मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निबंध मराठी (04+ सर्वोत्तम निबंध) | Marathwada Mukti Sangram Din Nibandh In Marathi 2023 | मराठवाडा मुक्ती संग्राम निबंध


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निबंध मराठी | Marathwada Mukti Sangram Din Nibandh In Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त निबंध मराठी मध्ये बघणार आहोत. 17 सप्टेंबर 1948 रोजी आपला मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र होऊन अखंड भारतात विलीन झाला. त्यामुळे आपण दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो.

शाळेत किंवा परीक्षेत देखील मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाविषयी निबंध लिहिण्यास सांगितले जाते. आणि म्हणूनच आज आपण या लेखात एकूण 04+ अतिशय सुंदर आणि जबरदस्त निबंध बघणार आहोत. ही निबंध 01 ली ते 10 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी आहे. या निबंधांचा अभ्यास करून प्रथम क्रमांक मिळावा. चला तर मित्रांनो सुरुवात करुया.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निबंध मराठी | Marathwada Mukti Sangram Din Nibandh Marathi – निबंध क्र.01

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निबंध मराठी 10 ओळी

  1. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला.
  2. परंतु मराठवाडा अजूनही हैदराबादच्या निजामाच्या जुलमी राजवटीत खितपत पडला होता.
  3. त्यावेळी भारतात 565 संस्थाने होती त्यापैकी 562 संस्थाने भारतात विलीन होण्यास तयार होती.
  4. परंतु हैद्राबाद, जुनागड आणि काश्मीर हे संस्थांनी भारतात विलीन होण्यास नकार दिला.
  5. हैदराबाद संस्थानातील जनता निजामाच्या अन्यायाला त्रासून गेली होती. संस्थानातील जनता भारतात सामील होण्यासाठी तयार होती.
  6. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली वंदे मातरम् चळवळ सुरू झाली.
  7. शेवटी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैद्राबाद संस्थानावर सशस्त्र पोलीस कारवाई केली.
  8. आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आले.
  9. अशाप्रकारे मराठवाडा मुक्ती संग्रामाला यश आले.
  10. मराठवाडा स्वतंत्र भारतात विलीन झाले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निबंध मराठी | Marathwada Mukti Sangram Din Nibandh In Marathi – निबंध क्र.02

थोर संतांचा येथे निवारा!
त्यात निजामाचा बसला डेरा !!
क्रांतीची ही धगधगती ज्वाला !
मराठवाडा सोडुनि निजाम पळाला !!

मराठवाडा हे भाषा सूचक नाव असून त्याचा अर्थ मराठी भाषा बोलण्याचा भूप्रदेश असा होतो. पूर्वीच्या हैदराबाद संस्थानात बहुभाषिक विभागांचा समावेश होता. त्या भुभागांना त्याच्या बोलीभाषेवर ओळखण्याची पद्धत निर्माण झाली. त्यातूनच मराठवाडा, तेलंगाना, कर्नाटक, असे भिन्न भाषिक प्रदेश आकारास आले.

मराठवाड्याची कागदपत्रातील पहिली नोंद इ.स. 1510 ते 1614 च्या कालखंडात तारीख हे फरिश्तामध्ये मऱ्हाठवाडी अशी झाल्याची दिसून येते. निजामाचे पंतप्रधान सालारजंग पहिले यांनी 1870 मध्ये राज्याची नव्याने जिल्हा बंदी करून मराठी भाषिकांचा औरंगाबाद सुबा निर्माण केला व त्यास मराठवाडा असे नाव दिले.

आज मराठवाडा महाराष्ट्राचा एक प्रादेशिक विभाग आहे. मराठवाड्याची भूमी संतांची पावनभूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीतच आद्यकवी श्री. मुकुंदराज, श्री. चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई यांसारखे विश्ववंद्य संत निर्माण झाले.

ऐतिहासिक काळापासून महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीमध्ये मराठवाडा आग्रभागी होता. विविध कालखंडातील राजवटीमध्ये मराठवाड्याने स्वतःचे वेगळे असे व्यक्तीमत्व जपले आहे.

