पावसाळा निबंध मराठी 10 ओळी (07+ सर्वोत्तम निबंध) | 10 Lines on Rainy Season in Marathi | पावसाळा निबंध 10 ओळी

पावसाळा निबंध मराठी 10 ओळी | 10 lines on rainy season in marathi – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात पावसाळ्यावर 10 ओळी निबंध मराठी मध्ये बघणार आहोत. मित्रांनो शाळेत तुम्हाला गुरुजी पावसाळ्यावर 10 ओळी निबंध लिहिण्यास सांगतात. हा लेख तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.

आज या लेखात पावसाळा निबंध मराठी 10 ओळी यावर 7+ अतिशय सुंदर आणि सोपे निबंध आपण पाहणार आहोत. ही निबंध तुम्हाला परीक्षेत सुद्धा खूप उपयोगी पडतील. याची आम्हाला खात्री आहे. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता निबंधाला सुरुवात करुया.

पावसाळा निबंध मराठी 10 ओळी – निबंध क्र.01

 1. पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे.
 2. तसे मला सर्वच ऋतू आवडतात, परंतु सर्वात जास्त मला पावसाळा ऋतू आवडतो.
 3. पावसाळा हा ऋतू दर वर्षी जून महिन्यात सुरू होतो आणि सप्टेंबर महिन्यात संपतो.
 4. पावसाळ्यात खूप मजा येते.
 5. या वातावरणात सगळीकडे हिरवळ पसरलेली असते.
 6. मंद झुळूक वारा असतो, आकाशात ढग जमलेले असतात, विजांचा कडकडाट असतो.
 7. पावसाळ्यात आम्ही कागदाच्या होडी बनवून पाण्यात खूप खेळतो.
 8. आम्ही पावसाच्या पाण्यात खूप भिजतो.
 9. पावसाळा या ऋतू खूप सण असल्यामुळे अजून या ऋतूची आवड निर्माण होते.
 10. पावसाळ्यात शेतकरी आपल्या शेतात पेरणी करतो.

पावसाळा निबंध मराठी 10 ओळी – निबंध क्र.02

 1. पावसाळ्यात आकाशात काळे ढग दाटून येतात.
 2. पावसाळ्यात रोज पाऊस पडतो.
 3. पावसाळ्यात आकाशात इंद्रधनुष्य दिसते.
 4. पावसात भिजायला खूप मजा येते.
 5. पावसाळ्यात जागोजागी पाणी साचते.
 6. माझ्याकडे भरपूर छत्रे आहेत.
 7. आपण न भिजण्यासाठी छत्री घेतो.
 8. पावसाळ्यात नद्यांना पूर येतो.
 9. मला पावसाळा खूप आवडतो.
 10. पावसाळा खूप मनमोहक असतो.

पावसाळा निबंध मराठी 10 ओळी – निबंध क्र.03

 1. पाऊस म्हटलं की सर्वांचे मन आनंदाने नाचू लागते.
 2. उन्हाळ्यानंतर धरती मातेला थंड करण्याचे काम करतो पावसाळा.
 3. शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा आणि लहान मुलांच्या आनंदाचा विषय आहे पावसाळा.
 4. माझा आवडता ऋतू आहे पावसाळा.
 5. पाऊस आला की धरती मातेच्या अंगावर पडणारे टपोरे थेंब त्यातून येणारा मातीचा श्वास जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरुवात होते.
 6. आकाशात काळे ढग जमू लागतात. थंड वारा वाहू लागतो आणि पावसाला सुरुवात होते.
 7. मोर आनंदाने पिसारा फुलवून नाचू लागतात.
 8. शेतकरी राजा सुखावतो आपल्या कामाची आखणी करतो.
 9. पशु, पक्षी प्राणी सुखावतात लहान मुलांची छत्री रेनकोट घेण्यासाठी लगबग सुरू होते.
 10. सगळीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

पावसाळा निबंध मराठी 10 ओळी – निबंध क्र.04

 1. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा हे तीन महत्त्वाचे ऋतू आहेत.
 2. त्यात मला पावसाळा हा ऋतू खूप आवडतो.
 3. पावसाळ्याचा कालावधी हा जून ते सप्टेंबर पर्यंत असतो.
 4. पाण्याला जीवन म्हटले जाते, त्यामुळे पावसाळा हा अत्यंत महत्त्वाचा ऋतू आहे.
 5. रिमझिम पडणारा पाऊस हा उन्हाळ्यातील उन्हामुळे तापलेल्या जमिनीची तहान भागवितो.
 6. पाऊस पडल्याने सर्व झाडे हिरवीगार होतात आणि बहरतात.
 7. पावसाळ्यात जमिनीतून मातीचा येणारा सुगंध मला खूप आवडतो.
 8. मी आणि माझे सर्व मित्र पाण्यात खेळतो आणि कागदाच्या होड्या बनवून वाहत्या पाण्यात सोडतो.
 9. पाऊस पडला की कधीकधी रंगीबिरंगी इंद्रधनुष्य बघायला मिळते.
 10. मला पावसात भिजायला खूप आवडते त्यामुळे मला पावसाळा हा ऋतू खूप आवडतो.

