टीसी मिळणे बाबत अर्ज (05+ सर्वोत्तम नमुने) | TC Application in Marathi 2023 | Best Application for TC in Marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

टीसी मिळणे बाबत अर्ज मराठी | TC Application in Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात टीसी मिळण्याबाबत अर्ज नमुना मराठी मध्ये बघणार आहोत. 10 वी, 12 वीचा निकाल लागला. सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन. आता सर्व विद्यार्थ्यांना पुढील शाळा, कॉलेज चे वेध लागले आहे. शाळा सोडण्यासाठी टीसी ची आवश्यकता असते. त्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागतो. परंतु टीसी मिळण्याबाबत अर्ज कसा लिहावा हे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहीत नसते.

आज आपण या लेखात टीसी मिळण्याबाबतचा अर्ज कसा लिहावा. टीसी मिळण्याबाबत अर्ज नमुना मराठी मध्ये बघणार आहोत. आज या लेखात आपण एकूण 5+ अतिशय सुंदर, सोपे आणि जबरदस्त नमुने बघणार आहोत. ही नमुने शाळा सोडण्यासाठी तसेच कॉलेज सोडण्यासाठी आपल्याला खूप उपयुक्त पडणार आहे.

टीसी मिळण्याबाबत अर्ज | शाळा | TC Application in Marathi – नमुना क्र.01

दि.10/06/2023

प्रति,
मा. मुख्याध्यापक,
श्री. गणेश विद्यालय, देवगाव(रं)
ता. कन्नड, जि. छ. संभाजीनगर

अर्जदार :- प्रकाश अरविंद पाटील.
विषय :- टी.सी. मिळणे बाबत.

महोदय,
वरील विषयास अनुसरून अर्ज करतो कि, मी प्रकाश अरविंद पाटील, इयत्ता 10 वी (तुकडी ब, रोल नं. 50) या वर्गात सण 2022-23 या वर्षी शिक्षण घेत होतो. मार्च 2023 मध्ये झालेल्या S.S.C. परीक्षेत मी उत्तीर्ण झालो आहे. तरी पुढील शिक्षणासाठी मला टी.सी. ची आवश्यकता आहे. तरी तो मला लवकरात लवकर मिळावा ही नम्र विनंती.

आपला आज्ञाधारक विद्यार्थी,
सही ——–
प्रकाश अरविंद पाटील.

टीसी मिळण्याबाबत अर्ज | कॉलेज | College TC Application in Marathi – नमुना क्र.02

दि.15/06/2023

प्रति,
मा. प्राचार्य,
सरस्वती ज्युनियर कॉलेज, टिटवाळा,
ता. कल्याण, जि. ठाणे.

अर्जदार :- शुभांगी प्रमोद देशमुख.
विषय :- T.C. मिळणे बाबत.

महोदय,
वरील विषयास अनुसरून अर्ज करते कि, मी शुभांगी प्रमोद देशमुख आपल्या कॉलेज ची विद्यार्थीनी असून मी इयत्ता 12 वी (तुकडी अ, रोल नं. 31) या वर्गात सण 2022-23 या वर्षी शिक्षण घेत होते. मार्च 2023 मध्ये झालेल्या H.S.C. परीक्षेत मी उत्तीर्ण झाले आहे. तरी पुढील शिक्षणासाठी मला टी.सी. ची आवश्यकता आहे. तरी तो मला लवकरात लवकर मिळावा ही नम्र विनंती.

आपली आज्ञाधारक,
सही ——–
शुभांगी प्रमोद देशमुख.

टीसी मिळण्याबाबत अर्ज मराठी | TC Application in Marathi – नमुना क्र.03

दि. 10/07/2023

प्रति,
मा. मुख्याध्यापक / प्राचार्य,
रेश्माई माध्यमिक विद्यालय,
ता. गंगापूर, जि. नाशिक.

