुळे “महात्मा” बनलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामान्य विचारांना व असामान्य जीवन कार्यस कोटी कोटी प्रणाम करतो आणि जाता जाता एवढेच म्हणेन…

आधुनिक भारताचे शिल्पकार…
दिनदुबळ्यांचा बनले आधार…
ज्यांच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले…
तो ज्ञानाचा रे दाता महात्मा ज्योतिबा फुले…

जय हिंद! जय महाराष्ट्र! धन्यवाद!

महात्मा फुले भाषण मराठी | Mahatma Phule Speech in Marathi – भाषण क्र.02

शेतकऱ्यांचा आसूड तुम्ही उगारला !
गुलामगिरीतही सामाजिक विषमतेवर प्रहार केला !!
सावित्रीसंगे स्त्री शिक्षणाचा पाया रचला !
त्रिवार वंदन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबाला !!

सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो. आज मी तुम्हाला महात्मा फुले यांच्या विषयी जे दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.

समाजात जर क्रांती हवी असेल तर पहिले शस्त्र म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षण हाती घेतले. त्यावेळी स्त्रियांना शिक्षण देणे म्हणजे भ्रष्टाचार करणे असे वाटत असे. त्यामुळे स्त्रियांना शिक्षणाची दारे बंद होती. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षण सर्वप्रथम हाती घेतले.

मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार नव्हते. त्यावेळी महात्मा फुले यांनी आपल्या धर्मपत्नी सावित्रीबाई फुले यांना प्रथम शिकवून तिला शिक्षिका बनविले. सावित्रीबाई फुले या भारतातील प्रथम शिक्षिका होत्या. त्यांनी मुलींना शिक्षण देण्याची मुहूर्तमेढ रोवली. महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडे वाड्यात 1948 साली मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.

मुलींना शिक्षण मिळावे म्हणून ते जातीने लक्ष देत होते. तसेच त्यांनी हरिजन शिक्षणाचे कार्यही हाती घेतले. हरिजन मुलांसाठी जोतिबांनी पहिली शाळा इसवी सन 1951 साली पुण्यातच काढली. त्याबरोबरच अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी होती. अस्पृश्यता, अज्ञान, दारिद्र्य या अस्पृश्याचा शिक्षणाद्वारे विकास करण्याचा आणि हीन परिस्थितीतून बाहेर काढण्याचा महात्मा फुले यांनी ठाम निश्चय केला. ते स्वतः अस्पृश्यांच्या वस्तीत राहायला गेले आणि माणुसकीचा खरा धर्म त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला.

प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. जातीभेद नष्ट करण्यासाठी समाजातील खालचा वर्ग शहाणा झाला पाहिजे असे त्यांचे मत होते. बोलणे आणि करणे याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे महात्मा फुले होय.

बारा वर्षाखालील सर्व बालकांना सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण देणे हे शासनाचे कर्तव्य आहे, अशी महात्मा फुलेंनी जोरदार मागणी केली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे, मोफत असले पाहिजे अशी मागणी करणारे ते पहिले भारतीय होते. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केल्याने विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांना उच्च दर्जाचे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक केली पाहिजे. यावर महात्मा फुलेंनी भर दिला होता.

19 ऑक्टोबर 1882 रोजी त्यांनी हंटर आयोगासमोर आपले म्हणणे मांडताना सांगितले की, प्राथमिक शाळांसाठी शक्यतो प्रशिक्षित शिक्षक असावेत. आणि ते शेतकरी वर्गातील असावेत. त्यामुळे ते मुलांच्या गरजा ओळखून त्यांना समजावून देतील. परंतु ब्राह्मण समाजातील शिक्षक मुलांपासून स्वतःला अलिप्त ठेवतील यासाठी कनिष्ठ वर्गाचे शिक्षकांची प्रशिक्षणासाठी निवड करावी. असा ठराव शासन दरबारी मांडला होता. प्राथमिक शालेय अभ्यासक्रमात आरोग्य, शेती, कला, ग्रामोद्योग अशा विषयांना प्राधान्य दिले पाहिजे. या सर्व कार्यामुळे हा वर्ग जो आहे तो स्वावलंबी बनला. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या सर्व मागण्या मान्य करून घेतल्या.

