जागतिक आरोग्य दिन माहिती मराठी 2023 | World Health Day Information in Marathi 2023 | जागतिक आरोग्य दिन का साजरा करतात | इतिहास


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

World Health Day Information in Marathi 2023 | जागतिक आरोग्य दिन माहिती मराठी 2023 – नमस्कार मित्रांनो, दरवर्षी दिनांक 07 एप्रिल रोजी आपण जागतिक आरोग्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. पण तुम्हाला माहिती आहे का? की आपण जागतिक आरोग्य दिन का साजरा करतो? याच्या मागचा इतिहास काय आहे?

आज आपण या लेखात जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास काय आहे? अशा सर्व बाबींची माहिती बघणार आहोत. प्रथम आपणास जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! चला तर मित्रांनो वेळ वाया न घालविता सुरुवात करुया.

जागतिक आरोग्य दिन माहिती मराठी | World Health Day Information in Marathi

या लेखात आपण जागतिक आरोग्य दिनाची माहिती मराठी मध्ये सविस्तर बघणार आहोत. आपल्याला जर आपल्या आरोग्याची काळजी असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.

जागतिक आरोग्य दिन का साजरा करतात?

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा | शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोस्तुते !!

प्रत्येक संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी जेव्हा देवासमोर दिवा लावला जातो, तेव्हा हे शुभंकरोती अवश्य म्हटलं जातं आणि त्यातूनच आपल्या लक्षात येतं की खरंच आरोग्याला धनसंपदा असं म्हणण्यात आलेला आहे.

Health is Wealth हे सुद्धा आपण लहापणापासून ऐकत आलेलो आहोत. पण तरी सुद्धा आपण आरोग्याला संपत्ती इतकं महत्त्व देतो का? खरंतर कोणत्याही संपत्तीपेक्षा अधिक महत्त्व आपण आरोग्याला द्यायला हवं बरं का!

पण दहा रुपयांचे साध नाणं जर हरवलं तर, आपण जेवढी हळहळ व्यक्त करतो, तेवढीच हळहळ आपण अशा सगळ्या वेळी व्यक्त करतो का? जेव्हा आपण जंक फूड आपल्या पोटात घालत असतो, जेव्हा आपण रात्र रात्र जागून सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो.

जेव्हा आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून आपल्याच काहीतरी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अगदी मशरूम असतो. मात्र आपण या आरोग्याची काळजी अजिबात घेत नसतो.

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास मराठी | World Health Day History in Marathi

आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही. त्यामुळे या आरोग्याबद्दल जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने 7 एप्रिल 1948 रोजी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (World Health Organization) ची स्थापना करण्यात आली होती. त्याच वेळेस ठरवण्यात आलं होतं की 07 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात यावा.

पहिला जागतिक आरोग्य दिन दिनांक 07 एप्रिल 1950 रोजी साजरा करण्यात आला होता. या निमित्ताने प्रत्येक वर्षी जागतिक आरोग्य दिवस एका थीम सहित सहित साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य दिन 2023 ची थीम “Health For All” “सगळ्यांसाठी आरोग्य” अशी आहे.

या जगात प्रत्येक मनुष्याला जगणाचे समान अधिकार आहेत. तो श्रीमंत असो वा गरीब, तो कोणत्याही जाती धर्माचा असो. अधिकार सर्वांना समान आहेत. त्यामुळेच आरोग्याचा अधिकार सुद्धा सर्वांना समान आहे. सर्वांचे आरोग्य चांगले राहिले तर संपूर्ण जगाचे आरोग्य चांगले राहील.

पण खरंतर प्रत्यक्षात काय घडतंय? दरवर्षी सुमारे एक कोटी तीस लाख इतके लोक प्रदूषणामुळे मरण पावत आहेत. एकच नव्हे तर 90% लोक हे प्रदूषित हवा इन्हेल करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण अशा जगाचा स्वप्न पाहू शकतो का? की, ज्या जगामध्ये अगदी शुद्ध हवा, पाणी, अन्न असणार आहे. आणि ज्या जगातला प्रत्येक देश आरोग्य व्यवस्थेसाठी आणि वातावरणासाठी भक्कम आर्थिक तरतूद करून ठेवेल.

जर आरोग्य व्यवस्थित राखता आलं नाही तर, कुटुंबाचा आर्थिक गणित तर बिघडतच पण देशाच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा ताण येतोच. वातावरणातील प्रतिकूल बदल हे आपल्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम करतात. हे बदल किंवा प्रदूषण किमान आपल्यामुळे तरी होऊ नयेत यासाठी तरी आपण काळजी घ्यायला हवी.

म्हणूनच तर आरोग्य हरवल्यानंतर खंत करण्यापेक्षा आरोग्य हरवूच नये यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. 07 एप्रिल, जागतिक आरोग्य दिवसाच्या निमित्ताने आपण खरंच स्वतःला वचन देऊया आणि आपल्या आरोग्य जपण्यासाठी पूर्णतः प्रयत्न करूया. धन्यवाद !

सारांश | जागतिक आरोग्य दिन माहीत मराठी | World Health Day Information in Marathi

मित्रांनो वरील लेखात आपण जागतिक आरोग्य दिनाबद्दल माहीत मराठी मध्ये बघितली. वरील लेखात आपण जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास, जागतिक आरोग्य दिवस दिनविशेष आणि जागतिक आरोग्य दिवसाचे महत्त्व जाणून घेतले. आपले आरोग्य हे खूप अनमोल आहे मित्रांनो. ज्याचा काही मोल नाही. म्हणून आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे.

मित्रांनो आपल्याला आमचा हा छोटासा प्रपंच कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही विचार किवा मार्गदर्शन असेल तर ते ही कळवा. आणि हा लेख आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

जागतिक आरोग्य दिवस याबद्दल आपल्या मनातील काही प्रश्न

  1. जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो?

    जागतिक आरोग्य दिन दरवर्षी 07 एप्रिल रोजी साजरा केला जातो.

  2. जागतिक आरोग्य दिन 2023 ची थीम काय आहे?

    सर्वांसाठी आरोग्य | Health for All

  3. जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो?

    आरोग्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 07 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो.

Leave a Comment