शिक्षक दिन चारोळ्या मराठी (100+ सर्वोत्तम चारोळ्या) | Shikshak Din Charolya Marathi 2023 | शिक्षक दिन चारोळी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

शिक्षक दिन चारोळ्या मराठी 2023 | Shikshak Din Charolya Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात शिक्षक दिनानिमित्त चारोळ्या मराठी मध्ये बघणार आहोत. 05 सप्टेंबर रोजी आपण राष्ट्रीय शिक्षक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो. या दिवशी आपल्या शाळेत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमात भाषण सूत्रसंचालन करावे लागते.

आज आपण या लेखात 100+ अतिशय सुंदर आणि सोप्या चारोळ्या मराठी मध्ये बघणार आहोत. शिक्षक दिनानिमित्त भाषण सूत्रसंचालन करताना चारोळ्या वापरल्यास भाषणाला एक चांगले आकर्षण निर्माण होते. चारोळी वापरल्यास आपण श्रोत्यांची मने नक्कीच जिंकू शकता आणि टाळ्यांचा कडकडाट ऐकून घेऊ शकता. चला तर मित्रांनो चारोळ्या बघुया.

शिक्षक दिन चारोळ्या मराठी | Shikshak Din Charolya Marathi

ज्ञानाचा प्रकाश देण्या
दिवा अखंड तो जळतो !
जीवनाचा अर्थ खरा
शिक्षकांमुळेच कळतो !!

गुरु विना ज्ञान नाही,
गुरुच्या ज्ञानाला अंत नाही !
गुरुने जिथे दिलं ज्ञान,
तेच खरे तीर्थस्थान !!

नित्य नव्या कल्पना
शिक्षणात आणतात !
ते शिक्षकच असतात
जे नाविन्याचे स्पुरण देतात !!

शिक्षक म्हणजे एक समुद्र,
ज्ञानाचा, पवित्र्याचा
एक आदरणीय कोपरा,
प्रत्येक व्यक्तीच्या मनातला…

दिल आम्हाला ज्ञानाचा भंडार,
केलं आम्हाला भविष्यासाठी तयार !
आम्ही आभारी आहोत गुरूंचे,
ज्यांनी आम्हाला घडवलं आज !!

अक्षर अक्षर शिकवून,
शब्दांचा अर्थ सांगितला !
कधी प्रेमाने तर कधी ओरडून,
जीवनाचा मार्ग दाखवला !!

पृथ्वी म्हणते, आकाश म्हणते,
फक्त एकच गाणे !
गुरु तुम्हीच आहात ती साक्षात शक्ती,
ज्यामुळे उजळलं हे जगणे !!

2G, 3G, 4G, 5G, 6G
पण येईल,
आम्हाला घडवण्यासाठी
पण
गुरु G शिवाय पर्याय नाही

जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे,
तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही !
फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर,
जीवन जगणंही शिकवता तुम्ही !!

तुमने सिखाया उंगली पकडकर चलना,
तुमने सिखाया कैसे गिरने के बाद संभलना,
तुम्हारी वजह से आज हम पहुचे है,
इस मुकाम पे,
आज शिक्षक दिवस के दिन करते है
आज सलाम आपसे…

गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविन जगी न होई सन्मान!
जीवन भवसागर तराया,
चला वंदू गुरुराया !!

नेहमी ज्ञानाची तहान असते तो शिक्षक !
नेहमी विद्यार्थ्यांची प्रगती पाहतो तो शिक्षक !
नेहमी ज्ञान अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक !
नेहमीच घडतो आणि घडवतो तो शिक्षक !

शिक्षक एक समुद्र ज्ञानाचा अन् पावित्र्याचा,
एक आदरणीय कोपरा प्रत्येक व्यक्तीच्या मनातला,
शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा,
शिक्षक निर्माता भावी पिढीचा आणि समाजाचा !

शिक्षक दिनानिमित्त चारोळ्या मराठी | Shikshak Din Charolya Marathi

गुरुशिवाय ज्ञान नाही,
गुरुने दिलेल्या निस्वार्थ
ज्ञानाला अंत नाही.
गुरुने जेवढे दिले ज्ञान,
त्यालाच आहे मोलाचे स्थान!

