नागपंचमी माहिती मराठी 2023 | Nag Panchami Information in Marathi 2023 | नागपंचमी का साजरी करतात?


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

नागपंचमी माहिती मराठी 2023 | Nag Panchami Information in Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, नागपंचमी ला आपण सर्व झोके खेळतो. नागोबाला दूध पाजतो, त्याची पूजा करतो. नागपंचमी आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो. परंतु आपल्याला माहीत आहे का की आपण नागपंचमी का साजरी करतो? यामागील शास्त्रीय कारण काय आहे? नागपंचमी ची पौराणिक कथा काय आहे? नागपंचमी 2023 कधी आहे?

तर मित्रांनो आज आपण या लेखात नागपंचमी माहिती मराठी मध्ये बघणार आहोत. आज आपण या लेखात नागपंचमी का साजरी करतो? यामागील शास्त्रीय कारण काय आहे? नागपंचमी ची पौराणिक कथा काय आहे? नागपंचमी ची पूजा कशी करावी? नागपंचमी चे महत्व काय आहे? अशा सर्व बाबींची माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो सुरुवात करुया.

नागपंचमी माहिती मराठी | Nag Panchami Information in Marathi

नागपंचमी 2023 मध्ये कधी आहे?

हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 21 ऑगस्टच्या मध्यरात्री 12:21 पासून सुरू होईल आणि 22 ऑगस्ट च्या मध्यरात्री 2:00 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार नागपंचमी 21 ऑगस्ट सोमवारी साजरी केली जाईल.

सोमवार हा भगवान शिवाला समर्पित असल्याने आणि नाग भगवान शिवाचे भक्त असल्याने सोमवारी येणारी नागपंचमी अत्यंत शुभ मानली जाते.

नागपंचमीच्या दिवशी नागदेवता आणि भगवान शंकराची पूजा केल्याने सर्पदंश आणि अकालीन मृत्यूचा धोका टाळतो. या सोबतच भगवान शंकराची पूजा केल्याने ग्रहदोष दूर होतात.

नागपंचमी कथा

आटपाट नगर होते. त्या नगरात एक गरीब शेतकरी कुटुंब राहत होते. त्या शेतकऱ्याला दोन मुले व एक मुलगी होती. एकदा शेतात नागर फिरवत असताना शेतकऱ्याकडून नागाची तीन पिल्ले चिरडून मरण पावतात. मरण पावलेल्या पिल्लांकडे पाहून नागिणीने आक्रोश केला. त्यानंतर नागिणीच्या मनात त्या शेतकऱ्या विषयी सुडाची आग धगधगू लागली.

एके दिवशी तिने शेतकऱ्याचा सूड घ्यायचे ठरवले. रात्री अंधाराचा फायदा घेऊन नागिन शेतकऱ्यांसह त्याची पत्नी व दोन मुलांना डसली. दुसऱ्या दिवशी नागीण पुन्हा शेतकऱ्याच्या मुलीला डसण्यासाठी त्याच्या घरी आली.

परंतु नागिनीला पाहताच शेतकऱ्याच्या मुलीने नागिन समोर दुधाने भरलेली वाटी ठेवली व तिची क्षमा मागितली. शेतकऱ्याच्या मुलीची श्रद्धा पाहून नागिन तिच्यावर प्रसन्न झाली. त्यानंतर नागिनीने तिचे आई-वडील व दोन भाऊ यांना जिवंत केले.

तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा होता. या दिवसापासून नागदेवतेचा कोप दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात येणाऱ्या पंचमीला नागाचे विधिवत पूजन केले जाते.

नागपंचमी उपवासाचे महत्त्व

पाच युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वरचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्नग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात.

भावाला चिरंतन आयुष्य व अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख व संकट यातून तारला जावो. हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याच्या भावाला 75 टक्के लाभ होतो व त्याचे रक्षण होते.

नागाची पूजा करण्यामागील शास्त्र

सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.

