डॉ. बाबासाहेब आंबेडकर कविता मराठी (07+ अतिशय सुंदर कविता) | Dr Babasaheb Ambedkar Kavita In Marathi 2023 | Dr Babasaheb Ambedkar Jayanti Kavita In Marathi 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Dr Babasaheb Ambedkar Kavita In Marathi 2023 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर कविता मराठी – नमस्कार मित्रांनो, जय भीम ! दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी आपले महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती आहे. बाबासाहेबांची जयंती आपण अगदी आनंदाने, उत्साहाने आणि मोठ्या जल्लोषात साजरी करतो.

प्रथम आपण सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती च्या हार्दिक शुभेच्छा ! आज आपण या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर 07+ अतिशय सुंदर कविता मराठी मध्ये बघणार आहोत. आपल्याला ह्या कविता 14 एप्रिल ला भाषण देताना नक्की उपयुक्त ठरतील याची आम्हाला खात्री आहे. चला तर मित्रांनो सुरुवात करुया.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कविता मराठी | Dr Babasaheb Ambedkar Kavita In Marathi – कविता क्र.01

कळतच नाही बाबासाहेब
काय लिहावं तुमच्यावरती !
कार्यही तुमचे तेवढेच,
नि तेवढीच आहे कीर्ती !!

एक दिवस विचार केला
बाबासाहेब लिहाव तुमच्यावरती !
पण फार वाईट वाटलं,
पाहून आताची स्थिती !!

हयातभर कार्य केले देशासाठी
त्या कार्याची जाणीव नाही !
बाबासाहेब तुम्ही काहींना
जन्मभरच कळले नाही !!

जगातील पाच विद्वानात
तुम्ही गणले जात होते !
दोन वर्ष अकरा महिने
18 दिवस, मात्र ते खरे होते !!

ऐकून तुमची कहाणी
डोळ्या येतो पाणी !
आमच्यासाठी केलं तुम्ही
हाडाचं मणी नि रक्ताचं पाणी !!

जिवंतपनी मारतो लाथा
मेल्यावरती फुले काशीला !
तसंच तर बाबासाहेब
भारतरत्न मिळाले तुम्हाला !!

तुम्ही शिक्षण पूर्ण केले
हालाखीत जीवन जगून !
नोकरीलाही लाथ मारली
नवा भारत घडावा म्हणून !!

किंमत नाही तुमच्या कार्याची
बाबासाहेब विचार केला बसून !
अश्रूंची किंमत नाही या जगात
म्हणून माझे अश्रू मीच घेतो पुसून !!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कविता मराठी | Dr Babasaheb Ambedkar Kavita – कविता क्र.02

सलाम या महामानवाला
शून्यातून केली सुरुवात
अमर झाले इतिहासात
आंबेडकर असे त्यांचे नाव
आपल्या सर्वांचे असे भीमराव..!

शुद्रापोटी जन्म घेतला,
प्रत्येक वर्णाचा विकास करविला
आणि…
बघता बघता या मानवाचा
महामानव झाला…!

आयुष्य गेले लढण्यात
प्रत्येकाचा विचार करण्यात
या देशाला समतेकडे नेण्यात
प्रत्येकाला भारतीय म्हणून घडवण्यात..!

बालपण जोडीले पुस्तकांना
तोडीले अनेक बंधनांना
न्याय मिळवून दिला बहुजनांना
निर्माण केले संविधान घडले
कारण लोकशाहीला..!
सलाम माझ्या या महामानवाला..!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कविता मराठी | Dr Babasaheb Ambedkar Jayanti Kavita In Marathi – कविता क्र.03

कुळी जन्माला असा पुत्र
ज्याने उपकार केले मातीवर !
माझ्या भिमाचे नाव मी
कोरले माझ्या छातीवर !!

अंधाऱ्या घरात पेटविल्या
ज्ञानाच्या ज्योती !
जगभर गाजते त्यांच्या
कार्याची कीर्ती !!
असा दुसरा विद्वान न
जन्मला जगाच्या मातीवर !
माझ्या भिमाचे नाव कोरले
मी माझ्या छातीवर !!