सम्राट अशोका नंतर काही शतकात मराठवाड्यात वेगवेगळ्या घराणेशाहीने राज्य केले. त्यामध्ये सर्वप्रथम सातवाहनांचा उदय झाला. त्याला सातवाहन कालखंड म्हणतात. पैठण ही सातवाहनांची राजधानी होती. यांनी सुमारे 450 वर्षे राज्य केले. त्यानंतर वाकाटक कालखंड, यादव काळ सुद्धा 200 वर्षाचा होता. राष्ट्रकूट कालखंड 250 वर्षांचा होता.

सातवाहनानंतर हा परिसर आपल्या प्रभुत्वाखाली ठेवणारे यादव हे अखेरचे हिंदू राजघराणे होय. देवगिरी ही यादवांची राजधानी होती. यादवकाळात धार्मिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल झाले. महानुभाव, नाथपंथ, वारकरी, लिंगायत, सुफी यांसारखे नवे धर्मपंथ उदयास आले होते.

भक्ती हा सर्वांचा पाया होता. तरी प्रत्येकाच्या भक्ती उपासनेत काही अंशी तफावत होती. समाजाची कर्मकांडातून सुटका करण्यासाठी स्वामी चक्रधर, संत ज्ञानेश्वर, महात्मा बसवेश्वर यांनी पराकाष्टा केली.

यादवकाळात हेमाडपंथी मंदिराचा प्रकार लोकप्रिय झाला होता. अंभई अनुवाद, धर्मपुरी, निलंगा, औसा, चंपावती, औंढा, देवगिरी, पैठण, परळी, अंबाजोगाई आधी ठिकाणी अतिशय भव्य मंदिरे उभारली. आजही ती मंदिरे उत्तम स्थितीत असून यादवकालीन वैभवाची साक्ष देतात.

-: समाप्त :-

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निबंध मराठी | Marathwada Mukti Sangram Din Nibandh In Marathi – निबंध क्र.03

मराठवाडा मुक्ती संग्रामामुळे स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व मिळवून दिलेल्या मराठवाड्यातील सर्व शूरवीरांना…!
मानाचा मुजरा…!
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!

मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हाच तो दिवस आहे ज्या दिवशी मराठवाड्यावर निजामाने जी सत्ता स्थापन केली होती, त्याची ती सत्ता संपुष्टात आली आणि मराठवाडा हा आपल्या भारतात विलीन झाला.

आपला भारत देश जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला असला तरी, भारतात अनेक संस्थांने होती. त्यामध्ये हैदराबाद हे एक निजामाचे संस्थान होते. ते भारतात सामील होण्यास तयार नव्हते. ‘स्वामी रामानंद तीर्थ’ यांनी हैदराबाद संस्थान भारतात सामील व्हावे म्हणून प्रयत्न केले.

तसेच ‘वंदे मातरम चळवळीद्वारे’ अनेक विद्यार्थ्यांनी मराठवाडा निजाम मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु निजाम ऐकत नव्हते. याला विरोध करण्यासाठी निजामाचा सेनापती कासिम रझवी याने रझाकार ही संघटना स्थापन केली. त्यात मुस्लिम स्वयंसेवकांची भरती केली.

या रझाकरांनी प्रजेवर अनन्वित अत्याचार केले. जबरदस्तीने धर्मांतर आणि अत्याचार अशा घटनांनी प्रजा त्रासून गेली होती. शेवटी भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो ही लष्करी कारवाई केली. यामध्ये निजामाचा पराभव झाला.

17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला. भारतातील मराठवाडा स्वतंत्र झाला आणि भारताचे अखंड भारताचे स्वप्न पूर्ण झाले. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढाईत अनेक लोक सहभागी झाले. तसेच महिलांनीही महत्त्वाची कामगिरी बजावली होती. अशा प्रकारे मराठवाडा मुक्ती संग्राम यशस्वी झाला.

-: समाप्त :-

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निबंध मराठी | Marathwada Mukti Sangram Din Essay In Marathi – निबंध क्र.04

जरी जाहला स्वतंत्र भारत देश !
मराठवाडा होता निजामाचा प्रदेश !!
लोहपुरुषाने फौजेला दिला आदेश !
मराठवाडा मुक्तीसंग्राम देतो राष्ट्रीय एकतेचा संदेश !!