नागपंचमीला मेहंदी लावण्याचे महत्त्व

सत्येश्वर नागराजाच्या रूपात सत्येश्वरीच्या समोर उभा राहिला. तो निघून जाईल, असे वाटून तिने त्याच्याकडून म्हणजे नागराजाकडून तसे हातांवर वचन घेतले. ते वचन देताना सत्येश्वरीच्या हातावर वचन चिन्ह निर्माण झाले. त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातावर मेहंदी काढते.

झोका का खेळतात?

दुसऱ्या दिवशी सत्येश्वरीला नागराज दिसला नाही. तेव्हा ती जंगलात सैरावैरा भटकू लागली व शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजांनी तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्वराचे रूप प्रकट केले. तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यावर झोके घेऊ लागली.

त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. त्या दिवशी झोका खेळण्यामागील उद्देश्य असतो – जसा झोका वर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे व झोका खाली येतो तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी व दुःखे खाली जाऊ देत.

नवीन वस्त्रे आणि अलंकार का घालतात?

सत्येश्वरीचा भावासाठी शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी व तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले. त्यातून सत्येश्वर समाधानी झाला. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्रे व अलंकार घालतात.

नागपंचमीची पूजा कशी करावी?

ग्रामीण भागात गावातील सर्व महिला मिळून वारुळाला जाऊन नागदेवतेची पूजा करण्याची प्रथा आहे. वारुळा जवळ जाऊन नागदेवतेला लाह्या, दूध, साखर व पुरणा पासून बनवलेल्या उकडीची दिंड वारूळाजवळ ठेवून पूजा केली जाते.

शहरी भागात स्त्रियांना वारुळाला जाणे शक्य नसल्याकारणाने त्या या दिवशी पारंपारिक वेशभूषा करून घरातच पाटावर हळद व चंदनाचा वापर करून नाग नागिन व त्यांची पिल्ले यांचे चित्र काढतात व त्यांना दूध, लाह्या, पूरणा पासून बनवलेल्या उकडीची दिंड, दुर्वा, आघाडा व साखर वाहून त्याची पूजा करतात.

आपल्याला पडणारी काही मुख्य प्रश्न –

  1. नागपंचमी कधी आहे?

    नागपंचमी 2023 मध्ये 21 ऑगस्ट रोजी आहे.

  2. नागपंचमी कशी साजरी करतात?

    नागपंचमी च्या दिवशी सर्व स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार घालून वारुळला जाऊन नाग देवतेची पूजा करतात. सर्व स्त्रिया दुसऱ्या दिवशी झोके खेळतात. अशाप्रकारे नागपंचमी साजरी केली जाते.

  3. नागपंचमी का साजरी करतात?

    पौराणिक कथेनुसार बहीण ही भावाच्या रक्षणासाठी आणि त्याच्या प्रगतीसाठी नाग देवतेची उपासना करते. नाग देवतेची पूजा केली जाते. त्यालाच नागपंचमी असे म्हणतात.

सारांश | Nag Panchami Mahiti Marathi | नागपंचमी माहिती मराठी

श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी होय. येत्या 21 ऑगस्ट ला आपण नाग पंचमी मोठ्या उत्साहात साजरी करणार आहोत. वरील लेखात आपण नागपंचमी ची माहिती मराठी मध्ये बघितली. वरील लेखात आपण नाग पंचमी ची सखोल आणि संपूर्ण माहिती बघितली जसे की नागपंचमी ची कथा, नाग पंचमी का साजरी करतात?

मित्रहो आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मार्गदर्शन किंवा मते असतील तर ते ही आम्हाला कळवा. आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

नागपंचमी माहिती मराठी 2023 | Nag Panchami Information in Marathi 2023 | नागपंचमी का साजरी करतात?

1 thought on “नागपंचमी माहिती मराठी 2023 | Nag Panchami Information in Marathi 2023 | नागपंचमी का साजरी करतात?”

Leave a Comment