गुड फ्रायडे म्हणजे काय? | गुड फ्रायडे माहिती मराठी | Good Friday Information in Marathi | काय आहे या दिवसाचे महत्त्व?


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Good Friday Information in Marathi | गुड फ्रायडे म्हणजे काय? | गुड फ्रायडे माहिती मराठी नमस्कार मित्रांनो, कधी ना कधी तुमच्या मनात हा प्रश्न नक्की आला असेल की, गुड फ्रायडे म्हणजे काय? हा कोणता सण आहे का? याचा इतिहास काय आहे? हा सण कसा साजरा केला जातो? असे विविध प्रश्न तुमच्या मनात येत असतील.

तर म्हणूनच मित्रांनो, आज आपण या लेखात गुड फ्रायडे म्हणजे काय? त्याचा इतिहास काय आहे? हा सण कोण व कसा साजरा करतात? या सर्व बाबी आज आपण या लेखात बघणार आहोत. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता सुरुवात करुया.

गुड फ्रायडे म्हणजे काय?

गुड फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे. ईस्टरच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी हा दिवस पाळाला जातो. या दिवसाला ब्लॅक फ्रायडे, ग्रेट फ्रायडे अशा नावांनीही संबोधले जाते.

पण या दिवसाबाबत अनेकांमध्ये अनेक गैरसमजही बघायला मिळतात. अनेकांना हे माहीतच नसतं की हा एक दुःखाचा दिवस आहे. त्यामुळे काही लोक सोशल मीडियातून या दिवसाच्या शुभेच्छा देताना दिसतात.

ख्रिश्चन धर्मातील समजूतीप्रमाणे याच दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉस वर चढवण्यात आले होते. याची आठवण ठेवून ख्रिस्ती धर्मात हा दिवस शोक दिवस मानला जातो.

काय आहे या दिवसाचे महत्त्व?

भारतामध्ये गुड फ्रायडे निमित्त बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालय तसेच शैक्षणिक संस्थांना सुट्टी असते. काही ख्रिस्ती पारंपारिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय दुःखवट्याप्रमाणे साजरा होतो.

या दिवशी कोणताही आनंददायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाही. ख्रिस्ती भाविक बांधव चर्चमध्ये जाऊन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.

येशू ख्रिस्तांना क्रॉस वर का चढवलं गेलं?

ख्रिस्ती धर्मानुसार येशू ख्रिस्त हे परमेश्वराचे पुत्र होते. लोकांना ते अज्ञानाच्या अंधारातून बाहेर येण्यासाठी शिक्षित करत होते.

त्यावेळी काही कट्टरपंथी लोकांनी येशू ख्रिस्तांचा विरोध केला. आणि त्या काळाच्या रोमन गव्हर्नर Pontius Pilate कडे येशू ख्रिस्ताची तक्रार केली. येशू ख्रिस्तांची शिकवण रोमन सत्ताधारकांसाठी धोक्याची ठरत होती.

यहुदी म्हणजेच ज्यू लोकांनी क्रांती करू नये आणि आपली सत्ता आबाधित राहावी यासाठी गव्हर्नर ने येशू ख्रिस्तांना क्रॉस वर लटकवून जिवे मारण्याचा आदेश दिला.

रोमन सैनिकांनी येशू ख्रिस्तांच्या डोक्यावर काट्याचे मुकुट ठेवून चाबकाचे फटके देत त्यांची धिंड काढली. येशूचे अनुयायी आक्रोश करत होते, क्षमा याचना करत होते, तर कर्मठ लोक मात्र येशूची अवहेलना करत होते.

पण आपल्या शेवटच्या क्षणी ही येशू ख्रिस्ताने “हे परमेश्वरा हे लोक काय करत आहेत ते, हे जाणत नाहीत, या सगळ्यांना त्यांच्या पापांसाठी क्षमा कर, माफ कर,” असे स्वर्गातल्या परमेश्वराला विनवत आपले प्राण त्यागले असे ख्रिश्चन बांधव मानतात.

त्यामुळे येशूच्या बलिदानाचा हा दिवस “गुड फ्रायडे” म्हणून ओळखला जातो. गुड फ्रायडे नंतरचा येणारा रविवार म्हणजेच ईस्टर संडे हा येशूचा परत प्रकटण्याचा दिवस असतो. त्यामुळे ईस्टर संडेचा हा दिवस ख्रिस्ती बांधव मोठ्या आनंदात साजरा करतात.

सारांश | Good Friday Information in Marathi | गुड फ्रायडे माहिती मराठी

मित्रांनो, वरील लेखात आपण गुड फ्रायडे ची माहिती जाणून घेतली. गुड फ्रायडे या दिवसाचे महत्त्व आणि त्याचा इतिहास जाणून घेतला. आम्हाला अशा आहे की आपल्या वरील शंकांचे समाधान झाले असेल आणि आपल्याला आमची ही माहिती आवडली असेल.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रपंच कसा वाटला आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही विचार किवां मार्गदर्शन असेल तर ते ही कळवा. आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Good Friday Meaning in Marathi | Good Friday Information in Marathi

Leave a Comment