लिंग व त्याचे प्रकार | ling olkha in marathi | ling information in Marathi 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

ling olkha in marathi नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात ling information in Marathi लिंग व त्याच्या विविध प्रकारांची सखोल माहिती बघणार आहोत. या लेखात आपण लिंग म्हणजे काय? लिंगाचे प्रकार किती व कोणकोणते? लिंग ठरविण्याच्या सामान्य पद्धती आणि लिंगभेदामुळे नामांच्या रूपांत होणारा बदल अशा सर्व बाबी आपण या लेखात पाहूया.

लिंग म्हणजे काय?

नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्ही पैकी कोणत्याही जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात.

मनुष्य प्राण्यात काही पुरुष असतात, तर काही स्त्रिया असतात. इतर प्राण्यांमध्ये हा फरक आपण नर व मादी अशा शब्दांनी करतो. प्राणीमात्रात पुरुष-स्त्री, नर-मादी असा भेद आपण करतो तो त्याच्या लिंगावरूनच. लिंग याचा अर्थ खून किंवा चिन्ह असा आहे.

लिंगाचे प्रकार | Lingachi mahiti marathi

मराठीत तीन लिंगे म्हणतात. Lingachi mahiti marathi.

  1. पुल्लिंग
  2. स्त्रीलिंग
  3. नपुंसकलिंग

पुल्लिंग

प्राणीवाचक नामातील पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुरुषलिंगी, पुंलिंगी किंवा पुल्लिंगी असे म्हणतात.

उदा. चुलता, शिक्षक, घोडा, चिमणा, मुंगळा इत्यादी.

स्त्रीलिंग

स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना स्त्रीलिंगी असे म्हणतात.

उदा. चुलती, शिक्षिका, घोडी, चिमणी, मुंगी इत्यादी.

नपुंसकलिंग

निर्जीव वस्तू वाचक शब्दावरून पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही अशा शब्दाला नपुंसकलिंग असे म्हणतात.

उदा. पुस्तक, दगड, शहर, शाही, कागद वगैरे.

अशा शब्दांना खरे तर नपुंसकलिंगी असे म्हणावयास पाहिजे, पण मराठी भाषेच्या व्यवहारात प्रत्यक्ष असे होत नाही. यातील दगड, कागद हे पुल्लिंगी दौत, शाही हे शब्द आपण स्त्रीलिंगी मानतो.

लिंग ठरविण्याच्या सामान्य पद्धती

  • सामान्यतः आकारांत नामे पुलिंगी ईकारांत नामे स्त्रीलिंगी तर एकारांत नामे नपुंसकलिंगी असतात.
  • सजीव प्राण्यातील एखादा नर आहे किंवा मादी आहे, हे निश्चित सांगता येत नसेल, तर त्याला नपुंसकलिंगी मानून त्याचा उल्लेख ‘ते’ या शब्दाने करतो. उदा. ते कुत्रे, ते वासरू, ते पाखरू इत्यादी.
  • निर्जीव वस्तूंच्या बाबतीत त्या वस्तूंच्या नामांच्या मागे हा-ही-हे, तो-ती-ते हे शब्द वापरून आपण लिंग ठरवतो.

उदा.

पुल्लिंगस्त्रीलिंगनपुंसकलिंग
तो वाडा ती इमारत ते पेन
तो भात ती भाकरी ते तेज
तो टाक ती लेखणी ते वरण
तो दिवा ती पणती ते घर
लिंगाचे प्रकार

लिंगभेदामुळे नामांच्या रूपात होणारा बदल

1. काही ‘आकारांत’ पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप ‘ईकारांत’ होते व त्याचे नपुसकलिंगी रूप ‘एकारान्त’ होते.

पुल्लिंगस्त्रीलिंगनपुंसकलिंग
मुलगा मुलगी मुलगे (मूल)
कुत्रा कुत्री कुत्रे
पोरगा पोरगी पोरगे (पोर)
घोडा घोडी घोडे

2. काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास ‘ईण’ प्रत्यय लागून त्यांची स्त्रीलिंगी रूपे होतात.

