डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चारोळी मराठी & हिंदी (500+ अतिशय सुंदर) | Dr Babasaheb Ambedkar Charoli in Marathi & Hindi 2023 | बाबासाहेब आंबेडकर चारोळी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

Dr Babasaheb Ambedkar Charoli in Marathi & Hindi 2023 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चारोळी मराठी & हिंदी – नमस्कार मित्रांनो, जय भीम! प्रथम आपणास व आपल्या परिवारास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 14 एप्रिल म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस होय. हा दिवस आपण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतो. या दिवशी आपण एकमेकांना शुभेच्छा देतो.

14 एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंती निमित्त भाषण देताना जर आपल्याला श्रोत्यांची मने जिंकायची असतील तर चारोळी शिवाय पर्याय नाही. म्हणून आज आपण या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त चारोळ्या मराठी मध्ये बघणार आहोत. या लेखात आपण 500+ अतिशय सुंदर आणि जबरदस्त चारोळी मराठी आणि हिंदी भाषेत बघणार आहोत. चला तर मित्रांनो सुरुवात करुया.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चारोळ्या मराठी | Dr. Babasaheb Ambedkar Charolya in Marathi

सर्वसामान्यांचे आधार,
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार…
ज्या ज्ञानसूर्याने दूर केला,
दिन-दलितांच्या जीवनातील अंधार…
अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना,
वंदन करतो मी त्रिवार…

संविधानाचा उघडूनी पत्ता !
जातीवाद्यांची उलथवली सत्ता !!
जातीभेद मिटवीला लेखणीच्या पातीवर !
माझ्या भिमाचे नाव मी कोरले माझ्या छातीवर !!

बुद्धांसारखं होतं ज्ञान !
देऊन गेले संविधान !!
मिळवून दिले समाजात स्थान !
बाबासाहेब आमचे प्राण !!

अंधार दाटला फार
आता दिवा पाहिजे !
नव्या या युगात सूर्य
नवा पाहिजे !!
जातीपातीत विखुरलेल्या
या मायभुमीला !
पुन्हा एकदा भिमाईचा
भिवा पाहिजे !!

आमच्या डोक्यावर ना कोण्या
आमदाराचा हात आहे,
ना कोण्या खासदाराचा हात आहे,
पण ज्याचा हात आहे,
तो सगळ्यांचा बाप आहे…

चवदार तळ्याचे पाणी
ज्याने चवदार केलं !
पशुसारखं जगणाऱ्यांना
ज्यांनी माणसात नेलं !!
ज्ञानसूर्य, भारतरत्न
भिमराय माझा
पहा आभाळापार गेला !
त्याचा माणुसकीचा वेलं !!

तू देव नव्हतास…
तू देवदूतही नव्हतास…
तू मानवतेची पूजा करणारा,
खरा महामानव होतास…

शिल्पकार तुम्ही घटनेचे,
पंडित तुम्ही कायद्याचे !
प्रचारक तुम्ही समतेचे,
भारतरत्न तुम्ही देशाचे !!

नमन त्या पराक्रमाला,
नमन त्या देश प्रेमाला,
नमन त्या ज्ञान सूर्याला,
नमन त्या महापुरुषाला,
नमन त्या बाबासाहेबांना.!

चुकीच्या निर्णयाविरोधात बंड करण्याची
हिम्मत ज्यांच्यात असते !
स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची
धमक त्यांच्यात असते !!
समूहात वेगळं पडण्याचं फक्त
त्यांनाच भय असते !
ज्यांना गुलाम म्हणून
जगण्याची सवय असते !!

फुलांची कहाणी वसंताने लिहिली…
रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली…
आम्ही नाही कोणाचे गुलाम
कारण आमच्या आयुष्याची कहाणी,
डॉ. बाबासाहेबांनी लिहिली..!

करून गेला तो भीम होता !
लढून गेला तो भीम होता !!
आम्ही फक्त पुस्तकातून
वाचला आहे इतिहास !
पुस्तक वाचून इतिहास
घडवून गेला तो भीम होता !!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चारोळी मराठी | Dr. Babasaheb Ambedkar Charoli in Marathi

सागराचे पाणी कधी आटणार नाही !
सूर्याचे तेज कधी मिटणार नाही !!
एकच काय हजार जन्म झाले तरी !
बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही !!

नजाऱ्यात पाहिले नजारे,
असा नजारा नाही पाहिला…
जेव्हा मी आकाशात पाहिले,
भीमा सारखा तारा नाही पाहिला…

किती आले आणि किती गेले !
सांगा कुणाच्या लक्षात राहिले !!
डॉ. आंबेडकर असे एक नेते झाले !
ज्यांनी लोकांच्या हृदयावर राज्य केले !!

