अण्णाभाऊ साठे भाषण मराठी (04+ सर्वोत्तम भाषणे) | Annabhau Sathe Bhashan Marathi | अण्णाभाऊ साठे यांच्यावर भाषण


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

अण्णाभाऊ साठे भाषण मराठी | Annabhau Sathe Bhashan Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी भाषण मराठी मध्ये बघणार आहोत. आपल्या देशात तसेच आपल्या महाराष्ट्रात अनेक थोर समाजसेवक, समाजसुधारक होऊन गेले. त्यापैकी एक म्हणजे आपले अण्णाभाऊ साठे हे होय. ते फक्त समाजसुधारकच नव्हते. ते लेखक, कवी, कथा – कादंबरीकार देखील होते.

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त आपल्या शाळेत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. अशावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी भाषण करावे लागते. किंवा सूत्रसंचालन देखील करावे लागते. अशावेळी आपल्याला हे भाषण नक्कीच खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. आज या लेखात आपण एकूण 4+ अतिशय सोपे, सुंदर आणि धडाकेबाज भाषणे बघणार आहोत.

अण्णाभाऊ साठे भाषण मराठी | Annabhau Sathe Bhashan – भाषण क्र.01

समाजात जगण्यासाठी…
दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान…
साहित्य आणि लोककलेतून केला…
समाजाचा पुननिर्माण…

आपले विचार, कार्य व प्रतिमा यातून लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 01 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते.

गरिबी व भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. ते वडिलांबरोबर मुंबईत आले. तिथे त्यांनी मिळेल ते काम केले. जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. पण ते खचले नाहीत. नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते. धूळ झटकली की तलवार पुन्हा धारदार बनते. अशी त्यांची विचारसरणी होती.

शाळा न शिकताही त्यांनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली. त्यांचा लोकशाहीर म्हणून नावलौकिक झाला. ते म्हणत की मी जे जीवन जगतो, बघतो, अनुभवतो तेच मी लिहितो. त्यांनी कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडे, पटकथा, लावणी यांची निर्मिती केली.

त्यांची ‘मुंबईची लावणी’ व ‘माझी मैना गावावर राहिली’ या लावण्या अविस्मरणीय आहेत. रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते. ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव’ हे आंबेडकरांवरील गीत खूप गाजले. ‘फकीरा’ या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला.

अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रात प्रचंड जनजागृती केली. गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

अशा या थोर शिवशाहीर, भारतीय साहित्यातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे 18 जुलै 1969 रोजी निधन झाले.
अण्णाभाऊ बद्दल कितीही बोलले तरी ते कमीच आहे. जाता जाता एवढेच सांगेन की,
झाले बहु, होतील ही बहु, परंतु यासमहा…

जय हिंद! जय महाराष्ट्र!

अण्णाभाऊ साठे भाषण मराठी | Annabhau Sathe Bhashan Marathi – भाषण क्र.02

शब्दांची खान, महाराष्ट्राची शान…
बहुजनांची आन, साहित्याची मान…
अण्णाभाऊंची लेखणी…
आहे जगात देखणी…

सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो! सर्वांना माझा नमस्कार! सर्वप्रथम सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा..! आज मी आपल्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.

अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक, लोककवी, लेखक व कादंबरीकार होते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे हे होते. त्यांचा जन्म 01 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव वालुबाई आणि वडिलांचे नाव भाऊराव हे होते.

अण्णाभाऊ साठे यांचे शिक्षण फारसे झाले नव्हते. तरीही त्यांनी अनेक उत्कृष्ट कादंबऱ्या व कथांचे लेखन केले. त्यांना आपण पोवाडे व लावणी रचणारा ‘शाहीर’ म्हणूनही ओळखतो. त्यांनी लेखन केलेल्या कादंबरीवर अनेक चित्रपट देखील तयार करण्यात आले. ‘फकीरा‘ ही त्यांची खूप गाजलेली कादंबरी आहे.

