लोकमान्य टिळक भाषण मराठी (04+ सर्वोत्तम भाषणे) | Lokmanya Tilak Speech in Marathi | Lokmanya Tilak Bhashan Marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

लोकमान्य टिळक भाषण मराठी | Lokmanya Tilak Speech in Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त भाषण मराठी मध्ये बघणार आहोत. दरवर्षी 23 जुलै रोजी आपण लोकमान्य टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो. अशावेळी भाषण किंवा सूत्रसंचालन करावे लागते.

आणि म्हणूनच आम्ही आपल्यासाठी या लेखात लोकमान्य टिळक यांच्या वर भाषण घेऊन आलो आहोत. आज आपण या लेखात एकूण 4+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज भाषणे बघणार आहोत. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता भाषणाला सुरुवात करुया.

लोकमान्य टिळक भाषण मराठी – भाषण क्र.01

लोकमान्य टिळक यांच्यावर 10 ओळी भाषण | lokmanya tilak speech in marathi 10 lines

  1. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते.
  2. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला.
  3. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते.
  4. लोकमान्य टिळक व आगरकर यांनी मराठा व केसरी हे दोन वृत्तपत्रे सुरु केली.
  5. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव सुरू केले.
  6. लोकांनी त्यांना नेता म्हणून स्वीकार केल्यामुळे त्यांना ‘लोकमान्य’ ही पदवी देण्यात आली.
  7. महात्मा गांधींनी त्यांना ‘आधुनिक भारताचा निर्माता’ असे म्हटले.
  8. लोकमान्य टिळक हे स्वराज्याचे पहिले पुरस्करते होते.
  9. त्यांना सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रवर्तक म्हणून ओळखली जाते.
  10. 01 ऑगस्ट 1920 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

लोकमान्य टिळक भाषण लहान मुलांसाठी – भाषण क्र.02

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच”….

अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक ..!
सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो….!
सर्वांना माझा नमस्कार….!

आज मी आपल्यासमोर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, लेखक, लोकमान्य टिळक यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे.

लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी मधील चिखलगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आई चे नाव पार्वतीबाई होते.

लोकमान्य टिळक लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते. आत्मविश्वास आणि निर्भीडपना हे त्यांचे गुण होते. 1877 मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवी मिळवली. त्यांनी ‘केसरी’ व ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. लोकांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले.

इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठविल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला.

ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना ‘भारतीय अशांततेचे जनक’ असे म्हटले.

01 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले. भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा मार्ग दाखविणारा दीपस्तंभ मावळला.

अशा थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम!!

Lokmanya Tilak Marathi Bhashan PDF Download

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

लोकमान्य टिळक जयंती भाषण मराठी – भाषण क्र.03

सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो…

सर्वप्रथम, सर्वांना लोकमान्य टिळक यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा..!

आज मी आपल्यासमोर “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे आणि तो मी मिळवणारच.!” अशी सिंहगर्जना करणारे थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांच्या विषयी बोलणार आहे.

लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरीतील चिखलगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत तर आईचे नाव पार्वतीबाई होते. आत्मविश्वास आणि निर्भयपणा हे गुण त्यांच्या अंगी जन्मजात होते.

त्यांनी लोकांसाठी, लोककल्याणाची कामे केली. म्हणून त्यांना ‘लोकमान्य टिळक’ असे म्हटले जाते. लोक सेवेसाठी त्यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश हायस्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी व फर्ग्युसन कॉलेज या शिक्षण संस्था सुरू केल्या.

1881 मध्ये जनजागृती करिता त्यांनी केसरी व मराठा वृत्तपत्राची निर्मिती केली. वृत्तपत्राच्या माध्यमातून जळजळीत लेखन करून त्यांनी इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडले. भारतीय समाजाला एकजूट करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले.

सामान्य जनतेला राष्ट्रीय दृष्ट्या जागृत करून परकीय सत्तेच्या विरोधात उभे करण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी केले. म्हणूनच “भारतीय असंतोषाचे जनक” ही उपाधी त्यांना मिळाली. इंग्रजांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगाव लागला. मंडालेच्या तुरुंगात त्यांनी ‘गीतारहस्य’ या अजोड ग्रंथाचे अभ्यासपूर्ण लेखन केले.

01 ऑगस्ट 1920 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. अशा या देशासाठी जीवन समर्पित करणाऱ्या थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम..!!

धन्यवाद.!

