राजर्षी शाहू महाराज कविता मराठी (05+ अतिशय सुंदर कविता) | Rajarshi Shahu Maharaj Kavita in Marathi 2023 | छत्रपती राजर्षी शाहू महाराज कविता मराठी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

छत्रपती राजर्षी शाहू महाराज कविता मराठी | Rajarshi Shahu Maharaj Kavita in Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यावर कविता मराठी मध्ये बघणार आहोत. या लेखात आपण एकूण 5+ अतिशय सुंदर कविता बघणार आहोत. राजर्षी शाहू महाराज यांच्या सारखा थोर पुरुष पुन्हा होणे नाही. दरवर्षी 21 जून रोजी आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो.

अशा वेळी शाळेत, कार्यालयात विवीध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्यावर भाषण देताना कवितेचा वापर केल्यास भाषणाला एक वेगळेच महत्त्व निर्माण होते. श्रोते मंत्रमुग्ध होऊन आपले भाषण व कविता ऐकतात. चला तर मित्रांनो कवितेला सुरुवात करुया.

राजर्षी शाहू महाराज कविता मराठी – कविता क्र.01

राजर्षी शाहू महाराज

लोकराजा शाहू तुम्हा वंदितो मी,
तुमच्या विचारांनी पावन झाली
महाराष्ट्र भूमी…

रयतेचे राज्य केले तुम्ही साकार,
रयतेच्या सुखासाठी कष्ट घेतले अपार,
देह झिजविला हा रयतेच्या कामी,
लोकराजा राजर्षी शाहू…

शिक्षण प्रसाराचे कार्य केले महान,
आपल्या कर्तृत्वाचा आम्हा अभिमान,
अमर झाला तुम्ही लोकराजा नामी,
लोकराजा राजर्षी शाहू…

दीन दलितांचे तुम्ही कैवारी,
झिजवून काया शिक्षण सेवा केली खरी,
वंदितो आम्ही, तुम्हा जन्मोजन्मी,
लोकराजा राजर्षी शाहू…

Learning with aradhya YT

राजर्षी शाहू महाराज कविता मराठी – कविता क्र.02

दीनदुबळ्याचा आधार !
केला शिक्षणात सुधार !!
राजर्षी शाहू महाराज !
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार !!

आरक्षणाचे शाहू महाराज प्रणेते !
दुःखी पीडितांचे ते तारण हारते !!
होतकरूंच्या कार्याला दिला त्यांनी आधार !!!

जाति भेदाची तोडूनी भिंत !
जनता ठेवली त्यांनी सुखात !!
समाज रचनेस दिला राजांनी आकार !!!

मल्लविदेस दिले प्रोत्साहन !
अनेकांचे राजेंनी केले शिक्षण !!
आजच्या या दिनी कवी गोवर्धन
त्यांना प्रणाम करतो त्रिवार !!!

दीनदुबळ्याचा आधार !
केला शिक्षणात सुधार !!
राजर्षी शाहू महाराज !
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार !!

काव्यरसिक यूट्यूब चॅनल

राजर्षी शाहू महाराज कविता मराठी – कविता क्र.03

लोककल्याणाचा घेतला वसा,
राजर्षी शाहू महाराज तुमचा मनोमनी ठसा !!

कलंक अस्पृश्यतेचा मिटवण्यासाठी
समतेचे राज्य तुम्ही निर्मिले
नोकरीत मिळवून दिले आरक्षण
सन्मानाने जगण्या तुम्ही शिकवले

ध्यास समतेचा हा घेतला असा
राजर्षी शाहू महाराज तुमचा मनोमनी ठसा

बळीराजाचे राज्य यावे म्हणूनी
बाजारपेठा बसवल्या कैक तुम्ही शहरी
शेतकरी संघाची करून स्थापना
शेतकऱ्यांना दिली ओळख खरी

