Informal Letter in Marathi 2023 | अनौपचारिक पत्र लेखन मराठी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Informal Letter in Marathi 2023 | अनौपचारिक पत्र लेखन मराठी – नमस्कार मित्रांनो, पत्र लेखनाचे मुख्य दोन प्रकार पडतात. औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र (Informal Letter) हे होय. आज आपण या लेखात पत्र लेखनाच्या अनौपचारिक पत्र या प्रकारची माहिती व अनौपचारिक पत्र (Informal Letter in Marathi) लेखणाचे 07+ नमुने, उदाहरण बघणार आहोत.

आज आपण या लेखात अनौपचारिक पत्र (Informal Letter in Marathi) म्हणजे काय असते. मराठी विषयाच्या परीक्षेमध्ये 05 ते 10 गुणांना हा प्रश्न नक्की विचारला जातो. अनौपचारिक पत्र (Informal Letter in Marathi) कसे लिहावे याचा उत्तम अभ्यास करुया. त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

अनौपचारिक पत्र म्हणजे काय?

अनौपचारिक पत्र हा पत्र लेखनाचा एक उपप्रकार आहे. अनौपचारिक पत्र आपण आपल्या कुटुंबियांना, मित्र मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना लिहीत असतो. या पत्रातून आपण आपल्या भावभावना, खुशाली दुसर्यांपर्यंत पोहोचवत असतो. अनौपचारिक पत्राचे काही नमुने / उदाहरणे पुढे पाहुयात.

अनौपचारिक पत्र कसे लिहावे?

  1. अनौपचारिक पत्र लिहिण्याचे विशिष्ट असे नियम संकेत नाहीत.
  2. उजवीकडच्या कोपऱ्यात दिनांक, वार, गावाचे नाव लिहावे.
  3. मध्यभागी ओम / श्री असेही लिहावे.
  4. डावीकडे प्रिय, तीर्थरूप, आदरणीय इ. योग्य भावना लिहून पुढे व्यक्तीचे नाव लिहून पत्र लेखनाला सुरुवात करवी.
  5. शेवटी व्यक्तीनुरूप नमस्कार, आशीर्वाद लिहून तुझा/तुझी/तुमचा इ. लिहून समारोप करावा.
  6. पत्रातील भाषा संवाद केल्यासारखी, गप्पा मारल्यासारखी, साधी, सोपी, मनमोकळी असावी.
  7. पत्रातील भाषा वर्णनात्मक, खेळकर, दिलखुलास आपलेपणाची असावी.
  8. पत्रातील भाषा प्रेमळ असावी.

अनौपचारिक पत्राचे नमुने उदाहरण

राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या शिबिरात सहभागी झालेला मुलगा आपल्या वडिलांना आपले अनुभव कळवत आहे असे पत्र लिहा.

उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे राहण्यास गेलेल्या मुलीचे आपल्या आईला पत्र.

सपना पळसकर,
मु. पाथर्डी,
ता. गाणगापूर,
जि. छत्रपती संभाजीनगर,
दिनांक – 20/05/2023

प्रिय आईस,
साष्टांग नमस्कार,

आई तु माझ्यावर खूप रागावली असशील, कारण मी मामाकडे येऊन पंधरा दिवस झाले. तरी तुला पत्र लिहिले नाही. पण मी तुला खात्रीने सांगते की, मी इथे खूप आनंदात आहे. माझी काळजी करू नकोस. मी इथे चांडोळ पक्षाप्रमाणे मुक्त फिरत असते. आम्ही रोज नदीवर पोहायला जातो. आम्ही कॅरम, लपाछपी, लंगडी इत्यादी खेळ रोज खेळतो. रोज वाचन देखील करतो.

इथे मी आनंदात आहे. पण मला घराची, माझ्या मैत्रिणींची, बाबांची आणि छोट्या सोणुची खूप आठवण येते.
सर्वांना मी आठवण केली म्हणून सांग. मी पुढच्या आठवड्यात मामासोबत परत येणार आहे.

तुझी प्रिय मुलगी,
सपना पळसकर.

तुमचा मित्र 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्हा पातळीवर प्रथम आला आहे. मित्र या नात्याने मित्राचा गौरव करणारे पत्र लिहा.

