नागपंचमी निबंध मराठी (05+ सर्वोत्तम निबंध) | Nag Panchami Nibandh Marathi 2023 | माझा आवडता सण नागपंचमी निबंध मराठी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

नागपंचमी निबंध मराठी 2023 | Nag Panchami Nibandh Marathi 2023 – नमस्कार माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, श्रावण महिना हा सणांचा महिना मानला जातो. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच ‘नागपंचमी‘ होय. आपल्याला शाळेत माझा आवडता सण नागपंचमी या विषयावर निबंध लिहिण्यासाठी सांगितले जाते. किंवा परिक्षेत देखील माझा आवडता सण या विषयावर निबंध लिहिण्यासाठी 05 ते 10 गुणासाठी प्रश्न नक्की विचारला जातो.

आज आपण या लेखात नागपंचमी निबंध मराठी मध्ये बघणार आहोत. याला आपण माझा आवडता सण नागपंचमी निबंध मराठी असेही म्हणू शकतात. आज आपण या लेखात एकूण 05+ अतिशय सुंदर आणि सोपे निबंध बघणार आहोत. चला तर मित्रांनो निबंधाला सुरुवात करुया.

नागपंचमी निबंध मराठी | Nag Panchami Nibandh Marathi – निबंध क्र.01

नागपंचमी निबंध मराठी 10 ओळी

  1. नागपंचमी हा माझा आवडता सण आहे.
  2. नागपंचमीच्या दिवशी आम्ही सर्व मैत्रिणी छान छान कपडे आणि अलंकार घालतो.
  3. आणि मग आम्ही वारुळाला जाऊन नाग देवतेची पूजा करतो.
  4. नागपंचमी ला आम्ही सर्व मैत्रिणी मिळून खूप झोके खेळतो.
  5. झोके खेळण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही.
  6. त्या दिवशी घरात गोड गोड पदार्थ बनवले जातात.
  7. नागपंचमीला सर्व लग्न झालेल्या मुली आपल्या माहेरी येतात.
  8. हा सण मुख्यतः महिलांचा सण समजला जातो.
  9. सर्व महिला आणि मुली या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात.
  10. नागपंचमी ला खूप मजा येते.

नागपंचमी निबंध मराठी | Nag Panchami Nibandh Marathi – निबंध क्र.02

सर्व स्त्रिया व मुली यांना हवाहवासा वाटणारा सण म्हणजे ‘नागपंचमी’. श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी असतो. हा सण श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी येतो.

नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया भक्ती भावाने नागदेवतेची पूजा करतात. ग्रामीण भागातील स्त्रिया पारंपारिक वेशभूषा करून एकत्र येऊन नागाच्या वारुळा जवळ जाऊन तिथे पूजा करतात. दूध व लाह्यांचा नैवेद्य दाखवतात.

काहीजणी घरांमध्येच पाटावरती नागाची मूर्ती ठेवून किंवा नागाचे चित्र काढून त्याची पूजा करतात. या दिवशी स्त्रिया व मुली झोका, झिम्मा व फुगडी खेळतात. तसेच नागपंचमीची गाणी म्हणतात.

या सणाच्या आदल्या दिवशी स्त्रिया भावासाठी उपवास करतात. नागाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखले जाते. कारण साप शेतामध्ये असलेले उपद्रवी उंदीर व कीटक खातो आणि शेतकऱ्यांच्या पिकाचे रक्षण करतो.

हा सण नागाबद्दल समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी व सापांचे संरक्षण करण्यासाठी साजरा केला जातो. जर आपल्याला कुठे साप दिसला तर त्याला मारू नका. सर्पमित्राला बोलवून सापाला जंगलात सोडावे.

नागपंचमीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!

-: समाप्त :-

माझा आवडता सण नागपंचमी निबंध | Maza Avadta San Nag Panchami Nibandh Marathi – निबंध क्र.03

वसंत ऋतुच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नागपंचमीच्या शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी !

श्रावण महिना सुरू झाल्यावर येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी होय. नागपंचमी हा एक पारंपारिक सण आहे आणि हा हिंदू लोकांमध्ये श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी सर्वत्र आनंदात व उत्साहात साजरा केला जातो.

या दिवशी घरोघरी नाग देवतांचे पूजन केले जाते. ग्रामीण भागांमध्ये सर्व स्त्रिया एकत्र येऊन पारंपारिक वेशभूषा करून बाहेर असणाऱ्या नागाच्या वारुळा जवळ जाऊन तेथे पूजा करतात. नागदेवतेला दूध, लाह्या तसेच पुरणाची दिंड इत्यादीचा नैवेद्य दाखवतात. पारंपारिक खेळ खेळतात.

नागपंचमीची गाणी म्हणतात. या सणाच्या आदल्या दिवशी स्त्रिया हातावर मेहंदी काढतात. तसेच आपल्या भावाला चिरंतर आयुष्याची प्राप्ती होवो आणि तो आपल्या प्रत्येक सुखदुःख आणि संकटातून तारला जावो. यासाठी नागपंचमीचा उपवास करतात.

