महात्मा गांधी कविता मराठी (05+ सर्वोत्तम कविता) | Mahatma Gandhi Poem in Marathi 2023 | Mahatma Gandhi Kavita in Marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

Mahatma Gandhi Poem in Marathi 2023 | महात्मा गांधी कविता मराठी 2023– नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात आपल्या भारत देशाचे स्वातंत्रवीर, महान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी 05+ अतिशय सुंदर कविता मराठी मध्ये बघणार आहोत. आपल्याला महात्मा गांधी जिंच्या विषयी तर माहीतच आहे. त्यांचे आपल्या भारत देशावर केलेले उपकार कधी न फिटण्या सारखे आहे.

म्हणूनच आज त्यांच्या त्याग व कार्य कर्तुत्वाला आदरांजली म्हणून आम्ही आपल्या समोर 05+ अतिशय सुंदर कविता मांडणार आहोत. ह्या कविता आपल्याला महात्मा गांधी यांच्या विषयी भाषण देताना किंवा सूत्रसंचालन करताना खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालविता कवितेला सुरुवात करुया.

महात्मा गांधी कविता मराठी | Mahatma Gandhi Poem in Marathi – कविता क्र.01

गांधी आज असते तर,
मला काय म्हणाले असते
कौतुक केलं असतं माझं
की जरा रागावले असते

हिशेब विचारला असता का
स्वातंत्र्याचा नंतरचा
की रस्ता दाखवला असता
त्यांनी जंतर-मंतरचा

चळवळ एखादी उभी करू
असे बोलले असते का
कार्यकरते जमवण्यासाठी
पैसे दिले असते का?

ड्राय डे बद्दल एकदा
स्पष्ट बोलून घेतलं असतं
नाईलाज म्हणून बंद ठेवतो
सरळ सांगून दिलं असतं

रागावलेच जास्त तर
एक आश्वासन देऊन देऊ
चार पुतळ्यांच पुन्हा नवीन
भूमिपूजन करून घेऊ

आज अहिंसेचा रस्ता बापू
हिंसेतून जात आहे
म्हणून बापू सारा देश
तुमची वाट पाहत आहे

-: समाप्त :-

महात्मा गांधी कविता मराठी | Mahatma Gandhi Poem in Marathi – कविता क्र.02

// बापू…//

विसरले खूप सारे
मी अजूनही विसरलो नाही
निघताना दिंडवडे लोकशाहीचे
मी चाळली पुस्तके काही…

मोहनदास एक साधा असेल
महात्मा असाच का हो झाला?
स्वातंत्र्य दिन भारताचा असेल
असाच का हो आला ?

ऊन, वारा, पाऊस सारा
होता अंगावर तुम्ही सोसला
का हो असेल आता लोकशाहीने
धर्मभेदाचा शालू नेसला?

सुखात होते तुम्ही
का हो रस्त्यावरती आले?
स्वातंत्र्याची फळे
का चोखायला आम्हा दिले?

-: समाप्त :-

महात्मा गांधी कविता मराठी | Mahatma Gandhi Kavita in Marathi – कविता क्र.03

नमन स्वीकारा आमचे
बापू तुम्ही महात्मा
भारताच्या प्रगतीसाठी
तुमचा अमर आत्मा..!!

‘शांतीदूत’ तुम्ही देशाचे
शांततेची केली कामना
सत्य, अहिंसेचा संदेश
जागवली स्वातंत्र्य भावना..!!

नेसून सुती पंचा
हातात घेतली काठी
अन्याय मिटवण्यासाठी
लागले अहिंसेच्या पाठी..!!

‘खेड्यांकडे चला’ हा मूलमंत्र
स्वच्छतेचा दिला संदेश
इंग्रज सत्तेला झुगारून
दिला ‘चले जाव’चा आदेश..!!

