15 ऑगस्ट भाषण मराठी (05+ सर्वोत्तम भाषणे) | 15 August Speech in Marathi 2023 | स्वातंत्र्य दिन भाषण 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

15 ऑगस्ट भाषण मराठी 2023 | स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 2023 | 15 August Speech in Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, प्रथम आपणास व आपल्या परिवारास स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.! आज आपण या लेखात 15 ऑगस्ट निमित्त भाषण मराठी मध्ये बघणार आहोत. 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. 15 ऑगस्ट रोजी आपल्या शाळेत / कार्यालयात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. अशावेळी आपण भाषणात भाग घेऊ शकता.

आज आपण या लेखात एकूण 5+ अतिशय सोपे, सुंदर आणि धडाकेबाज भाषणे बघणार आहोत. ही भाषणे मोठ्या माणसांसाठी तसेच लहान मुलांसाठी देखील खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. तुम्ही या भाषणाची pdf देखील डाऊनलोड करू शकता. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता भाषणाला सुरुवात करुया.

15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 August Bhashan Marathi – भाषण क्र.01

15 ऑगस्ट भाषण मराठी 10 ओळी

 1. सर्वांना माझा नमस्कार.
 2. माझे नाव अमोल पाटील आहे.
 3. आज 15 ऑगस्ट, हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहोत.
 4. प्रथम सर्वांना “भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”
 5. 15 ऑगस्ट हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे.
 6. या दिवशी 1947 मध्ये आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.
 7. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.
 8. आज हा दिवस आपल्याला त्या पराक्रमी वीरांच्या त्यागाची आणि बलिदानाची आठवण करून देतो.
 9. मला माझ्या भारत देशाचा अभिमान आहे.
 10. आज आपण सर्वांनी मिळून भारत देशाला जगातील एक चांगला देश बनवण्याची प्रतिज्ञा करू.

धन्यवाद !
बोला – भारत माता की जय ! वंदे मातरम !

15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 August Bhashan Marathi – भाषण क्र.02

15 ऑगस्ट भाषण मराठी लहान मुलांसाठी

“गुंज रहा है दुनिया मे…
हिंदुस्तान का नारा !
चमक रहा है आसमान में…
तिरंगा हमारा !!”

आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो ! आज 15 ऑगस्ट, हा आपल्या भारत देशाचा सन्मानाचा तसेच उत्साहाचा दिवस आहे. या मंगलदिनी सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

तिरंगा झेंडा फडकतो,
जयजयकार बोला.
15 ऑगस्ट, आज आमचा
भारत देश स्वतंत्र झाला.

15 ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.

मित्रांनो आपल्या भारत देशाला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेली नाही. त्यासाठी अनेक नेत्यांनी आणि शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.

आठवण स्मरावी त्यांची
ज्यांनी देशासाठी बलिदान केले
क्रांतीसाठी जे घटले अन्
क्रांतिवीर झाले.

आपला भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. विविधतेत एकता हे भारताचे ब्रीदवाक्य आहे. भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. परंतु अजूनही गरिबी, भ्रष्टाचार, असमानता अशा समस्या आहेत. त्यावर आपण सर्वांनी मिळून मात केली पाहिजे.

देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन भारताला शिक्षित, स्वस्त, आत्मनिर्भर व स्वच्छ बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

स्वातंत्र्यासाठी ध्वज फडकतो,
सूर्य तळपतो प्रगतीचा,
भारतभूच्या पराक्रमाला,
मुजरा मानाचा…

स्वातंत्र्य दिन भाषण PDF DOWNLOAD

जय हिंद ! जय भारत ! वंदे मातरम !

15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 August Speech in Marathi – भाषण क्र.03

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला…
नतमस्तक मी त्या सर्वांचा,
ज्यांनी भारत देश घडवला…

सन्माननीय, व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर, पूज्य गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या देश बांधवांनो.!

आज 15 ऑगस्ट! आपण सर्वजण इथे आपल्या भारताचा 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत.

सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

मित्रहो 15 ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा, स्वाभिमानाचा दिवस आहे. या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.

आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाष चंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपतराय अशा अनेक थोर स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणास लावले.

