आषाढी एकादशी निबंध मराठी 2023 (04+ सर्वोत्तम निबंध) | Ashadhi Ekadashi Nibandh Marathi | Ashadhi Ekadashi Nibandh in Marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

आषाढी एकादशी निबंध मराठी | Ashadhi Ekadashi Nibandh Marathi नमस्कार मित्रांनो, प्रथम आपल्याला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्रातील सर्व वारकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. पंढरपूर नगरी आणि चंद्रभागा नदी देखील या सोहळ्याची आतुरतेने वाट पहात असते.

आज आपण या लेखात आषाढी एकादशी निबंध मराठी मध्ये बघणार आहोत. आज या लेखात आपण आषाढी एकादशी निमित्त 4+ अतिशय सुंदर निबंध बघणार आहोत. आपल्याला शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने निबंध लिहिण्यास सांगितले जाते. अशावेळी हे निबंध आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील. चला तर मित्रांनो निबंधाला सुरुवात करुया.

आषाढी एकादशी निबंध मराठी | Ashadhi Ekadashi Nibandh in Marathi – निबंध क्र.01

आषाढी एकादशी

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीला संत ज्ञानेश्वर संत नामदेव, संत सावता, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांसारख्या संत परंपरेचा महान वारसा लाभलेला आहे. ‘सर्वांमध्ये विठ्ठल’ म्हणजे सर्व समान आहेत अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात रुजवली. या सर्व संतांचे व अवघ्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरची विठू माऊली.

आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी म्हणजे आषाढी किंवा देवशयनी एकादशी होय. या एकादशीला महा एकादशी या नावानेही ओळखले जाते. वर्षभरात एकूण 24 एकादशी असतात. मात्र त्यापैकी आषाढी एकादशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण याच एकादशीला महाराष्ट्रातील लाखो भाविक वारकरी वारीमध्ये चालत पंढरपूरला जातात.

जीवनात एकदा तरी वारी अनुभवावी असे म्हटले जाते. आषाढी एकादशीपासून चतुर्मासाची सुरुवात होते. अशी अख्यायिका आहे की, आषाढी एकादशीला भगवान विष्णू शेषनागावर निद्रीस्त होतात आणि चतुर मासा नंतर कार्तिकेय एकादशीला जागे होतात.

आषाढी एकादशीला आळंदीवरून ज्ञानेश्वरांची, देहू वरून तुकारामांची, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, उत्तर भारतातून संत कबीर यांची तर पैठण वरून संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी येते. या पालख्यांबरोबर सर्व भाविक पायी विठू नामाचा गजर करत पंढरपूरला पोहोचतात.

एकादशीच्या दिवशी पहाटे उठून चंद्रभागेच्या तिरी स्नान करतात. तुळस वाहून विष्णूची पूजा करतात. दर्शन घेतात. विटेवर उभे असलेल्या विठ्ठलाचे दर्शन घेतात. या दिवशी सर्व भाविक उपवास करतात. आपल्या शेतात पेरणी करूनच हे शेतकरी बांधव वारीला निघतात.

पंढरपूरला विठोबाच्या पायी मस्त ठेवून यंदाची सुगी चांगली येऊ दे, अवघ्या मानव जातीवर कोणतीही संकट येऊ देऊ नकोस असं मागणं वारकरी विठोबा कडे मागतो. मोठ्या भक्ती भावाने महाराष्ट्रातील लाखो भावी ही परंपरा पाळताना दिसून येतात.

आषाढ महिन्यात पाऊस असतो अग्नि मंद होऊन पचन संस्था मंदावलेली असते. अशावेळी जड पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी योग्य नसते. अशावेळी पचायला सोपे पदार्थ खाणे, कमी आहार घेणे हे उपयुक्त ठरते. आणि म्हणूनच या काळात उपवास करणे. आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे. अशा प्रकारे आषाढी एकादशीचे शास्त्रीय महत्त्व देखील आहे.

