शिक्षक दिन कविता मराठी (05+ अतिशय सुंदर कविता) | Teachers Day Poem in Marathi 2023 | शिक्षकांवर कविता


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

शिक्षक दिन कविता मराठी 2023 | Teachers Day Poem in Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात शिक्षक दिनानिमित्त कविता मराठी मध्ये बघणार आहोत. दरवर्षी 05 सप्टेंबर रोजी आपण शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. हा दिवस आपल्या शिक्षकांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. आजच्या दिवशी आपल्या आदर्श शिक्षकांवर कविता सांगून शिक्षकांचे मन जिंकू शकता.

आज आपण या लेखात एकूण 05+ अतिशय सुंदर कविता बघणार आहोत. शिक्षक दिनानिमित्त भाषण सूत्रसंचालन करताना कविता वापरल्यास भाषणाला एक वेगळेच आकर्षण निर्माण होते आणि आपण श्रोत्यांची मने जिंकू शकतो. या कविता आपल्याला शिक्षक दिनावर भाषण देताना नक्कीच उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. चला तर मित्रांनो कवितेला सुरुवात करुया.

शिक्षक दिन कविता मराठी | Teachers Day Poem in Marathi – कविता क्र.01

शिक्षकांविषयी कविता

विद्यार्थ्यांना घडवणारा,
संस्काराचा घडा !
किती उपकार मानू,
तुमचे कळत नाही मला !!

तुमच्यामुळे जीवनाला,
मिळाली नवी दिशा!
अंधारलेल्या वाटेवरती,
प्रकाशाची दिली आशा !!

आम्ही माती तुम्ही,
कुंभार हवं तसं घडवा !
चुकलं असता आमचं,
आम्हा मार्ग नवा दाखवा !!

असू दे सदा तुमची,
ज्ञानरूपी छाया !
चला सर्व वंदूया,
सारे श्री गुरुराया !!

Credit – Right to Write official YT

शिक्षक दिन कविता मराठी | Teachers Day Poem in Marathi – कविता क्र.02

शिक्षक कविता

कळतच नाही सर मला
काय लिहावं तुमच्या वरती !
कार्यही तुमचे तेवढेच
नि तेवढीच आहे कीर्ती !!

तुम्ही नाही केलीत L.L.B.
कायद्याच्या जगातली कधी !
पण जीवनाच्या कायद्याची पद्धत
सर तुमची मात्र होती साधी !!

तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले
आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून !
थोडा मीही प्रयत्न केला सर
त्यात माझही नाव यावं म्हणून !!

सर तुम्ही बोललेले शब्द नि शब्द
कट्यारी सारखे वार करत होते !
पण जीवनाच्या रणांगणात
लढण्याचे सामर्थ्यही देत होते !!

सर तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टी
मी माझे आदर्श मानतो !
हरलोच आयुष्याच्या वाटेवर
तर आठवुन लढायला बसतो !!

सर तुमच्याविषयी खूप लिहायचं होतं
माझ्या आयुष्याच्या डायरीत !
पण अक्षरच सापडेना सर मला
तुम्ही शिकवलेल्या बाराखडीत !!

तरी प्रयत्न सोडला नाही मी
सर तुम्ही सांगितलं होतं म्हणून !
पण तुमच्या या कवितेन
माझं आयुष्यच गेलं झिजून !!

कवी – हिरोजसुत

शिक्षक दिनावर कविता मराठी | Teachers Day Poem in Marathi – कविता क्र.03

शिक्षकांवर कविता

अजय देवगनच्या केसांसारखे
केस ते लावत होते
चेहरा त्यांचा नेहमी
आनंदी ते ठेवत होते
असे ते आमचे सर होते

विद्यार्थी त्यांच्या वर्गातला असो वा
दुसऱ्याच्या वर्गातला
प्रत्येक विद्यार्थ्याचे ते
लाडके होते
असे ते आमचे सर होते