लिहूनिया रे भारतीय संविधान !
भीमरावाने केले कार्य महान !!
सारा देशच चाले आज त्यांच्याच नियमानं !
माणसाला माणुसकी शिकवली भिमान !!

ज्ञानियांचा तो ज्ञानी, ज्ञानवंतांचा
मुकुटमणी शोभला खरा !
या भारत भूमीवर डॉ. आंबेडकर
जन्मले कोहिनूर हिरा !!

अमोघ वाणी आणि प्रचंड विद्वत्ता !
जगी झाले ते एकमेवाद्वितीय नेता !!

संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांना माझे शत शत नमन,
त्यांच्या विचारांचे आपण
करूयात जतन..!

होता सिंहासारखा बाबा आमचा
नव्हती त्याला कोणाची भीती !
अरे होऊन गेले वर्षे जरी ही किती
आजही बोलावते आम्हाला,
ती चैत्यभूमीची माती !!

असा मोहरा झाला नाही,
पुढे न होणार…
भीमरावांचे नाव,
सतत गर्जत राहणार…

आले किती गेले किती,
उडून गेले भरारा,
संपला नाही आणि संपणार नाही,
माझ्या भिमाचा दरारा..!

भारतरत्न बाबासाहेबांचे,
कर्तुत्व आहे महान !
त्यांच्यापुढे वाटतात,
चंद्र – सूर्यही लहान !!

करून जीवाचे रान,
दिला सर्वांना समतेचा मान,
अशी भीमरावांची शान,
भल्या भल्यांची झुकते मान..!

संविधान असे लिहिले की,
सूर्य चंद्र असेपर्यंत मिटणार नाही !
ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे,
या जन्मात फिटणार नाही..!

बाबासाहेब आंबेडकर चारोळ्या मराठी | Babasaheb Ambedkar Charolya in Marathi

मोजू तरी कशी उंची,
तुझ्या कर्तुत्वाची,
तू जगाला शिकवली व्याख्या,
माणसातल्या माणुसकीची..!

दलितांची तलवार होऊन गेले…
अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले…
होते ते एक गरीबच,
पण या जगाचा “कोहिनूर” होऊन गेले…
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा,
भारताचे संविधान लिहून गेले…

दलितांचे तुम्ही तलवार होऊन गेलात,
अन्यायाविरुद्ध प्रहार करूनी गेलात,
होता तुम्ही गरीबच मात्र या,
जगाचा कोहिनूर होऊन गेलात .!

मोजू तरी कशी उंची,
तुमच्या कर्तुत्वाची !
तुम्ही जगाला शिकवली,
व्याख्या माणुसकीची !!

ज्यांच्यामुळे लाखो घरांचा
उद्धार झाला…
दीन-दुबळ्यांना जगण्याचा
अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या
महामानवाला…
ज्यांनी संविधानरूपी समतेचा
अधिकार दिला..!

मान वर करून जगायला शिकवले…
अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले…
शिक्षणाचे महत्त्व समाजाला समजावले…
अशा महामानव बाबासाहेबांना,
शत – शत नमन !!

दलितांचे कैवारी तुम्ही…
गोरगरिबांचे उद्धारक तुम्ही…
बाबासाहेब तुमच्या कर्तुत्वामुळे,
सर्वांना मिळाली जगण्याची हमी…

करून जीवाचे रान…
दिला सर्वांना समतेचा मान…
अशी भीमरावांची शान…
लिहिले भारताचे संविधान…

माझ्या भिमाने डोळे उघडले,
प्रत्येक जण मानव झाला…
माझ्या भिमाने पुस्तक उघडले,
प्रत्येक जण विद्वान झाला…
माझ्या भिमाने लेखणी उचलली,
आणि देशाचे संविधान तयार झालं…

अंधार होता ज्यांच्या नशिबी,
त्यांना प्रकाशाचे दान दिलं…
तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब,
तुम्हीच देशाला संविधान दिलं…

एक थेंब होतो आम्ही,
आम्हाला समुद्र बनवलं…
अधिकार दिला आम्हाला,
आमचं नशीब घडवलं…
पायाची धूळ होतो आम्ही,
आंबेडकरांनी आम्हाला आकाश बनवलं…

बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार !
तुम्हीच महामानव जनतेचा आधार !!
दुःखी पीडितांचे तारणहार !!

जातिभेदाची भिंत तोडली…
अनियतिशी नियतीची युद्ध लढली…
बाबासाहेब तुम्ही होता,
म्हणूनच क्रांती घडली…

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चारोळ्या | Dr. Babasaheb Ambedkar Charolya

आमच्या स्वातंत्र्याची कहाणी लिहिली भिमाने,
आनंदाने सजवला आमचा संसार भिमाने,
भिमाने केलं आम्हाला बलवान,
नव्या युगाची दिली आम्हाला जाण.!