-: समाप्त :-

आषाढी एकादशी निबंध मराठी | Ashadhi Ekadashi Nibandh in Marathi – निबंध क्र.02

राहिलो पाण्यात! तोललो नाण्यात
तरीही गाण्यात! विठ्ठल बोलतो
देह उष्ठावूणी! आत्मा बाटवूनी
माया साठवुनी! पुन्हा तुझ्यादारी
जीवनाचा सार! एकच विचार
आत्म्याची धार! विठ्ठल विठ्ठल..

“राम कृष्ण हरी” आज आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी. यालाच देवशयनी एकादशी असे देखील म्हटले जाते. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अनेक अलौकिक संत महाराष्ट्राच्या या पुण्यभूमीत होऊन गेले आहेत.

अशा या महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे “पांडुरंग विठ्ठल”. पंढरपुरात कटेवर हात ठेवून भक्तांचा सांभाळ करणारे विठ्ठल रखुमाई आपणा सर्वांना अतिशय विलोभनीय दिसतात. अशा या पांडुरंगाच्या दर्शनाला अनेक भाविक पायी चालत जातात. यालाच ‘वारी’ म्हणतात.

ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला. एकनाथ महाराजांनी भागवत धर्माचं देऊळ उभारलं व त्याला भक्कम आधार दिला आणि तुकोबांनी त्यावर कळस चढविला.

अवघे गरजे पंढरपुर! चालला नामाचा गजर
टाळ घोष गाणी येती! ध्यानी विठ्ठलाची मूर्ती
पांडुरंग नहाले हो चंद्रभागा तिरी! इडा पिडा टळुनी जाती
देहाला या लाभू मुक्ती! नामरंगी रंगले हो संतांचे माहेर
देव दिसे ठाई ठाई! भक्तीन मुक्ताबाई सुखा लागी आलाय हो आनंदाचा पूर!

मित्रांनो आज आनंदाचा, उत्साहाचा म्हणजेच आषाढी एकादशीचा दिवस. आषाढी एकादशी म्हटलं की, डोळ्यासमोर येतात ते पंढरपूर आणि त्या पंढरपुरात दाखल झालेल्या भक्तांची मांदियाळी, चंद्रभागेचा काठ, प्रदक्षिणा मार्ग, वारीत भावड्या भक्तांची रेलचेल.

वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशी मध्ये आषाढी एकादशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणी होऊन लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपूरला येतात.

आषाढी एकादशीला आळंदीवरून ज्ञानेश्वरांची, देहू वरून तुकारामांची, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, शेगाव येथून स्वामी समर्थांची, पैठण वरून एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी येतात. या पालकीबरोबर सर्व भाविक पायी विठू नामाचा गजर करीत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी येतात.

भाविक एकादशीच्या दिवशी पहाटे उठून चंद्रभागेच्या तिरी स्नान करतात. तुळस वाहून विष्णूची पूजा करतात. दर्शन घेतात. या दिवशी सर्व भाविक उपवास करतात. अशा प्रकारे आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषात साजरी केली जाते.

-: समाप्त :-

आषाढी एकादशी निबंध मराठी | Ashadhi Ekadashi Essay in Marathi – निबंध क्र.03

काया ही पंढरी
आत्मा हा विठ्ठल
नांदतो केवळ पांडुरंग
!! जय जय हरी विठ्ठल !!

महाराष्ट्राला संतांची भूमी समजले जाते महाराष्ट्रातील संतांच्या हृदयात स्थान करणारे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा.

मराठी वर्षाच्या आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात जी एकादशी येते तिला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात यास एकादशीला महा एकादशी असेही म्हणतात.

वश्यातील एकूण 24 एकादशी पैकी आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण याच एकादशीला महाराष्ट्रातील लाखो भावी वारकरी वारी घेऊन पंढरपूरला जातात जीवनात एकदा तरी वारी अनुभवावी असे म्हटले जाते महाराष्ट्रात सुमारे आठशे वर्षांपासून वारीची ही परंपरा पाळली जाते असे म्हणतात.

आषाढी एकादशी पासून चतुर मासाची सुरुवात होते अशी आख्यायिका आहे की आषाढी एकादशीला भगवान विष्णू शेषनागावर निद्रिस्त होतात आणि चतुर मासा नंतर कार्तिकी एकादशीला जागे होतात.

