जागतिक योग दिन माहिती मराठी 2023 | Yoga Day Information in Marathi 2023 | जागतिक योग दिनाविषयी माहिती मराठी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

जागतिक योग दिन माहिती मराठी 2023 | Yoga Day Information in Marathi 2023 | जागतिक योग दिनाविषयी माहिती मराठी – नमस्कार मित्रांनो, 21 जून रोजी आपण जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो. परंतु आपणास माहिती आहे का? की आपण हा जागतिक योग दिन का साजरा करतो? याचा इतिहास काय आहे? कशा प्रकारे हा दिवस साजरा केला जातो? जागतिक योग दिन 2023 ची थीम काय आहे?

अशा सर्व प्रकारच्या बाबींची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. आज आपण या लेखात जागतिक योग दिनाविषयी संपूर्ण आणि सखोल माहिती बघणार आहोत. तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

योग म्हणजे काय | What is Yoga in Marathi?

योग हा शब्द ‘युज’ या संस्कृत धातू पासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. योग ही भारतातील पांच हजार वर्ष प्राचीन ज्ञानशैली आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे, ज्यात शरीर ताणले, वाकवले, पिळले जाते आणि अवघड श्वसन प्रक्रियांचा अवलंब केला जातो. खरेतर मानवी मन आणि आत्मा यांची अनंत क्षमता जाणून घेणाऱ्या या विज्ञानाची ही म्हणजे योगाभ्यासाची केवळ वरवरची ओळख झाली. योगाभ्यासामध्ये जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो.

गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, “योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे. हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे.”

योगाचा इतिहास | History of Yoga in Marathi

योग दहा हजार पेक्षा जास्त वर्षापासून प्रचलित आहे. या परंपरेचा उल्लेख नारदीय सुक्त आणि सर्वात प्राचीन अश्या ऋग्वेदामध्ये आढळतो. हा आपणास पुन्हा सिंधू-सरस्वती सभ्यतेचे दर्शन घडवतो. या सभ्यतेमधील पशुपतीनाथांच्या एका नाण्यावर योगमुद्रा विराजमान आहे जी त्या काळातील योगाच्या व्यापकतेचे द्योतक आहे. अतिप्राचीन उपनिषद बृहद अरण्यक मध्ये योगामधील काही शारीरिक आसनांचा उल्लेख आढळतो.

छान्दोग्य उपनिषदामध्ये प्रत्याहार चा तर बृहद अरण्यक मधील एका स्तवनामध्ये प्राणायाम चा सविस्तर उल्लेख आहे. प्रचलित योगाच्या स्वरूपाचा प्रथम उल्लेख कठोपनिषदमध्ये आहे जी आयुर्वेदाच्या कथा शाखामधील अंतिम आठ वर्गांमध्ये पहिल्यांदा येते जे मुख्य आणि अत्यंत महत्वाचे उपनिषद आहे. येथे योगाला अंतर्मनाच्या यात्रेसाठी तसेच चेतनेच्या विकासासाठी गरजेच्या प्रक्रियेच्या रुपात जाणले जाते.

प्रसिद्ध संवाद “योग याज्ञवाल्क्य”, जो बाबा याज्ञवल्क्य आणि शिष्या गार्गी यांच्यामधील संवाद आहे, ज्याचे वर्णन बृहद अरण्यक उपनिषदमध्ये आहे, यामध्ये श्वास घेण्याचे कित्येक व्यायाम प्रकार, शारीरिक शुध्दतेसाठी गरजेची आसने आणि ध्यानाचा उल्लेख आहे. गार्गी लिखित छांदोग्य उपनिषद मध्ये देखील योगासनांचा उल्लेख आहे.

अथर्ववेद मध्ये संन्याश्यांच्या एका समुहामधील चर्चेनुसार शारीरिक आसने हि योगासने म्हणून विकसित होऊ शकतात यावर भर दिला आहे. विविध संहितांमध्ये असा उल्लेख आढळतो कि प्राचीन काळी मुनी, महात्मा आणि विविध संतांद्वारे कठोर शारीरिक आचरण, ध्यान आणि तप केले जात असे.

काळानुसार योग एक आचरणाच्या रुपात प्रसिध्द होत गेला आहे. भगवत गीतेसह महाभारतातील शांतिपर्वा मध्ये योगाचा खुलासेवार उल्लेख आढळतो.