या कादंबरीला राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट मराठी कादंबरी म्हणून गौरवण्यात आले आहे. त्यांची ‘वैजयंती’ ही कादंबरी ज्या स्त्रिया तमाशात पहिल्यांदा काम करतात, त्यांचे लोक कसे शोषण करतात, हे चित्रित करते. त्यांची ‘माकडांची चाळ’ ही कादंबरी भटक्या विमुक्त जातींचे चित्रण करते.

अण्णाभाऊ साठे यांनी तमाशा लोककलेस लोकनाट्य असा दर्जा प्राप्त करून दिला. त्यांनी आपले साहित्यातून लोक जागृती केली. समाजात जनजागृती केली.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कामी त्यांनी विशेष योगदान दिले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून गोवा मुक्ती संग्राम यामध्ये विशेष सहभाग घेतला.

दुर्दैवाने 18 जुलै 1959 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या थोर समाजसुधारकाने या जगाचा कायमचा निरोप घेतला. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी भाषण मराठी | Annabhau Sathe Bhashan Marathi – भाषण क्र.03

निरक्षर कसा जो दीड दिवस शाळेत गेला.
केवळ मातंग म्हणून त्याला शाळेतून हाकलला.
याच उद्रेकातून त्याने अवघा समाज
आपल्या लेखणीतून मांडला.
हादरवून सोडला सह्याद्री सारा,
पण त्यानेच संयुक्त महाराष्ट्र घडविला.
शाहीर म्हणावे की साहित्याचा महामेरू,
आजही प्रश्न आम्हास पडत होता.

नमस्कार मित्रांनो आपल्या प्रतिभेने मराठी सारस्वताला समृद्ध करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी.

काही माणसांचा अंत झाला. परंतु त्यांना यश मिळाले नाही. तर काही माणसांना यश मिळालं. मात्र त्याचवेळी त्यांचा अंत झाला. मुळात यश आणि अंत या दोन्ही टप्प्यांच्या मधोमध उभा राहून स्वतःच्या काळजाचे रक्त आपल्या लेखणीला पाजत मातीखाली दबलेल्या माणसांचा हुंकार ज्यांनी आपले साहित्यातून अक्षरबद्ध केले ते लोकशाहीर, साहित्यरत्न, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे होय. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर मी अनन्य खैरनार प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.

मित्रांनो सुधारकांचे कर्ते सुधारक व बोलके सुधारक असे दोन प्रकार पडतात. यातील कर्ते सुधारक या प्रकारात मोडून सातत्याने सामाजिक विषमतेच्या मुळावर घाव घालून समाज परिवर्तनाच्या दिशेने धाव घेण्याचं काम आपल्या उभ्या आयुष्यात अण्णाभाऊ साठे यांनी केल्याचं आपल्याला दिसून येते.

खरंतर दीड दिवसाची शाळा शिकलेला अण्णाभाऊ साठे सारखा अक्षरशून्य असलेला जीवनाचा पाईक लेखणीचे हत्यार बनवतो आणि साहित्य हे समाज परिवर्तनाचे प्रचंड शस्त्र आहे असे म्हणत समोरच्या जगातला सर्वस्पर्शी व्यथासागर आपल्या साहित्याच्या माध्यमातून साकारत असतानाच दीनदलित माणसांची जीवन व्यथेशी चाललेली झुंज हे आपल्या साहित्याचे मूलतत्त्व बनवत असतानाच –

गुलामगिरीच्या चिखलात रूतूनि का
बसलास का ऐरावत
अंग झाडूने निघ बाहेरी
घे बिनीवरती धाव
जग बदल घालुनी घाव

अशा शब्दांमध्ये तिथल्या बहुजन समाजामध्ये संघर्षाच स्पुल्लिंग चेतवायचं काम करायला लागतात हे अण्णाभाऊ साठे यांच्या रूपाने परिवर्तनाची फार मोठी नांदी होती हे ही आपल्याला लक्षात येईल.
म्हणूनच म्हणतात –

दीड दिवसाचं घेतलय शिक्षण,
शाळेच्या दाराला !
साऱ्या रशियान केला सलाम,
एका मागाच्या पोराला !!