धगधगत्या सूर्या परी प्रकाश दिला !
आपल्या तेजाने देश प्रकाशमय केला !!
गोरगरिबांना अधिकार मिळवून दिला !
06 डिसेंबर 1956 रोजी हा ज्ञानसूर्य
आपल्याला सोडून गेला !!

इथे फक्त नावासाठी देव किती झाले,
पण एका भिमामुळे आम्ही आज मानव झालो !
ज्यांना चालणं आणि सांभाळणं लक्षात नव्हतं,
आज धुळीतून उभ राहून आकाश झाले !!

हे भीम बाबा आम्हाला वाचवलंत तुम्ही
या निष्ठूर जगाने आम्हाला टाकलं,
पण तुम्ही आम्हाला जवळ केलं !

ममता, करुणा आणि समता
आहे ज्यांचा आधार…
आमच्या जीवनात
बाबासाहेबांनी आणली बहार…

भीमाने आपल्याला शक्तिमान बनवलं…
जी हटवता येणार नाही अशी शक्ती बनवलं…
नव्या युगातील ओळख आम्हाला बनवलं…
आणि एका हवेच्या झुळकेला वादळ बनवलं…

हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा वेग होता…
अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा
इरादा नेक होता…!
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाहीतर जगात एक होता…!

होते अंधारलेले जीवन,
दिसत नव्हता प्रकाशाचा किरण…
पुसण्या त्यांचे अश्रू,
देण्या दीन-दलितांना नवसंजीवन…
अवतरला एक महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव…

आभाळ मोजतो आज आम्ही,
भीमा तुझ्यामुळे…
वादळही रोखतो आज आम्ही,
भिमा तुझ्यामुळे…
बंदुक, तोफा, शस्त्रसाठा,
याची आम्हा गरजच नाही…
कारण शब्दानेच रान पेटवतो आम्ही,
भीमा फक्त तुझ्यामुळे…

जन्म घेतला दिन-दलितांचा उद्धार कराया,
संविधान निर्मितीचे देदीप्यमान कार्य कराया,
झोपेत असलेल्या समाजास,
जगण्याचा अधिकार द्यावया,
शतशः नमन करतो मी तुजला भीमराया..!

कोणालाही जमणार नाही,
अशी क्रांती करून दावली…
जातीयवादाला देऊन टक्कर,
चवदार ओंजळ भरून दावली…
निसर्ग नियमाप्रमाणे,
पाणी आग विझवते…
पण.. माझ्या भिमाने तर…
पाण्यालाच आग लावली…

सजली अवघी धरती,
पाहण्या तुमची कीर्ती,
तुम्ही येणार म्हटल्याने,
नसानसात भरली स्फूर्ती,
आतुरता फक्त आगमनाची,
जयंती भिमराव बाबांची..!

कपटनीतीच्या शकुनीचा,
डाव जे मांडत आहे,
म्हणून आज बुद्धाच्या धरतीवर,
रक्त हे सांडत आहे,
जे विसरले बुद्धाला,
आपसात भांडत आहे,
जे नमले बुद्धाचरणी,
आज सुखात नांदत आहे.

हजारो वेळा चंद्र सूर्य निघाले पण,
प्रकाशाचा अर्थ कळला नव्हता.
जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जन्मालाच आले नसते तर,
जगण्याचा अर्थ आजही कळला नसता…

ओम बोलल्याने मनाला शांती मिळते,
साई बोलल्याने मनाला शांती मिळते,
राम बोलल्याने पापापासून मुक्ती मिळते,
आणि जय भीम बोलल्याने,
माणसाला माणुसकी कळते.

ध्येय मार्गावरील वादळ,
आपल्या ज्ञानाने केले निष्फळ,
मनी निश्चयाचे बळ,
विचारांनी होते अढळ,
त्यातूनच उभी राहिली,
दिन दलितांची चळवळ…

जाती भेदाची भिंत तोडली…
अनियतिशी युद्ध लढली…
बाबासाहेब तुम्ही होता,
म्हणूनच ही क्रांती घडली…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चारोळी हिंदी | Dr. Babasaheb Ambedkar Charoli in Hindi

कर गुजर गये वो भीम थे,
दुनिया को जगाने वाले भीम थे,
हमने तो सिर्फ इतिहास पढा है यारो,
इतिहास बनाने वाले मेरे भीम थे।

देश के लिये जिन्हो ने
विलास को ठुकराया था।
गीरे हुये को जिन्होंने
स्वाभिमान सिखाया था।
जिसने हम सबको तूफानों से
टकराना सिखाया था।
देश का वो था अनमोल दिपक
जो बाबा साहब कहलाया था।

गरज उठे गगन सारा,
समुन्दर छोडें आपना कीनारा,
हिल जाए जहान सारा,
जब गूंजे “जय भीम” का नारा।

रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है!
ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है!
औरो को जो मिला है वो मुकदर से मिला है!
हमें तो मुकदर भी तेरे संविधान से मिला है!