पोशिंदा जगाचा सुखावला असा
राजर्षी शाहू महाराज तुमचा मनोमनी ठसा

स्त्री शिक्षणाचा केला प्रसार
स्त्रियांना मिळाला जगण्याचा अधिकार
विधवा विवाहाचा करून कायदा
अबलांचा केला तुम्ही उद्धार

समाज परिवर्तनाचा दिला वारसा
राजर्षी शाहू महाराज तुमचा मनोमनी ठसा

कलागुणांची करुन जोपासना
राजाश्रय कलावंतांना दिला तुम्ही
लोककलेला दिली नवचेतना
संस्कृतीचे संरक्षण केले तुम्ही

गुणग्राहक राजा जगी ना दुजा
राजर्षी शाहू महाराज तुमचा मनोमनी ठसा

Savita Kale

छत्रपती राजर्षी शाहू महाराज कविता मराठी – कविता क्र.04

समता बंधुता याची शिकवण
देणारा राजा म्हणजे
छत्रपती राजर्षी शाहू महाराज

अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी
झटणारा राजा म्हणजे
छत्रपती राजर्षी शाहू महाराज

सर्वसामान्य बहुजनांना बद्दल विचार करून त्यांना
स्वाभिमानाचे नवे जीवन देणारा राजा म्हणजे
छत्रपती राजर्षी शाहू महाराज

सदैव समाजाचा विचार करणारे
थोर समाज सुधारक म्हणजे
छत्रपती राजर्षी शाहू महाराज

कर्तव्यदर्शक आरक्षणाचे जनक म्हणून
ओळखला जाणारा राजा म्हणजे
छत्रपती राजर्षी शाहू महाराज

छत्रपती राजर्षी शाहू महाराज कविता मराठी – कविता क्र.05

छत्रपती राजर्षी शाहू महाराज

कोल्हापूर संस्थानाचे,
छत्रपती शाहू राजे !
स्त्री समता पुरस्कर्ते,
लोकराजा नाव गाजे !!

मोफत शिक्षणासाठी,
कायदा केला सक्तीचा !
प्राथमिक शाळा गावी
शिक्षक तो नियुक्तीचा !!
स्त्री समता पुरस्कर्ते,
लोकराजा नाव गाजे !!

अंधश्रद्धा निर्मूलक,
जनहितासाठी दक्षक !
जनक आरक्षणाचे
लोककल्याणाचे हे लक्ष !!
असे स्त्री समता पुरस्कर्ते,
लोकराजा नाव गाजे !!

अज्ञान सारले केला,
आधुनिक शेतकरी!
कृषी योजना बांधले,
धरण राधानगरी !!
स्त्री समता पुरस्कर्ते,
लोकराजा नाव गाजे !!

विधवा विवाह केले,
पुनर्विवाह तर मग्न !
एकात्मतेसाठी केली,
आंतरजातीय लग्न !!
स्त्री समता पुरस्कर्ते,
लोकराजा नाव गाजे !!

ज्योतिबांच्या विचारांचे,
राजे दलितांचे कैवारी !!
क्षत्रिय समाजाचे,
राजर्षी पदही भूषविले भारी !!
स्त्री समता पुरस्कर्ते,
लोकराजा नाव गाजे !!

Nalini Ahire

सारांश | राजर्षी शाहू महाराज कविता मराठी | Rajarshi Shahu Maharaj Kavita in Marathi

मित्रांनो वरील लेखात आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यावर कविता मराठी मध्ये बघितल्या. वरील लेखात आपण एकूण 5+ अतिशय सुंदर कविता बघितल्या. आम्हाला आशाच नाही तर खात्री आहे की आपल्याला वरील कविता नक्कीच आवडल्या असतील.

वरील लेखातील कविता या आमच्या नाहीत. या ज्यांच्या कविता आहेत त्यांचे क्रेडिट आम्ही दिलेले आहे. या कविता फक्त आणि फक्त आपल्या अभ्यासासाठी आम्ही येथे देत आहोत. आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Rajarshi Shahu Maharaj Poem in Marathi

Leave a Comment