माझा आवडता प्राणी वाघ निबंध मराठी (05+ सर्वोत्तम निबंध) | Maza Avadta Prani Wagh Nibandh Marathi 2023 | वाघ निबंध मराठी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

माझा आवडता प्राणी वाघ निबंध मराठी 2023 | Maza Avadta Prani Wagh Nibandh Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात माझा आवडता प्राणी वाघ या विषयावर निबंध मराठी मध्ये बघणार आहोत. वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे. वाघाला जंगलाचा राजा देखील म्हणतात. शाळेत माझा आवडता प्राणी या विषयी गुरुजी निबंध लिहायला सांगतात. अशावेळी हे निबंध तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.

आज आपण या लेखात 05+ अतिशय सुंदर आणि जबरदस्त निबंध बघणार आहोत. परीक्षेत देखील आपल्याला ह्या निबंधाचा खूप उपयोग होणार आहे. ही निबंध 4थी ते 12वी पर्यंच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयोगाची आहे. त्यामुळे या लेखाचा अभ्यास करा आणि परीक्षेत चांगले गुण मिळवा. चला तर मित्रांनो निबंधाला सुरुवात करुया.

वाघ निबंध मराठी | Wagh Nibandh Marathi – निबंध क्र.01

वाघावर निबंध 10 ओळी

 1. माझा आवडता प्राणी वाघ हा आहे.
 2. वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे.
 3. वाघाला सगळेच प्राणी घाबरतात.
 4. वाघाला जंगलाचा राजा देखील म्हणतात.
 5. वाघ हा मासाहारी प्राणी आहे.
 6. तो जंगलातील इतर प्राण्यांना मारून त्यांचे मास खातो.
 7. वाघाला शौर्य चे प्रतीक देखील मानले जाते.
 8. कारण वाघ कोणालाच घाबरत नाही.
 9. सध्या आपल्या देशात वाघांची संख्या खूप कमी झाली आहे.
 10. वाघांचे आपण संरक्षण केले पाहिजे.

माझा आवडता प्राणी वाघ निबंध मराठी | Maza Avadta Prani Wagh Nibandh Marathi – निबंध क्र.02

माझा आवडता प्राणी वाघ आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. वाघ हा मांजराच्या प्रजातीतील परंतु आकाराने मोठा प्राणी आहे. वाघ हा घनदाट जंगलात राहतो.

वाघाचा रंग पिवळा असतो. त्याच्या अंगावर काळया रंगाचे पट्टे व तांबूस रंगाची फर असते. वाघ खूप ताकतवान, बहादूर व शूरवीर प्राणी आहे. वाघ अत्यंत रुबाबदार दिसतो.

वाघ हा मांसाहारी प्राणी आहे. वाघाचे दात खूप धारदार असतात. वाघ पंजाच्या साह्याने शिकारीवर प्रहार करतो. वाघ भूक लागेल तेव्हा शिकार करतो. वाघाच्या डरकाळी ने संपूर्ण जंगल हादरून जाते. वाघ शौर्य व सहसाचे प्रतीक आहे.

भारत देशाला वाघाचे माहेरघर म्हटले जाते. कारण जगात सर्वाधिक वाघांची संख्या भारतात आहे. परंतु आजच्या काळात वाघांचे प्रमाण कमी होत आहे. वाघांची संख्या वाढविण्यासाठी अनेक महिमा राबविल्या जात आहे.

त्यामुळे वाघांची शिकार थांबून वाघांच्या संख्येत वाढ करणे आपले कर्तव्य आहे.

-: समाप्त :-

माझा आवडता प्राणी वाघ निबंध मराठी | Maza Avadta Prani Wagh Nibandh Marathi – निबंध क्र.03

वाघा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. तो रुबाबदार आणि राजबिंडा दिसतो. तो खूप शक्तिमान असतो. वाघ हा एक वन्य प्राणी आहे. तो खूप वेगाने पळतो. त्याच्या अंगावर काळे आणि पिवळे पट्टे असतात. त्यामुळे तो गवतात लपून राहू शकतो.

वाघ हा मांसाहारी प्राणी आहे. त्याचे दात खूप तीक्ष्ण असतात. तो हरीण, ससे, सरस इत्यादी पशूंची शिकार करतो. मात्र भूक लागली असेल तरच वाघ शिकार करतो. पोट भरलेले असेल तर तो शिकार करत नाही.

इंग्रजांच्या काळात वाघांची खूप शिकार झाली. त्यामुळे वाघ पृथ्वीवरून नाहीसे होते की काय असे वाटले. म्हणून मग स्वातंत्र्य मिळाल्यावर वाघांसाठी खास अभयारण्य निर्माण केली गेली. रणथंभोर, काना, ताडोबा इत्यादी अभयारण्यात आज वाघ पाहायला भेटतो.

काही समाज विघातक लोक वाघाची शिकार करतात. वाघाचे कातडे, हाडे यांची तस्करी करतात. कोणत्याही वन्य प्राण्याची शिकार करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे आपण वघाचेच नाही तर इतरही वन्य प्राण्यांचे संरक्षण केले पाहिजे.