पुल्लिंगस्त्रीलिंग
वाघ वाघीण
सुतार सुतरीण
माळी माळीण
कुंभार कुंभारीण
हत्ती हत्तीण
लोहार लोहरीण

3. काही प्राणीवाचक ‘अकारांत’ पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपये ‘ईकारांत’ होतात.

पुल्लिंगस्त्रीलिंग
तरुण तरुणी
हंस हंसी
वानर वानरी
गोप गोपी
दास दासी
बेडूक बेडकी

4. काही ‘आकारांत’ पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ‘ई’ प्रत्यय लागून त्यांची लघुत्त्वदर्शक स्त्रीलिंगी रूपे बनतात.

पुल्लिंगस्त्रीलिंग
गाडा गाडी
लोटा लोटी
सुरा सूरी
दांडा दांडी
खडा खडी
आरसा आरशी

5. संस्कृतातून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूपे ही ई-प्रत्यय लागून होतात.

पुल्लिंगस्त्रीलिंग
श्रीमान श्रीमती
राजा राज्ञी
भगवान भगवती
जनक जननी
युवा युवती
विद्वान विदुषी

6. काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र रीतीने होतात.

पुल्लिंगस्त्रीलिंग
वर वधू
बाप आई
नवरा बायको
बोकड शेळी
विधुर विधवा
राजा राणी
पती पत्नी

7. मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगातही आढळतात.

पुल्लिंगस्त्रीलिंगनपुंसकलिंग
बाग बाग
हरिण हरिण
पोर पोर पोर
ढेकर ढेकर
वेळ वेळ
मजा मजा

8. परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून सामान्यतः ठरवितात.

पुल्लिंगस्त्रीलिंगनपुंसकलिंग
बूट (जोडा)पेन्सिल (लेखणी)बुक (पुस्तक)
क्लास (वर्ग)ट्रंक (पेटी)

9. सामासिक शब्दाचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते.

पुल्लिंगस्त्रीलिंगनपुंसकलिंग
साखरभात मीठभाकरी गायरान
भाजीपाला भाऊबहीण बाईमाणूस
लक्ष्मीकांत देवपूजा देवघर
मेंढवाडा पुरणपोळी

10. गरुड, टोळ, पोपट, मासा, साप, सुरवंट या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, कीटकांच्या नामाचा उल्लेख पुलिंगीच करतात. तर ऊ, घार, घूस, जळू, पिसू, मैना, सुसर या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, कीटकांच्या नामांचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगीच करतात.

स्त्रीलिंगी शब्द मराठी

  1. पगडी
  2. पोथी
  3. काया
  4. वेळ
  5. मुलगी
  6. पोरगी
  7. इमारत
  8. भाकरी
  9. लेखणी
  10. कुत्री
  11. घोडी
  12. दासी
  13. हंसी
  14. देवी
  15. सुतरिण
  16. कुंभारिण
  17. तेलीण
  18. तरुणी
  19. बहीण
  20. पत्नी
  21. आई
  22. राणी
  23. माता
  24. स्त्री
  25. गाय

नपुसकलिंग शब्द मराठी

  1. मुलगे
  2. पोरगे
  3. पुस्तक
  4. शरीर
  5. कुत्रे
  6. घोडे
  7. ते घर
  8. ते वरण
  9. ते पेन
  10. ते तेज
  11. पोर
  12. बाईमाणूस
  13. दगड
  14. शहर
  15. कागद

सारांश | ling olkha in marathi | ling information in Marathi

मित्रांनो वरील लेखात आपण लिंग व त्याच्या विविध प्रकारांची अगदी सोप्या भाषेत माहिती बघितली. वरील लेखात आपण ling olkha in marathi, ling information in Marathi याबद्दल सखोल माहिती जाणून घेतली. आम्हला आशा आहे की आपल्याला ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल. आमच्या ordar.in या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

लिंग व त्याचे प्रकार, ling olkha in marathi, ling information in Marathi

ling olkha in marathi | ling information in Marathi

Leave a Comment