शिक्षक दिन भाषण मराठी (05+ सर्वोत्तम भाषणे) | Shikshak Din Bhashan Marathi 2023 | Teachers Day Speech in Marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

शिक्षक दिन भाषण मराठी 2023 | Shikshak Din Bhashan Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात शिक्षक दिनानिमित्त भाषण मराठी मध्ये बघणार आहोत. दरवर्षी 05 सप्टेंबर रोजी आपण शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. आपल्या जीवनात शिक्षकाला अनन्यसाधारण महत्व आहे. 05 सप्टेंबर हा दिवस शिक्षकांचे आभार प्रकट करण्याचा दिवस होय.

आज आपण या लेखात 05+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज भाषणे बघणार आहोत. या दिवशी आपल्या शाळेत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. शिक्षक दिनानिमित्त शाळेत भाषण द्यावे लागते. सूत्रसंचालन करावे लागते. शिक्षक दिनानिमित्त भाषण सूत्रसंचालन करताना आपल्याला ही भाषणे नक्कीच खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. चला तर भाषणाला सुरूवात करूया.

शिक्षक दिन भाषण मराठी लहान मुलांसाठी | Teachers Day Speech in Marathi for Child – भाषण क्र.01

शिक्षक दिन भाषण मराठी 10 ओळी | 10 Lines on Teachers Day in Marathi

  1. सर्वांना सप्रेम नमस्कार.
  2. आदरणीय मुख्याध्यापक, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्रांनो.
  3. माझे नाव सुशील जाधव आहे.
  4. 5 सप्टेंबर या दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो.
  5. दरवर्षी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
  6. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे कार्य केले.
  7. ते भारताचे दुसरे राष्ट्रपती होते.
  8. शिक्षक समाजातील प्रमुख आधारस्तंभ मानला जातो.
  9. तो भावी पिढी घडवण्याचे काम करतो.
  10. ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या मडक्याला आकार देतो म्हणजे घडवतो. त्याप्रमाणे शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्याला घडवतो.

शिक्षक दिन भाषण मराठी | Shikshak Din Bhashan Marathi – भाषण क्र.02

अक्षर अक्षर शिकवून आम्हाला,
शब्दाचा अर्थ सांगितला…
कधी प्रेमाने तर कधी रागावून,
जीवनाचा मार्ग दाखवला…

सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो! सर्वांना माझा नमस्कार!
सर्वप्रथम आपणास शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक…!

आज 05 सप्टेंबर हा दिवस आपण ‘शिक्षक दिन‘ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस होय.

ते कुशल वक्ते, थोर विचारवंत, विद्वान, उत्तम लेखक व आदर्श शिक्षक होते. त्यांचे शिक्षणावरील प्रेम आणि विद्वत्तेमुळे भारतात त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

शिक्षक म्हणजे –
चांगले संस्कार करणारी मूर्ती,
संकट काळात धैर्य देणारी स्फूर्ती!
चारित्र्य पूर्ण विद्यार्थी घडवणारा शिल्पकार
जादूची छडी म्हणजे जी करते
विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार…!

शिक्षक दिन हा राष्ट्राचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आहे. हा दिवस आपल्या शिक्षकांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.

शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते अतूट असते. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निर्माता असतो. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवतो. त्याप्रमाणे शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देत असतात.

शिक्षक दिन सर्व शाळा व महाविद्यालयात उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देतात. या दिवशी मुले शाळेत शिक्षकांची भूमिका निभावतात.

शिक्षक हेच भावी पिढीचे शिल्पकार आहेत. शिक्षण हाच खरा विकासाचा मंत्र आहे. शिक्षक हेच समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. यामध्ये शिक्षकांची भूमिका फार मोलाची आहे. ज्याप्रमाणे माळी झाडांची काटछाट करून त्याला सुंदर बनवतो. त्याचप्रमाणे शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांचे दुर्गुण दूर करून त्यांच्यात सदगुणांचा विकास घडवून आणतात.

आपण सर्वांनी आपल्या शिक्षकांचा नेहमी आदर व सन्मान केला पाहिजे. हीच आपल्या प्रत्येक गुरुला योग्य गुरुदक्षिणा ठरेल.