समीर जाधव,
582, गुरू निवास,
राणा प्रताप चौक,
छ. संभाजीनगर,
दिनांक 14/12/2022

प्रिय मित्र अनिल,

मित्रा, अगदी मनापासून अभिनंदन हं तुझे. आजच्या वर्तमानपत्रात मी तुझी बातमी वाचली. तू 400 मीटर धावण्याच्या जिल्हा क्रीडा स्पर्धेत पहिला आलास ना! अटीतटीची झाली म्हणे ती स्पर्धा. पण तू सुरुवाती पासूनच एवढा वेग कायम ठेवलास की, तुझा पहिला क्रमांक अगदी वादातीत ठरला म्हणे.

गेल्या वर्षी हे यश तुला हुलकावणे देऊन गेले होते. तरीही हार न मानता तू वर्षभर कसून सराव केलास. त्याच मेहनतीला हे यश मिळाले. किंबहुना तू आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने हे यश खेचून आणले. म्हणूनच तुझे पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन.

तुझा अभ्यास उत्तम चालू असेलच. तुझ्या आई बाबांना साष्टांग नमस्कार सांग.

तुझाच मित्र
समीर जाधव,
छ. संभाजीनगर.

तुमच्या मित्र / मैत्रिणीस पत्र लिहून नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा द्या.

सुरेश कांबिलकर,
मू. कोळगाव,
ता. हवेली,
जि. बीड.
दि. 01/01/2023

प्रिय मित्र प्रशांत,
सप्रेम नमस्कार.

खूप दिवसापासून तुला पत्र लिहायचे मनात होते. शेवटी आज नवीन वर्षानिमित्त पत्र लिहायला मुहूर्त सापडला. तुला माझ्याकडून येणाऱ्या नवीन वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा! येणाऱ्या वर्षात तुझी सर्व स्वप्न, इच्छा पूर्ण होवोत ही सदिच्छा! तसेच तुझ्या प्रगतीचा आलेख वर्षागणिक वाढत जावो, ही ईश्वरचरणी प्रार्थना…

तुझे आई बाबा कसे आहेत? त्यांना माझा नमस्कार सांग. त्यांना, तुझ्या छोट्या भावाला व आजी-आजोबांना देखील माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढील महिन्यात मी आई-बाबांसोबत तुला भेटायला येणार आहे. तेव्हा आपण खूप धमाल करू. तुमच्या शेतातल्या विहिरीवर पोहायला जाऊ. तुमच्या बागेतील पेरू, मोसंबी, केळी मनसोक्त खाऊ. लवकरच भेटू.

तुझा प्रिय मित्र,
सुरेश कांबीलकर.

तुमच्या मित्राला / मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा.

गौतमी पाटील,
604, गायत्री निवास,
शिवाजी चौक,
पुणे.
दि. 05/03/2023

प्रिय मैत्रीण वृषाली,
सप्रेम नमस्कार.
प्रथम तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

कालच तुझ्या वाढदिवसाचे निमंत्रण पत्र मिळाले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तुझा वाढदिवस थाटामाटात साजरा करणार असल्याचे समजले. माझी 12 वीची बोर्डाची परीक्षा असल्याने मी तुझ्या वाढदिवसाला येऊ शकत नाही. याचे तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी पुढील महिन्यात सुट्टीत तुझ्याकडे भेटायला येईल. तेव्हा आपण खूप मजा करू.

असो, तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुला आयुष्यात जे हवे, ते मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझ्या आई वडिलांना माझा नमस्कार सांग.

तुझी मैत्रीण
गौतमी पाटील
पुणे.

सारांश | Informal Letter in Marathi | अनौपचारिक पत्र लेखन मराठी

मित्रांनो, वरील लेखात आपण अनौपचारिक पत्र लेखन मराठी, अनौपचारिक पत्र म्हणजे काय? अनौपचारिक पत्र कसे लिहावे? अनौपचारिक पत्र लेखन नमुने, उदाहरण बघितले. आम्हाला अशा नाही तर खात्री आहे की आपल्याला वरील अनौपचारिक पत्र लेखन आवडले असेल.

जर आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न आवडला असेल तर हा लेख आपल्या गरजू विद्यार्थ्यांना मित्रांना नक्की शेअर करा. आपले मत आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Leave a Comment