लोकमान्य टिळक जयंती भाषण मराठी | Lokmanya Tilak Jayanti Bhashan Marathi – भाषण क्र.04

“नेतृत्व ते जहाल ते लोकमान्य होते,
समृद्ध लेखनीची जळती मशाल होते,
परकीय बंदीवास शापित देश होता,
पण आग केसरीचा एकेक लेख होता,
त्या सिंह गर्जनेने जागा समाज झाला,
उदयास भारतात स्वातंत्र्य सूर्य आला !!

अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथील जमलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींनो…
प्रथम लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते.

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच .!”

अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे लोकमान्य टिळक यांची आज जयंती.

लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक तर आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचे मूळ नाव केशव असे होते पण ‘बाळ’ हे टोपण नावच कायम राहिले.

प्रखर बुद्धीचा निर्भय विद्यार्थी अशी टिळकांची बालपणापासूनच ख्याती होती. गणित आणि संस्कृत या विषयावर त्यांचा उदंड प्रेम होतं. अतिशय क्लिष्ट गणित ही टिळक अगदी तोंडी सोडवत असत. त्यांच्या या अचाट बुद्धिमत्ते पुढे शिक्षकही चकित होऊन जायचे.

लोकमान्य टिळकांना त्या काळात चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती. पण त्यांनी तो विचार मनातून काढून टाकला. जे सरकार देशावर जुलूम करतं, आपल्या मातृभूमीला लुटून कंगाल करतं, अशांची नोकरी त्यांना कदापि पटली नाही.

हिंदुस्तानी तरुणांनी स्वावलंबी व्हावं. त्यांच्या मनात देशप्रेम जागृत व्हावं. म्हणून राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल या विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेल्या शाळेत त्यांनी पगार न घेता शिक्षकाचे काम पत्करलं.

देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केली. वृत्तपत्राच्या माध्यमातून ते इंग्रज सरकारवर टीका करू लागले. तसेच लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती या उत्सवांना सुरुवात केली.

1897 साली पुण्यात आलेल्या प्रत्येक साथीच्या काळात टिळकांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांनी इंग्रज सरकार विरुद्ध बंड पुकारले. आपल्या वृत्तपत्रातून इंग्रजांवर टीका करणे सुरू केले. त्यामुळे इंग्रजांनी टिळकांना करावासाचे शिक्षा ठोठावली. मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षाची शिक्षा भोगत असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

टिळकांनी स्वराज्याची संकल्पना भारतातील लोकांमध्ये रुजवली. आणि म्हणूनच इंग्रजांनी त्यांना “भारतीय अशांततेचे जनक” म्हणून संबोधले. लोकमान्य टिळकांना आधुनिक भारत आणि आशियायी राष्ट्रवादाचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते.

टिळक म्हणत “कोण कुठला हा इंग्लंड देश? आपण सर्व भारतीय एकत्र येऊन त्यावर थुंकलो तरीही त्यात वाहून जाईल.” स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांनी स्वतःला झोपून दिले होते. ‘देशकार्य म्हणजेच देवकार्य’ हा विचार त्यांनी भारतीयांच्या मनात रुजवला आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.

भारत मातेच्या या अनमोल रत्नाचे 01 ऑगस्ट 1920 रोजी आजारपणामुळे निधन झाले. या थोर नेत्या विषयी सांगावी तितके थोडेच आहे.

भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे असे थोर व्यक्तिमत्व आपल्याला लाभले. याचा मला फार अभिमान आहे. अशा या महान नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम.!!

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

सारांश | लोकमान्य टिळक भाषण मराठी | Lokmanya Tilak Speech in Marathi

मित्रांनो, वरील लेखात आपण लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त भाषण मराठी मध्ये बघितले. वरील लेखात आपण एकूण 04+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज भाषणे बघितली. ही भाषणे आपल्याला लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त नक्कीच खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे.

Lokmanya Tilak Marathi Bhashan PDF Download

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा विचार असतील तर ते ही कळवा. आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे शीर्षक असेही असू शकते –

  • लोकमान्य टिळक भाषण
  • लोकमान्य टिळक भाषण मराठी
  • लोकमान्य टिळक भाषण मराठी लहान मुलांसाठी
  • Lokmanya tilak bhashan marathi
  • लोकमान्य टिळक जयंती भाषण मराठी
  • लोकमान्य टिळक पुण्यतिथी भाषण मराठी
  • Lokmanya Tilak Speech in Marathi

3 thoughts on “लोकमान्य टिळक भाषण मराठी (04+ सर्वोत्तम भाषणे) | Lokmanya Tilak Speech in Marathi | Lokmanya Tilak Bhashan Marathi”

Leave a Comment