महात्मा फुले कविता मराठी (07+ अतिशय सुंदर कविता)| Mahatma Phule Kavita in Marathi 2023 | Mahatma Jyotiba Phule Kavita in Marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Mahatma Phule Kavita in Marathi 2023 | महात्मा फुले कविता मराठी – नमस्कार मित्रांनो, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या थोर समाज कार्याला वंदन करून मी या लेखाला सुरुवात करतो. खरतर त्यांच्या बलिदानासमोर हा माझा लेख काहीच नाही. 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती आहे.

आज आपण या लेखात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी 07+ अतिशय सुंदर कविता मराठी मध्ये बघणार आहोत. त्यांच्या जयंती निमित्त भाषण करताना तुम्हाला या कवितांचा नक्कीच फायदा होईल. याची मला खात्री आहे. या लेखातील सर्व कविता खूप छान आहेत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

महात्मा ज्योतिबा फुले कविता मराठी | Mahatma Jyotiba Phule Kavita in Marathi – कविता क्र.01

क्रांतीसुर्य महात्मा फुले

शोधून समाधी शिवरायांची,
केला तिचा जीर्णोद्धार !
महाराष्ट्राच्या मावळ्यांनो,
उपकार कसे त्यांचे विसराल !!

रचला पोवाडा शिवरायांवर,
पोहोचवला इतिहास घरोघरी !
कुळवाडी भूषण म्हणून महात्मा फुले,
शिवरायांचा उल्लेख करी !!

असता विरोध समाजाचा,
समाजासाठीच ते लढले !
समाजहिताचा विडा उचलून,
अखंड आयुष्य झटले !!

स्त्रियांची पाहून अवस्था दयनीय,
हृदयाला त्यांच्या पडले तडे !
बदलाया परिस्थिती ही,
ज्योतिबा समाजाशी लढले !!

स्त्रीला नव्हता अधिकार शिक्षणाचा,
शिक्षणाचे दरवाजे त्यांनी उघडले,
फेकत असता लोक चिखल,
त्यांच्यावर राग मनात न धरला,
अभिमानाने जगण्याचा अधिकार,
स्त्रियांना मिळवून दिला !!

सती जाणे प्रथा ही अनिष्ट,
बंद केली तिला !
स्त्री ही लक्ष्मी आहे घरातली,
हा दर्जा मिळवून दिला !!

सत्यशोधक समाज स्थापून,
जागं केलं लोकांना !
अंधश्रद्धेला बळी न पडू,
दिले त्यांनी समाजाला !!

महात्मा, समाजसुधारक, क्रांतीसुर्य
पदवी शोभे तुम्हाला !
कार्य आपले तरुणाईसाठी,
प्रेरणाच म्हणा !!
भटकता मार्ग आयुष्यात तरुणांनो
महात्मा फुलेंना आठवा..!
महात्मा फुलेंना आठवा..!

महात्मा ज्योतिबा फुले कविता मराठी | Mahatma Jyotiba Phule Poem in Marathi – कविता क्र.02

मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतो…

माझ्या मनातील भावना मीच खोलतो !
मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतो !!

सर्वांना द्या शिक्षणाचा अधिकार !
तरच होईल समाजात सुधार !!
समाज शिकला तरच देश,
प्रगतीच्या मार्गावर चालतो !
मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतो !!

माणसांनो माणसाचा करा आदर !
संकटकाळी द्या एकमेकास आधार !!
देवरूपी तोच जो संकटकाळी
पिढीतांचा हात धरतो !
मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतो !!

नका करू कुणाचा द्वेष अन राग !
सर्व मानवाचा निर्माता आहे एक !!
एकमेकांस करा सहाय्य ही
मी तुम्हा साद घालतो !
मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतो !!

माझ्या मनातील भावना मीच खोलतो !
मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतो !!

महात्मा ज्योतिराव फुले कविता मराठी | Mahatma Jyotirav Phule Kavita in Marathi – कविता क्र.03

ज्यांच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले !
तो ज्ञानाचा दाता महात्मा ज्योतिबा फुले !!

होता स्वातंत्र्य पूर्वीचा तो काळ !
महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार !!
त्यांच्यासाठी केले त्यांनी ज्ञानाचे द्वार खुले !
तो ज्ञानाचा दाता महात्मा ज्योतिबा फुले !!

शेतकऱ्यांचा जाणता नेता !
दिन दुबळ्यांचा तारण हारता !!
समाज हितास ज्यांनी आपुले जीवन वाहिले !
तो ज्ञानाचा दाता महात्मा ज्योतिबा फुले !!

अंधारमय जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती !
सावित्रीबाई ज्योतिबाची काय वर्णावी कीर्ती !!
नावच त्यांचे या जगती सदैव अमर झाले !!
तो ज्ञानाचा दाता महात्मा ज्योतिबा फुले !!

ज्यांच्यामुळे शिकली दिन डोळ्यांची मुले !
तो ज्ञानाचा रे दाता महात्मा ज्योतिबा फुले !!

