महात्मा फुले चारोळ्या मराठी (170+ अतिशय सुंदर) | Mahatma Phule Charolya in Marathi 2023 | महात्मा फुले चारोळी 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Mahatma Phule Charolya in Marathi 2023 | महात्मा फुले चारोळ्या मराठी – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त चारोळ्या मराठी मध्ये बघणार आहोत. महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त भाषण देताना जर आपल्याला श्रोत्यांकडून टाळ्यांचा कडकडाट ऐकून घ्यायचा असेल तर चारोळ्या शिवाय पर्याय नाही.

आणि म्हणूनच मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त भाषणासाठी 170+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज चारोळ्या मराठी मध्ये घेऊन आलो आहोत. या चारोळी आपण आपल्या भाषणात नक्की वापरा आणि भाषण स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंका. चला तर मित्रांनो सुरुवात करुया.

महात्मा फुले चारोळ्या मराठी | Mahatma Phule Charolya in Marathi

ज्योतिबां मुळेच घडली
क्रांतीज्योती सावित्री !
म्हणूनच आज स्वच्छंदी
व्यक्त होत आहे कवयत्री !!

अनंत यातना सहन केल्या !
पण हार कधी नाही मानली !!
स्त्री शिक्षणाची महती !
सर्वात आधी तुम्ही जाणली !!

महाराष्ट्राची दिव्य ज्योती
ओवाळू पंचारती !
नमन माझे महात्मा फुले
आज आहे त्यांची जयंती !!

विद्येविना मती गेली !
मतीविना नीती गेली !
नितीविना गती गेली !
गतीविना वित्त गेले !
वित्ताविना शूद्र खचले !
इतके अनर्थ एका अविद्येने केले !!

दुःखी पिढीतांचा दुःखहर्ता !
विद्येचा तो महान दाता !!
तहानलेल्या यांचा त्यांनी तृप्त केला आत्मा !
म्हणून नाव त्यांचे पडले महात्मा !!

आधुनिक भारताचा शिल्पकार !
दिन दुबळ्यांचा बनले आधार !!
त्यांच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले !
हो ज्ञानाचा दाता महात्मा फुले !!

तुम्ही नसते तर ही ताठर समाज व्यवस्था
झुकली असती का !
तुम्ही ज्ञानदानाचे कार्य केले नसते तर महिला
शिकली असती का !!

कोणी दूर केला असता महिलांच्या
जीवनातील अंधकार !
त्यांच्यासाठी कोणी खुले
केले असते ज्ञानाचे द्वार !!

मुली व अस्पृश्यांसाठी सुरू केली शाळा !
लाविला त्यांनी शिक्षणाचा लळा !!
भिडे वाड्यात खुलविला !
फुले दांपत्यांनी शिक्षणाचा मळा !!

स्त्री शिक्षणाचे तुम्ही रोपटे लाविले !
त्याचेच आज भव्य वृंदावन झाले !!
फळा फुलांनी ते सर्व बहारले !
त्या फळा-फुलातून आज आवाज निघतो
महात्मा फुले, महात्मा फुले !!

शेतकऱ्यांचे तुम्ही जाणते नेते !
दिनदुबळ्यांचे तुम्ही तारण हारते !!
महिला शिक्षणाचे तुम्ही प्रेरणादाते !
आधुनिक भारताचे भाग्यविधाते !!

शेतकऱ्यांचा आसूड लिहून शेतकऱ्यांचे दुःख मांडले !
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही सरकारशी भांडले !!
राजपुत्राच्या सभेला ही शेतकऱ्यांच्या वेशात गेला !
शेतकऱ्यांना तुम्ही न्याय मिळवून दिला !!

ज्यांच्यामुळे शिकली
दीनदुबळ्यांची मुले !
ते ज्ञानदाते,भाग्यविधाते
महात्मा ज्योतिबा फुले !!

समाजसेवेसाठी ज्यांनी जीवन खर्चीले !
स्त्रियांच्या शिक्षणाचे द्वार खुले केले !!
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ज्यांनी बंड केले !
धन्य धन्य ते महात्मा ज्योतिबा फुले !!

शेतकऱ्यांचे तुम्ही जाणते नेते !
दीनदुबळ्यांचे तुम्ही तारणहारते !!
महिला शिक्षणाचे तुम्ही उद्गाते !
आधुनिक भारताचे भाग्यविधाते !!

तुम्ही पेटवलेली ज्ञानज्योत !
आज स्त्री अनुभवत आहे !!
त्या ज्योतीचा लख्ख प्रकाश !
घरोघरी आज तेवत आहे !!

महात्मा फुले चारोळी मराठी | Mahatma Phule Charoli in Marathi

गोरगरिबांच्या सेवेसाठी,
ज्यांनी झिजवले जीवन !
अशा थोर महात्मा फुलेंना,
करूया नमन, करूया नमन !!

झाली होती सामान्यांना,
जगण्याची भ्रांती !
शिक्षणाचे सांगून महत्व,
ज्योतिबांनी केली समाजक्रांती.!!

महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे,
समानता आणि सत्तेसाठी देह झिजवणारे,
बहुजन समाजाचे उद्धारक सत्यशोधक
समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले
यांना विनम्र अभिवादन !!