आषाढी एकादशीला आळंदीवरून ज्ञानेश्वरांची, देहू वरून तुकारामांची, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, शेगाव येथून स्वामी समर्थांची, पैठण वरून एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी येतात.

एकादशीच्या दिवशी पहाटे उठून चंद्रभागेच्या तिरी स्नान करतात. तुळस वाहून विष्णूची पूजा करतात. दर्शन घेतात. विटेवर उभे असलेल्या विठ्ठलाचे दर्शन घेतात. या दिवशी सर्व भाविक उपवास करतात. आपल्या शेतात पेरणी करूनच हे शेतकरी बांधव वारीला निघतात.

पंढरपूरला विठोबाच्या पायी मस्त ठेवून यंदाची सुगी चांगली येऊ दे, अवघ्या मानव जातीवर कोणतीही संकट येऊ देऊ नकोस असं मागणं वारकरी विठोबा कडे मागतो. मोठ्या भक्ती भावाने महाराष्ट्रातील लाखो भावी ही परंपरा पाळताना दिसून येतात.

आषाढ महिन्यात पाऊस असतो अग्नि मंद होऊन पचन संस्था मंदावलेली असते. अशावेळी जड पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी योग्य नसते. अशावेळी पचायला सोपे पदार्थ खाणे, कमी आहार घेणे हे उपयुक्त ठरते. आणि म्हणूनच या काळात उपवास करणे. आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे. अशा प्रकारे आषाढी एकादशीचे शास्त्रीय महत्त्व देखील आहे.

-: समाप्त :-

आषाढी एकादशी निबंध मराठी | Ashadhi Ekadashi Essay in Marathi- निबंध क्र.04

विठू माऊली तू, माऊली जगाची
माऊली मूर्ती विठ्ठलाची…

आषाढ महिना म्हटला की अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय होतो. आषाढ महिन्यातील येणारी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी होय. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असेही म्हणतात. कारण या दिवशी भगवान विष्णू शेषनागावर निद्रिस्त होतात असे मानले जाते.

आषाढी एकादशीचा दिवस महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. आषाढी वारी हे महाराष्ट्राचे एक जगावेगळे वैशिष्ट्य आहे. अशी वारी जगात कुठेच अनुभवायला मिळत नाही. विठ्ठल नामाचा गजर करीत लाखो वारकरी आपला जातीभेद, गरीब श्रीमंती हा भेद विसरून पायी चालत पंढरपूरला येतात.

सर्वजण जणू एकरूप होऊन जातात. या दिवशी देहू, त्र्यंबकेश्वर, पैठण, शेगाव, आळंदीहून संतांच्या पालख्या पंढरपुरात येतात. सर्व वारकरी तसेच अनेक सर्वसामान्य भावीक, भक्त या दिवशी उपवास करतात. विठ्ठलाच्या नाम संकीर्तनात दिवस साजरा करतात.

या दिवशी राज्यभरातील अनेक छोट्या – मोठ्या स्थानिक विठ्ठल मंदिरांमध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी असते. अनेक ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचनाचे कार्यक्रम असतात. विविध शाळा, सोसायटी, धार्मिक संस्था आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करतात. या दिवशी माऊली माऊली जयघोष करून अवघा महाराष्ट्र विठ्ठल मय करतात.

जय हरी विठ्ठल !
जय हरी विठ्ठल !!

-: समाप्त :-

सारांश | Ashadhi Ekadashi Nibandh Marathi | आषाढी एकादशी निबंध मराठी

मित्रांनो वरील लेखात आपण आषाढी एकादशी या वर निबंध मराठी मध्ये बघितले. वरील लेखात आपण आषाढी एकादशी निमित्त 4+ अतिशय सुंदर निबंध बघितले. आपल्याला शाळेत आषाढी एकादशी वर निबंध लिहायला सांगितल्यास वरील निबंध आपल्याला खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रपंच कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

आषाढी एकादशी निबंध मराठी | Ashadhi Ekadashi Nibandh Marathi | Ashadhi Ekadashi Nibandh in Marathi

Leave a Comment