त्या सर्व शूर स्वातंत्र्यसैनिकांमुळेच आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत.

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इ. सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

तरीही आज भारतासमोर महागाई, भ्रष्टाचार, गरिबी सारख्या समस्या आ वासून उभ्या आहेत. या समस्यांचे उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय देश सुखी संपन्न व प्रगत होणार नाही.

चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया. शेवटी मला म्हणावेसे वाटते की,

तिरंगा आमुचा ध्वज,
उंच उंच फडकवू…
प्राणपणाने लढून आम्ही,
शान याची वाढवू…

धन्यवाद!
भारत माता की जय ! वंदे मातरम !

15 ऑगस्ट निमित्त भाषण मराठी | 15 August Speech in Marathi – भाषण क्र.04

आज सलाम आहे त्या वीरांना,
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला !
ती आई आहे भाग्यशाली,
जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे,
हा देश अखंड राहिला ..!!

सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, आदरणीय गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित माझ्या देश बांधवांनो.! आज 15 ऑगस्ट आणि आज आपण येथे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना या मंगलमय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!!

मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्या अगोदर सुमारे दीडशे वर्षांपूर्वी इंग्रज भारतात आले होते आणि एखाद्या शेताला जशी कीड लागते तशी व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशात पाय ठेवला आणि कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला. त्यानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीत आपण दीडशे वर्ष भरडत राहिलो. भयानक अत्याचार असह्य वेदना सहन केल्या.

मित्रांनो, पारतंत्र्यात किती दिवस जगायचे? आणि इंग्रजांच्या गुलाम म्हणून किती अत्याचार सहन करायचा? आपल्याच देशात परके म्हणून किती दिवस वापरायचे? सोन्याचा धूर निघत असलेल्या देशाला असं उघड्या डोळ्यांनी लुटताना किती दिवस बघायचं? असा प्रश्न भारत मातेच्या लेकरांना पडला नसता तर नवलच !

अशा नराधमांच्या जुलमी राजवटी विरुद्ध लढण्यासाठी भारत भूमीचे अंकुर उगवले. इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आपल्या देशात आपलीच जनता राज्य करणार अशी मोठी क्रांती करण्याचा निर्णय भारत मातेच्या या क्रांतिकारकांनी घेतला.

अशक्य कोटीतील लक्ष होते! पण नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, खुदीराम बोस, चाफेकर बंधू यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचा ठरवल. कारण याच्या दुर्दम्य इच्छाशक्ती पुढे अशक्य अशी कोणती गोष्ट नव्हतीच मुळी! इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली. हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढ्यात भाग घेतला. अनेक क्रांतिकारक जोखडातून मुक्त हसत हसत फासावर गेले.

महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांसारख्या नेत्यांनीही स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतली. सगळ्या बाजूंनी इंग्रजांना घेण्यात आले. आणि शेवटी तो सुवर्णदिन आला. इंग्रजांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यात भारतीय यशस्वी झाले होते. दीडशे वर्षे या भारत भूमीवर फडकणारा ‘युनियन जॅक’ खाली घेण्यात आला आणि तिरंगा अभिमानाने फडकवण्यात आला.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो प्रखर राष्ट्रभक्तांनी, क्रांतिकारकांनी, नेत्यांनी आपले बलिदान दिले त्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम !! आणि एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण स्वातंत्र्य आहोत. अन्याय आणि अत्याचार सहन करू नका. त्याला वेळीच प्रतिरोध करा. कारण जर गप्प बसू तर परत कोणी राज्य करेल कळणार नाही. आपल्यातील न्यायाची ज्योत पेटत राहू द्या. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.

जय हिंद! जय भारत! वंदे मातरम!

स्वातंत्र्य दिन भाषण मराठी | Independence Day Speech in Marathi 2023 – भाषण क्र.05

रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा…
उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा…
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा…
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा…

सन्माननीय प्राचार्य, पूज्य गुरुजनवर्ग, कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व येथे जमलेले माझे मित्र मैत्रिणींनो! आज 15 ऑगस्ट. आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करीत आहोत.

