स्वातंत्र्य दिन कविता मराठी 2023 (07+ अतिशय सुंदर कविता) | Independence Day Poem in Marathi | 15 ऑगस्ट कविता मराठी 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

स्वातंत्र्य दिन कविता मराठी 2023 | 15 ऑगस्ट कविता मराठी 2023 | Independence Day Poem in Marathi – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात स्वातंत्र्य दिनानिमित्त कविता मराठी मध्ये बघणार आहोत. येत्या 15 ऑगस्ट 2023 ला आपण 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. अशावेळी आपल्या शाळेत, कार्यालयात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा कार्यक्रमात भाषण किंवा सूत्रसंचालन करताना आपल्याला कवितेची फार आवश्यकता असते.

आज आपण या लेखात 07+ अतिशय सुंदर आणि सोप्या कविता बघणार आहोत. मित्रहो या लेखात दिलेल्या कविता या आमच्या नाहीत. या कविता ज्यांच्या आहेत त्याचे क्रेडिट आम्ही कवितेच्या शेवटी दिलेले आहे. या सर्व कविता आम्ही येथे फक्त शैक्षणिक मदत म्हणून देत आहोत. याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल अशी आशा करतो. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता कवितेला सुरुवात करुया.

स्वातंत्र्य दिन कविता मराठी | Independence Day Poem in Marathi – कविता क्र.01

स्वातंत्र्य दिन

तीन रंगाचा आमुचा तिरंगा,
केशरी, पांढरा अन् हिरवा !
नभी फडकत गातो,
नित्य पराक्रमाची गाथा !!

भारतीय इतिहासात,
तो दिवस अमर झाला !
15 ऑगस्टला,
आमुचा भारत स्वतंत्र झाला !!

ना जातीसाठी लढले,
ना धर्मासाठी लढले,
शूर भारतीय वीर,
फक्त देशासाठी लढले!!

तिरंगा आमुचा मान आहे,
पराक्रमाचे गाण आहे !
भारताची शान आहे,
तिरंगा आमुचा प्राण आहे !!

अनेक जातीधर्म सोबती,
आनंदाने हा राहतो !
देश माझा भारत,
विविधतेत एकता साधतो !!

स्वातंत्र्य दिन कविता हिंदी | Independence Day Poem in Hindi – कविता क्र.02

स्वतंत्रता दिवस

न जाने कितने वीरो ने
अपनी जान गवाई थी
तब जाकर मेरे भारत ने
सही स्वतंत्रता पायी थी !

ये धरती भी हमारी थी
आकाश हमारा था
पर ब्रिटिश के शासन मे
कुछ भी न हमारा था !

मंगल, भगत, आझाद
सबने लडी लढाई थी
तब जाकर मेरे भारत ने
सही स्वतंत्रता पायी थी !

एक समय था जब ये भारत
सोने की चिडिया कहलाता था
यही देखकर इसे विदेशी
हर बार हथीयाना चाहता था !

अंग्रेजो के छक्के छुडाकर
लक्ष्मीबाई ने जान गवाई थी
तब जाकर मेरे भारत ने
सही स्वतंत्रता पाई थी !

अंग्रेजी यहा गर आये थे
उसमे भी कही तो हमारी गलती थी
कुछ अपनो के मन मे ही बडी गद्दारी थी !

स्वातंत्र्य दिन कविता मराठी | Independence Day Kavita Marath i- कविता क्र.03

सुंदर सुंदर माझा देश

सुंदर सुंदर माझा देश,
सगळ्यात वेगळा माझा देश…

जग ज्याच्यावर गर्व करेल,
असा अनोखा माझा देश…

चांदी सोने माझा देश,
सुजलाम सुफलाम माझा देश…

गंगा यमुनेच्या माळेचा,
फुलांसारखा माझा देश…

प्रगती करेल माझा देश,
नियमित खुशाल माझा देश…

इतिहासामध्ये नाव करेल,
असा महान माझा देश…

सुंदर सुंदर माझा देश,
सगळ्यात वेगळा माझा देश…

स्वातंत्र्य दिन कविता मराठी | Independence Day Kavita Marathi- कविता क्र.04

स्वातंत्र्याच्या अफाट समरी

स्वातंत्र्याच्या अफाट समरी
लढल्या कोटी विभूती
देहाच्या केल्या समिधा त्यांनी
अन् प्राणांची आहुती

चाफेकर फडके भगत बोस अन्
राणी ती झाशीची
कितीक द्यावी यादी येथे
अजरामर नावांची

पल्याड यांच्या अनेक अनामिक
जे झिजले या ध्येयाने
असावेत आज लाख दंडवत
त्यांच्याही नावाने

कृतज्ञता ही मनात राहो
मानून त्यांनी मी पथदर्शी
ते होते म्हणून आपण आहो
स्वतंत्र भारतवर्षी

कवी – डॉ. मानसी देशपांडे

15 ऑगस्ट कविता मराठी | 15 August Kavita Marathi – कविता क्र.05

भारत

या जन्माचा नजराणा,
मायभूमीस पेश व्हावा….
तिरंगाच माझा,
गणवेश व्हावा….

