माझी शाळा कविता मराठी (05+ अतिशय सुंदर कविता) | My School Poem in Marathi 2023 | Mazi Shala Kavita Marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

My School Poem in Marathi 2023 | माझी शाळा कविता मराठी – नमस्कार मित्रांनो, शाळा म्हणजे विद्येचे माहेर घर होय. आपल्या आयुष्यात आणि आपल्याला घडविण्यात शाळेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे आज आम्ही आपल्यासाठी माझी शाळा या विषयावर 05+ अतिशय सुंदर कविता घेऊन आलो आहोत.

या कविता आपल्याला शाळेत किंवा इतर ठिकाणी भाषण देताना किंवा सूत्रसंचालन करताना खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता कवितेला सुरुवात करुया.

माझी शाळा कविता मराठी | My School Poem in Marathi – कविता क्र.01

-// शाळा माझी सुंदर आहे //-

पाटी पुस्तक दप्तर आहे,
शाळा माझी सुंदर आहे !

मानवतेच्या संस्काराचा,
परिपाठातून जागर आहे,
पाटी पुस्तक दप्तर आहे,
शाळा माझी सुंदर आहे !

मोठ्या बाई प्रेमळ आमच्या,
ओठी त्यांच्या साखर आहे,
कुणी विचारो, प्रश्न कितीही,
साधे सोपे उत्तर आहे,
पाटी पुस्तक दप्तर आहे,
शाळा माझी सुंदर आहे !

वर्ग शिक्षिका आई सम त्या,
नाही कुठले अंतर आहे,
सर आमचे पण शिस्त लाविती,
त्यांच्या विषयी आदर आहे,
पाटी पुस्तक दप्तर आहे,
शाळा माझी सुंदर आहे !

कवायतीची शिस्त जणू की,
कुणा वाटते लष्कर आहे,
जिवलग येथे किती मिळाले,
गौतम, अकबर, शंकर आहे,
पाटी पुस्तक दप्तर आहे,
शाळा माझी सुंदर आहे !

संगणकावर शिकतो आता,
प्रोजेक्टर चा वापर आहे,
गणिते करतो, कविता म्हणतो,
सुंदर बनले अक्षर आहे,
पाटी पुस्तक दप्तर आहे,
शाळा माझी सुंदर आहे !

निकाल आमचा अभिमानाचा,
शंभर पैकी शंभर आहे,
पाटी पुस्तक दप्तर आहे,
शाळा माझी सुंदर आहे !

-: समाप्त :-

माझी शाळा कविता मराठी | My School Poem in Marathi – कविता क्र.02

// आमची शाळा //

श्री गणेशा जिथे गिरविला,
बे चा पाढा जिथे शिकविला,
जिथे विद्येचा अर्थ समजला,
तिच आमची शाळा !!

जिथे ज्ञानाची भूक भागली,
अभ्यासाची गोडी लागली,
जिथे यशाची चव चाखली,
तिच आमची शाळा !!

शिक्षक आम्हा असे लाभले,
ज्यांनी आमुची हित जाणले,
अशक्य जेथे शक्य बनले,
तिच आमची शाळा !!

जिथे स्वप्नांना पंख फुटले,
जिथे प्रगतीचे मार्ग सुचले,
भविष्य जेथे उज्वल घडले,
तिच आमची शाळा !!

वर्षा मागून वर्ष सरतील,
दूर दूर विद्यार्थी जातील,
तरी मनी ते तिलाच स्मरतील,
तीच आमची शाळा !!
कविश

-: समाप्त :-

माझी शाळा कविता मराठी | My School Poem in Marathi – कविता क्र.03

// शाळा //

ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा
संस्काराचा गोड झरा म्हणजे शाळा
व्यक्तिमत्व विकासाचे वेगळे वेळान म्हणजे शाळा
मौजमस्तीचा वेगळाच थाट म्हणजे शाळा

कोपऱ्यातील प्रयोगशाळा आणि
ग्रंथालय म्हणजे शाळा
रोजचा रंगीत फळा म्हणजे शाळा
एक ठोका, दोन ठोके तर
टन टन वाजणारी घंटा म्हणजे शाळा
मैत्री आणि भांडणाची जोड म्हणजे शाळा