पावसाळा निबंध मराठी 10 ओळी – निबंध क्र.05

 1. पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे.
 2. उन्हाळ्यात उन्हाने सर्वांच्या अंगाची लाही लाही होते. म्हणून आपण पावसाची आतुरतेने वाट पाहतो.
 3. आपल्याबरोबरच प्राणी, पक्षी सुद्धा पावसासाठी आकाशाकडे टक लावून वाट पाहतात.
 4. पावसाळा सुरू झाला की नदी, नाले, ओढे पाण्याने खळखळ वाहतात.
 5. सगळीकडे हिरवेगार गवत दिसू लागते.
 6. झाडांना पालवी फुटते. जणू काही सृष्टीने हिरवा शालू परिधान केला आहे.
 7. पावसाळा सुरू झाला की शेतातील कामांना शेतकरी दादा घाई करतो.
 8. मशागत केलेल्या शेतामध्ये पेरणी करतो.
 9. हळूहळू शेतांमध्ये हिरवे सोने डोलू लागते.
 10. सगळीकडे आनंदी आनंद असतो.

पावसाळा निबंध मराठी 10 ओळी – निबंध क्र.06

 1. पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सर्वांनाच आवडतो.
 2. पावसामुळे निसर्गात खूप सारे बदल होतात.
 3. पाऊस सुरू होण्याआधी उन्हाळ्याच्या गर्मीने संपूर्ण जमीन तापलेली असते.
 4. लोक गर्मीत येणाऱ्या घामाने अस्वस्थ झालेली असतात.
 5. पाऊस पडल्याने सर्व झाडे हिरवीगार होतात आणि गर्मीने तापलेल्या वातावरणात गारवा येतो.
 6. पाऊस कधी रिमझिम येतो तर कधी कधी दोनो कोसळतो.
 7. सर्व आटलेले नद्या नाले पुन्हा वाहू लागतात.
 8. शेतीच्या कामाला सुरुवात होते. पावसामुळे शेतकरी खुश होतात.
 9. पावसात शाळेत जाण्याची मज्जा काही वेगळीच असते.
 10. पाऊस कधी इतका पडतो की सगळीकडे पाणी साचते आणि आम्हाला शाळेला सुट्टी मिळते.

पावसाळा निबंध मराठी 10 ओळी | Rainy Season Essay 10 Lines in Marathi – निबंध क्र.07

 1. पावसाळा आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि आनंद घेऊन येतो.
 2. पावसाळ्यात निसर्ग हिरवागार दिसतो.
 3. प्रत्येक जण पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतो.
 4. पावसाळा आला की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो.
 5. पावसाळ्याला माझ्या आयुष्यात खूप महत्त्व आहे.
 6. एकदा मी घरून बाजारात फिरायला गेलो. होतो मी घरून बाजारात गेलो तेव्हा खूप गरम होते.
 7. मी पूर्ण घामाने भिजलो होतो कुठेतरी थंड पाणी प्यायला मिळेल असे वाटले.
 8. मी एका दुकानात गेलो जिथे मला थंड पाण्याची बाटली मिळाली आणि ते पाणी प्यायलो.
 9. पाणी पिऊनही मला खूप गरम वाटत होते. काही वेळाने अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला.
 10. पाऊस पडताच वातावरण थंड झाले. मला पाण्यात भिजण्याची इच्छा झाली. मी मोबाईल आणि पर्स ठेवण्यासाठी दुकानातून पॉलिथिन घेतले आणि नंतर पाण्यात खूप भिजलो.

सारांश | 10 lines on rainy season in marathi | पावसाळा निबंध 10 ओळी

मित्रांनो पावसाळा हा ऋतू कोणाला आवडत नाही! हा ऋतू म्हणजे सणवार आणि आनंदाचा पर्वच असतो. म्हणून शाळेत शिक्षक पावसाळ्यावर 10 ओळी निबंध लिहिण्यास नेहेमीच सांगतात. वरील लेखात दिलेली 7+ अतिशय सुंदर निबंध संच आपल्याला यासाठी खूप उपयोगी पडणार आहे. वरील लेखात आपण पावसाळा निबंध मराठी 10 ओळी बघितल्या.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा मार्गदर्शन असतील तर ते ही कळवा. हा लेख आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

 • rainy season essay in marathi
 • rainy season essay in marathi 10 lines
 • rainy season essay 10 lines in marathi
 • पावसाळा निबंध 10 ओळी

Leave a Comment