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात,
ज्यांचे निर्धार ठाम असतात !
त्यांना कुठेतरी उद्दिष्ट गाठायचे असतात.!

मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे,
हाच तुमचा ध्यास होता !
त्यांना शिक्षणाची गोडी लावणे,
यासाठी जीवनभर अट्टाहास होता !!

स्त्री शिक्षणाचे अग्रदूत म्हणून
आदराने तुम्हाला ओळखतात !
सत्याचा आयुष्यभर स्वीकार केल्याने
सत्याचा वाली तुम्हास समजतात !!

शिक्षणाची ज्योत उजळण्यासाठी
कष्टरूपी तेल ओतलात तुम्ही !
त्या कष्टाचे चीज आज झाले आणि
स्त्री जीवनात नाही कशाची कमी !!

शेतकऱ्यांचा आसूड तुम्ही उगारला !
गुलामगिरीतही सामाजिक विषमतेवर प्रहार केला !!
सावित्रीसंगे स्त्री शिक्षणाचा पाया रचला !
त्रिवार वंदन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबाला !!

समाजसेवेसाठी ज्यांनी जीवन खर्चीले !
महिलांसाठी शिक्षणाचे दालन केले खुले !!
इंग्रजांना राष्ट्रभक्तीचे धडे शिकविले !
धन्य आमचे महात्मा ज्योतिबा फुले !!

दूर करून अंधकार सारा
ज्योत ज्ञानाची पेटवली !
शिकवून सावित्रीबाईंना
शिक्षणाची गंगा पोहोचविली !!

तूच ज्ञानज्योती तूच क्रांतीज्योती !
पटवली स्त्री शिक्षणाची महती !!
सर्व क्षेत्री उंच भरारी घेती !
तुझ्यामुळेच सावित्रीच्या लेकी !!

दिशाहीन झालेल्या बहुजनांसाठी,
पाणी केले खुले !
धन्य ते बहुजनांचे नेते,
महात्मा ज्योतिराव फुले !!

ज्यांच्यामुळे शिकली
दीनदुबळ्यांची मुले !
ते विद्या दाते, ते ज्ञानदाते
महात्मा ज्योतिबा फुले !!

होता स्वातंत्र्य पूर्वीचा काळ,
महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार !
त्यांच्यासाठी केले त्यांनी ज्ञानाचे द्वार खुले,
ते ज्ञानाचा दाता महात्मा फुले !!

विद्या विद्या ! शिक्षण शिक्षण !
हाच प्रतिक्षण ! ध्यास तुला !!
तुझ्या चरित्राने ! मन स्थित्यंतर !
नाही गत्यंतर ! ज्ञाना विना !!
आता हे अंधही ! झालेत डोळस !!
सुखाचा कळस ! गाठतात !
महात्म्या तुला हे ! अनंत प्रणाम !!
हृदयी तुझे नाम ! निरंतर !!

नाव त्याच “ज्योती”
काम केलं नावाप्रमाणेच
आपल्या अंधाऱ्या घरात
प्रकाश लावला त्यानेच
ना कुणाची परवा केली
ना कुणाची भीती
काम आपलं करत राहिला
शिकली माझी आई
शिकली माझी बहीण
शिकेल माझी मुलगी
ते ही यांच्यामुळेच .!!

सारांश | महात्मा फुले चारोळ्या मराठी | Mahatma Phule Charolya in Marathi

मित्रांनो वरील लेखात आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त चारोळ्या मराठी मध्ये बघितल्या. वरील लेखात आपण 170+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज चारोळ्या बघितल्या. या चारोळ्या आपण महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त भाषण, सूत्रसंचालन साठी वापरू शकता. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे भाषण देऊन श्रोत्यांची मने जिंका.

आमचा हा छोटासा प्रपंच आपल्याला कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही विचार किवा मार्गदर्शन असेल तर ते ही कळवा. आपल्या मित्रांना ही ह्या चारोळ्या शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे शीर्षक असेही असू शकते –

महात्मा ज्योतिबा फुले चारोळ्या मराठी | Mahatma Jyotiba Phule Charolya in Marathi

महात्मा ज्योतिबा फुले चारोळ्या | Mahatma Jyotiba Phule Charolya

महात्मा ज्योतिबा फुले चारोळी मराठी | Mahatma Jyotiba Phule Charoli in Marathi

महात्मा ज्योतिबा फुले चारोळी | Mahatma Jyotiba Phule Charoli

महात्मा ज्योतिराव फुले चारोळ्या मराठी | Mahatma Jyotirav Phule Charolya in Marathi

महात्मा फुले भाषण चारोळ्या मराठी | Mahatma Phule Bhashan Charolya in Marathi

महात्मा फुले भाषण सूत्रसंचालन चारोळ्या मराठी | Mahatma Phule Bhashan Sutrasanchalan Charolya in Marathi

महात्मा फुले चारोळ्या मराठी 2023 | Mahatma Phule Charolya in Marathi 2023

महात्मा फुले चारोळ्या मराठी | Mahatma Phule Charolya in Marathi

Leave a Comment