सकाळची प्रार्थना आणि दुपारचा भात म्हणजे शाळा
पाठीवर दप्तर आणि अंगात गणवेश म्हणजे शाळा
प्रत्येक विषयाचा एक नवा अंदाज म्हणजे शाळा
शिक्षकाच्या हातातील छडी म्हणजे शाळा

उत्तुंग जगाकडे बघणारी
केविलवाणी नजर म्हणजे शाळा
उरात साठवलेली असंख्य स्वप्न म्हणजे शाळा
आयुष्याच्या वळणावरच गोड स्वप्न म्हणजे शाळा
अशी माझी शाळा, अशी माझी शाळा !

-: समाप्त :-

माझी शाळा कविता मराठी | Mazi Shala Kavita in Marathi – कविता क्र.04

महती जिची गाता गाता,
शब्दही अपुरे पडतील,
अशी माझी शाळा !

इथेच शिकलो, इथेच वाढलो,
खेळलो, बागडलो इथेच,
हरून पुन्हा जिंकलो !

लहान मोठे कोणी नव्हते,
घराप्रमाणे भासत असते,
सर्व वाटतात भावंडे,
शिक्षक मातापिता प्रमाणे

विविध स्पर्धा खुल्या होत्या,
सर्वांसाठी खेळ, क्रीडा, साहित्य,
यांचा होता मेळ !

छत्राखाली तुमच्या आले,
पदस्पर्शी होऊनी आयुष्य,
झाले सोनेरी पाऊले!

-: समाप्त :-

माझी शाळा कविता मराठी | Mazi Shala Kavita Marathi – कविता क्र.05

// मराठी शाळा //

पुरे आहे मराठी शाळा मज शिक्षण घ्यायला
मुलं नाही म्हणत पप्पा चला इंग्रजी शाळेला
फी भरता भरता इंग्रजी शाळेची,
पप्पाचे कपाट लागले वाजायला
मुलांचे प्रोजेक्ट पूर्ण करता करता,
मम्मीचे हात लागले दुखायला !!

उंच इमारत पाहून इंग्रजी शाळेची
का जायचे पैसे भरायला ??
आज गरज इंग्रजी भाषेची,
गरज नाही इंग्रजी शाळांची,
बुद्धीवादी लागले हंबरडा फोडायला !!

सहा वर्षांनी दाखला मिळतो शाळेत जायला
कशाला हवेत मग चोचले छोटा मोठा शिशु म्हणायला
हवा आपण आज थोडा विचार करायला !
एबीसीडी येण्यासाठी का लाखभर मोजायला !!

इंग्रजी शाळेत दाखल झालो की डॉक्टर, कलेक्टर,
इंजिनियर होईल असे पाहिजे विचारायला
मग मराठी शाळेत जे डॉक्टर, कलेक्टर झाले !
त्यांच्या डिग्री पाहिजेत एकदा तपासायला !!

हवी जिद्द चिकाटी कोणतीही भाषा शिकायला
बियाणे चांगले लागते अंकुर फुटायला
झेडपी चा विद्यार्थी दिप आज शिक्षक झाला
थोडा वेळ तर लागतोच वटवृक्ष व्हायला !!

-: समाप्त :-

सारांश | My School Poem in Marathi | माझी शाळा कविता मराठी

तर मित्रहो, वरील लेखात आपण माझी शाळा यावर कविता बागितल्या. वरील लेखात आपण माझी शाळा या विषयावर 05+ अतिशय सुंदर कविता बघितल्या. आम्हाला आशाच नाही तर खात्री आहे की आपल्याला वरील माझी शाळा कविता नक्की आवडल्या असतील.

मित्रांनो आपल्याला आमचा हा छोटासा प्रपंच कसा वाटला?? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही विचार किवा मार्गदर्शन असतील तर ते ही कळवा. आपल्या मित्रांना ह्या कविता नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

सुंदर माझी शाळा कविता

Majhi Shala Kavita in Marathi

Majhi Shala Kavita Marathi

माझी शाळा यावर कविता

Leave a Comment