अण्णाभाऊ साठे जयंती हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी (100+)| Annabhau Sathe Jayanti Quotes in Marathi | Quotes, Wishes, Msg, Status in Marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

अण्णाभाऊ साठे जयंती हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Annabhau Sathe Jayanti Quotes in Marathi – नमस्कार मित्रांनो, 01 ऑगस्ट हा अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस होय. दरवर्षी 01 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरी करतो. अशावेळी आपण एकमेकांना शुभेच्छा देतो.

अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या साहित्यातील काही ओळी आपण जोडल्या तर त्याला एक वेगळेच आकर्षण निर्माण होते. आज आपण या लेखात अण्णाभाऊ साठे जयंती शुभेच्छा संदेश मराठी मध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे Annabhau Sathe Jayanti Quotes, Wishes, Msg, Status in Marathi हे सुध्दा बघणार आहोत.

Annabhau Sathe Jayanti Quotes in Marathi | अण्णाभाऊ साठे यांचे विचार

सत्यास जर जीवणाचा आधार नसेल तर प्रतिभा ही अंधकारातील आरशासारखी निरूपयोगी ठरत असते.

पृथ्वी ही शेशनागाच्या मस्तिकशावर तरलेली नव्हे तर कष्ट करणारया श्रमिक वर्गाच्या तळहातावर तरलेली आहे.

माझ्या राष्ट्रावर, माझ्या देशातील जनतेवर त्यांच्या कतृत्वावर संघर्षावर मला ठाम विश्वास आहे.

माझा भारत देश सुखी, समृदध व्हावा. इथे सगळीकडे समानता वास करावी. या देशाच्या भुमीच स्वर्ग व्हावे. असे स्वप्न मी रोज पाहत असतो अणि हेच स्वप्न पाहत मी लेखन करीत असतो.

जग बदल घालुन घाव सांगुन गेलेत आम्हास भीमराव

दलितांचे जीवण खडकातुन झिरपत असलेल्या पाण्यासारखे असते ते आपण जवळ जाऊन पाहायला हवे. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे आपणास हे तुकाराम महाराज बोलले ते एकदम सत्य आहे.

मनुष्य हा कोणाचा गुलाम नाहीये वास्तविक जगताचा निर्माता आहे.

साहित्य हे आरशाप्रमाणे पारदर्शक अणि स्पष्ट असायला हवे. त्यात आपल्या वास्तविक जीवणाचे प्रतिबिंब दिसायला हवे.

नैराश्य हे तलवारीवर जमलेल्या धुळी प्रमाणे असते अणि आपण ती धुळ जर लगेच झटकुन टाकली तर आपले जीवन पुन्हा तलवारीसारखे धारदार बनु शकते.

आपणा सर्वाची जात ही एक वास्तविक बाब आहे आणि आपण ज्या गरीबीत जगतो ती एक कृत्रिम बाब आहे. गरीबी आपण पैसे कमवून एकटेच नष्ट करू शकतो पण जात नष्ट करायला आपण सगळयांनी मिळून पुढाकार घेणे गरजेचे आहे.

अनिष्ट रुढी परंपरेचे पालन करून मनुष्यास हीनतेची वागणुक देणे हा धर्म नव्हे तर एक सामाजिक कीड आहे.

दलितांना देखील इतर व्यक्तीं सारख्या समान भावभावना असतात. पण दलित हा इतर व्यक्तींपेक्षा थोडा अलग असतो. दलित हा निर्मितीशील असतो तो वास्तव जगामध्ये कष्टाचे मेहनतीचे सागर उपसुन धनाचे डोंगर उभे करत असतो.

कला, कौशल्य हे गरीबांच्या झोपडीमध्ये जन्माला येतात अणि मोठमोठया राजमहालात फक्त जन्माला येत असतात गरीबाचे रक्त पिणारी झुरळ.

आम्हास गंगेसारखे निर्मळ अणि पावन साहित्य पाहिजे आहे. आम्हास मांगल्य हवे आहे. आम्हास मराठी साहित्य परंपरेचा प्रचंड अभिमान आहे. कारण मराठी साहित्य आमच्याच वास्तविक जीवणातील संघर्षाचे चित्रण करते. यातुनच त्याची निर्मिती झाली आहे.

मी जसे जीवण जगत आहे आणि जीवणात जसे बरे वाईट अनुभव मला प्राप्त होता आहे. तेच अनुभव मी लिहित असतो. माझी माणसे मला कुठेतरी भेटली आहेत त्यांच सर्व जगणे मला ठाऊक आहे.

जो कलावंत आपल्या जनतेची कदर करीत असतो. त्याचीच कदर जनता देखील करीत असते. हे मी पहिले शिकतो त्यानंतरच कुठलेही लेखन करीत असतो.