महात्मा फुले यांचे स्त्री शिक्षण व बहुजन समाजातील शिक्षणाला प्रेरणा व चालना देण्याच्या कार्यातील योगदान फार मौलिक स्वरूपाचे आहे. महात्मा फुले हे एक समाजातील समाज सुधारक व शिक्षण प्रसारक होते. हे लक्षात घेता त्यांच्या कार्याचे महत्त्व तर अधिकच स्मरणीय ठरते. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

महात्मा फुले जयंती भाषण मराठी | Mahatma Phule Jayanti Speech in Marathi – भाषण क्र.03

समाजसेवेसाठी ज्यांनी जीवन खर्चीले !
स्त्रियांच्या शिक्षणाचे द्वार खुले केले !!
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ज्यांनी बंड केले !
धन्य धन्य ते महात्मा ज्योतिबा फुले !!

सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो…
सर्वांना माझा नमस्कार…

आज मी आपल्यासमोर स्त्री शिक्षणाचे जनक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक, महान क्रांतिकारक, समाजसुधारक आणि थोर विचारवंत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे.

महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुन या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये झाले.

महात्मा फुले यांच्यावर “थॉमस पेन” यांच्या “राईट ऑफ मॅन” या पुस्तकाचा प्रभाव पडला. समाजातील अज्ञान, दारिद्र्य, जातीभेद दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण व मागासलेल्या मुला मुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर दिला.

1848 मध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली आणि शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाई वर सोपवली. “घरातील एक स्त्री शिकली की कुटुंब शिकते.” “ज्ञान ही एक शक्ती आहे.” असे विचार त्यांनी मांडले.

महात्मा फुलेंनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दुरावस्था समोर आणली. समाजातील वाईट प्रथा नष्ट करून सर्वांना सज्ञांनी बनविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात आत्मविश्वास वाढवला. त्यांना हक्कांची अधिकारांची जाणीव करून दिली.

28 नोव्हेंबर 1890 साली जोतिरावांचा मृत्यू झाला. स्त्रियांसाठी पहिली शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहेत. त्यांच्या कार्यास माझे कोटी कोटी नमन !

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

महात्मा फुले भाषण मराठी | Mahatma Phule Speech in Marathi – भाषण क्र.04

गोरगरिबांच्या सेवेसाठी
ज्यांनी झिजवले जीवन
अशा थोर महात्मा फुलेंना
करूया नमन ! करूया नमन !!

अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 11 एप्रिल थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. त्यांच्या जयंती निमित्त मी आपणास जी माहिती सांगणार आहे ती आपण सर्वांनी शांतचित्ताने ऐकावी ही नम्र विनंती.

महात्मा फुले हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 या रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई असे होते.

त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथील पंतोजींच्या शाळेत मराठी माध्यमात आणि माध्यमिक शिक्षण पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी माध्यमात झाले. शाळेमध्ये अतिशय हुशार आणि शिस्तप्रिय विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.

महात्मा ज्योतिबा फुले यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तमिळ, गुजराती इत्यादी भाषा येत असत. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला.

महात्मा फुले यांनी इ.स. 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढली. त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवले आणि त्यांना मुलींच्या शिक्षिकेची जबाबदारी दिली.

महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे आसूड, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी इत्यादी पुस्तके लिहिली. समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी 24 सप्टेंबर इ.स. 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी “सत्यशोधक” समाजाची स्थापना केली. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, जातिभेद नष्ट करण्यासाठी ते आयुष्यभर लढले.

आणि म्हणूनच जनतेने त्यांना “महात्मा” म्हणून ही पदवी दिली. अशा या थोर समाजसुधारकाचे 28 नोव्हेंबर 1890 साली निधन झाले. अशा या थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम!

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.
जय हिंद! जय महाराष्ट्र!