शिक्षणाच्या ज्योतीतून, अज्ञानाचा अंधार दूर करत, नवभारताची सुशिक्षित पिढी घडविणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना –

शत शत प्रणाम !
शत शत प्रणाम !!

शिक्षक दिन भाषण मराठी PDF Download

-: समाप्त :-

शिक्षक दिन भाषण मराठी | Shikshak Din Bhashan Marathi – भाषण क्र.03

आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मुख्याध्यापक, पूज्य गुरुजनवर्ग, उपस्थित असलेले माझे सर्व मित्र-मैत्रिणींनो आज 5 सप्टेंबर आयुष्याला आधार, आकार आणि ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचा दिवस.

शि – म्हणजे शिलवान
क्ष – म्हणजे क्षमाक्षिल
क – म्हणजे कर्तव्यदक्ष

अशा सर्व शिक्षकांना वंदन करून शिक्षक दिनानिमित्त मी दोन शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती.

निरागस मुलांना आकार देतो, शून्यातून मुलांना घडवतो, विद्यार्थ्यांच्या यशासाठी, ज्ञान देण्यासाठी नेहमीच तत्पर असतो, तो व्यक्ती म्हणजे शिक्षक.

गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून आहे. जीवनात आई वडिलांची जागा कोणीच भरू शकत नाही. आपल्याला या जगात आणण्याचे श्रेय त्यांच्याकडे असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आपले आई वडील.

शिक्षक आपल्याला योग्य मार्ग दाखवून योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात. दरवर्षी 05 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिक्षकां प्रति सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

शिक्षकांचे प्रत्येकाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असते. समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान दार्शनिक व्यक्तिमत्व आणि शिक्षक होते. या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्वारे शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. शिक्षक हे सन्मानाचे हक्कदार आहेत. कारण शिक्षकच चांगले चारित्र्य निर्माण करू शकतात.

आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्व घडण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभे राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचे महत्त्व समजावण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.

शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते. कारण शिक्षकांमुळे भविष्यातील डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचावणारी सामर्थ्यवान पिढी तयार होते.

दिया ज्ञान का भंडार हमे,
किया भविष्य के लिए तयार हमे,
हे आभारी उन गुरुओ के हम,
जिसने किया कृतज्ञ अपार हमे.!

शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरूचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज शिक्षणाचे अवमूल्यन केले जात असल्याचे चित्र समाजात दिसत आहे. गुरु-शिष्य संबंधातील पवित्र भावना लोप पावत आहे.

या संबंधातील पावित्र्य कायम ठेवण्यासाठी, डॉक्टर राधाकृष्णन यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. आपल्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरीती व आदर असे पैलू पाडले जात असतात.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. चला तर मग शिक्षक दिनी त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करूया.

मेरे जैसे शून्य को,
शून्य का ज्ञान बताया !
हर अंक के साथ शून्य,
जोडणे का महत्व बताया !!

सबके सामने कर सकु बात,
यह विश्वास मुझमे जगाया !
गुरु तेरे उपकार का कैसे चुकाऊ मे मोल,
लाख किमती धन भला,
गुरु है मेरे अनमोल!!

माझ्या जीवनात आलेल्या सर्व शिक्षकांना, गुरूंना वंदन करून मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो व तुमची रजा घेतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र!
शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

शिक्षक दिन भाषण मराठी PDF Download

-: समाप्त :-

शिक्षक दिनाचे भाषण मराठी | Teachers Day Speech in Marathi – भाषण क्र.04

छडी लागे छम छम !
विद्या येई घम घम !!

असे म्हणत चुकी केल्यावर हातावर छडी मारून उठवणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक.

आदरणीय व्यासपीठ, माननीय मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज 5 सप्टेंबर “डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन” यांचा वाढदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून भारतभर साजरा केला जातो.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परंब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ।

पुरातन काळापासूनच गुरूंनी शिष्याचे नाते सलोख्याचे आणि प्रेम भावाचे म्हणून गौरवले जाते. गुरु शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे.

भारतात प्राचीन काळापासूनच गुरु शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात.

म्हणूनच म्हटले आहे –

“गुरु विना कोण दाखवील वाट”

राष्ट्र निर्मितीचा मूळ पाया घालणारी एकच व्यक्ती म्हणजे शिक्षक होय. जीवन जगताना कितीतरी खडतर प्रसंग येतात. त्यातून तावून, सुलाखून निघण्याचे सामर्थ्य बालपणीच शिक्षकांनी शिकवलेले संचितच पुरविते, बळ देते.