अ, आ, इ शिकवून आम्हाला
सर्व शब्दाचा अर्थ सांगितला !
कधी मायेने तर कधी रागाने
जीवनाचा योग्य मार्ग दाखवला !!

देतात आम्हाला ज्ञानाचे भंडार,
करतात भविष्यासाठी तयार !
आम्ही आभारी आहोत त्या गुरूंचे
ज्यांनी आम्हाला पात्र बनवले आज !!

ज्यावेळी बंद होतात सर्व दरवाजे,
त्यावेळी नवीन मार्ग दाखवता तुम्ही !
उपकार कसे फेडायचे आम्ही,
जीवन कसे जगायचे शिकवलात तुम्ही !!

गुरु विना मिळणार नाही ज्ञान
ज्ञानाविना जगात होणार नाही सन्मान
गुरु आहेत प्रेमाची छाया
चला नमन करू गुरुराया

लोकांना देऊनी प्रकाश
दिवा अखंड जळतो !
जीवनाचा खरा अर्थ गुरुजी
तुमच्यामुळेच कळतो !!

कवी म्हणतो, कवयत्री म्हणते
एकच गाणे !
गुरुजी तुमच्याच मुळे उजळले
हे आमचे जगणे !!

जीवनात गुरु असेल तरच
जीवन होते साकार !
गुरुजी तुमच्यामुळेच आहे
माझ्या जीवनाला आकार !!

प्रेमाचे असतात ते शब्द
स्नेहाचा असतो तो स्पर्श
आपुलकीची असते ती नजर
कौतुकाची असते ती थाप
कायम मदतीचा असतो हात
तुम्हीच देता जीवनभर साथ.

शिक्षक दिनाच्या चारोळ्या मराठी | Teachers Day Charolya in Marathi

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः
गुरुर्साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः

ज्ञानाचा प्रकाश देण्या…
दिवा अखंड जळतो !
जीवनाचा अर्थ खरा…
शिक्षकांमुळेच कळतो !!

दिल आम्हाला ज्ञानाचा भंडार…
केलं आम्हाला भविष्यासाठी तयार…
आम्ही आभारी आहोत गुरूंचे…
ज्यांनी आम्हाला घडवलं आज !

साक्षर आम्हास बनवले,
जीवन काय आहे समजावले,
बरोबर – चूक ओळखायला शिकवले,
असे महान गुरु आम्हास लाभले !

हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो
तो गुरु…
जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो
तो गुरु…

गुरूंची ऊर्जा सूर्यासारखी,
विस्तार आकाशासारखा,
गुरुचा सानिध्य आहे जगातील,
सर्वात मोठी भेट तेच… तेच आहेत,
जगातील अनेक व्यक्तिमत्त्वांचे शिल्पकार.!

शिकवता शिकवता आपणास
आकाशाला गवसणी घालण्याचे
सामर्थ्य देणारे आदराचे स्थान
म्हणजे आपले शिक्षक !

एक चांगला शिक्षक
मेणबत्ती प्रमाणे असतो
स्वतः जळून विद्यार्थ्यांचे
आयुष्य उजळून टाकतो

शिक्षणापेक्षा मोठे कोणतेच
वरदान नाही
आणि गुरुचा आशीर्वाद मिळणे
यापेक्षा मोठा सन्मान नाही.

विद्येविना मती गेली..
मती विना नीती गेली..
नितीविना गती गेली..
गती विना वित्त गेले..
वित्तविना शूद्र खचले..
इतके अनर्थ एका अविद्येने केले..
या अविद्येचा काळोख ठेवून
विद्यारुपी प्रकाश देणारे ते म्हणजे
शिक्षक…!

सारांश | शिक्षक दिन चारोळी मराठी | Shikshak Din Charoli Marathi

मित्रहो, वरील लेखात आपण शिक्षक दिनानिमित्त चारोळ्या मराठी मध्ये बघितल्या. वरील लेखात आपण एकूण 100+ चारोळ्या मराठी मध्ये बघितल्या. 05 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन, हा दिवस आपण आपल्या गुरूंच्या प्रती आदर, सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस होय. शिक्षक दिनानिमित्त माझ्या सर्व शिक्षकांना, गुरूंना शत शत नमन!

मित्रांनो आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला जगभरातून भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Leave a Comment