जय हिंद ! जय महाराष्ट्र! जय भारत!

अण्णाभाऊ साठे जयंती भाषण मराठी | Annabhau Sathe Speech in Marathi – भाषण क्र.04

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो! प्रथम आपण सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

थोर समाजसेवक, समाजसुधारक, साहित्यसम्राट, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या थोर कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते.

तू गुलाम नाहीस,
तू गुलाम नाहीस,
तू या वास्तव जगाचा,
निर्माता आहेस !

असा क्रांतिकारी संदेश देणारे तुकाराम साठे हे अण्णाभाऊ साठे म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. ते अस्पृश्य व उपेक्षित अशा मातंग समाजामध्ये जन्माला आले आणि या महाराष्ट्राला एक अमूल्य अशी शिकवण देऊन गेले.

मित्रांनो लोकांना मान्य नव्हते ते लोकमान्य झाले. ज्यांच्या हातात तलवार आली ते छत्रपती झाले. 18 तास वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास करून ते विश्वरत्न झाले. पण फक्त या जगात दीड दिवस शाळेत जाऊन आमचे अण्णाभाऊ साहित्यरत्न व लोकशाहीर झाले.

विद्यार्थी मित्रांनो जर आजच्या पिढीने अण्णाभाउंचा आदर्श समोर ठेवला तर राष्ट्र उन्नतीसाठी नक्कीच हातभार लागेल. जर दीड दिवस शाळेत जाऊन अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न, साहित्यसम्राट आणि लोकशाहीर होत असतील तर आपण दहा दहा, बारा बारा वर्ष शाळेत जाऊन एक आदर्श नागरिक का होऊ शकत नाही?

होऊ शकतो. जर आपण थोर महापुरुषांचे आदर्श समोर ठेवले तर! परंतु सध्या तरी असे होताना दिसत नाही. कारण हे महापुरुष, लोकशाहीर आपण फक्त जयंती पुरतेच मर्यादित ठेवले. आमच्या अण्णा भाऊंनी उभे आयुष्य चिरानगरच्या झोपडपट्टीत काढले. आणि याच चिरानगरच्या झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ अशा कलाकृतींची निर्मिती झाली.

अण्णाभाऊ म्हणतात आपण जरी गलिच्छ वस्तीत राहत असलो तरी, आपले मन स्वच्छ असावे. मित्रांनो अण्णाभाऊंना देखील सुखी जीवन जगणे शक्य होते. परंतु अण्णाभाऊंनी दिन दुबळ्यांच्या जगातच कायम वास्तव्य केलं. आणि या जागाच प्रखर वास्तव आपल्या लेखणीतून संपूर्ण जगासमोर मांडलं.

आमचे अण्णाभाऊ एका कवितेच्या शेवटी म्हणतात –

धर ध्वजा कर ऐक्याची,
मनीषा जी महाराष्ट्राची!
पाऊले टाक हिमतीची,
कणखर जणू पोलादाची!!

घे आन स्वातंत्र्याची,
महाराष्ट्रास्तव लढण्याची!
उपकार फेडूनी जन्मभूमीची जाया,
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळूनी काया!

मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली होती. मग त्याला काही जणांनी विरोध दर्शवला. खूप साधक-बाधक चर्चा झाली, परंतु मराठी मनाने संयुक्त महाराष्ट्राचा ध्यास घेतला होता. निष्टेने हे कार्य मराठी माणसे करत होती. त्यांच्या एकजुटीत फूट पडू नये म्हणून आमचे अण्णा भाऊ साठे म्हणतात- हा ऐक्याचा झेंडा हातात घे हीच अवघ्या महाराष्ट्राची मनोकामना आहे आणि ती मनोकामना पूर्ण करण्यास कटिबद्ध हो.