आपण दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करतो. हा दिवस मराठवाडा प्रदेशात महत्त्वाचा आहे. मराठवाडा विभागाच्या इतिहासातील महत्त्वाचा संघर्ष आणि स्वातंत्र्यलढ्यांच्या स्मृती जिवंत ठेवने हा या दिवसाचा उद्देश आहे. या दिवशी विविध सोहळे आणि कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये मराठवाड्याचा गौरवशाली इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला जातो.

15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला खरा परंतु, मराठवाड्यातील जनता अजून हैदराबादच्या निजामाच्या जुलमी अधिपत्याखाली होती. त्यावेळी भारत हा विविध संस्थांनामध्ये विस्तारलेला होता.

त्यामध्ये 565 संस्थानांपैकी 562 संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. परंतु हैदराबाद, जुनागढ आणि काश्मीर या संस्थानांनी स्वतःला वेगळी घोषित केले. त्यांनी स्वतंत्र भारतात विलीन होण्यास चक्क नकार दिला.

हैदराबाद स्वतःला स्वतंत्र घोषित केल्यावर साहजिकच भारताच्या बरोबर मध्यावर एक वेगळाच देश निर्माण होण्याची चिन्हे दिसत होती. म्हणजेच आपला भारत देश स्वतंत्र होऊनही काही भाग हा वेगळा होता. तो संस्थानाच्या अधिपत्याखाली येत होता. त्यातच हैदराबाद संस्थान हे एक होते.

स्वामी रामानंद तीर्थ यांनी निजामाविरुद्ध चळवळ सुरू केली. त्यात अनेक स्वतंत्र सैनिकांनी, विद्यार्थ्यांनी, महिलांनी भाग घेतला. शेवटी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोलो अंतर्गत हैद्राबाद संस्थानावर सशस्त्र पोलीस कारवाई केली.

शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थानाचे निजाम शरण आले. आणि अशाप्रकारे मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला. संस्थानाचे विलीनीकरण भारतात करण्यात आले. ज्यामुळे मराठवाड्यातील जनता आज मुक्त श्वास घेत आहेत त्या सर्व शूर स्वातंत्र्य सैनिकांना माझे कोटी कोटी प्रणाम.!

यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा हा विभाग येतो आणि याच मराठवाड्याला 15 ऑगस्ट ऐवजी 17 सप्टेंबर रोजी स्वातंत्र्य मिळाले. या मराठवाडा मुक्ती संग्रामाला आज 75 वर्षे झाली. त्याचा आज 75 वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो आपण सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.!

-: समाप्त :-

मराठवाडा मुक्तिसंग्रामात योगदान देणारे नेते कोणते होते ?

याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.

सारांश | Marathwada Mukti Sangram Din Essay In Marathi | मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निबंध मराठी

मित्रहो, वरील लेखात आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे निबंध मराठी मध्ये बघितले. वरील लेखात आपण एकूण 04+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज निबंध मराठी मध्ये बघितले. शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निबंध स्पर्धा मध्ये ही निबंध आपल्याला नक्कीच खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रपंच कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा मार्गदर्शन असतील तर ते ही कळवा. आपल्या गरजू विद्यार्थी मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला जगभरातून भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे शीर्षक असेही असू शकते –

  • मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचा धगधगता इतिहास निबंध
  • मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचा धगधगता इतिहास निबंध मराठी
  • मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचा धगधगता इतिहास
  • मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निबंध मराठी
  • मराठवाडा मुक्ती संग्राम निबंध मराठी
  • मराठवाडा मुक्ती संग्राम निबंध
  • Marathwada Mukti Sangram Essay In Marathi
  • Marathwada Mukti Sangram Din Nibandh
  • Marathwada Mukti Sangram Nibandh In Marathi
  • Marathwada Mukti Sangram Nibandh
  • मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त निबंध मराठी
  • मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे निबंध मराठी
  • मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाविषयी निबंध मराठी
  • मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाविषयी निबंध
  • 17 सप्टेंबर निबंध मराठी मध्ये
  • 17 सप्टेंबर निबंध मराठी

Leave a Comment