सांडावे रुधीर,
या मातृभूमीसाठी…
हरेक जन्मी,
भारत माझा देश व्हावा….

स्वातंत्र्याच्या नभात उधळु चांदणे…
जाणीव करुनी प्रत्येक
कोरोना योद्ध्याची….
जाण ठेऊनी त्याची मनामनाने…..

रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा….
उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा….
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा..
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा…

कवी – अजय नन्नार

15 ऑगस्ट कविता मराठी | 15 August Kavita Marathi – कविता क्र.06

हा देश महान

निळा, हिरवा, भगवा, पिवळा
करा साऱ्या रंगांची या होळी,
या तिरंग्याचा लावा खुशाल
लावा टिळा तुम्ही कपाळी

जाती, धर्म सोडून सारे
व्हा पाईक मानवतेचे,
जपा बंधुता नि समता
गा जयगीत एकतेचे

मिरवू नका घेऊन झेंडे
आहे देश आपला देव,
देशासाठी जगावे, मरावे
जीवनाचं सार्थक व्हावं

नको दंगली, रक्तपात
अहिंसा धर्म हा जपा,
विषमतेच बीज मातीतून
उखडून बंधुंनो टाका

घ्या शपथ या मायभूची
करा अर्पण आपले प्राण,
हा देश आपला महान
मज वाटे हा अभिमान..!

कवी – रवींद्र गायकवाड

15 ऑगस्ट कविता मराठी | 15 August Kavita Marathi – कविता क्र.07

मी माझा भारत ..!

मी स्वतंत्र ,मी स्वतंत्र ,मी स्वतंत्र आहे
आनंदाने मी स्वातंत्र्याचे गीत गात आहे।।धृ।।

काय दिले मज देशाने
ते पहात आहे
मोकळ्या श्वासाचे मी
जीवन जगत आहे….।।१।।

पोटभर भाकरी
मी खात आहे
अंगभर कपडा
अंगावर घालत आहे…।।२।।

निवारा मायेचा मजला
मातृभूमीच्या कुशीत मिळत आहे
विचारांना माझ्या येथे
मोठे मानक लाभत आहे….।।३।।

उज्वलतेचा केशरी मनोहर
सात्विकतेचा सफेद खरोखर
सम्पन्नतेचा हिरवा घेऊन पहा
अशोक चक्रांकित तिरंगा नभी फडकत आहे।।4।।

तिरंग्याला घेऊन हाती
देश छाती फुगवत आहे
स्वातंत्र्याचे गीत सुंदर गाता
सारे ब्रम्हांड कौतुकाने पहात आहे।।५।।

अभिमान मला माझ्या देशाचा
मी स्वतंत्र भारताचा नागरिक आहे
स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले
त्या सर्वांना मी मानवंदना कृतज्ञतेची देत आहे.।।६।।

मी स्वतंत्र मी स्वतंत्र मी स्वतंत्र आहे
आनंदाने मी स्वातंत्र्याचे गीत गात आहे।।धृ।।

कवी – प्रशांत शिंदे

सारांश | स्वातंत्र्य दिन कविता मराठी | Independence Day Poem in Marathi

मित्रहो, वरील लेखात आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन कविता मराठी तून बघितल्या. वरील लेखात आपण एकूण 07+ अतिशय सुंदर आणि सोप्या कविता बघितल्या. स्वातंत्र्य दिनाच्या कविता आपल्याला भाषण देताना नक्कीच खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. या कविता येथे फक्त शैक्षणिक मदत म्हणून दिलेल्या आहेत. या कविता ज्यांच्या आहेत त्यांचेही खूप खूप धन्यवाद.

स्वातंत्र्य दिन कविता मराठी pdf Download

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत, विचार किवा मार्गदर्शन असतील तर ते ही कळवा. आणि हो आपल्या गरजू विद्यार्थ्यांना, मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Leave a Comment