जातिभेदाची भिंत
त्यांनी तोडली !
अनियतिशी नीतीची
युद्ध लढली !!
विश्वास होता त्यांचा
या न्याय नितीवर !
माझ्या भिमाचे नाव कोरले
मी माझ्या छातीवर !!

संविधानाचा उघडूनी पत्ता !
जातीवाद्याची उलथवली सत्ता !!
जातीभेद मिटवला त्यांनी,
लेखणीच्या पातीवर !
माझ्या भिमाचे नाव कोरले
मी माझ्या छातीवर !!

कार्यच भीमाचे होते पहा नेक !
समानतेचा दिला सर्वांना हक्क !!
कवी दादासाहेब भाळला
त्यांच्या न्याय नितीवर !
माझ्या भिमाचे नाव कोरले
मी माझ्या छातीवर !!

कुळी जन्माला असा पुत्र
ज्याने उपकार केले मातीवर !
माझ्या भिमाचे नाव मी
कोरले माझ्या छातीवर !!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कविता मराठी | Dr Babasaheb Ambedkar Poem In Marathi – कविता क्र. 04

भारतरत्न बाबासाहेबांचे
काम आहे खूप मोठे !
त्यांच्यापुढे वाटतात आम्हाला
चंद्र सूर्यही छोटे !!

सर्वसामान्यांचे तुम्ही तारणहार
संविधानाचे तुम्ही शिल्पकार !
दुःखी पीडितांचा एकमेव आधार
ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर !!

जातीभेदाची भिंत तोडली
अनियतिशी नियतीची युद्ध लढली !
बाबासाहेब तुम्ही होता,
म्हणूनच क्रांती घडली !!

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कविता मराठी | Dr Babasaheb Ambedkar Kavita In Marathi – कविता क्र.05

शोधलं अनेकांनी
त्याला बौद्ध विहारात
तो कोणालाच भेटला नाही

शोधलं अनेकांनी
निर्जीव पुतळ्यात
तो कोणालाच भेटला नाही

डिजेवरती वाजवली गेली
थयथयाट करणारी गाणी
विचार त्या घटनाकाराचा
कोणाला पटलाच नाही

आपटली कित्येकांनी डोकी
मिरवणुकीत नाचले तुफानी
चोरून दारू पिऊन, दिल्या घोषणा
महापुरुषांचा विजय असो अशा

लाखोंचा खर्च केला
जयंतीवरती दिलखुलास
शिकून संघटित होऊन
संघर्ष करण्याचा विचार
जयंतीतून दिसलाच नाही

शोधनं चालू आहे त्याला
14 एप्रिल जवळ आली आहे म्हणून
प्रत्येकाच्या मोबाईलवर स्टेटस ठेवण्यासाठी

फेसबुकवर वाजवली
जातील गाणी दणक्यात
टिकटॉक वरून पाजलं
जाईल ज्ञान भारताला
तो भीमराव कसा होता याचं

शोधलं जाईल त्याला मूर्तीमध्ये
पूजले जातील निर्जीव
पुतळे एका दिवसा पुरते

काचेच्या तस्विरींना घातले
जातील महागडे हार
पेहराव प्रत्येकाचा निळे फेटे
आणि सदरे एकदम डौलात
छाती वरती जय भीम बिल्ला
मिरवला जाईल थाटात

दिखाऊपणामुळे फक्त
महापुरुषांचे भक्त व्हाल
विचारांना लाथाडून
नकली अनुयायी बनाल

भीमराव न वाचता
आचरणात न दिसता
घ्याल भिमाचं नाव
छाताड फुटेपर्यंत
व्हाल चळवळीतील गद्दार

दिसला ना मजला पुतळ्यात भीम
दिसला ना मजला तस्वीरीत भीम
दिसला ना मजला पुतळ्यात भीम
दिसला ना मजला तस्वीरित भीम
ते भीम तत्व शोधलं मनातून
पुस्तक वाचून, ज्ञान ग्रहण करून

समता स्वातंत्र्य आणि
बंधुत्व पेरणे या
विचारातच समजला
आजन्म दिसतो भीम

परिवर्तन होत नसतं नुसतच नाचून
यंदा भिमाची जयंती साजरी करूयात
घरात पुस्तके वाचून
घरात पुस्तके वाचून