महाभारत आणि भगवत गीतेच्या फार पूर्वी वीस पेक्षा ज्यादा उपनिषदामध्ये सर्वोच्च चेतनेसोबत मनाचे मिलन होणे म्हणजे ‘योग’ असे सांगितले गेले आहे. हिंदू दर्शनातील प्राचीन मुलभूत सूत्रांच्या रुपामध्ये योगाची चर्चा आहे, ज्यांचा अलंकृत उल्लेख पतंजली योग सूत्रमध्ये आहे. महर्षी पतंजली आपल्या दुसऱ्याच योग सूत्र मध्ये योगाची व्याख्या

“योगः चित्त-वृत्ती निरोधः “ – योग सूत्र १.२

अशी करतात. पतंजलींचे लेखन देखील अष्टांग योग साठी आधार बनले आहेत. जैन धर्मातील पांच प्रतिज्ञा आणि बौध्द धर्मातील योगाचाराची बीजे पतंजली योग सूत्रामध्ये आहेत.

मध्य कालीन युगात हठ योगाचा विकास झाला.

जागतिक योग दिन का साजरा करतात?

आजच्या या धावपळीच्या जीवनात माणूस हा आरोग्यापासून लांब होत चालला आहे. कोरोणा सारख्या महामारीने आपल्याला चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामुळे एवढे तर नक्की झाले आहे की जर आपले शरीर निरोगी असेल तरच आपण आयुष्यातील सर्व गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. त्यासाठी आपले शरीर निरोगी असणे महत्त्वाचे आहे.

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत केलेल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाची घोषणा केली. पहिला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ 21 जून 2015 रोजी जगभरात साजरा करण्यात आला. ही भारत देशासाठी अभिमानाची बाब ठरली.

आपल्या जीवनातील योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी जागतिक योग दिवस साजरा करण्यात येतो. योगा बद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी व लोकांनी योगाच्या माध्यमातून निरोगी राहावे हा याचा मुख्य हेतू होय.

योगाचे प्रकार | Types of Yoga in Marathi

योगाचे मुख्य सहा प्रकार पडतात. ते पुढीलप्रमाणे आहेत.

  1. राजयोग
  2. हठयोग
  3. लययोग
  4. ज्ञानयोग
  5. कर्मयोग
  6. भक्तियोग

योगाचे फायदे | Benefits of Yoga in Marathi

योगासन हे केवळ व्यायाम नाही. तर हे आपले शरीर आणि मन दोन्ही जोडण्याचे साधन आहे. खरे आरोग्य तेच ज्यामध्ये शरीरासोबत मनही निरोगी राहते. योगा मुळे शरीरासोबत आपले मनही निरोगी राहते. योगामुळे असाध्य आजार देखील बरे होतात. याची खूप सरी उदाहरणे आहेत.

जागतिक योग दिनाची थीम | International Yoga Day Theme in Marathi

जागतिक योग दिनाच्या थीम पुढीप्रमाणे आहेत.

  1. 2017 – आरोग्यासाठी योग (Yoga for health)
  2. 2018 – शांततेसाठी योग (Yoga for Peace)
  3. 2019 – हृदयासाठी योग (Yoga for Heart)
  4. 2020 – कौटुंबिक योग (Yoga at Home and Yoga with Family)
  5. 2021 – कल्याणकारी योग (Yoga for well-being)
  6. 2022 – मानवतेसाठी योग (Yoga for Humanity)

जागतिक योग दिन 2023 ची थीम | International Yoga Day 2023 Theme

जागतिक योग दिन 2023 ची थीम सध्या तरी काही माहिती दिलेली नाही.

  1. जागतिक योग दिन केंव्हा साजरा केला जातो?

    दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो.

  2. जागतिक योग दिन 2023 ची थीम काय आहे?

    वसुधैव कुटुंबकम

सारांश | जागतिक योग दिन माहिती मराठी | Yoga Day Information in Marathi 2023

वरील लेखात आपण जागतिक योग दिनाविषयी माहिती मराठी मध्ये बघितली. जागतिक योग दिनाविषयी संपूर्ण माहिती आपण बघितली. आम्हाला अशाच नाही तर खात्री आहे की आपल्याला वरील माहिती नक्कीच आवडली असेल.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा विचार असतील तर ते ही कळवा. आपल्या मित्रांनाही हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

जागतिक योग दिन माहिती मराठी 2023 | Yoga Day Information in Marathi 2023 | जागतिक योग दिनाविषयी माहिती मराठी

Leave a Comment