महात्मा ज्योतिबा फुले कविता | Mahatma Jyotiba Phule Kavita – कविता क्र.04

ज्योतीने ज्योत लावली…

ज्योतीने ज्योत लावली,
बहुजनास ती भावली !
शिक्षणाच्या रोपट्याने,
दिली आम्हास सावली !!

विकासाची वाट दावली,
गंगा विद्येची धावली !
ज्योतीच्या प्रकाशाने,
पळे कर्मकांडांची सावली !!

सावित्रीची कृपा जाहली,
ज्योत मशालीत पाहिली !
शिक्षणाच्या प्रवाहात,
बहुजन शोषित न्हाहली !!

ज्योतीने ज्योत लावली,
बहुजनास ती भावली !
शिक्षणाच्या रोपट्याने,
दिली आम्हास सावली !!

महात्मा ज्योतिबा फुले कविता मराठी | Mahatma Jyotiba Phule Kavita in Marathi – कविता क्र.05

ज्योती नि सावित्री
आमुचे मायबाप…
आमुच्याचसाठी त्यांनी
घेतला जीवनभर ताप…

गुलामीत होते जिने,
जणू गळ्याभोवती होता साप…
जीवन ते कसले,
होता परंपरेचा फास…

दिवसभर राबने,
पोटी न होता परिपूर्ण घास…
रक्त शोषित होता आपुलाच,
जणू असावा न उडणारा डास…

निर्मिती ते अंत,
समाजाचे होतो आम्ही दास…
शिक्षणाची लावून ज्योत,
ज्योतीने मिटविला आमुचा त्रास…

ज्योती नि सावित्री
आहे आमुचे मायबाप…
आहे आमुचे मायबाप…

महात्मा ज्योतिबा फुले कविता मराठी | Mahatma Jyotiba Phule Kavita in Marathi – कविता क्र.06

ज्योतिबा तुम्ही आमच्या,
सावित्री आईला सर्वप्रथम शिकवलं !
स्त्री सुद्धा ज्ञान देऊ शकते,
हे सिद्ध करून दाखवीलं !!

जीवनात प्रत्येक संकट,
झेललं तुम्ही निधड्या छातीनं !
तुम्ही प्रेरित होता,
शिवबांच्या महाराष्ट्राच्या मातीन !!

रस्त्यावर चालण्याचाही,
अधिकार नव्हता ज्यांना !
तुम्ही पाण्याचा हौद,
खुला करून दिला त्यांना !!

जातीभेद नष्ट करण्यासाठी,
सर्व समाज एकत्र केला !
त्यासाठी मुलाचा आंतरजातीय,
विवाह सिद्धीस नेला !!

अन्यायाच्या अंधारामध्ये,
क्रांतीचा सूर्य उदयास आला !
असामान्य कर्तुत्वानेच,
ज्योतिबा तुम्ही महात्मा झालात !!

महात्मा फुले कविता मराठी | Mahatma Phule Poem in Marathi – कविता क्र.07

शिका शिका रे…

शिका शिका रे सांगून गेले
आम्हा महात्मा फुले
किती साहिले बोल जणांचे
किती सोसले कष्ट
स्वतः शिकले ज्ञानी बनले
झाले अचंबित दृष्ट
शिक्षणाने घडतो माणूस
पुन्हा पुन्हा बोलले

दिन पीडितांचे ते कैवारी
अन् शेतकऱ्यांचे मित्र
त्यांच्या न्याय हक्कासाठी
लढले ते अहोरात्र
काढून शाळा मुलींसाठी
शिक्षण केले खुले

शिकवून आपल्या पत्नीस केले
पहिल्या स्त्री शिक्षिका
त्याही खपल्या समाजाप्रती
बनल्या स्त्री रक्षिका
कितीही अडथळे आले
तरी ते नाही डगमगले

घेऊन दप्तर, पाटी पुस्तक
चला शाळेला चला
आपण घडवू नशीब आपले
घडवू या राष्ट्राला
ज्ञानवंत व्हा कीर्तीवंत व्हा
हे ब्रीदवाक्य खरे आपुले

सारांश | महात्मा फुले कविता मराठी | Mahatma Phule Kavita in Marathi

मित्रांनो वरील लेखात आपण महात्मा फुले यांच्या वर कविता मराठी मध्ये बघितल्या. वरील लेखात आपण महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त 07+ अतिशय सुंदर कविता मराठी मध्ये बघितल्या. आम्हाला अशा नाही तर खात्री आहे की आपल्याला वरील ह्या कविता नक्की आवडल्या असतील.

मित्रांनो आपल्याला आमचा हा छोटासा प्रपंच कसा वाटला आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही विचार किवा मार्गदर्शन असेल तर ते ही कळवा. हा लेख आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

1 thought on “महात्मा फुले कविता मराठी (07+ अतिशय सुंदर कविता)| Mahatma Phule Kavita in Marathi 2023 | Mahatma Jyotiba Phule Kavita in Marathi”

Leave a Comment