स्वातंत्र्य दिन चारोळ्या मराठी (100+ अतिशय सुंदर) | Swatantra Din Charolya Marathi | 15 ऑगस्ट चारोळ्या मराठी 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

स्वातंत्र्य दिन चारोळ्या मराठी 2023 | 15 ऑगस्ट चारोळ्या मराठी 2023 | Swatantra Din Charolya Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या चारोळ्या मराठी मध्ये बघणार आहोत. येत्या 15 ऑगस्ट ला आपण 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या शाळेत, कार्यालयात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. अशावेळी आपल्याला भाषण, सूत्रसंचालन करावे लागते.

भाषण किंवा सूत्रसंचालन करताना जर चारोळ्या वापरल्यास आपल्या भाषणाला एक वेगळेच आकर्षण निर्माण होते. चारोळी वापरल्यास आपण श्रोत्यांची मने नक्कीच जिंकू शकता. आणि वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवू शकता. भाषणात चारोळ्यांचे महत्त्व अनन्यसाधारण साधारण आहे.

आज आपण या लेखात एकूण 100+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज चारोळ्या बघणार आहोत. आम्हाला खात्री आहे की आपल्याला ह्या चारोळ्या नक्कीच उपयोगी पडतील. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता चारोळी ला सुरुवात करुया.

स्वातंत्र्य दिन चारोळ्या मराठी | Swatantra Din Charolya Marathi

उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला..

अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेलल्या गोळ्या आपल्या निधड्या छातीवर,
म्हणून आज आपण स्वाभिमानाने उभे आहोत या मातीवर….

तीन रंगाचा आमुचा तिरंगा, केशरी, पांढरा अन् हिरवा…
नभी फडकत गातो, नित्य पराक्रमाची गाथा…

भारतीय इतिहासात, तो दिवस अमर झाला. …
१५ ऑगस्टला, आमुचा भारत स्वतंत्र झाला…

ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले,
शूर भारतीय वीर, फक्त देशासाठी लढले….

तिरंगा आमुचा मान आहे, पराक्रमाचे गान आहे.
भारताची शान आहे, तिरंगा आमुचा प्राण आहे…

अनेक जातीधर्म सोबती, आनंदाने हा राहतो….
देश माझा भारत, विविधतेत एकता साधतो…

रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा,
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा !

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुझ्यासाठी
अनेकांनी दिले बलिदान….
वंदन तयासी करूनिया आज
गाऊ भारतमातेचे गुणगान….

ज्या भूमीवर वाहते गोदावरी, कृष्णा, यमुना, गंगा…
हिमालयाच्या शिखरावर सदैव फडकतो अभिमानाने तिरंगा…

स्वातंत्र्यवीरांना करुया शत शत प्रणाम
ज्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…

स्वातंत्र्य, समता, बंधुता हाच आहे घटनेचा पाया,
लोकशाही बळकट करण्या संविधानाचा जागर करूया….

हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई जेथे बंधुभावाचे व्रत आहे,
त्या सुंदर देशाचे नाव फक्त भारत आहे..

आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से मे ये मूकाम आता है
खुशनशीब होता है वो खून जो देश के काम आता है….

जगले ते देशासाठी अन देशासाठीच हुतात्मा झाले,
भारत मातेला त्यांनी गुलामीतून मुक्त केले….

विविधतेत एकता आहे आमची शान,
म्हणूनच आहे आमचा भारत देश महान..

भारत देश आहे आमचा महान
सदैव आम्हा स्फूर्ती देते आमचे संविधान…

मतभेद सारे विसरूया बंधने सारे तोडूया,
एक मनाने, एक भावनेने आज पुन्हा एक होऊया..

स्वतंत्रता से सब खुशहाली है समता से सब एक समान,
बंधुता हमको बांधे रखती गणतंत्र होता बलवान…

स्वातंत्र्य दिनाला ध्वजवंदन हे अखंडतेची महती,
व्यक्त करतो आदर आम्ही भारतीय संविधानाप्रति..