आपल्या सर्वांसाठी स्वातंत्र्य दिन खूप अनमोल आहे. हे आपण कधीच विसरू शकणार नाही. आपल्या भारत देशावर दीडशे वर्षे इंग्रजांनी राज्य केले. या दीडशे वर्षाच्या काळात भारतीयांचे खूप शोषण केले. भारतीयांवर खूप अन्याय, अत्याचार केले.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आणि अखेर इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो तो दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 होय. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला आहे.

14 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीयांना संदेश देण्याहेतू भाषण केले. ते म्हणाले “सर्व जग झोपत आहे, आज मध्यरात्रीनंतर भारताच्या स्वातंत्र्याची पहाट होणार आहे. सर्वांना स्वातंत्र्याच्या खूप खूप शुभेच्छा.”

आपल्या भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. विविधतेत एकता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच मला म्हणावेसे वाटते,

सुंदर हे जग मे सबसे,
नाम भी न्यारा है,
जहा जाती भाषा से बढकर,
देश प्रेम की धारा है !
निश्चल, पवन, प्रेम पुराना,
भारत देश हमारा है !!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण व वाहतूक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे.

15 ऑगस्ट या आपल्या राष्ट्रीय सणा दिवशी प्रत्येक जण आनंदी असतो. पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकविण्यात येतो. सर्वत्र देशभक्तीपर गीते गायली जातात. देशभक्तीपर भाषणे केली जातात.

आज आपल्या देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. परंतु त्याचबरोबर अनेक समस्या ही आपल्या देशाला भेडसावत आहे. महागाई, भ्रष्टाचार, जातीवाद, व्यसनाधीनता, अत्याचार या सर्व समस्या आवासून आपल्यासमोर उभे आहेत.

अनेक अडचणींवर मात करत आपण स्वातंत्र्य मिळवले आहे. हे स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर आपण या समस्यांना सामोरे जाऊन या समस्या मुळातूनच नष्ट केल्या पाहिजेत. मगच आपला भारत देश सुजलाम सुफलाम बनेल.

जाता जाता मी एवढेच म्हणेन,

स्वातंत्र्याची ध्वजा फडकते,
सूर्य तळपतो प्रगतीचा,
भारत भूमीच्या पराक्रमाला,
माझा मानाचा मुजरा…

जय हिंद! जय भारत! वंदे मातरम!!

सारांश | 15 ऑगस्ट भाषण मराठी 2023 | 15 August Speech in Marathi 2023

मित्रांनो, वरील लेखात आपण 15 ऑगस्ट भाषण मराठी मध्ये बघितले. वरील लेखात आपण एकूण 5+ अतिशय सोपे, सुंदर आणि धडाकेबाज भाषणे बघितली. ही भाषणे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. ही भाषणे आपल्या शाळेत नक्की द्या आणि सर्वांची मने जिंकून घ्या.

स्वातंत्र्य दिन भाषण PDF DOWNLOAD

मित्रांनो आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा विचार असतील तर ते ही कळवा. आणि हो आपल्या गरजू विद्यार्थ्यांना, मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे शीर्षक असेही असू शकतात –

 • स्वातंत्र्य दिनाचे भाषण मराठी
 • स्वातंत्र्य दिनाचे भाषण
 • 15 ऑगस्ट भाषण मराठी
 • 15 ऑगस्ट निमित्त भाषण
 • 15 ऑगस्ट भाषण 2023
 • स्वातंत्र्य दिन भाषण 2023
 • 15 ऑगस्ट भाषण लहान मुलांसाठी
 • स्वातंत्र्य दिन भाषण लहान मुलांसाठी
 • 15 ऑगस्ट भाषण मराठी सोपे
 • स्वातंत्र्य दिन भाषण मराठी सोपे
 • 15 August Bhashan Marathi 2023
 • 15 August Speech in Marathi 2023
 • Independence Day Speech in Marathi
 • 15 August Bhashan 2023
 • 15 August Bhashan Marathi Madhe
 • 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी
 • 15 august speech in marathi for child
 • 15 august speech in marathi for students

स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो?

कारण या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले होते.

Leave a Comment