फक्त कल्पणेच्या कृत्रिम डोळयांनी बघुन कुठलेही सत्य दिसुन येत नाही, तर ते सत्य हदयात साठवणे गरजेचे असते.

डोळयांनी सर्व काही दिसत असते. पण ते सर्वच साहित्यास हातभार लावत नसते.

प्रतिभेतुन सत्य अणि जीवणाच वास्तविक दर्शन घडुन येत नसेल तर ती प्रतिभा निरर्थक आहे.

जो जनतेकडे पाठ फिरवतो साहित्य देखील त्याच्याकडे पाठ फिरवित असते.

जगात जेवढेही सर्वश्रेष्ठ कलावंत आहेत त्यांनी वाडमयास विश्वाचे तिसरे नेत्र मानले आहे अणि हे नेत्र सदैव पुढे अणि जनतेबरोबर असायला हवे.

मला कधीही कल्पणेचे खोटे पंख लावून भरारी घेता येत नाही त्याबाबतीत मी स्वताला बेडुकच मानतो.

अण्णाभाऊ साठे जयंती हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Annabhau Sathe Jayanti Wishes in Marathi

वर्गविग्रहाचे तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे …यांना जयंतीनिमित्त… विनम्र अभिवादन !

१३ लोकनाट्य ,३ नाटके ,१३ कथा संग्रह ,३५ कादंबऱ्या ,१ शाहीरी पुस्तक, १५ पोवाडे ,१ प्रवास वर्णन ७ चित्रपट कथा , असे महान साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे …यांना जयंतीनिमित्त… विनम्र अभिवादन !

महाराष्ट्र मायभू अमुची, मराठी भाषिकांची, संत मंहताची, ज्ञानवंताना जन्म देणार नररत्नांचे दिव्य भांडार, समरधिर घेत जिथे अवतार || जी |लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान, लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पुनर्निर्माण …लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंती दिनी || विनम्र अभिवादन ॥

शोषितांचा आक्रोश शब्दातुन मांडनारे थोर समाजसुधारक, लेखक, कवी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

त्या गडद अंधाराचा शेवट दिसत होता.. समतेचा तो दिवा लख्ख चमकत होता…… समाजाचे सर्व कोपरे प्रकाशाने उजळीत विचारांची मशाल पेटविणारा शाहीर,,…. आज वाघापरी लढतांना दिसत होता…

एकजुटीच्या या रथावरती । आरूढ होऊनी चलबा पुढती ।। नव महाराष्ट्रा निर्मुन जगती । करी प्रगट निज नाव || साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दिनी विनम्र अभिवादन

“मी एकटा नाही, युगायुगाची साथ आहे, अरे सावध व्हा प्रस्थापितांनो ही तर तुफानाची सुरुवात आहे..!” – सत्यशोधक अण्णाभाऊ साठे

पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती दलित, कष्टकरी, उपेक्षितांच्या तळहातावर तरलेली आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

कलियुगी माजले पाप, भांडवलदारी साप बेलगामास लागली धाप मारली डफावर थाप अण्णा भाऊंची लेखणी, दशकोटीत देखणी जनता केली स्वाभिमानी, साहित्याचा शिरोमणी / गरिबांच्या चितरकथा, घुसमटलेल्या व्यथा वाचून भडकला माथा, उरी सुलगला भाता साहित्यरत्नाचा विचार होऊ नका लाचार रोखण्या अत्याचार, अन्यायाचा घे समाचार

अण्णाभाऊ साठे – साहित्याच्या समिक्षेने नको त्याचा बाऊ केला. होईल तेवढा खुजा माझा अण्णाभाऊ केला. साऱ्या जगाला कळला, पण त्यांना कळला नाही. कोंबडे गप्पगार बसले, पण सूर्योदय टळला नाही. सारे षडयंत्र उमगले कशाला आणू बोलूनि आव ! लोकशाहीरच गाऊन गेलाय जग बदल घालूनि घाव !!

सारांश | अण्णाभाऊ साठे जयंती हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Annabhau Sathe Jayanti Quotes in Marathi

मित्रांनो वरील लेखात आपण अण्णाभाऊ साठे जयंती हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये बघितले. वरील लेखात आपण अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शूभेच्छा संदेश, कोट्स मराठी तून बघितले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त एकमेकांना शुभेच्छा देताना हे संदेश आपल्याला खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे.

मित्रांनो आपल्याला आमचा हा छोटासा प्रपंच कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा विचार असतील तर ते ही कळवा. आपल्या गरजू मित्रांना, विद्यार्थ्यांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Annabhau Sathe Quotes in Marathi

अण्णाभाऊ साठे जयंती हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

Annabhau Sathe Jayanti Quotes in Marathi

Annabhau Sathe Quotes in Marathi

Leave a Comment