मोहनदास ‘महात्मा’ होऊन
या जगात झाले अमर
देशाच्या अस्तित्वासाठी
लढले स्वातंत्र्य समर..!!
कवियात्री उमा पाटील

-: समाप्त :-

महात्मा गांधी कविता मराठी | Mahatma Gandhi Kavita Marathi – कविता क्र.04

सत्य, अहिंसेचे पुजारी
जन्मले गुजरातच्या पोरबंदर ग्रामी
माता पुतळाबाई पिता करमचंद गांधी
नामकरण केले मोहनदास गांधी

साधी रहाणी उच्च विचारश्रेणी
सत्य अहिंसेचे नित्य पुजारी
स्वदेशी वस्तूंचे सन्मानकर्ते
दाखवली उपोषणाची ताकद भारी

सत्याग्रहाची अफाट ताकद
दाखवून दिली जगतामधी
सत्यमेव जयते चा नारा
अजुनी दुमदूमे आसमंतामधी

नका वाईट पाहू, बोलू ,ऐकू
शिकवण दिली सत्याची
चले जावो म्हटले ब्रिटिशांना
बँरिस्टरची स्वातंत्र्य झुंज शर्थीची

मिळवून दिले स्वातंत्र्य भारतास
सत्य, अहिंसेच्या मार्गाने
बनले राष्ट्रपिता, पदवी महात्मा
भारतवासीयांनी दिली प्रेमाने

हे राम हे शब्द अखेरचे
दर्शवतात जीवन साधना
जन्मला या भारतभूमीतअसा महात्मा
हे आपले सौभाग्य म्हणा

कवी संदीप तोडकर

-: समाप्त :-

महात्मा गांधी यावर कविता मराठी | Mahatma Gandhi Kavita Marathi – कविता क्र.05

दोन ऑक्टोबरला जयंती
या महान प्रसिद्ध नेत्याची
माला घालूया महात्माजींना
स्मरण करूनी हो प्रेमाची…..

भारताच्या स्वातंत्र्यासाठी
ज्यांनी आपुले प्राण वेचले
ते स्वच्छतेचे ,अहिंसेचे भोक्ते
त्या बापूजींना वंदन आपले….

इंग्रजांविरूद्ध लढा दिला
अनेक मार्गांनी बापूजींनी
सत्याग्रहाने इंग्रजांना नमवले
आपल्याच महान महात्माजींनी…

स्वदेशीचे स्विकार केला त्यांनी
अहिंसा,सत्याग्रह,स्वकष्ट करूनी
तत्वज्ञानाचाही वापर केला
नजराणा दिला स्वकतृत्वातुनी…..

सूतकताई, गरजेपुरते वस्त्र हे ध्येय
घालवले जीवन त्यांनी आश्रमातुनी
आदर्श बापूजींचा घेवूया आज
आपण महात्मा गांधींच्या प्रेरणेतुनी….

बापूजींच्या भाषणातून मिळते
शिकवण ऐक्याची अन अहिंसेची
अन्यायाविरूद्ध लढा पुकारला त्यांनी
चळवळ केली असहकारतेची…..

वंदन करते आज महान या बापूंना
ज्यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र दिला
समाजहितासाठी लढा पुकारला
सदैव याच कार्याचा गौरव केला…..
कवयित्री वसुधा नाईक

-: समाप्त :-

सारांश | Mahatma Gandhi Poem in Marathi | महात्मा गांधी कविता मराठी

मित्रांनो, वरील लेखात आपण महात्मा गांधी कविता मराठी मधून बघितल्या. वरील लेखात आपण महात्मा गांधी यांच्या विषयी 05+ अतिशय सुंदर कविता मराठी मध्ये बघितल्या. ह्या कविता आपल्याला महात्मा गांधी जयंती आणि पुण्यतिथी निमित्त भाषण देताना किंवा सूत्रसंचालन करताना खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही विचार किवा मार्गदर्शन असतील तर ते ही कळवा. ह्या महात्मा गांधी वर कविता आपल्या मित्रांना ही शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

1 thought on “महात्मा गांधी कविता मराठी (05+ सर्वोत्तम कविता) | Mahatma Gandhi Poem in Marathi 2023 | Mahatma Gandhi Kavita in Marathi”

Leave a Comment