ना जिंदगी की खुशी
ना मौत का गम !
जब तक है..दम…
जय भीम कहेंगे हम.!!

आज हम उनकी बातो को
आज दिल से अपनायेंगे,
चलो आज हम सब मिलकर
आंबेडकर जयंती मनायेंगे!

नींद खोयी अपनी
बाबा साहेब आपने
हम रोते हों को
हंसाया बाबा आपने
कभी न भूलेंगे हम
अपने बाबा साहेब को
कहता है जमाना
बाबा साहेब आंबेडकर जिनको

ममता,करणा और समता
जिसका है आधार !
हमारी उजाड़ी जिन्दगी में,
ला दी बाबा साहेब ने बहार !!
हमारी आजादी की कहानी,
लिखी हमारे भीम ने !
खुशियों भरा सजाया,
हमारा संसार भीम ने !!

नज़ारे देखे हमने हजारों
देखा न कभी ऐसा नजारा
आसमां में देखे सितारे बहुत
पर भीम जैसा सितारा न देखा

भीम जी ने हमे बलवान बना डाला है
हटा ना पाये वो चट्टान बना डाला है
नये युग की हमे पहचान बना डाला है
और हवा के ये झोके को तुफान बना डाला है.।

जब भीम थे चलते तो हजारों दिल मचलते
भीम जब रुकते तो तूफ़ान है रुक जाते
इतने काबिल थे बाबा की कभी इरादा न बदला
बाबा भीम ने तो सारा इतिहास बदल डाला

देश प्रेम में जिसने,
आराम को ठुकराया था !
गिरे हुए इंसान को,
स्वाभिमान सिखाया था !!
जिसने हमको मुश्किलों से,
लड़ना सिखाया था !
इस आसमां पर ऐसा इक दीपक,
बाबा साहेब कहलाया था !!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शायरी हिंदी | Dr. Babasaheb Ambedkar Shayari in Hindi

फूलो की कहानी बहारो ने लिखी…
रातो की कहानी सितारों ने लिखी…
हम नहीं है किसी के गुलाम…
क्योंकि हमारी जिंदगी,
बाबासाहब जी ने लिखी!!
जय भिम !

नजारों मे नजारा देखा
एसा नजारा नही देखा,
आसमान मे जब भी देखा
मेरे भीम जैसा सितारा नही देखा।

है ये सारा जहाँ जिनकी शरण में
हमारा है नमन उन बाबा के चरण में
है पूजा के योग्य बाबा हम सबकी नजर में
आप मिलकर फूल बरसायें बाबा के चरण में.

सारांश | डॉ. बाबासाहेब आंबेडकर चारोळी मराठी | Dr Babasaheb Ambedkar Charoli in Marathi

मित्रांनो वरील लेखात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चारोळी बघितल्या. या चारोळ्या आपण बाबासाहेबांच्या जयंती निमित्त किंवा पुण्यतिथी निमित्त भाषण देताना वापरू शकता. आणि आपल्या भाषणाने श्रोत्यांची मने जिंकू शकता. वरील लेखात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी 500+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज चारोळ्या मराठी आणि हिंदी भाषेत बघितल्या.

या चारोळी बाबासाहेबांच्या जयंती निमित्त भाषण आणि सूत्रसंचालन करताना आपल्याला खूप उपयुक्त ठरतील. माझ्या भीम सैनिकांनो, आपल्याला आमचा हा छोटासा प्रपंच कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपल्या गरजू विद्यार्थांना आणि मित्रांना हा लेख जरूर शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Dr Babasaheb Ambedkar Charoli in Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चारोळी मराठी | Dr. Babasaheb Ambedkar Charolya in Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर चारोळ्या मराठी | डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चारोळ्या

Dr Babasaheb Ambedkar Charoli in Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चारोळी मराठी | Dr. Babasaheb Ambedkar Charolya in Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर चारोळ्या मराठी | डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चारोळ्या

Dr Babasaheb Ambedkar Charoli in Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चारोळी मराठी | Dr. Babasaheb Ambedkar Charolya in Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर चारोळ्या मराठी | डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चारोळ्या

Leave a Comment