अशाप्रकारे श्रमाचा मूल्य राखून अण्णाभाऊ साठे यांनी उपेक्षितांचे जीवन रेखाटलं. समाजातील हुंडा पद्धती आणि अशा अनेक अनिष्ट रूढी परंपरा यांना त्यांनी कडाडून विरोध केला.

अन्याय अत्याचार विरुद्ध लढणाऱ्या थोर व्यक्तिमत्त्वांचे चित्र आपल्या कादंबरीत त्यांनी रेखाटले. अण्णाभाऊंची ‘फकीरा‘ ही कादंबरी महाराष्ट्रात चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाने त्याला सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार देखील दिला आहे.

मित्रांनो आपली दशा कोणी दुसरा येऊन सुधारेल ही अपेक्षाच मुळात चुकीची आहे. आपली दशा आपणच सुधारली पाहिजे असा संदेश अण्णाभाऊंच्या जीवन कार्यातून आपल्याला मिळतो.

शोषितांचा आक्रोश आपल्या लेखणीतून मांडणारे एक थोर समाजसुधारक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम करते व मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते. धन्यवाद.!

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

सारांश | अण्णाभाऊ साठे भाषण मराठी | Annabhau Sathe Bhashan Marathi

वरील लेखात आपण अण्णाभाऊ साठे यांच्यावर भाषण मराठी मध्ये बघितले. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती किंवा पुण्यतिथी निमित्त वरील भाषणे आपल्याला खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती किंवा पुण्यतिथी च्या वेळी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. अशावेळी तुम्ही जर भाषणात भाग घेतला असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मार्गदर्शन असतील तर ते ही कळवा. आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे शीर्षक असेही असू शकते –

 • Annabhau Sathe Bhashan Marathi
 • Annabhau Sathe Bhashan Marathi Madhe
 • Annabhau Sathe Bhashan
 • Annabhau Sathe Speech in Marathi
 • अण्णाभाऊ साठे यांचे भाषण
 • अण्णाभाऊ साठे यांच्यावर भाषण
 • अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी भाषण
 • अण्णाभाऊ साठे जयंती भाषण मराठी
 • अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी भाषण मराठी
 • अण्णाभाऊ साठे जयंती भाषण
 • अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी भाषण
 • अण्णा भाऊ साठे भाषण
 • अण्णाभाऊ साठे भाषण मराठी
 • अण्णाभाऊ साठे जयंती भाषण मराठी
 • अण्णाभाऊ साठे यांच्यावर भाषण
 • Annabhau Sathe Speech in Marathi
 • अण्णा भाऊ साठे भाषण
 • अण्णाभाऊ साठे भाषण मराठी
 • अण्णाभाऊ साठे जयंती भाषण मराठी
 • अण्णाभाऊ साठे यांच्यावर भाषण
 • Annabhau Sathe Speech in Marath
 • अण्णा भाऊ साठे भाषण
 • अण्णाभाऊ साठे भाषण मराठी
 • अण्णाभाऊ साठे जयंती भाषण मराठी
 • अण्णाभाऊ साठे यांच्यावर भाषण
 • Annabhau Sathe Speech in Marath

3 thoughts on “अण्णाभाऊ साठे भाषण मराठी (04+ सर्वोत्तम भाषणे) | Annabhau Sathe Bhashan Marathi | अण्णाभाऊ साठे यांच्यावर भाषण”

 1. आण्णा भाऊ साठे बद्दल सुंदर मांडणी करुन भाषण साठी जे मुद्दे पाहीजेत ते आपणं सांगितले त्या बद्द्ल धन्यवाद

 2. अण्णा भाऊ साठे यांच्या बद्दल त्यांच्या जीवन कार्याची, समाज कार्याची, त्यांना मिळालेल्या पुरस्कराची अतिशय साचेबद्ध मांडणी व माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!

Leave a Comment