डॉ बाबासाहेब आंबेडकर कविता मराठी | Dr Babasaheb Ambedkar Poem – कविता क्र.06

अंधारच होता नशिबी ज्यांच्या
त्यांना प्रकाशाचं दान दिलं

तुमचे मानावे किती उपकार
साहेब तुम्ही संविधान दिलं

ज्योतिबांची विचारधारा टिकण्यासाठी
निरक्षरतेचे कलंक पुसण्यासाठी
तुम्ही वेचलं आयुष्य
सामान्यांच्या सुखासाठी

आज स्वातंत्र्यात जगतो आम्ही
बाबासाहेबांना स्मरतो आम्ही
शाहू, फुलेंच्या विचारांना
ओंजळीत या धरतो आम्ही

जरी वेगळ्या भाषा असल्या
तरी एकता कायम आहे
कारण तुम्ही दिलेल्या संविधानात
समानतेचा नियम आहे

हा सलोखा, ही बंधुता,
राष्ट्रभावना वाढत जाईल
रोज पहाटे सूर्य दिसला की,
तुमची आठवण येत राहील

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कविता मराठी | Dr Babasaheb Ambedkar Kavita In Marathi 2023 – कविता क्र.07

आमच्या बापाने संविधान लिहिलं
म्हणनाऱ्यानी…
सांगा संविधान कधी वाचलं का?
वाचनं दूरच राहिलं
किमान घरात तरी दिसलं का?

बंगल्यात भलामोठा भीमाचा, बुद्धाचा फोटो लावणाऱ्यांनी…
तथागत बुद्धांचा तत्त्वज्ञान कधी पाळलं का?
खितपत पडलेल्या समाजाकडे
लक्ष कोणाचं वळलं का?

बाबासाहेबांचा विजय असो अशी घोषणा
देणाऱ्यांनी
आणि मीच नेता अशी म्हणून लाल
करणाऱ्यांनी
समाजाची प्रगती कधी केली का?

समाजात स्वतःला बुद्धिमान समजणारे
डॉक्टर, वकील, प्राध्यापक आणि शिकलेले सारे
न्याय हक्कांसाठी रस्त्यावर कधी दिसले का?

भीम मनाला धोका दिला शिकलेल्यांनी
यावर कधी शिकलेले विचार करत बसले का?
कायदा आमच्या बापाने लिहिला म्हणणाऱ्यांनी
सांगा, संविधान कधी वाचलं का?

गाडी, बंगला, पैसा, अडका असणाऱ्या
सावित्रीच्या लेकींनी गरिबांच्या पोरांना
शिकवण्यासाठी हात कधी धरला का?
कायदा आमच्या बापाने लिहिला म्हणणाऱ्यांनी
सांगा संविधान कधी वाचलं का?

सारांश | Dr Babasaheb Ambedkar Kavita In Marathi 2023 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर कविता मराठी

मित्रांनो वरील लेखात आपण बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 07+ अतिशय सुंदर कविता बघितल्या. आम्हाला आशाच नाही तर खात्री आहे की आपल्याला वरील कविता नक्की आवडल्या असतील. 14 एप्रिल हा दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो.

मित्रांनो आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा मार्गदर्शन असेल तर ही कळवा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कविता मराठी (07+ अतिशय सुंदर कविता) | Dr Babasaheb Ambedkar Kavita In Marathi 2023 | Dr Babasaheb Ambedkar Jayanti Kavita In Marathi | डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कविता मराठी | Dr Babasaheb Ambedkar Kavita In Marathi 2023 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कविता मराठी | Dr Babasaheb Ambedkar Poem In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कविता मराठी | Dr Babasaheb Ambedkar Jayanti Kavita In Marathi

1 thought on “डॉ. बाबासाहेब आंबेडकर कविता मराठी (07+ अतिशय सुंदर कविता) | Dr Babasaheb Ambedkar Kavita In Marathi 2023 | Dr Babasaheb Ambedkar Jayanti Kavita In Marathi 2023”

  1. खूपच छान कविता आहेत.
    अशाच कविता हव्यात जे समाजामध्ये परिवर्तन करण्याकरिता नव चैतन्य निर्माण करेल.

Leave a Comment