शाळेत शिकत असताना विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्या स्पर्धांचे परीक्षण गुरूच्या हाताखालूनच केले गेल्याने तो आत्मविश्वास नोकरीसाठी मुलाखत द्यायला जाताना किंवा संकटाच्या वेळी कामास येतो. शिक्षक विद्यार्थ्यांना फक्त विषयाचे ज्ञान देत नाहीत तर, जीवनात जगण्याचे बाळकडू पाजतात.

म्हणून फक्त आजच नाही, तर रोजच त्यांना सन्मान देऊया. त्यांचे धन्यवाद करुया.

धन्यवाद !
जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

Teachers Day Speech in Marathi PDF Download

-: समाप्त :-

शिक्षक दिनानिमित्त भाषण मराठी | Teachers Day Speech in Marathi – भाषण क्र.05

शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक.

5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. प्रथमतः आई या गुरूला नंतर माझे वडील या गुरूंना आणि ज्यांनी माझे भविष्य घडविले त्या तमाम गुरुवर्याना नमन करून मी भाषणास सुरुवात करतो.

चिखलातला जन्मही
सुंदर सार्थकी लावावा.!
निसर्गासारखा शिक्षक
प्रत्येकाला मिळावा.!!

भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन ‘शिक्षक दिन‘ म्हणून साजरा करतात.

शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते.

आपल्या गुरु, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. असं म्हणतात की, एक पुस्तक, एक पेन, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक हे संपूर्ण देशाचे भविष्य आहे.

कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यांना आकार देऊन सुंदर मूर्ती घडवतो. त्याचप्रमाणे शिक्षकही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला सुरेख आकार देऊन संस्कारक्षम भावी पिढी घडविण्याचे महान कार्य करत असतात.

कोरोना काळात शाळा बंद होत्या. तेव्हा कळले शिक्षकांचे महत्त्व. शाळेचे महत्त्व. ऑनलाईन शिक्षण शिक्षकांची कमतरता भरून काढू शकत नाही.

शिक्षक दिन साजरा केलाच पाहिजे. कारण विद्यार्थ्याला अज्ञानातून ज्ञानाकडे आणि ज्ञानातून विज्ञानाकडे घेऊन जात उद्याचे भविष्य घडविण्याचे महान कार्य शिक्षकच करत असतात.

अवजारे लोहार बनतो,
दागिने सोनार !
मातीपासून मडके बनवितो,
मेहनत करून कुंभार !!

पण अज्ञानावर घाव घालून विद्यार्थ्यांना स्वयंप्रकाशित करणारे ते फक्त शिक्षकच असतात. माझ्या जीवनातील सर्व गुरुवर्यांना आज शिक्षक दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम !!

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

-: समाप्त :-

आपल्याला पडणारी काही मुख्य प्रश्न –

  1. शिक्षक दिन कधी असतो?

    शिक्षक दिन दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी असतो.

  2. शिक्षक दिन का साजरा करतात?

    आपल्या भारत देशाचे दुसरे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 05 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.

सारांश | शिक्षक दिनाचे भाषण मराठी | Shikshak Din Bhashan Marathi

माझ्या बाल मित्रांनो, वरील लेखात आपण शिक्षक दिन भाषण मराठी मध्ये बघितले. वरील लेखात आपण एकूण 05+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज भाषणे बघितली. ही भाषणे आपल्याला शाळेत शिक्षक दिनानिमित्त भाषण सूत्रसंचालन करताना नक्कीच खूप खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. म्हणून मित्रांनो ही भाषणे पाठ करून घ्या.

मित्रहो आपल्याला आमचा हा छोटासा प्रपंच कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा विचार असतील तर ते ही कळवा. आपल्या गरजू विद्यार्थ्यांना मित्रांना ही भाषणे नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला जगभरातून भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Teachers Day Bhashan Marathi

शिक्षक दिनाचे भाषण मराठी

2 thoughts on “शिक्षक दिन भाषण मराठी (05+ सर्वोत्तम भाषणे) | Shikshak Din Bhashan Marathi 2023 | Teachers Day Speech in Marathi”

Leave a Comment