विद्यार्थ्यांसोबत नेहमी
मित्रासारखे ते वागत होते
असे प्रेमळ स्वभावाचे ते
आमचे सर होते
असे ते आमचे सर होते

सर एक दिवस शाळेत न आल्यास
शाळेत जणु शिक्षक नसल्यासारखं
आम्हाला वाटत होतं
एवढ विद्यार्थ्यांचं सरांवर प्रेम होतं
असे ते आमचे सर होते

चार च्या सुट्टीत जेव्हा त्यांना
सुट्टी मागण्यासाठी आम्ही जात होतो
सर्वांसमोर ते नाही म्हणत
हाताच्या इशाऱ्यांनी हळूच
ते जा म्हणत होते
असे ते आमचे सर होते.

Credit – Marathipoem142 YT

शिक्षक दिनाच्या कविता मराठी | Shikshak Din Kavita Marathi – कविता क्र.04

शिक्षक दिन कविता

पृथ्वीतलावरचे ईश्वर
म्हणजे आपले गुरु
ज्ञानाचा अथांग सागर
म्हणजे आपले गुरु

जे घडवतात, शिकवतात
भविष्य आपले सावरतात
बळ पंखात भरुनी आपल्या
गरुड झेपेचे वेड लावतात

कुंभार घडवितो गटास तसे
गुरुठायी घडतो आपण
काय किती आपणास दिले
अशक्य आहे ते त्यांचे मापन

महिमा त्यांचा अगाध किती
वर्णाया शब्दही पडतीय अपुरे
गुरुविण जीवन म्हणजे
वाटे सारे सुने अधुरे

ऋण असे हे न फिटणारे
आहे गुरूंचे माझ्यावरी
होता येणार नाही उतराई
कोणतीही गुरुदक्षिणा दिली तरी..

Credit – savitakale9372 YT

शिक्षक दिनानिमित्त कविता मराठी | Shikshak Din Kavita Marathi – कविता क्र.05

माझे आवडते शिक्षक कविता

सर तुम्ही तुमच्या जीवनात
खूप काही केलं
माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना
जगण्याचा बळ दिलं

म्हणून तर तुमच्यामुळे सर
जीवनाच सोनं झालं
दारिद्र्याला झुगारून सर
वैभववाच लेन आलं

तुमच्यामुळेच मला सर
जगण्याचं भान आलं
तुम्ही मात्र विद्यार्थ्यांसाठी
जीवनाचं रान केलं

निवृत्तीच्या वयातही सर
चेहरा तुमचा खुललेला
सुंदर सुंदर विचारांनी
मार्ग तुमचा फुललेला

असेच जीवन फुलत जावो
हीच एक सदिच्छा
पुढील जीवनासाठी सर
खूप खूप शुभेच्छा !!

Credit – Harishadawale YT

सारांश | शिक्षक दिन कविता मराठी | Shikshak Din Kavita Marathi

मित्रहो, वरील लेखात आपण शिक्षक दिनानिमित्त कविता मराठी मध्ये बघितल्या. वरील लेखात आपण एकूण 05+ अतिशय सुंदर आणि सोप्या कविता बघितल्या. मित्रहो वरील कविता या आमच्या नाहीत. या कविता ज्यांच्या आहेत त्यांची नावे आम्ही कवितेच्या शेवटी दिलेली आहेत. वरील कविता आम्ही फक्त शैक्षणीक दृष्टीकोनातून एक मदत म्हणून येथे देत आहोत.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा विचार असतील तर ते ही कळवा. आपल्या मित्रांना या कविता नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला जगभरातून भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

  • Heart touching poem on teacher in marathi
  • शिक्षक कविता मराठी छोटी
  • शिक्षकांवर कविता
  • Kavita for teachers in marathi
  • Teacher marathi kavita
  • Shikshak poem in marathi
  • Farewell poem For teacher in marathi
  • Shikshak din bhashan Marathi kavita

Leave a Comment