विषय :- शाळा सोडल्याचा दाखला मिळणे बाबत.
अर्जदार :- सुरेश भारत कांबीलकर.
मु. पो. राजेवाडी, ता. गंगापूर, जि. नाशिक

महोदय,

वरील विषयान्वये विनंती अर्ज करतो / करते की, मी आपल्या शाळेत सन 2017 ते 2020 पर्यंत शिकत होतो / होते. मला माझ्या शैक्षणिक / निवडणूक / शासकीय / अन्य कारणासाठी शाळा सोडल्याचा दाखला हवा आहे. तरी शक्य तितक्या लवकर मला शाळा सोडल्याचा दाखला मिळावा ही आपणास नम्र विनंती.

आपला / आपली नम्र
सही ——
नाव – सुरेश भारत कांबिलकर.

टीसी अर्ज PDF DOWNLOAD

टीसी मिळणे बाबत अर्ज | Application for TC in Marathi – नमुना क्र.04

दि.11/06/2023

प्रति,
मा. मुख्याध्यापक,
रेश्माई विद्यामंदिर, कराड
ता. कराड, जि. सांगली

अर्जदार :- आयांश राजकुमार कांबळे.
विषय :- टी.सी. मिळणे बाबत अर्ज.

महोदय,
वरील विषयास अनुसरून अर्ज करतो कि, मी आयांश राजकुमार कांबळे, इयत्ता 5 वी (तुकडी क, रोल नं. 23) या वर्गात सण 2022-23 या वर्षी शिक्षण घेत होतो. माझे वडील शासकीय अधिकारी आहेत. माझ्या वडिलांची शासकीय कारणास्तव सोलापूर येथे बदली झाली आहे. त्यामुळे मला सोलापूर येथे शाळेत प्रवेश घ्यायचा आहे. तरी पुढील शिक्षणासाठी मला टी.सी. ची आवश्यकता आहे. तरी तो मला लवकरात लवकर मिळावा ही नम्र विनंती.

आपला आज्ञाधारक विद्यार्थी,
सही ——
आयांश राजकुमार कांबळे.

टीसी मिळणे बाबत अर्ज मराठी | Application for TC in Marathi – नमुना क्र.05

कु. सुनिल शिवसींग जारवाल,
A204, नारायण नगर सोसायटी,
कोपरगाव, जि. अहमदनगर,
दि. 30 मे 2023.

प्रति,
मा. मुख्याध्यापक,
सरस्वती विद्यामंदिर, कोपरगाव,
जि. अहमदनगर.

अर्जदार :- कु. सुनिल शिवसींग जारवाल.
विषय :- शाळा सोडल्याचा दाखला मिळणेबाबत.

महोदय वरील विषयास अनुसरून मी, सुनील शिवसिंग जारवाल आपणास विनंती करतो की, मी आपल्या महाविद्यालयात सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात शिकत होतो. या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम परीक्षेत मी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालो असून मला पुढील शिक्षणासाठी या दाखल्याची अत्यंत आवश्यकता आहे.

कृपया आपणास विनंती आहे की माझ्या 102A/2022-23 या नोंदणी क्रमांकाचा दाखला लवकरात लवकर मिळावा.

आपला आज्ञाधारक विद्यार्थी
सही ——
सुनील शिवसिंग जारवाल.

सारांश | टीसी मिळणे बाबत अर्ज मराठी | Application for TC in Marathi

मित्रांनो वरील लेखात आपण टीसी मिळण्याबाबत अर्ज नमुना मराठी मध्ये बघितले. वरील नमुने आपल्या शाळा सोडण्यासाठी तसेच कॉलेज सोडण्यासाठी देखील उपयोगी पडतील. वरील नमुने अगदी सोपे असून टीसी मिळवण्यासाठी तुमची मदत करेल.

टीसी अर्ज PDF

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा विचार असतील तर ते ही कळवा. आपल्या गरजू मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Leave a Comment