महात्मा फुले भाषण मराठी | Mahatma Phule Speech in Marathi – भाषण क्र.05

महाराष्ट्राची दिव्य ज्योती
वाळू त्यांची आरती !
नमन माझे महात्मा फुले यांना
आज आहे त्यांची जयंती !!

बहुजन समाजाचे महाराष्ट्रातील पहिले उद्धारक महात्मा ज्योतिराव फुले सर्वांना चांगले परिचित आहेत. त्यांनी आपल्या “शेतकऱ्यांचा आसूड” या ग्रंथामध्ये विद्याहीन, दारिद्र्य व अज्ञानी बहुजन समाजाच्या हीनदीन अवस्थेची मोजक्या शब्दात व्यथा मांडली आहे.

11 एप्रिल 1827 रोजी माळी समाजातील गोविंदराव आणि चिमणाबाई यांच्या घरी हे रत्न जन्मास आले.

19 व्या शतकातील बहुजन समाज म्हणजे शूद्र-अतिशुद्रांचा समाज! यामध्ये उच्चवर्णीय ब्राह्मण सोडून मराठ्यांसह सर्व जातींचा समावेश होता. अगदी मराठे स्वतःला क्षत्रिय मानत असले. तरी ब्राह्मण मात्र त्यांना शूद्र समजत होते. असा हा समाज म्हणजे देशातील 97% समाज सामाजिक गुलामगिरी, धार्मिक गुलामगिरी, दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रद्धेच्या गर्तेत गुरफटला होता.

आणि त्यांच्या या अवस्थेचे मूळ कारण एकच होते, ते म्हणजे अविद्या, विद्याहीनता, धनहिनता! महात्मा फुले हे या अन्यायी व्यवस्थेच्या विरोधात उभे राहणारे पहिले कृतिशील नेते होते. बहुजन समाजात नवविचार जागृत करून त्याला पुनर्जीवन प्राप्त करून देण्याचे महान कार्य ज्योतिबांनी केले. 19 व्या शतकात शूद्र व अतिशूद्रांकरीता सारे जीवन समर्पित करणारा युगपुरुष म्हणजे ज्योतिराव फुले!

सुधारणेचा मूळ पाया शिक्षण आहे, असे ज्योतिबांचे ठाम मत होते. शिक्षणाने सर्वांगीण सुधारणा होऊ शकते, या विचारांवर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. आदर्श समाज रचनेसाठी शिक्षणाची गरज आहे हे ओळखून त्यांनी स्त्री शिक्षण आणि शूद्रांना शिक्षण देण्याचे ठरविले. त्याची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासूनच म्हणजे आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन केली.

पुणे येथील भिडे वाड्यात त्यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. लिहिता वाचता येणे एवढा मर्यादित उद्देश्य शिक्षणामागे नाही, तर आचारात, विचारात अमुलाग्र बदल घडवून आणण्याचे काम शिक्षणाने झाले पाहिजे याबाबत फुले दांपत्य आग्रही होते.

सावित्रीबाईंच्या सहकार्यामुळे आणि उत्तेजनामुळेच आपण समाजकार्य व लोकसेवेचे कर्तव्य पार पाडू शकलो असे ते कौतुकाने सांगत.

त्यांनी आयुष्यभर अस्पृश्यतेला प्रखर विरोध केला. तसेच केशवपणाचा धिक्कार करून विधवा विवाहाचा पुरस्कार केला. अंधश्रद्धेचे निर्मूलन होऊन समतावादी विचार रुजावा यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. “सार्वजनिक सत्यधर्म” या पुस्तकातून त्यांनी सत्य वर्तनाने वागणाऱ्या व्यक्तीचे लक्षणे लोकांसमोर मांडली. हे पुस्तक वाचताना ज्योतिबांचा समाजाविषयी किती अभ्यास होता हे लक्षात येते.

गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून तात्कालीन इंग्रज राजवटीवर आक्रमक शैलीत त्यांनी हल्ला केला. गरीब शेतकऱ्यांविषयी वाटणारा कळवळा आणि अन्यायाबद्दलची चीड त्यांच्या शब्दांमधून जाणवते. दरिद्री शेतकऱ्यांना बियाणे व शेतीची अवजारे पुरविण्यासंबंधी सरकारकडे त्यांनी आग्रह धरला होता. समाजसुधारणेच्या हेतूने ज्योतिबांकडून विपुल लेखन झाले. “अखंड” या काव्य प्रकारातून मानवता धर्माचे प्रतिपादन ते करतात.

आपला देह जगाच्या कल्याणासाठी कष्टावा, असा उपदेश ते करतात. अस्पृश्यता निर्मूलन, स्त्री शिक्षण, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, समाजसुधारक, विचारवंत या त्यांच्या महान कार्यामुळेच लोकांसाठी ते महात्मा ठरले.
अशा या थोर महात्म्याचे महानिर्वाण 28 नोव्हेंबर 1890 साली झाले. क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचे संघर्ष आणि समाज कार्य पाहून एवढेच म्हणावेसे वाटते की,

स्त्री शिक्षणाचे तुम्ही रोपटे लाविले !
त्याचेच आज भव्य वृंदावन झाले !!
फळा फुलांनी ते सर्व बहारले !
त्या फळा-फुलातून आज आवाज निघतो
महात्मा फुले, महात्मा फुले !!

जय हिंद ! जय महाराष्ट्र ! धन्यवाद !!

सारांश | Mahatma Phule Speech in Marathi | महात्मा फुले भाषण मराठी

मित्रांनो, वरील लेखात आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी भाषणे बघितली. ही भाषणे आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती किंवा पुण्यतिथी निमित्त देऊ शकता. वरील लेखात आपण महात्मा फुले यांच्या वर 05+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज भाषणे बघितली. ही भाषणे आपण महात्मा फुले यांच्या जयंती किंवा पुण्यतिथी च्या वेळी खूप उपयुक्त ठरतील.

आमचा हा छोटासा प्रयत्न आपल्याला कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही विचार किवा मार्गदर्शन असेल तर ती ही कळवा. ही भाषणे आपल्या गरजू विद्यार्थ्यांना, मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे शीर्षक असेही असू शकते –

महात्मा ज्योतिराव फुले भाषण मराठी | Mahatma Jyotirav Phule Bhashan Marathi

महात्मा ज्योतिराव फुले भाषण मराठी | Mahatma Jyotirav Phule Speech in Marathi

महात्मा ज्योतिबा फुले भाषण मराठी | Mahatma Jyotiba Phule Bhashan Marathi

महात्मा ज्योतिराव फुले भाषण मराठी | Mahatma Jyotirav Phule Speech in Marathi

महात्मा ज्योतिराव फुले भाषण | Mahatma Jyotirav Phule Bhashan

महात्मा ज्योतिबा फुले भाषण | Mahatma Jyotiba Phule Bhashan

महात्मा फुले भाषण मराठी | Mahatma Phule Bhashan Marathi

महात्मा फुले भाषण मराठी | Mahatma Phule Speech in Marathi

महात्मा फुले भाषण | Mahatma Phule Bhashan

महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त भाषण मराठी

महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर भाषण

महात्मा फुले यांच्या विषयी भाषण

महात्मा फुले यांच्या पुण्तिथी निमित्त भाषण मराठी

Jyotiba Phule Speech in Marathi

महात्मा फुले जयंती भाषण

महात्मा ज्योतिबा फुले जयंती भाषण

महात्मा ज्योतिबा फुले यांचे भाषण मराठी

Mahatma Phule Speech in Marathi | महात्मा फुले भाषण मराठी

महात्मा ज्योतिबा फुले भाषण मराठी | Mahatma Jyotiba Phule Bhashan Marathi महात्मा ज्योतिबा फुले भाषण मराठी | Mahatma Jyotiba Phule Bhashan Marathi महात्मा ज्योतिबा फुले भाषण मराठी | Mahatma Jyotiba Phule Bhashan Marathi महात्मा ज्योतिबा फुले भाषण मराठी | Mahatma Jyotiba Phule Bhashan Marathi Jyotiba Phule Speech in Marathi

Leave a Comment