-: समाप्त :-

माझा आवडता प्राणी वाघ निबंध मराठी | Majha Avadta Prani Wagh Nibandh Marathi – निबंध क्र.04

वाघ हा माझा आवडता प्राणी आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. सिंह जंगलाचा राजा जरी असला तरीही मला वाघच जंगलाचा राजा वाटतो. वाघाची ताकद सिंहापेक्षा जास्त असेल असे मला वाटते. वाघ हा मांसाहारी प्राणी आहे. तो हरिण, लांडगा यांसारख्या भक्ष प्राण्यांवर अन्नासाठी अवलंबून असतो.

वाघाला दोन कान, चार पाय, एक शेपूट असते. वाघाचा रंग पिवळा आणि तपकिरी रंगाचे मिश्रण असतो. त्याच्या शरीरावर काळेपट्टे देखील असतात. त्याच्या या रंगामुळे वाघ खूप उठून दिसतो.

वाघ हा हिंसक प्राणी जरी असला तरी तो सर्वांना आवडतो. आपल्या देशात तसेच इतर अनेक देशात वाघाच्या अनेक प्रजाती आढळतात. परंतु आज वाघाच्या अनेक प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे वाघ या प्राण्याला संरक्षण देण्यासाठी भारत सरकारने अनेक मोहिमा राबविल्या आहेत.

वाघाच्या शिकारीवर देखील बंदी घालण्यात आलेली आहे. आज पांढऱ्या रंगाचे वाघ लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांची प्राणिसंग्रहालयात वन्य अधिकाऱ्यांच्या नजरेत विशेष काळजी घेतली जाते. वाघ हा आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. त्यामुळे त्याचे अस्तित्व टिकवून ठेवणे फार गरजेचे आहे.

-: समाप्त :-

माझा आवडता प्राणी वाघ निबंध मराठी | My Favourite Animal Tiger Essay in Marathi – निबंध क्र.05

राजबिंडा प्राणी, सगळ्यांना आवडणारा पण भीतीही वाटणारा हिंस्र प्राणी म्हणजेच वाघ होय. वाघ हा माझा आवडता प्राणी आहे. वाघोबाला जंगलाचा राजा देखील म्हणतात. वाघ हा आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. वाघ हा मांसाहारी प्राणी आहे.

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. वाघाचे वैज्ञानिक नाव पॅंथरा टायग्रीस असे आहे. वाघ हा मांजराच्या प्रजातीतील सर्वात मोठा प्राणी आहे. सर्व प्राण्यांमध्ये वाघ हा माझा आवडता प्राणी आहे.

जगात सर्वाधिक वाघ भारतात आहे. म्हणूनच भारताला वाघांचे माहेरघर म्हटले जाते. वाघ हा घनदाट जंगलात वास्तव्य करून राहतो. मुख्यतः आकाराने मोठ्या असलेल्या जंगलामध्ये वाघ राहतो. वाघाच्या अंगावर काळया रंगाचे पट्टे व तांबूस रंगाची फर असते.

प्रत्येक वाघाच्या अंगावरील पट्टे वेगवेगळे असतात. वाघाचे वजन साधारणतः 180 ते 100 किलो असते. वाघ हा मांसाहारी प्राणी आहे. वाघ जंगलातील कोणत्याही प्राण्याची शिकार करू शकतो. वाघाचा जबडा जबरदस्त ताकदवान असतो. त्याच्या मदतीने तो शिकार करतो.

वाघ उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी पाण्याजवळ राहतो. वाघ शौर्याचा व साहसाचा प्रतीक आहे. आपण वाघाला जंगलाचा राजा म्हणून ओळखतो. भारतात वाघांची संख्या सर्वाधिक असली तरी देखील वाघ आज दुर्मिळ झाले आहेत. वाघांची संख्या वाढविण्यासाठी भारतात सर्वत्र वाघ संवर्धन मोहीम राबविली जात आहे.

-: समाप्त :-

सारांश | माझा आवडता प्राणी वाघ निबंध मराठी | Majha Avadta Prani Wagh Nibandh Marathi

मित्रांनो, वरील लेखात आपण वाघ यावर निबंध किंवा माझा आवडता प्राणी वाघ यावर निबंध मराठी मध्ये बघितले. ही निबंध लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खूप उपयोगी आहे. शाळेत परीक्षेत जर आपल्याला माझा आवडता प्राणी या विषयी निबंध लिहायला सांगितल्यास आपण वरील निबंध लिहू शकता.

मित्रहो, आपल्याला आमचा हा छोटासा प्रपंच कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही विचार असतील तर ते ही कळवा. आपल्याला मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला जगभरातून भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे शीर्षक असेही असू शकते –

 • Essay on Tiger in Marathi
 • My Favourite Animal Tiger Essay in Marathi
 • Tiger Essay in Marathi
 • वाघ निबंध मराठी
 • वाघावर निबंध मराठी
 • माझा आवडता प्राणी वाघ
 • माझा आवडता प्राणी वाघ निबंध मराठी

Leave a Comment