नागपंचमीचा सण हा सर्व प्राण्यांबद्दल आदर, प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. नागाला शंकर देवाच्या गळ्यातील हाराच स्थान आहे. तर साक्षात विष्णू भगवान यांची शय्या म्हणून देखील नागाला स्थान आहे.

लोक जीवनात ही भारतीयांचं नागाशी पुर्वीपासून दृढ नात आहे. याच कारणामुळे नागाची देवता म्हणून पूजा केली जाते.

आजही भारतातील अधिकांशी लोकसंख्या ही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. नाग शेतकऱ्याचा मित्र आहे. तो शेतीतील उंदीर तसेच इतर नुकसानकारक जीव खाऊन आपला उदरनिर्वाह करतो. सापाला क्षेत्रपालही म्हणतात.

आज दिवसेंदिवस सापांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे उंदीर शेतमालाचे नुकसान करत आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या समतोलासाठी कुठेही साप आढळल्यास सर्पमित्रांना बोलवून त्यांना लोकवस्ती पासून दूर जंगलात सोडावे.

चला तर मग मित्रांनो आज नागपंचमीच्या दिवशी संकल्प करूया – “रक्षण करूया नागाचे, जतन करूया आपल्या निसर्गाचे”
नागपंचमीच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

-: समाप्त :-

माझा आवडता सण नागपंचमी निबंध मराठी | Maza Avadta San Nag Panchami Nibandh Marathi – निबंध क्र.04

मराठी महिन्यातील पाचवा महिना म्हणजे श्रावण श्रावण. हा सणांचा महिना आहे. अशा या पावित्र महिन्यातील सणांची सुरुवात नागपंचमी पासून होते. या महिन्यात निसर्ग फळाफुलांनी नटलेला असतो. धरती जणू हिरवा शालू परिधान केल्याचे भासते.

नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतामध्ये उंदीर पिकाची नासधूस करतात. त्यांना मारण्याचे काम नागच करतो. म्हणून तर आपण नागपंचमी साजरी करून नागाविषयी प्रेम व्यक्त करतो.

नागपंचमी दिवशी दिवसा स्त्रिया मुली वारुळाला जातात. नागोबाची मनोभावे पूजा करतात. सासुरवाशींनी माहेरी येतात. फुगड्या, झिम्मा अशी पारंपारिक खेळ खेळतात. गाणी गातात. खेडेगावात झाडाला झोके बांधतात. सर्व मैत्रिणी एकत्र येऊन झोके खेळतात.

नागाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नागपंचमी होय. आम्ही सर्व मैत्रिणी या दिवशी खूप धम्माल करतो. मला हा सण खूप खूप आवडतो. आपल्याला व आपल्या परिवाराला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

-: समाप्त :-

माझा आवडता सण नागपंचमी निबंध मराठी | Maza Avadta San Nag Panchami Nibandh Marathi – निबंध क्र.05

“चल ग सखे वारुळाला वारुळाला !
नागोबाला पुजायला पुजायला..!”

श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे ‘नागपंचमी.’ हा सण श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी येतो. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.

एका शेतकऱ्याच्या नागराच्या फाळाने नागिणीचे तीन पिल्ले मृत्यूमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला. अशीही समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही. घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही. तवा वापरायचा नाही. कुटायचे नाही. असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे.

या दिवशी स्त्रिया घराची स्वच्छता करतात. अंगणात रांगोळी काढतात. जवळपासच्या वारुळा जवळ जाऊन नागदेवतेची पूजा करून तिला दूध, लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.

या सनाच्या दिवशी स्त्रियांमध्ये व मुलींमध्ये फार उत्साह संचारतो. स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात. झिम्मा, फुगडी, पिंगा इत्यादी विविध खेळ खेळून स्त्रिया आपले मन मोकळे करतात. या सणाच्या आदल्या दिवशी स्त्रिया भावाचा उपवास करतात.

नाग आणि साप हे शेताचे रक्षण करते आहेत. कारण त्यांच्यामुळे उंदराच्या संख्येवर नियंत्रण राहते. धन धान्य उत्पादन वाढते. ते शेतकरी बांधवांचे मित्र मानले जातात. दिवसेंदिवस सापांची संख्या कमी होत आहे. म्हणूनच पर्यावरणातील सापांचे संरक्षण करण्याच्या हेतूने नागपंचमी हा सण साजरा केला जातो.

-: समाप्त :-

सारांश | नागपंचमी निबंध मराठी | Nag Panchami Essay in Marathi

मैत्रिणींनो वरील लेखात आपण नागपंचमी या सणा विषयी निबंध मराठी मध्ये बघितले. वरील लेखात आपण एकूण 05+ अतिशय सुंदर आणि सोपे निबंध बघितले. वरील निबंध आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. माझा आवडता सण याविषयी निबंध मराठी तून लिहिण्यासाठी तुम्ही ही निबंध उपयोगात आणू शकता.

मित्रांनो, आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा विचार असतील तर ते ही कळवा. आपल्या मित्रांना हे निबंध नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Leave a Comment