अनेकांनी केला सर्वस्वाचा त्याग दिले देशासाठी बलिदान
वंदन तयासी करूया आज गाऊ भारतमातेचे गुणगान…

15 ऑगस्ट चारोळ्या मराठी | 15 August Charolya Marathi

“तिरंगा झेंडा फडफडे जय जय कार बोला
15 ऑगस्ट आज आमुचा भारत स्वतंत्र झाला.

दे सलामी… या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे,
हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.

या जन्माचा नजराना, माय भूमीस पेश व्हावा
तिरंगाच व्हावा गणवेश माझा.

देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.

स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा
भारत भूमीच्या पराक्रमाला आमुचा मानाचा मुजरा..

मुक्त आमुचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी आनंद आज उरी निनादे..

निशाण फडकत राही निशाण झळकत राही
देशभक्तीचे गीत आमचे दुनियेत निनादत राही..

किती आक्रोश तो जाहला किती रक्तांच्या नद्या वाहिल्या
सडा पडला मृतदेहांचा तेव्हा स्वातंत्र्यदिन उदयास आला..

आठवण स्मरावी त्यांची बलिदान ते केले
क्रांतीसाठी झटले अन क्रांतिवीर जे झाले..

स्वातंत्र्य दिन चारोळ्या हिंदी | Swatantra Din Charolya Hindi

ना मरो सनम बेवफा के लिए
दो गज़ जमीन नहीं मिलेगी दफ़न होने के लिए
मरना हैं तो मरो वतन के लिए
हसीना भी दुप्पट्टा उतार देगी तेरे कफ़न के लिए

जमाने में मिलते हैं आशिक कई, जमाने में मिलते हैं आशिक कई
मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता
नोटों में लिपट कर सोने में सिमटकर नोटों में लिपट कर सोने में सिमटकर मरे हैं कई
मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफ़न नहीं होता

मैं भारत बरस का हरदम अमित सम्मान करता हूँ
यहाँ की चांदनी मिट्टी का ही गुणगान करता हूँ
मुझे चिंता नहीं है स्वर्ग जाकर मोक्ष पाने की
तिरंगा हो कफ़न मेरा, बस यही अरमान रखता हूँ

काश मेरी जिंदगी मे सरहद की कोइ शाम आए
मेरी जिंदगी मेरे वतन के काम आए
ना खौफ है मौत का ना आरजु है जन्नत की
लेकीन जब कभी जीक्र हो शहीदो का
काश मेरा भी नाम आए।। काश मेरा भी नाम आए

भूल न जाना भारत मां के सपूतों का बलिदान
इस दिन के लिए हुए थे जो हंसकर कुरबान
आजादी की ये खुशियां मनाकर लो ये शपथ
कि बनाएंगे देश भारत को और भी महान

यदि प्रेरणा शहीदों से नहीं लेंगे
तो ये आजादी ढलती हुई साँझ हो जायेगी
और पूजे न गए, वीर
तो सच कहता हूँ कि नौजवानी बाँझ हो जायेगी

मुकम्मल है इबादत और मैं वतन ईमान रखता हूँ
वतन के शान की खातिर हथेली पे जान रखता हूँ
क्यु पढ़ते हो मेरी आँखों में नक्शा पाकिस्तान का
मुस्लमान हूँ मैं सच्चा, दिल में हिंदुस्तान रखता हूँ

सारांश | स्वातंत्र्य दिनानिमित्त चारोळ्या मराठी

मित्रहो, वरील लेखात आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन चारोळ्या मराठी मध्ये बघितल्या. वरील लेखात आपण एकूण 100+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज चारोळ्या बघितल्या. या चारोळ्या आपण भाषण, सूत्रसंचालन करताना नक्की वापरा आणि श्रोत्यांची मने जिंकून घ्या.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रपंच कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा विचार असतील तर ते ही कळवा. आपल्या गरजू विद्यार्थ्यांना, मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

स्वातंत्र्य दिन चारोळ्या मराठी 2023 | Swatantra Din Charolya Marathi 2023 | 15 ऑगस्ट चारोळ्या मराठी 2023

1 thought on “स्वातंत्र्य दिन चारोळ्या मराठी (100+ अतिशय सुंदर) | Swatantra Din Charolya Marathi | 15 ऑगस्ट चारोळ्या मराठी 2023”

Leave a Comment